कॅमेरा कोणता खरेदी करायचा ?कॉम्पॅक्ट की एस एल आर ?
आपल्याला प्रकाशलेखनाची उर्फ फोटोग्राफीची उर्फ छायाचित्रणाची आवड बहुतेकाना असते. त्यापासून मिळणार्या फोटोच्या गुणवत्तेची प्रत्येकाची अपेक्षाही वेगवेगळी असते व या छंदावर पैसा तरी किती उधळावा याचीही प्रत्येकाची तयारी वेगवेगळी असते. बाजारात फक्त ४ एक्स च्या डिजिटल झूमपासून ते ४२ एक्स च्या ऑप्टीकल झूमपर्यंत आवाका असलेले कॅमेरे विकत मिळतात. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे कॅमेरे मिळतात .
ते प्रकार म्हणजे १) कॉम्पॅक्ट कॅमेरे २) एस एल आर उर्फ सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरे
. व्यावसायिक फोटोग्राफऱ हा पहिल्या प्रकारच्या कॅमेर्याकडे ढुंकूनही बघत नाही.त्याचे कारण काय असावे असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे कारण आपले कॉम्पॅक्ट कॅमेरे वापरून व फोटोशॉपसारख्या फोटोएडीटरचा वापर करून आपणही थोडेफार काही काम व्यावसायिक फोटोग्राफरसारखे करून शकतो.मग त्याच्याकडे असणार्या त्याच्या खास एसेल आर कॅमेर्याचाच आग्रह तो का धरीत असतो हे आपण जाणून घेउ परिणामतः आपल्यापैकी ज्याना शक्य असेल त्याना एसेलआर वर पैसाही खर्च करता येइल.
या दोन्ही प्रकारच्या कॅमेर्यात तीन मूलभूत फरक आहेत. ते असे
१) दर्शन खिडकी तंत्र २) अधिकाधिक भिंगे बसविण्याची सोय ३) चित्र "बद्ध" करणार्या डिजिटल संवेदकाचे आकारमान
१) कॉम्पॅक्ट प्रकारच्या कॅमेर्यात सम्वेदक व दर्शन खिडकी हे एका जागी नसतात त्यामुळे दर्शन खिडकीतून दिसणारे चित्र हे संवेदकावर येणार्या चित्रापेक्षा वेगळे असते, काहीसे कापलेले.
तसे एसेलआर मधे ही संवेदक व दर्शन खिडकीची जागा वेगवेगळी असते पण त्यात दोन्ही ठिकाणी दिसणारी चित्र सारखी असतात कारण संवेदकाच्या समोर भिंगाला ४५ अंश कोन करील असा आरसा असतो. त्याच्या वर एक लोलक वसविलेला असून तो लोलक आरशात पडणारे चित्राचे प्रतिबिब जसेच्या तसे दर्शन खि़डकीकडे पाठवतो. फोटो काढण्याची कळ दाबली की आरसा वर उचलला जाउन भिंग व संवेदक यांची " नजरानजर" होऊन चित्र संवेदकावर पडते व साठवले जाते.
२) कॉम्पॅक्ट प्रकारच्या कॅमेर्यात ठोसपणे जोडलेले भिंग असते त्याच्या मर्यादेत ते पुढे मागे होऊन झूम होते. एसेलार मधे मात्र स्वतंत्र पणे हेतू अनुसार वेगवेगळी भिंगे जोडता येतात. त्यामुळे अगदी लांब असणार्या (उदा चंद्र) वस्तूच्या फोटोसाठी यात खास प्रकारचे टेले -भिंग तसेच जवळच्या फोटो साठी वाईड-भिंग जोडता येते.
३) संवेदकाचे आकारमान कॉम्पॅक्ट प्रकारच्या कॅमेर्यात जेवढे असते त्यापेक्षा एसेलआर मधे मोठे असते सबब फोटोतील बारकावे अधिक दिसू शकतात. या संवेदकाचे आकारमान मोठे असल्याने प्रकाशाची संवेदना असणारी अधिकाधिक केंद्रे एसेलार मधे असल्याने कमी प्रकाशात फोटो घेऊन सुद्धा चित्रातील रंगीबेरेंगी ठिपके येण्याचे प्रमाण एसेलार मधे कमी असते. त्यामुळे इमारती अंतर्गत घेतलेल्या प्रकाश चित्रांच्या छपाईत हा दोष कमी दिसतो. व्यावसायिक फोटेग्राफर लग्न मुंजीत अशा प्रकारची फोटोग्राफी करून अल्बम तयार करतात. आता आले ना आपल्या लक्षात ते एसेलाआर च्या एवढे प्रेमात का पडलेले असतात ते ?
काही फायदे कॉंम्पॅक्ट चे -
१) आकाराने लहान वजनाने हलके त्यामुळे जवळ बाळगायला सोपे २) निरनिराळे सृजनात्मक प्रकाशचित्रे तयार करण्याच्या सोप्या सोयी. ३) किमती कमी त्यामुळे सर्वसाधारण जनतेस परवडणारे ४)आरसा नसल्याने तो जॅम होऊन कॅमेरा बंद पडण्याची भीती नाही.
काही तोटे कॉंम्पॅक्ट चे - २) अधिक भिंगे लावता येत नाहीत. ( काही किमती कॉंम्पॅक्ट मधे ही सोय असते ) .फोकस हवा असे क्षेत्र कमी मिळते त्यामुळे फोटोचा विषय व बाकीच्या गोष्टी यात बाकीच्या गोष्टी नाईलाजाने फोटोत फोकसमधे घ्याव्या लागतात.( मॅक्रो मोडमधे फुलांचे फोटो घेताना काही प्रमाणात फोटोचा विषय सोडून इतराना डिफोकस करता येते. ) खास पोट्रेट टाईपचे फोटो काढताना अडचणी निर्माण होतात.
काही फायदे एसएलार चे -१) रॉ फॉरमॅटमधे फाईल्स तयार करता येतात यात जास्त माहिती असते व नंतर स्वता: फोटेग्राफर आपल्याला हवी तशी जेपीईजी ( कॉप्रेस्ड) फाईल तयार करू शकतो.( रॉ फॉर्मॅट आता किमती कॉम्पॅक्ट मधेही मिळतो)
२) कमी फोकस क्षेत्र निर्माण करता येत असल्याने आपल्याला हव्या असलेल्या विषयाच्या अलीकडील व पलीकडीत वस्तू डिफोकस करून फोटो -विषयाकडे लक्ष खेचून घेता येते. ३) बाह्य फ्लॅश दिवा वापरता येऊन प्रकाश पडण्याचा कोन बदलता येतो.व फ्लॅश विषयाच्या जवळही नेता येतो. ( काही भारी कॉंम्पॅक्ट मधेही ही सोय असते. ) ४) पूर्ण मानवी नियंत्रण फोकस, प्रकाश, वेळ यावर ठेवता येते. व ३० सेकंदा पेक्षाही मोठ्या एक्स्पोजरला वापरता येते. (याचा उपयोग रात्री चांदंण्यातील निसर्गाचा ( न हलणार्या गोष्टींचा) फोटो काढण्यासाठी होतो.) आपले समाधान होईपर्यंत हाताने भिंग पुढे मागे करून योग्य तो फोकस मिळविता येतो. ५) स्नॅपचे बटण दाबल्यानंतर शटर उघडण्यास कॉंम्पॅक्ट च्या मानाने तुलनात्मक कमी वेळ लागतो त्यामुळे क्षणिक प्रतिक्रियांचा फोटो काढताना फायदा होतो. ( उदा. लग्नात घास देतानाचा फोटो. )
काही तोटे फायदे कॉंम्पॅक्ट चे - १) मोठा संवेदक त्यामुळे त्यास साजेशे मोठे भिंग यामूळे भिंग व संवेदक दोघांवर होणारा खर्च वाढतो. वजन वाढते. २) आरसा, लोलक व मोठी भिंगे यामुळे कॅमेर्याचे वजनात वाढ सबब इकडून तिकडे सहजपणे कॅमेरा नेता येत नाही. ३) यास लागणारी अतिरिक्त भिंगे महाग त्यामुळे एकूणच खर्च वाढतो.
थोडक्यात आपण काय शिकायचे .- ज्यात फोकस ला वाव असेल , कमी प्रकाशात चित्र घेतल्यास त्यात येणारे टिपके कमी करणारा संवेदक असलेला थोडीसी किंमत जास्त असलेला कॉंम्पॅक्ट कॅमेरा आपण घेतल्यास एसएलार च्या जवळपास जाणारी फोटोग्राफी करू शकतो. पण आपण पक्षी निरि़क्षक,फुलवेडे , जंगल वेडे असू तर एसेलाआर ला जवळ करावे अर्थात खिसा काय म्हणतो हे त्याला विचारून !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कॅमेरा कोणता खरेदी करायचा
अगदी असेच
http://www.misalpav.com/node/
लेख आवडला...
शुक शुक मन्या
उत्तम माहिती. धन्यवाद.
यामुळे म्हणजे कशामुळे रे भाऊ
>>यामुळे म्हणजे कशामुळे रे
हॅ हॅ हॅ!
छान माहिती.....
उपयुक्त माहिती. चला आता एखादा
याचबरोबर कॉम्पॅक्ट अन
माझ्या माहितीप्रमाणे
सध्या मिररलेस कॅमेर्यांचे
एस एल आर घेताना
बरोबर
अगदी .. अगदी.. आत्ता घ्यायचा
(No subject)
.
छान माहिती
चांगली माहिती, धन्यवाद. पण
शोध
या धाग्यालाच अपडेट करीत आहे.
मला काहीच कंटेंट दिसत नाहिये.
अनेक प्रतिक्रीया दिसत नाहीत .
Nikon P510
कॉम्पॅक्ट की एस एल आर
Panasonic Lumix DMC-FZ१५० चे फोटो
वाह...
>> खरे श्रेय तर फोटो काढणार्
काका तुम्हाला कॅमेरा कशाला
हे कोणत्या काकोबाला उद्देशून ?