माणसे जोडणे ...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
19 Dec 2014 - 12:49 pm

आपण "माणसं जोडण्याच्या" मोठमोठया गोष्टी करतो आणि नेहेमी त्याची महती गात असतो.
आपण मित्र जोडतो, इतर सहकारी जोडतो.

पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही?

बाहेरची माणसे जोडतांना आपण त्यांना गुणदोषांसकट स्वीकारतो पण नात्यातील माणसांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या अपेक्षा आणि नियमांच्या खाली दाबून टाकतो आणि आपण स्वतः मात्र आपल्यात बदल करत नसतो. म्हणून ते अवघड आहे.

कुणी म्हणेल की मित्र निवडतांना चाॅ‌ईस असतो, नात्यात नसतो.

पण देवाने तेच तर एक चॅलेंज दिले आहे आपल्याला. ते म्हणजे : नात्यातील रक्ताने आधीच जोडल्या गेलेल्या माणसांना "जोडण्याचे" काम.

बाहेर च्या "सतराशे साठ" माणसांना जोडले तरी घरातल्या "सात आठ" माणसांपैकी एकालाही "जोडता" आले नसले तर काय उपयोग?

कुणी म्हणेल की नातेवाईकांपेक्षा मित्र तरी कामास येतात.

पण हा स्वार्थ झाला. कारण याचा अर्थ आपण बाहेरची माणसे सुद्धा यासाठीच जोडतो की ते उपयोगाला पडतील.

चाणक्य म्हणतो ते मग खरे आहे का? कोणत्याही मैत्री मागे कोणता न कोणता स्वार्थ असतोच. आणि रक्ताचे विविध नाते तरी कुठे वेगळे आहेत? त्यातही आयुष्यभर स्वार्थ असतोच ...

बघा. पटतंय का?

समाजविचार

प्रतिक्रिया

नात्यातले टोचण्याइतके जोडले गेलेले असतात त्यांना टोचणार नाही इतके दूर सारतात आणि अनोळखींना टोचणार नाही इतके जवळ येऊ देतात. प्राण्याच्या पिलांतही हे नैसर्गिक गुण सापडतात. उगाच खोट्या बुरख्यात मेकअप कशाला हवा ?

नित्य नुतन's picture

19 Dec 2014 - 4:04 pm | नित्य नुतन

जिथे मानपान, मालमत्तेत वाटेकरी येतात तिथे मनुष्यस्वभावानुसार हेवेदावे सुरु होतात आणि मग रक्ताची नाती दुरावतात...
तेच जिथे यापैकी काहीच नसते त्या मैत्रीत मात्र लोक बराच काळ स्थिरावतात ... पुढे जाऊन अपेक्षाभंग वगैरे प्रकार त्यातही येऊ शकतात ...

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 5:24 am | मुक्त विहारि

तुम्हाला, "माणसे जोडायचा" काय अनुभव ते लिहा....

बाकी लेखात, चाणक्याचे नांव वाचून समाधान पावलो.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2014 - 7:50 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

उपदेश टाकण्यापेक्षा अनुभव कथन टाकावे.

निमिष सोनार's picture

23 Dec 2014 - 1:31 pm | निमिष सोनार

मी मित्र जोडून त्याना मदत करून विसरून जातो आणि त्यांचे कडून काहीतरी त्या बदल्यात घेण्याचा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2014 - 2:54 pm | अत्रुप्त आत्मा

@मी मित्र जोडून त्याना मदत करून विसरून जातो आणि त्यांचे कडून काहीतरी त्या बदल्यात घेण्याचा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवत नाही.>>> बरं!!! पण मग तेच नम्रपणे लिहा..ना.....! तुमचं आत्मकथन वाचून काहिजणांना तसच वागायची प्रेरणा मिळेल. आणि ते वागतीलंही. हे धाग्यातील लेखन करण्यामागेही तुमचा तोच उद्देश आहे ना??? काय?