HATS ऑफ टू फिलीपिनोज,

झंम्प्या's picture
झंम्प्या in जनातलं, मनातलं
8 Dec 2014 - 8:55 pm

गेली चार दिवस नुसत प्रत्तेक लोकलच नाही तर इंटरनेशनल न्यूज चानेस्ल वर, वृत्तपत्रात, सगळीकडे, एकच चर्चा, “रुबी” (इंटरनेशनल नाव Hagupit) येतंय. त्याच्याशी लढण्यासाठी पिनॉय (फिलिपिनो लोक) सज्ज होत आहेत. ह्या बद्दल बोलण्या अगोदर थोडी या देशाची ओळख करून घेऊयात.

फिलिपिन्स – थोडी ओळख
नैसर्गिक वैविध्यतेने नटलेल फिलिपिन्स हा जवळ जवळ 7,107 लहान मोठ्या बेटांचा समूह. एकूण क्षेत्रफळ ३००,००० स्क़्वेर किमी. एकूण लोकसंख्या १०० मिलिअन (जगातील १२ वा सर्वात जास्त लोक्संखेचा देश, आणि आशियातला ७ वा) आणि, वेगवेगळ्या देशात विस्थापित झालेल्यांची संख्या जवळ जवळ १२ मिलिअन. इथे तुम्हाला वोल्केनो पासून बर्फाळ प्रदेशापर्यंत सगळं पाहायला मिळेल. आता हा बेटांचा देश म्हंटल्यावर सुंदर समुद्र किनारा असणारच हे वेगळं सांगायची गरज नाही. खूप सुंदर अशे समुद्र किनारे, जे पर्यटन स्थळे म्हणून फक्त आशिया खंडातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. पूर्ण जगातून इथे लोक हे निसर्गाच सौंदर्य अनुभवायला येतात. फिलिपिन्स, हा पसेफिक समुद्रातील बेटांचा समूह, भौगोलीक दृष्ट्‍या, उत्तरेला विएतनाम, तैवान, पश्चिमेला दक्षिण चीनचा समुद्र, आणि दक्षिणेस, इंडोनेशिया हे देश. विविध जाती समुदायाचे लोक इथे गुण्या गोविंदाने राहतात. इतिहासात, बर्याच देशांनी इथे स्वार्या करून काही काळ राज्य केलेलं आहे. पण १५४३ मध्ये स्पेनिश शोधकर्ता “रुय लोपेझ दे विल्लालोबोस” ( Ruy López de Villalobos) याने स्पेनचा फिलीप (दुसरा) राजाच्या आदराखातर ह्या देशाच नामकरण फिलिपिनास (Filipinas) असं केल. हेच पुढ फिलिपिन्स म्हणून ओळखलं जाऊ लागल. इथे मुख्यत्वे स्पेनिश लोकांची जरी कॉलोनी होती, तरी नंतरच्या काळात जापान, आणि शेवटी अमेरिका यांनी सुद्धा इथे राज्य केलंय. १९४५ मध्ये दुसर्‍या महायुधानंतर, हा एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. इथे असलेल्या हुकुमशाहीनंतर असलेली लोकशाही, हिस जरी अंतर्गत बंडाची झालर असली तरी, नैसर्गिक वैविध्यता, आणि सामरीक महत्वाच्या दृष्टीने, हा मध्यम शक्तिमान देश म्हणून जगात ओळखला जातो. इथे जरी विविध जाती धर्माचे लोक असतील तरी ख्रिश्चन, चायीनीज आणि दक्षिणेस, मुस्लीम बहुल धर्माचा पगडा जास्त दिसतो. खाण्या पिण्याच्या बाबतीत इथे आपल्याला पश्चिमी संसृतीचा पगडा दिसून येतो. पोर्क, बीफ, सी फूड आणि चिकन हे रोजच्या अन्नाचे अविभाज्य भाग आहेत. इथे बर्याचश्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. अगदी रोजच दूध सुद्धा. इथे चीन हा चिकन निर्यातीत आघाडीवर आहे. (साभार : विकिपीडिया)
ह्या देशात मी जवळ जवळ दीड वर्षांपूर्वी आलो. इथे येण्या अगोदर मी ऑस्ट्रेलियाला ट्रेनिंग साठी दोन महिने होतो. परदेश म्हणजे मनात एक संकल्पना तयार झालेली जीला इथे आल्यावर खूप मोठा धक्का बसला. पण नंतर इथेच आपल्याला दोन वर्ष काढायचीत आणि त्या शिवाय गत्यंतर नाही हे जेव्हा कळाल तेव्हा मग मनाची तयारी केली आणि जुळवून घ्यायला सुरवात केली. मी सध्या मनिला या राजधानीच्या शहरात राहतो. प्रमाणापेक्षा जास्त लोकसंख्या असल्याने, इथे भयंकर गर्दी आणि ट्राफिक चा प्रश्न मोठा आहे. पण वाखान्ण्याची गोष्ट म्हणजे भले खूप वर्दळ असेल तरी त्याला एक शिस्त आहे, हे मानव लागेल.

इथे जरी नैसर्गिक विविधजेच सौंदर्य असलं तरी त्याला भूकंप आणि चक्री वादळाची गडद किनार आहे. ट्रोपिकल देश असल्याने, इथले हवामान हे दमट असेच. अगदी आपल्या मुंबई सारखं. इथे मुख्यत्वे तीन ऋतू, फेब्रुवारी ते मे पर्यंत कडकडीत उन्हाळा. जून ते नोव्हेंबर पर्यंत पावसाळा आणि डिसेम्बर आणि जानेवारी महिन्यात त्यातल्या त्यात थोडी गुलाबी थंडी.

जून ते नोव्हेंबर महिन्याच्या काळात इथे बरीचशी चक्री वादळ येऊन जातात. ह्यांची सुरवात, ही समुद्रात कुठेतरी, कमी दाबाचा पट्टा तयार होऊन, आणि हळू हळू त्याच रुपांतर चक्री वादळात होते. बरेचसे कमी दाबाचे पट्टे जरी चक्री वादळात रुपांतरीत झाले नाही तरी त्यांच्यामुळे जास्त ते अति जास्त पर्जन्यवृष्टी होते. इथे असलेल्या लोक्संखेमुळे, आणि प्रर्थामिक सोयी सुविधांच्या अभावामुळे, साध्या पावसामुळेसुद्धा इथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी. घरात पाणी शिरणं, रस्ते पूर्णपणे, बंद होणे, अशे प्रकार घडतात. पण हे चक्री वादळाच्या धोक्यापुढे अगदी किरकोळच म्हनावे लागतील. पावसाळ्यात कंपन्या, कर्मचाऱ्यांना, तयारीनिशीच यायला लावतात. जर कधी अशी नैसर्गिक आपत्ती आली तर जवळ बेसिक गोष्टी जसे कपडे, ब्रश इ. घेऊनच येण्याचा सल्ला देतात जेणे करून पर्यायी व्यवस्था केली तर प्रोब्लेम यायला नको.

गेल्याच नोव्हेंबर मध्ये, म्हणजे बरोब्बर एक वर्षापूर्वी, इथे Yolanda या अति भयंकर चक्री वादळाने मृत्यूचे थैमान घातले होते. ते एवढे भयानक होते की कल्पना सुद्धा करू शकत नाही. ह्या नैसर्गिक आपत्तीत एकूण ६,३०० लोकांन्ना आपले प्राण गमवावे लागले, तर बरेचशे बेपत्ता झालेत. सांपत्तिक नुकसानीची गणतीच नाही. गावच्या गावं वादळात उध्वस्थ झाली. इतिहासातील आतापर्यंतच हे सर्वात भयंकर वादळ होत. ह्या वादळाची जर कल्पना करायची झाली, तर ताशी, ३१५ की.मी. वेगाने वाहणारे वारे, आणि त्या बरोबर येणारा भयंकर पाउस ( ५०० ते ८०० मिली मी.) काय करू शकतो ह्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही.

योलांडा हे वादळ ज्या मार्गाने, फिलिपिन्स मध्ये मृत्यूचा थैमान घालून गेलं त्याच मार्गावर आता बरोबर एक वर्षांनी दूसर वादळ आलाय. भले ते योलांडा एवढं भयंकर नसलं तरी त्याची तीव्रता ही कुठल्याही, प्रकारे कमी लेखता येणार नाही. जर कमी दाबाचा पट्टा हा ताशी, ११८ ते १४९ की.मी. वादळी वार्याची निर्मिती करणारा असेल तर त्याला “टायफुन” म्हणून संबोधलं जातं तर १९० की.मी. पेक्षा जास्त वार्याची निर्मिती करणार असेल तर त्याला “सुपर टायफून” म्हणून ओळखलं जात. आत्ता आलेलं रुबी हे ताशी, २९० की मी वादळी वार्याची निर्मिती करतंय.
योलांडा च्या वेळी स्थानिक संस्था ह्या अज्जिबात तैय्यार नव्हत्या, त्यामुळे ह्यातून जी जीवित हानी झाली ती खूप भयंकर होती. पण ह्यावेळी स्थानिक संस्थांनी जी पूर्व तयारी केलेली ती खरच वाखाणण्या जोगी होती. चक्री वादळाने प्रभावित होणार्‍या प्रदेशातील जवळ जवळ १,००,००० हून जास्त लोकांच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. ज्यांच करता येणार नव्हत त्यांची पर्यायी व्यवस्था केली. भक्कम सार्वजनिक बांधकामं, प्रार्थना स्थळे इथे त्यांची, खाण्यापिण्याची, तसेच बचाव दलाची व्यवस्था करून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करण्यात आली. येऊ घातलेलं वादळ हे भीषण जरी असेल, तरी न खचून जाता, होईल तेवढी तयारी करून, येणाऱ्या परिस्थितीला निधड्या छातीने सामोरे जाण्यासाठी येथील लोक तैय्यार आहेत. एका वर्षाच्या पेक्षा कमी वेळात येऊ घातलेलं हे अस्मानी संकटाला ते मोठ्या धीराने सामोरे जातायत. ह्या वादळाचे परिणाम हे खूप भयंकर आणि दूरगामी असतात. फक्त जीवाला धोका नसून, जी होणारी वित्त हानी, स्थावर, जंगम, मालमत्ता, शेती, वाडी, प्राणी, ह्याचं होणारं नुकसान हे दूरगामी, आणि भयंकर असत. पण ह्याला इलाज नाही. काही गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही टाळू शकत नाही तेव्हा त्याला समोरं जाण्यावाचून गत्यंकर नसत. पण ह्या अशा गोष्टी जेव्हा जीवनाचा भागच बनून गेल्याने, त्यांना समोर जाण आता सवयीचं झालाय, मेलेल कोमड आगीला जसं घाबरत नाही तसच न कुराबुरता, परत उद्यासाठी तयार राहतात हे पिनॉय लोक. अनेक लोक ह्या वादळात बेघर होतील, आयुष्यभराची कमाई घालून बसतील, पण त्याच वेळी नव्या उमेदीनं भक्कम इराद्याने ते तुम्हाला उद्या पुन्हा उभे राहिलेले दिसतील. ह्या लोकांची सहनशीलता पाहून आपण थक्क झाल्याशिवाय राहत नाही.
त्यांच्या निधड्या निर्धाराला माझा सलाम.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

झंम्प्या's picture

8 Dec 2014 - 8:57 pm | झंम्प्या

इथे मला काही फोटो प्रकाशित करायचे होते, पण तांत्रिक माहिती नसल्यामुळे करता आले नाहीत. कोणाकडून जर थोडी माहिती मिळाली तर बर होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2014 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 12:15 am | मुक्त विहारि

पानो का?

अना पांगालां मो.

फिलीपिन्स मित्र बरेच आहेत. आखाती देशात फिलिपिनो दिसतोच दिसतो.

फिलिपिन्स आणि फिलिपिनो लोकांबाद्दल वाचायला नक्की आवडेल.

मनिला आणि इतर प्रदेशांविषयी तर नक्कीच.शिवाय आखाती देशांत ह्यांचे टोपण नांव वेगळेच आहे.बाद्वे, फिलीपिन्समध्ये "कुत्रा" नामक प्राणी दिसत नाही, हे खरे आहे का?

मंदार कात्रे's picture

9 Dec 2014 - 12:41 am | मंदार कात्रे

फिलीपिन्समध्ये "कुत्रा" नामक प्राणी दिसत नाही, हे खरे आहे का? ;) ...ते कोरिया मध्ये असेल भाउ !

माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे जसे आपण बोकड कापून खातो तसे ते कुत्रा खातात. त्यामुळे कुत्रा दिसत नसावा.

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 5:48 am | मुक्त विहारि

पण बरेचसे फिलीपोनो, लवकर तसे कबूल करत नाहीत.

म्हणूनच धाग्याकर्त्याला विचारले.

शंकानिरसन योग्य माणसांकडूनच घेतलेले बरे.

कंजूस's picture

9 Dec 2014 - 6:41 am | कंजूस

चला पाहुणा म्हणून कोणी आपल्यावर भुकणार नाही.

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 12:04 pm | दिपक.कुवेत

नाकांत का बोलतात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2014 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाकात नाही बोलत.

मात्र फोटो काढताना क्लिक करण्याअगोदर हरएक फिलिपिनो/फिलिपिना न विसरता "पिच्चोर, वन, टू, थ्री" असं म्हणतात :)

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 12:10 pm | मदनबाण

नाकांत का बोलतात?
नाही. माझा मनिलावाल्यांशी रोजचाच संपर्क आहे. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

सामान्यनागरिक's picture

20 Dec 2014 - 2:11 pm | सामान्यनागरिक

मला लवकरच मनिलाला कार्यालयीन मामासाठी जायचे आहे. पण मनिला हे पर्यटनकर्त्यांसाठी चांगले स्थळ आहे असे वाटत नाही. कारण आंतरजालावर पुरेशी माहिती उपलब्ध नाही तसेच टुर कंपन्य तेथे फारश्या टुर करीत नाहीत असे वाटते. जर चांगले असल्यास पत्नीसह जाण्ञाचा ईरादा आहे,

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2014 - 5:03 pm | टवाळ कार्टा

कार्यालयीन मामासाठी >> =))