Calligraphy: मराठी सुलेखन

मदनबाण's picture
मदनबाण in मिपा कलादालन
5 Dec 2014 - 11:02 pm

Su1
स्केच पेन ने देखील सुलेखनाचे वेगळे प्रयोग करता येतात.

Su2

Su3

Su4

Su5

Su6

"अक्षर गंध" या संस्थेचे संस्थापक सुलेखनकार निलेश बागवे {निलेश B+ अशीच स्वतःची ओळख हे करुन देतात. :) }
यांच्या सुलेखनाच्या प्रात्येक्षिकाला मी हजर होतो,तेव्हा काही सुलेखनाचे फोटो काढले होते ते वरती दिले आहेत.स्केच पेन वापरुन सुरु झालेले हे प्रात्येक्षित बोरु पर्यंत चालले,अगदी दाढीचा ब्रश वापरुन सुद्धा हे करता येते. :)
स्वॅप्स यांचे विशेष आभार ! त्याच्या Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता या धाग्यामुळे जवळपास एक-दीड वर्षा पूर्वी काढलेले हे फोटो आठवले आणि इथे द्यावे वाटले. :)

कॅमेरा :- निकॉन डी-१००
*फोटो कंप्रेस केल्यामुळे कलर शेड मधे फरक पडतो.

{हौशी फोटोग्राफर} :)
मदनबाण.....

प्रतिक्रिया

एस's picture

5 Dec 2014 - 11:07 pm | एस

मस्तच. नीलेश B+ यांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. चौथ्या फोटोत ब्रश पकडण्याची जी पद्धत दिसते तशीच मी माझ्या धाग्यात वापरलेली आहे. इथे खूपच तिरकी आहे, नेहमीच्या देवनागरी सुलेखनासाठी साधारणतः ४५ अंशात ब्रश तिरपा धरतात.

संपादक मंडळी वरती माझ्या या धाग्यात "स्वॅप्स " यांच्या नावा ऐवजी "स्पा" असे चुकीचे टंकले गेले आहे त्यात बदल करावा ही विनंती.

एस's picture

5 Dec 2014 - 11:21 pm | एस

चालतंय वो, त्यात काय! :-D

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2014 - 4:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ओळख.

ऋणनिर्देशात तुम्हाला अपेक्षित असलेला नावाचा बदल केला आहे.

खटपट्या's picture

5 Dec 2014 - 11:11 pm | खटपट्या

वा !! जमल्यास अच्युत पालवांच्या वर्कशॉपला हजेरी लावा. अजुन मजा येइल.
मिपावर बरेच जण सुलेखनाचे चाहते आहेत हे बघून आनंद झाला.

चौथ्या फोटोत ब्रश पकडण्याची जी पद्धत दिसते तशीच मी माझ्या धाग्यात वापरलेली आहे. इथे खूपच तिरकी आहे, नेहमीच्या देवनागरी सुलेखनासाठी साधारणतः ४५ अंशात ब्रश तिरपा धरतात.
मला या विषयातले काहीच माहित नाही. माझ्या फोटोच्या अँगलमुळे पण ते तसं दिसत असावं ! [ अर्थात तुम्हाला ते जास्त योग्य माहित असेल. :) }
मला वाटतं निलेश बागवे हे सुलेखनकार अच्युत पालव यांचे शिष्य आहेत,पण या बद्धल खात्रीने सांगत नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)

मुक्त विहारि's picture

5 Dec 2014 - 11:19 pm | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीत पण एकजण ह्या कलेत खूप माहीर आहेत.(आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क परत गंडली.)

बाद्वे, चित्रकला, फोटोग्राफी आणि सुलेखन ह्या कला हातात हात घालूनच चालतात का?

चौकटराजा's picture

6 Dec 2014 - 6:38 pm | चौकटराजा

सुलेखनाची कला किती अगाध आहे याची एक लहानशी झलक म्हणजे वरचे प्रात्यक्षिक. मी आठवण्याचा प्रयत्न केला पण
कमल शेडगे यांच्या नावाबरोबर अच्युत पालव यांचे नाव विसरलो. ते ही ग्रेट आहेत या कलेत !

पैसा's picture

7 Dec 2014 - 1:26 pm | पैसा

धन्यवाद बाणा!

नाखु's picture

7 Dec 2014 - 4:14 pm | नाखु

सुलेखनाची कला बी जी लिमये

मदनबाण's picture

7 Dec 2014 - 5:00 pm | मदनबाण

@ एक्का काका
धन्यवाद... :)

@ नाद खुळा
दुव्या बद्दल आभारी आहे. :)

सर्व मंडळींना धन्स ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }

खटपट्या's picture

8 Dec 2014 - 8:41 am | खटपट्या

abcd

नाखु's picture

8 Dec 2014 - 12:16 pm | नाखु

खटपट !!!

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 11:57 am | मदनबाण

@ खटपट्या...
लयं भारी ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

नाखु's picture

9 Dec 2014 - 3:36 pm | नाखु

संदर्भा दुव्याबद्दल बद्दल दोन शब्दः

  • या निर्माण कर्त्याला मराठी कवीता/ओवी रचना यांची चांगली जाण आहे
  • तसेच काही सुलेखन दिनविशेष आणि अनवट बाबींसाठी केले आहे त्याला सलाम
  • माझा या कलाकाराशी अजिबात परिचय नाही.असंख्या अज्ञात वाचकांमधला मी एक वाचक
गणपा's picture

9 Dec 2014 - 5:12 pm | गणपा

बाणा फोटू आवडले रे.
एकंदर मिपावर सुलेखनाचे चहाते आहेत तर.
कुणाला संगणकावर सुलेखन कसं करायचं या बद्दल काही महिती आहे का?
मी प्रयत्न केलाय संगणकावर पण कागदावर हात जितका स्थिर असतो तितका माऊसवर रहात नाही. त्यामुळे अक्षरांची वळणं नीट जमत नाहीत.
जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

लहानपनी चित्रकलेत अक्षरलेखन असायचे, आमच्या मास्तुरे नं फळ्यावर जाड व हडकुळा हे दोन शब्द अशाप्रकरे ऊतरवले कि बासच, रच्याकने, अक्षरांचा उपयोग करुन गणपती काढने/बारीक अक्षरे वापरुन व्यक्तीचित्र बनवने हे यातच येते कि वेगळे आहे?

खटपट्या's picture

1 Apr 2016 - 10:53 pm | खटपट्या

मी केलेला एक प्रयत्न !!
abcd