युरेका

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
4 Dec 2014 - 1:07 pm

न्यूटन पास्कल Bohr सारे शाळेमध्ये भेटले होते
काही कळले काही घोकले तर काही बिनधास्त ठोकले होते .
पुन्हा कधी भेटतील असे स्वप्नी देखील नव्हते वाटले
पण नको तेव्हा नको तिथे माझ्या आठवणींचे तारु सुटले
तिच्याभोवती पोरांची झुंड जेव्हा फिरत असे
bohr चे मॉडेल माझ्या डोळ्यासमोर तरळत असे
आपणहून जरी हसली नाही तरी cadbury ची जादू चाले
न्यूटन चा inertia तेव्हा मनामध्ये घोळू लागे
तास तास तिच्यासंगे मिण्टा मध्ये सरून जाई
माझ्या चक्रम डोक्यामध्ये आइन्स्टाईन स्मरून जाई
स्पर्श झाला तिचा जेव्हा वीज अश्शी चमकून गेली
conductivity ची theory एका क्षणात समजून गेली
ओठांवरती ओठ दाबता … विसरलो पुढचं सारं
पस्कलच्या नियमाचं दुसरं उदाहरण कुठचं बरं
पण
एक दिवस तिनं मात्र सॉलिड बॉम्ब टाकला
म्हणे जुना कुणी तिचा मित्र तिला भेटला
'"एकाच वेळी का नाही मी तुझी आणि त्याची " ?
तिच्या निरागस प्रश्नाने झाली माझी गोची
वाद विनवण्या भांडण, even होतो रडलो
शप्पथ सांगतो, तेव्हा मी पुरा पुरा मोडलो.
अजूनही डोळ्यामध्ये एक अश्रू लपला आहे
पण श्रोडींगरच्या मांजराचा अर्थ मला कळला आहे

कविता

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2014 - 1:10 pm | टवाळ कार्टा

व्वा :)

चुकलामाकला's picture

5 Dec 2014 - 9:52 am | चुकलामाकला

:)

सतिश गावडे's picture

5 Dec 2014 - 10:12 am | सतिश गावडे

:)

संचित's picture

5 Dec 2014 - 11:13 am | संचित

श्रोडींगरच्या मांजराचा अर्थ याहून चांगला नव्हता कळला आधी.

सस्नेह's picture

5 Dec 2014 - 11:19 am | सस्नेह

भारी ! *smile*

वेल्लाभट's picture

5 Dec 2014 - 12:08 pm | वेल्लाभट

तर कैच्च माहीत नाही यातलं. पण भा. पो.
छान जमलीय कविता

'"एकाच वेळी का नाही मी तुझी आणि त्याची " ?
लबाड मांजर स्वांग करतय, कस ढ्यांग करतय ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.

प्रसाद गोडबोले's picture

5 Dec 2014 - 3:40 pm | प्रसाद गोडबोले

मला श्रोडिंगरचे मांजर ही काय कल्पना आहे हे माहीतच नसल्याने कवितेचा शेवट कळाला नाही :(

अवांतर : '

"एकाच वेळी का नाही मी तुझी आणि त्याची " ?

तसं पहायला गेलं तर ही एक भन्नाट ऑफर होती भाऊ ;)

याला म्हणतात अँगल! दोघात तिसरा अशी सिचुएशेन बघण्यापेक्षा.... दोघात एक !!

चुकलामाकला's picture

5 Dec 2014 - 4:51 pm | चुकलामाकला

;;;);));;) तीन तिघाडा 'काम' बिघाडा अशी म्हण आहे हो !:)

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2014 - 10:12 pm | टवाळ कार्टा

जमले नाही की अशा म्हणी तयार होतात :P