सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ....!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
21 Nov 2014 - 9:36 pm

सकाळी सकाळी कोठे वेळ असतो
थोडाही मोकळा मोकळा ...?
ठेवायचा असतो चहा
कधी कमी कधी जास्त
साखर मात्र
थोडी इकडे थोडी तिकडे
नंतर असतोच स्वयंपाक
नव-याचा भरायचा असतो डबा
डब्यात थोडेसे हे थोडेसे ते
निघता निघता खिडकीतून बघत बसते
कोप-यावर वळले की मात्र थोडा दम खाते

मग मुलांचे -
थोडे थोडे दटावते मुलाना
कधी धम्मक लाडू देते पाठीला
सुतासारखे होतात सरळ
स्वताला आवरून घेण्यासाठी
थोडी थोडी मदत मात्र घेतात
पोरांचे करता करता जीव मात्र हैराण होतो
त्यांच्या डब्यात त्याना हवे
तेच हवे असते
रोज रोज बटाटा त्यांचे
अगदी फेव्हरेट असते ….

मुले गेली तरी सुटका होते कोठे ..?
सासू सासरे
खाणे कमी असले तरी त्यांनाही चवीचे लागते
कशी बशी मोकळी होते
मग बसते कॉम्प्यूटरवर
काही प्रतिक्रिया आल्याका
कवितेला
तेवढे बघून घेते
बस तेवढेच
घरातला पडलेला पसरा
मग त्याच्याकडेही बघते ….

प्रकाश

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

21 Nov 2014 - 9:47 pm | पाषाणभेद

पका काका ही मात्र नेहमीसारखी नाही वाटली. परकाया प्रवेश झाला नाही.

सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ....!!

हे शीर्षक वाचून "एक्झॅक्टली!" अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली....

स्वामी संकेतानंद's picture

21 Nov 2014 - 10:18 pm | स्वामी संकेतानंद

सकाळी सकाळी कोठे वेळ असतो.... >>>> चटकन " शौचालयात" हे उत्तर आले.... सॉरी हां.. =))

स्वामी संकेतानंद's picture

21 Nov 2014 - 10:19 pm | स्वामी संकेतानंद

कवितेची सुरुवात छान झाली, नंतर कुठेतरी घसरल्यासारखी वाटली. :(