(जिज्ञासू)

आदरणीय ज्येष्ठ विडंबनकार 'खोडसाळ' यांच्या स्वतंत्र कल्पनेवर आधारित रचना 'जिज्ञासू' वाचून आम्हाला विडंबनधर्माला जागणे भाग पडले! Wink
'प्रयत्ने कवितेचे शब्द बदलता' गळलेले 'विडंबन' खाली देत आहोत. त्याला जालगतींकडून यथावकाश सद्गती मिळेलच! Wink

हाती लोटा, सरके नेसू
पळतो परसाकडे जिज्ञासू
विडंबनाचे मर्म समज रे
नुसते मेल्या नकोस हासू
भवभूती अन् गालिब सोडुन
केले आम्ही गुरुजी 'केसू'
ज्याची त्याला कळते आहे
कविता अमुची रक्तपिपासू
शत्रू आम्ही विडंबनाचे
'परप्रकाशी' त्या प्रतिभांचे
कवितेच्या मग सरणावरती
ऊर फोडुनी ढाळू आसू
'कविता कविता' आम्ही खेळू
कोणी बाळू, कोणी काळू
जालावरती सर्वापुढती
विद्वानांची आम्ही ठासू

चतुरंग

हा हा हा!!

रंगाशेठ,
एकदम धुमधडाका लावलाय हल्ली..
अफलातून विडंबन
'प्रयत्ने कवितेचे शब्द बदलता' गळलेले 'विडंबन' Rolling On The Floor Rolling On The Floor
(हसरा) केशवसुमार
स्वगतः रंग्याचे डेरिंग वाढलयं..डायरेक्ट हात आमच्या गुर्जींच्या कवितेला Surprise ..काही खरे नाही Nail Biting

परप्रकाशित

परप्रकाशित माता अपुली
पृथ्वी हे अभिधान तिचे
परप्रकाशित चंद्रहि मोहक
पौर्णिमेस त्या शोभतसे

परप्रकाशित मंगळ जरि तो
कुंडलिला त्याचा ताप
स्वयंप्रकाशित रवि वर असला
तरी ग्रहणे त्याला शाप

तात्पर्यः विडंबन आवडले. प्रकाश कुठून येतोय याची काळजी नको, काय चमकतेय ते बघा.

- सर्किट

खो खो खो

कस्लं हाणलंय!

वाट पाहूनी 'मी' हा थकलो | कित्येक घटका न पळे ||
तिरके बाण असे हे येती | करू काय 'मजला' न कळे ||

म्याच ??

अरे कुणीही म्याच खेळत नाही आज ???

झोपले कारे सर्व कुले वर करून ?

- सर्किट इंगळी

हाहाहाहा

रंगाशेठ,
सगळेच विनर्स मारताय हल्ली Wink छान छान! चालू द्या Smile
(प्रेक्षक)बेसनलाडू

वा!

वा! क्या बात है!

मस्त रे !

एकदम सही रंगाशेठ Smile
>> 'कविता कविता' आम्ही खेळू
>> कोणी बाळू, कोणी काळू
Smile

क्या बात है..

चतुरंग,
आपण एकदमच फॉर्म मध्ये आला आहात सध्या. असेच चालूद्या. खूप खूप मस्त आहे विडंबन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जबरा!!!

चतुरंगशेठ, विडंबन झकास जमले आहे.

आयला भारी

मस्तच विडंबन !

(स्वगतः रंगाराव नवनविन प्रयोग करतायेत मी पण पळतो आता मायबोलीवर कच्चा माल शोधायला Smile )

जालावरती

जालावरती सर्वापुढती
विद्वानांची आम्ही ठासू

हे बाकी छानच रे रंगा! Smile

>> 'कविता

>> 'कविता कविता' आम्ही खेळू
>> कोणी बाळू, कोणी काळू

Rolling On The Floor