शब्दांशी दोस्ती

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
20 Oct 2014 - 7:56 pm

शब्दांनीच जर मैत्री करायची
तर शब्दाना कशाला प्रौढ करायचे
कशाला द्यायची त्यांच्या हातात पंतोजीची छडी
नि उगाच आजोबाची काठी

एवढ्या जुन्या पिंपळ वृक्षाला फुटतेच ना नव्याने पालवी
केशरी छटा असलेल्या कोवळ्या पानांनी
वृक्ष जातोचना सळसळून
पोपट करतातच न मुक्काम भर रात्री त्यांच्या फांदीची उशी करून
झाडांना कशी स्वप्ने पडतात उद्याची
मग कशी दिसते
त्यांच्या अंगावर नव्याने फुलून गेलेली कोवळी पालवी

नव्याने दिसतेचना आभाळ
नव्याने जमतातच ना ढग
तोच पाउस प्रत्येकवेळी नव्याने बरसून जातो
मातीचा तोच गंध नव्याने जाणवून जातो
पहाटचा सूर्य नव्यानेच सापडून जातो

मैत्रीत आपले शब्दही सतत असावेत ताजे ...?
तत्वज्ञानाच्या चौकटीत ठोकून त्याना कशाला टांगायचे येशु सारखे
दररोज ते भेटले पाहिजेत नव्याने
जमेल मला , जमेल तुम्हालाही
फक्त सूर्या सारखे आपणही उगवले पाहिजे नव्याने
थोडे अंतर ठेऊन ..थोडे मोजून मापून
शब्दांचे देखील असतात ऋतू
फक्त जाणवून गेले की नव्याने शब्दांना जाते पालवी फुटून ...

प्रकाश

मुक्तक

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2014 - 9:36 pm | अत्रुप्त आत्मा

कलासिक!!!

*GOOD*

यशोधरा's picture

22 Oct 2014 - 9:15 pm | यशोधरा

आवडली.

कवितानागेश's picture

25 Oct 2014 - 5:28 pm | कवितानागेश

फारच छान. :)