"आज म्हणलं माती व्हावं"

वैभवकुमारन's picture
वैभवकुमारन in जे न देखे रवी...
20 Oct 2014 - 12:31 pm

"आज म्हणलं माती व्हावं"

कुंभाराच्या पोटासाठी
त्याला एक मडकं द्यावं
कधीतरी कोणासाठी
मातीच एक घरट द्याव
........आज म्हणलं माती व्हावं

भिंतीला त्या पुसायाला
पोते-याच फडकं व्हाव
चूल बनून तापलेल्या
तव्याच ते बुडक घ्यावं
........आज म्हणलं माती व्हावं

कोंब कोंब शरीरावर
पिकांची मी माय व्हाव
मूळ घट्ट पकडुनी
पोटात त्याचं पाय घ्याव
........आज म्हणलं माती व्हावं

कुणब्याच्या सुखासाठी
अंगावरी शाण घ्याव
नांगरुनी शरीराला
स्वताच ते प्राण द्याव
........आज म्हणलं माती व्हावं

आकारुनी कुणी मला
देवाचं ते नाव द्यावं
बसुनीया देवळात
मानसाचा खेळ पहाव

.........आज म्हणलं माती व्हावं

मांडणी

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

20 Oct 2014 - 1:23 pm | वेल्लाभट

वाह....... वाह!

वैभवकुमारन's picture

22 Oct 2014 - 11:05 am | वैभवकुमारन

धन्यवाद सर

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2014 - 2:35 pm | माम्लेदारचा पन्खा

मुजोर झालेल्या पक्षांना
त्यांची जागा दाखवून द्यावं
आपल्या पोटात जागा देऊन
आपणही थोडं पुण्य घ्यावं

.......... आज म्हटलं माती व्हावं

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2014 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

येकच नंबर! *i-m_so_happy*

कविता आवडली. शेवटचं कडवं तर फारच!

वैभवकुमारन's picture

22 Oct 2014 - 11:04 am | वैभवकुमारन

धन्यवाद सर

माहितगार's picture

21 Oct 2014 - 5:31 pm | माहितगार

अप्रतीम !!

वैभवकुमारन's picture

22 Oct 2014 - 9:38 am | वैभवकुमारन

धन्यवाद

प्रमोद देर्देकर's picture

22 Oct 2014 - 10:52 am | प्रमोद देर्देकर

वा वा खुप छान

वैभवकुमारन's picture

22 Oct 2014 - 11:04 am | वैभवकुमारन

धन्यवाद सर