गाभा:
आजपर्यंत मिपावर हजारो धागे येऊन गेलेत... त्यातले काही मोजकेच ध्रुवासारखे अढ्ळ झाले....बाकी यथेच्छ पेटवले, उसवले आणि तुडवले गेले.
तर त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय लागतं धागा शतकी करायला? असे शतकोत्सुक प्रचंड प्रमाणात हल्ली ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे हा धागा त्यांना समर्पित आहे.
दुसरा फायदा असा की निदान ह्या निमित्ताने अशा घटकांची एक यादी तयार करून ते विषय थोडे बाजूला ठेवून नवीन विषयांवरही साधक बाधक चर्चा करता येईल कारण बरेच विषय परत येत आहेत आणि त्यामुळे चर्चेला मर्यादा येऊ लागली आहे असे कुठेतरी वाटतयं.
आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत......
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 3:16 pm | यसवायजी
प्रतिसाद क्र. १
15 Oct 2014 - 8:13 pm | माम्लेदारचा पन्खा
चर्चा चालावी कशी ?
15 Oct 2014 - 9:08 pm | यसवायजी
हे बघा.. हा अजुन १ प्रतिसाद. विषय कशाला पाहिजे तुमाला?
(तसा या धाग्यात काय इशय हाय का? तरीबी आले नव्हं ७ पर्तिसाद? आँ? )
(काड्यासारू) SYG :D
15 Oct 2014 - 3:26 pm | टवाळ कार्टा
15 Oct 2014 - 8:44 pm | पैसा
एखादा तडकता फडकता विषय, शाकाहारी-मांसाहारी, पुरोगामी-प्रतिगामी, भाजप-काँग्रेस, ब्राह्मण-इतर, श्रद्धा-अंधश्रद्धा, आयटी-इतर, पुणेकर-इतर वगैरे घ्यावा. त्यात एखाद्याला झोडपून काढावे,
नाहीतर आपला कंपू करून एखाद्यावर हल्ला चढवावा
नाहीतर तीव्र रागाने विडंबने पाडावीत आणि प्रतिसादातून वैयक्तिक हल्ले करावेत (हे स्वतःच्या जबाबदारीवर करा. तुमचे आधीचे अपराध असल्यास आयडी बळी जाऊ शकतो.)
नाहीतर ..... बरेच घटक आहेत हो!
इथले सगळेच यक्षपर्ट आहेत. म्या पामराने काय सांगावे!
15 Oct 2014 - 9:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
गांधीबाबांना विसरल्याबद्द्ल अतितीव्र णिषेध आणि जेवायची वेळ होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण =))!!!
15 Oct 2014 - 9:17 pm | सुहास..
होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण >>
धन्यवाद , पण १८ हाच आकडा का निवडलात ;) , काय निकष आहेत त्या मागे , काही विदा उपलब्ध आहेत का , काही ऐतिहासिक पुरावे आहेत का, काही लिंका आहेत का , तिकडे परदेशात ही १८ हाच आकडा निवडला जातो का , काही एकावर आठ च्या ऐवजी आठावर एक केल्यास काय शक्यता निर्माण होवु शकते, अशी एखादी नवी पाकृ ही आहे का, माझ्या मामाच्या , तिसर्या मावशीची पुतणीची काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव, तसेच काही आपल्या उपोषणाबाबत आहे का ;)
;) ;)
( कोण म्हणत १८ वरून शंभर नाय करता येत ;) )
16 Oct 2014 - 9:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कारण माझी जेवायची वेळ अंदाजे १८ मिनिटांनी होती ;)...परदेशातलंं काय माहीत नाही बॉ. बाहेर गेलो नाही अजुन. (प्रतिसादामधे आयटी ऑनसाईट विरुद्ध देशी मेकॅनिकल विंजिनिअर चं पोटेन्शिअल लक्षात आलेलं आहे आणि कदाचित हा एक प्रतिसाद सुद्धा १०० मारु शकतो).
तुमच्या मामाच्या , तिसर्या मावशीच्या पुतणीच्या काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव असं आहे का नाही माहित नाही. पण माझ्या शेजारच्यांच्या सासुबाईंच्या नणंदेच्या मावसबहिणीच्या सुनेच्या मोठ्या दिराच्या मावशीचे मिस्टर असंचं करतात म्हणे ;) =))
16 Oct 2014 - 9:40 am | अत्रन्गि पाउस
लिंका नासा वगैरेच्या अधिकृत संकेत स्थालावारील्च हव्यात ....
15 Oct 2014 - 9:20 pm | टवाळ कार्टा
पाशवी शक्ती राहिल्या की ;)
15 Oct 2014 - 9:37 pm | पैसा
कित्ती पण काड्या टाका. जाने देव, बच्चा हय म्हणून सोडून देतात.
(बास का? बॅट्या, ये आता. तो आला की एकटाच ५० प्रतिसाद देईल.)
16 Oct 2014 - 8:05 am | सतिश गावडे
याही धाग्यास शतकी करण्याच्या हेतूने ब्याट्याला डीवचण्याचा तुमचा हेतू लक्षात आला बरं.
16 Oct 2014 - 11:55 am | पैसा
सोदाहरण प्रात्यक्षिक म्हणतात याला. योग्य व्यक्तीला डिवचणे आणि योग्य जागी काड्या टाकणे अत्यंत महत्त्वाचे असते! ;)
16 Oct 2014 - 12:15 pm | प्रभाकर पेठकर
योग्य जागी काड्या टाकणे>>> *lol*
16 Oct 2014 - 11:40 am | बॅटमॅन
काय ओ पाशवी तै? माझी सुखनिद्रा बघवत नाय का तुम्हांला आँ?
16 Oct 2014 - 11:52 am | पैसा
इलियड पुरे कर.
15 Oct 2014 - 10:06 pm | माम्लेदारचा पन्खा
इतके दिवस इथे आहे पण काही कळलं नाही ब्वा....
15 Oct 2014 - 10:09 pm | पैसा
पूर्वी एक लै फ्येमस कंपू होता म्हणे. हल्ली कोण आहेत का काय म्हैत नै. पण तुम्ही स्वतःचा सुरू करा ना! हाकानाका! मी कित्ती दिवस प्रयत्न करतेय, पण संपादक म्हणून लोक वाळीत टाकतात! :P
15 Oct 2014 - 10:18 pm | माम्लेदारचा पन्खा
इन्स्पेक्टरनंच टोळीबाजीला प्रोत्साहन दिल्यासारखं वाटतंय..
रच्याक ने....एकदम अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा कुठ्ला कंपू तिकीट देतोय का ते बघू.....
16 Oct 2014 - 6:02 am | जेपी
सध्या पुणे पिंचीं वाल्यांचा कंपु आहे त्याला काही गोवेकरांचा पाठिंबा आहे.*wink*
मी स्वत:चा कंपु तयार करत आहे. तुम्हाला यायचे असेल तर येलकम. *wink*
एकदा कंपु झाला की शतक काय द्विशक पण होईल.
(लावली काडी)
16 Oct 2014 - 7:38 am | टवाळ कार्टा
तुम्ही "मी पयला" कंपु सुरु करताय काय? ;)
16 Oct 2014 - 7:48 am | जेपी
'मी पयला' हि संघटना आहे चळवळ आहे.
त्याचे सदस्य कधिच कंपुबाजी करत नाहित.उलट कंपुबाजीला बळी पडतात. *wink*
16 Oct 2014 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा
@उलट कंपुबाजीला बळी पडतात.>>>
15 Oct 2014 - 10:59 pm | रेवती
निवाशी- अणिवाशी र्हायला का!
कोन्ची पॅथी चांगली? हा एक आहे.
आठवले तर अजूण लिहीन.
15 Oct 2014 - 8:59 pm | सुहास..
पण कशाला ?
चार चांगली वाक्ये लिहुन चारच प्रतिसाद घेतले तर काही वाईट होणार आहात का ? की दोन चपात्या कमी जाणारेत ;)
15 Oct 2014 - 9:03 pm | प्यारे१
असं कसं असं कसं???????
मग लोकांना कळणार कशी आपली लोकप्रियता? च्यामारी लोक येऊन येऊन सांगून जायचे.
'झगा मगा मला बघा' म्हणून.
15 Oct 2014 - 9:08 pm | सुहास..
'झगा मगा मला बघा' म्हणून. >> अरे ते तसं नव्हते " मला पहा आणि फुले वहा " असे होते ;)
15 Oct 2014 - 9:32 pm | प्यारे१
मी सामान्य : गल्लीच्या बाहेर गेला का हो कधी? म्हणे मला पहा आणि फुले वहा.
आतापर्यंत तेच तर करा म्हणताय की तुम्ही. आँ? मला सांगताय. :-/
मी समीक्षक : आपल्या सीमित समाजजीवनाच्या अनुभव परिपेक्षामध्ये वावरताना स्वअनुभवा पलिकडं असलेलं एक अपरोक्ष अवकाश आहे आणि ह्या अवकाशामध्ये असलेल्या अनेकविध सामाजिक घटकांच्या मुखी असलेलं भाषेचं वेगळं अलंकृत रुप आपण नाकारत असू तर त्याबद्द्ल स्वतःलाच दोष देऊन, स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादा कबूल करुन स्वतःचा उमपर्द करणं ईष्ट. अर्थात तेवढंच करुन ते थांबायला हरकत नाही स्वतःच्या अल्पानुभवाच्या कूपामध्ये . पुन्हा एकदा असा परोक्ष अनुभव शवण होईपर्यंत. अन्यथा स्व मर्यादांच्या कुंपणाला धैर्या च्या कणखर बाहूंनी झुगारुन देऊन पंखांमध्ये बळ भरुन समाजविश्वामध्ये उत्तुंग भरारी घेण्याची तयारी करावी.
असो! जरा घाई मध्ये आहे.
(ओव्हर टु वाश्या)
16 Oct 2014 - 1:35 am | खटपट्या
वरील "मी समीक्षक" म्हनून जे काय लिवलय, त्येचं इश्लेशण का काय म्हनत्येत त्ये करायची सुपारी घ्या कोनीतरी...
16 Oct 2014 - 6:18 am | स्पंदना
सुपार्या कसल्या देताय? ह्या असल्या खंग्री भाषेला आडकित्ता गरजेचा राव!!
15 Oct 2014 - 9:58 pm | स्वप्नज
धाग्याचे शतक व्हावे असे वाटत असेल तर "हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ...." असा एखादा धागा काढावा ..... ह.घ्या.
15 Oct 2014 - 10:57 pm | लॉरी टांगटूंगकर
http://www.misalpav.com/node/27847
हा आमचा धागा याच विषयाला समर्पित होता.
16 Oct 2014 - 12:14 am | रामपुरी
बायकांना स्वयंपाक आला(च) पाहिजे(च) का? हा विषय घ्या. माझ्यामते तो मिपावरचा पहिला द्वि की त्रि शतकी धागा आहे. बरेच दिवस झाले. जरा फुंकर घातली कि पेटायला वेळ लागणार नाही.
बायकांचे कपडे कसे असावेत हा विषय घेतलात तरी हरकत नाही.
हे अतिशय ज्वालाग्राही विषय आहेत. सबब प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा...
16 Oct 2014 - 2:01 am | प्यारे१
नुस्त्या नै कै, ऐटीतल्या. आयटीतल्या पण म्हणतात काही जण.
16 Oct 2014 - 3:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही एक जुनी पाककृती आहे. वेळ असेल तर विकान्ताची वाट न पाहताच करून पहा -
(आपल्याच) धाग्याचा खफ
16 Oct 2014 - 7:51 am | नानासाहेब नेफळे
'समग्र नानाविचारामृत' ग्रंथ वाचल्यास धागे शतकीच काय सहस्त्रकी होतील.
16 Oct 2014 - 9:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपाची बॅंडविड्थ लिमिटेड आहे नाना, माईंना नमस्कार सांगा बाकी :)
16 Oct 2014 - 9:43 am | मदनबाण
स्त्रीयांचे ड्रायव्हिंग { अत्यंत ज्वालाग्रही विषय :) }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
16 Oct 2014 - 2:54 pm | टवाळ कार्टा
फलज्योतीष / पत्रिका / मुहुर्त राहिले की
16 Oct 2014 - 2:33 pm | vikramaditya
पत्रिका, मुहुर्त... वगैरे...
आणि हो, मला अध्यात्मातील काही कळते असे फक्त कोणी म्हणुन तर बघा...मग काय मौजा ही मौजा!
16 Oct 2014 - 2:43 pm | इरसाल
ख र ड फ ळा.
पब्लिक हल्ली जाम चेकाळायला लागलेय.
माझं डुआयडी पासवर्ड असलेलं एक्सेल शीट हरवलय रिकव्हर कस करायच ?
बर ते रिकव्हर करताना आजच्या युगातील स्रीयांना स्वयंपाक करता येतो काय ?
16 Oct 2014 - 7:21 pm | मुक्त विहारि
त्याच डू आयडींनी एकमेकांना प्रतिसाद देत रहायचे...
मिपा सलामत, तो डू आय.डी. पचास..
17 Oct 2014 - 12:52 pm | माम्लेदारचा पन्खा
धन्य ते मिपाकर आणि धन्य ते विषय.....
दंडवत स्वीकारा.....