राजगड

स्पा's picture
स्पा in भटकंती
8 Oct 2014 - 12:10 pm

टीप : राजगड बद्दल इत्यंभूत माहिती किसन ने ह्या धाग्यात दिल्याने परत खोलात मी लिहित नाही :)

तर ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली.
पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता.. :-D. मग वर आलो, वरती धनाजीराव वाकडे स्वागताला होते. मग सुड च्या हातचे फक्कड फवे खाल्ले, वर झकास चाय ढोसला.तेवढ्यात वल्ली यांनी फोन करुन त्यांना एकट्याला टाकुन आम्ही इथे मजा करतोय याचा निषेढ(सॊम्य) व्यक्त केला.जाताजाता ट्रेक ला शुभेच्छा दिल्या.अकराच्या सुमारास आत्म्याचा अणि धन्याचा निरोप घेऊन परत स्वारगेट ला आलो.
सुदॆवाने लगेचच भोर ला जाणारी बस मिळाली.नसरापुर फाटा येईस्तोवर मस्त झोप झाली. फाट्यावर देखिल लगेचच जिपडं मिळालं. घासाघीस करुन चारशे रुपड्यांवर डिल फायनल झालं. वाईट्टच उकडत होतं,मंबईच्या वरताण दमटपणा होता.हि सगळी सांच्याला पावसाची लक्षण दिसत होती.भोसले वाडीत पोचेस्तोवर तीन वाजुन गेलेले होते,गड समोर दिसल्यावर दिल खुष झाला.
१.fgf
मरणाच्या ऊन्हात गड चढायला सुरवात केली.
२.fgf

रस्ता विशेष कठीण नाहीये,पण भयंकर उकाड्यामुळे सतत थांबावं लागत होतं.गडाचे बुरुज दिसायला लागल्यावर मात्र अचानक वातावरण बदललं.समोर तोरण्यावरुन ढगांचे लोट यायला लागले,
३.fgf

४.fgf
५.सूड आणि किसनfgf

६.fgf

७.fgf

८.fgf
दमटपणा अजुन वाढला,गडगडाट सुरु झाला, चिन्ह काही निट दिसत नव्हती, आम्ही तसंच स्वता:ला रेटत वर पळालो.वर जाई पर्यंतच गड ढगात हरवुन गेला.
९. पाली दरवाजा
.fgf

सर्वात आधी पद्मावतीच्या देवळात मस्त कोपरा पकडला.बाकीचे पण बरेच ग्रुप देवळात आडोशाला आले.टाक्यांमधलं गार पाणी पिऊन ताजेतवाने झालो,

१०. फुलं पांघरलेली धरती आणि भरून आलेले आभाळ
.fgf
११.fgf
१२.fgf
१३.fgf
१४.fgf

१५.गडावर उतरलेली सांज
.fgffgf

सुवेळा माची बघण्याचा बेत पावसाने ऊधळुन लावला.दाद्या जोरदार कोसळायला लागला, सोबतीला विजांचा कडकडाट.करण्यासारखे काहि नव्हतेच,देवळात पद्मावतीसमोर दिवाबत्ती झाली,संध्याकाळ दाटून आली
१७.fgf

मस्त गार अंधारात पाऊस ऎकत बसलो.किती महिन्यांनी अशी शांतता मिळालेली होती.फक्कड चहाचा राऊंड झाला.पावसाचा जोर थोडासा कमी झाल्यावर अनवाणीच बाहेर पडलो.वातावरण एकदम बदलुन गेलेले होते.रात्रीच्या जेवणाचे सांगुन टाकले.तिन्हीसांजेला देवीची सुरेख आरती झाली.पाऊस परत वाढलेला होता.तिखटजाळ पिठलं,भाकर्या,ठेचा,दही,भात,असा दणकुन बेत होता,बेक्कार हाणलय सर्वांनी,गप्पा मारायचेही त्राण नव्हते,साठेआठलाच झोपुन गेलो.
सकाळी पाचला ऊठलो,कडक थंडी पडलेली होती.फ्रेश होऊन गड भटकायला निघालो.

१८.fgf
१९.gg
२०.आजूबाजूचा परिसर धुक्यात लपेटलेला होता .
.fgf
२१.fgf
२२.fgf
२३.kj
२४.fgf

सर्वात आधी बालेकिल्ल्यावर कूच केले.थोडासा कठीण असा मार्ग आहे.
२५.fgf
खडा चढ
२६.fgf
२७.fgf
वरून दिसणारे विहंगम दृश्य
२७.fgf
२८.fgf
२९.fgf
वर जननीमंदिर,ब्रह्मेश्वराचे देऊळ,बाजारपेठ, चन्द्र तलाव अजुन काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.
३०.fgf
३१.fgf
३२.fgf
३३.संजीवनी माची
.fgf

वरुन आजुबाजुच्या परीसराचा अप्रतीम नजारा दिसत होता.

३४.fgf
३५.मावळे :)
.fgf
दोन्ही माच्या पाहायच्या राहीलेल्या होत्या ,पण हातात कमी वेळ असल्याने उगाच घाई केली नाही.पाहायचं तर तब्येतीत,या निर्णयावर सगळे आले.खाली आल्यावर दणकुन पोहे खाल्ले.सामान आवरलं, आणि निघालो.गड उतरुन खाली भोसलेवाडीत आलो,खाली जीप कधी येईल विचारले,पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चालत पुढे निघालो.वाटेत एक नदी होती,मग डुंबण्याचा कार्येक्रम झाला,

३६.fgf

३७.fgf

निघालो.पण गाडीचा पत्ता नव्हता,वाझेघर पर्यंत जवळ जवळ चार किलोमीटर ऊन्हात चाललो,

३८. शेतं.
.fgf
तिकडे गेल्यावर समजलं,कोणतरी जीपवाल्यांपेकी स्वर्गवासी झाल्याने आज कोणीच येणार नाही, अडीच ची एक बस येते तीही आलेली नाही.बोंबला .. साडसहाची ईंद्रायणी मिळेल की नाही याची चिंता लागायला लागली,कसाबसा एका तासाने एक टमटमवाला आला,त्याने नसरापुर फाट्यावर सोडले.तिथुन कात्रज दुसर्या टमटमने,कात्रज- स्वारगेट बसने, स्वारगेट-पुणे स्टेशन रिक्षाने असे कसेबसे बरोबर सव्वासहाला ठेसनात पोचलो,धावत धावत गाडी पकडली,रिझर्वेशन नसल्याने झक मारत उभे राहुन कसेबसे रात्री घरी पोचलो.पण राजगडची नशा मात्र काही ऒरच होती, देवळात पडुन ऎकलेला पाऊस अजुनही मनातुन जात नाहीये :-)

त्यातल्या त्यात फोटूग्राफी
रानफुलं
fgf

fgf

fgf

fgf

fgf

प्रतिक्रिया

कहर फोटो अाहेत स्पांडुबा! वर्णनही फोटोंबरोबर अाल्याने वाचायला मजा आली.

जळायला होतं राव अशी वर्णनं वाचुन!या पोरांचं बरंय ठरवलं की निघाले,जिपडं,टमटम कसे पण..मस्त राहतात किल्ल्यावर,मज्जानु लाईफ!!

रच्याकने-सुर्योदयाचा फोटो केवळ अप्रतिम!तू फोटो काढण्यआधी निसर्ग मेकप करुन घेतो बहुतेक!!

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 12:30 pm | बॅटमॅन

हाण तेजायला. राजगडच्या भटकंतीचे धागे कितीही आले तरी शिळे होत नैत. कोणे एके काळी केलेला राजगड आठवला, आता पुनरेकवार जाणे आले...

यसवायजी's picture

8 Oct 2014 - 6:40 pm | यसवायजी

मला बी बोलव गा.

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 6:42 pm | बॅटमॅन

हौदप्पा.

सूड's picture

8 Oct 2014 - 7:07 pm | सूड

यसवायजीचं निकनेम?

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 7:08 pm | बॅटमॅन

हौदप्पा = हो रे.

नन्दादीप's picture

8 Oct 2014 - 12:37 pm | नन्दादीप

लय भारी......

किसन शिंदे's picture

8 Oct 2014 - 12:45 pm | किसन शिंदे

हे झक्कास वृत्तांत आणि फोटोही तेवढेच भारी काढले आहेत. सलग दुसर्‍या वर्षी ऑक्टोबरातच राजगड वारी झालीये, तरी मन अजून भरले नाहीये. वारंवार जायला मिळो हीच इच्छा!

वेल्लाभट's picture

8 Oct 2014 - 12:55 pm | वेल्लाभट

अतिशय जबराट कहर फोटो !!!!!! राजगड पुन्हा पुन्हा पुन्हा जाण्यासारखाच आहे मुळी. वाद नाही त्यात. लवकरच आमचीही वारी व्हावी अशी आशा.... बाकी वर्णन पण कडक्क

धन्या's picture

8 Oct 2014 - 1:00 pm | धन्या

फोटो भारीच आहेत. काही फोटो संस्कारीत वाटले. :)

पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता..

यानंतरही काहीतरी झालं असं ऐकून आहे. ;)

काय ओ काय झालं? सांगा ना गडे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2014 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

@यानंतरही काहीतरी झालं असं ऐकून आहे. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Oct 2014 - 1:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

२-३ वेळा जाउन आलो....पण अजुन ती सुवेळा माची हुलकावण्या देतेय
हा लेख वाचल्यावर आता पुन्हा जाणे आलेच :)

प्यारे१'s picture

8 Oct 2014 - 1:06 pm | प्यारे१

काही फटु (साधारण ५७%) दिसत नाहीयेत.

बाकी फटु आणि वरणन उत्तमच. जियो स्पा आणि मावळे टीम .

काही फटु (साधारण ५७%) दिसत नाहीयेत.

ही टक्केवारी कशी काढली? (न दिसणारे फोटो/एकुण फोटो) * १०० या सुत्राने का?

हो. सुदैवानं ही टक्केवारी आता ९०-९४ % पर्यंत गेलेली आहे. एक दोन फोटोच दिसत नाहीत.
(ह्यावेळी ओपिनियन पोल घेतला ;) )

रोम्ब नल्लारिकाय तंबि दुराय .परवाच आठवण काढली पिंपळाचा पार कुठल्या गावात म्हणून ऑक्टोबरच्या कटट्यावर.तर स्वारी हुती हिकडं पद्मावतीच्या आडुशाला राजगडावर पाऊस बघत.आकछी.कुणी सोडली रे पोडी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2014 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत फोटो भारी खर्रच आवडले.

बाकी पाचव्या फोटोतले किसन / सुड ओळखु आले अजुन बारीक ठिपक्यांचे जरी दाखवले असते तरी ओळखु आले असते. हा हा.

-दिलीप बिरुटे

सर तुम्ही दोन दिवसांसाठी पुण्याला या. आपण असेच एखादया गडावर जाऊ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2014 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यासेठ बरोबर गप्पा रंगतात अशा ट्रेकला नक्की मजा येईल.
या १६ च्या नंतर काही जमतं का ? येतो मी.

-दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत's picture

8 Oct 2014 - 1:45 pm | दिपक.कुवेत

पण काहि दिसत नाहियेत.

प्रभो's picture

8 Oct 2014 - 2:00 pm | प्रभो

मस्त रे!

मधुरा देशपांडे's picture

8 Oct 2014 - 2:04 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम फोटो आहेत. सगळेच सुंदर.

अतिशय देखणे फोटो आले आहेत. १०व्या नंबराचा तर जबराट, मस्त फ्रेम घेतली आहे.

खटपट्या's picture

9 Oct 2014 - 12:03 am | खटपट्या

हेच बोलतो !!

कंजूस's picture

8 Oct 2014 - 3:41 pm | कंजूस

बऱ्याच फोटोत width 640 पेक्षा जास्त ठेवली आहे. फोटो सर्व दिसताहेत. थोडे फोटो कमी करून कलादालनाच्या भिंतीवर लावले तर इकडची हवा जरा मोकळी होईल.

अहो काका त्याने फोटो टाकायचे कष्ट तरी घेतलेत, लोक हातभर धागा लिहीतात आणि टीचभर लिंका देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा हे बरं!! लेखनही इथेच आणि फोटोही इथेच!! अर्थात हे माझं मत झालं. सर्वानुमते काय होईल ते बघा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Oct 2014 - 3:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कहर आहेस लेका, काय फटू आहेत, व्वाह, तो दिवा-उदबत्तीचा तर लैच भारी.. जियो..

झकास्स्स... सगळेच फोटु मस्त आहेत, उदबत्तीचा आणि पाण्यात पोहणार्‍यांचा फोटु तर लयं भारी ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Oct 2014 - 4:45 pm | माम्लेदारचा पन्खा

आम्ही काय फक्त वर्णनंच वाचून आमचा कोळ्सा करुन घ्यावा? ह्ये वागनं बरं न्हवं !

सविता००१'s picture

8 Oct 2014 - 5:01 pm | सविता००१

आणि उत्तम लिखाण. स्पावड्या.. मस्त रे.

सुहास..'s picture

8 Oct 2014 - 5:23 pm | सुहास..

क ह र च !!

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 5:24 pm | प्रचेतस

जबरदस्त.
एकसे सो एक फोटू.

मी एक ट्रेकर's picture

8 Oct 2014 - 5:37 pm | मी एक ट्रेकर

फोटो मस्त आहेत. प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच पाहिजे असा हा किल्ला. राजगडाचा बालेकिल्ला आणि संजीवनी माचीची चिलखती तटबंदी तर अतिसुंदर.

तिमा's picture

8 Oct 2014 - 6:11 pm | तिमा

तरुणवयांत केलेल्या राजगडाच्या दोन ट्रीप्स आठवल्या. वर निवांतपणे राहिल्यामुळे सर्व माच्या आणि बालेकिल्ला बघून झाला होता. पण आम्ही साखर गांवातून गेलो होतो एवढं आठवतं.
फोटो लाजवाब!

काउबॉय's picture

8 Oct 2014 - 6:31 pm | काउबॉय

हेच म्हणतो.

फोटो वृत्तांत मस्त.

बाबा पाटील's picture

8 Oct 2014 - 6:56 pm | बाबा पाटील

अप्रतिम हा एकच शब्द या गडासाठी आहे,३-४ वर्षापुर्वी लेकीला पाठीला बांधुन हा ट्रेक केला होता आता धाकटीला घेवुन परत एकदा गड प्रदक्षिणा करावी लागणार. फोटोग्राफी निव्वळ क्लासिक या सदरात मोडते.

सखी's picture

8 Oct 2014 - 9:59 pm | सखी

येSSSSSस!! राजांचा गड आणि गडांचा राजा! अप्रतिम राजगड...तुमचे फोटो कहर आलेत अगदी! जळजळ झालीये अगदी...

यसवायजी's picture

8 Oct 2014 - 7:22 pm | यसवायजी

सुर्योदय, सांज, माची मस्त.
फोटो आणी वृत्तांत एकदम झकास.

सुबोध खरे's picture

8 Oct 2014 - 7:30 pm | सुबोध खरे

उदबत्तीचा , धुक्याचा आणि पहाटेच्या सुर्योदायचा फोटो प्रचंड आवडला आहे.
एक डोक्यात कल्पना आली. सरळ कारने राजगडाच्या पायथ्याशी गेलो तर? आता असे लटकत प्रवास करण्याचे वय राहिलेले नाही. (एके काळी रेल्वेचा बाथरूम मधून किंवा ३ टियरच्या खालच्या बर्थच्या खाली रेनकोट घालून झोपून ऐन थंडीत सुद्धा प्रवास केलेला आहे).
कार माझी, पेट्रोल माझे अजून चार जण येऊ शकतील. रविवारी सकाळी जायचे आणि सोमवारी दुपारपर्यंत परत यायचे.
कोणी स्वयंसेवक आहेत का ?

स्पा's picture

8 Oct 2014 - 7:34 pm | स्पा

मी आहे :)

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2014 - 8:28 pm | टवाळ कार्टा

मीSSSSSSSSSSS

मुक्त विहारि's picture

9 Oct 2014 - 12:28 am | मुक्त विहारि

डन

ह्यावेळी २च रविवार होते आणि दोन्ही बूक झाले.

आता ऑक्टोबरमधले ३ही कट्टे झाले की, आमचा पुढचा फेब्रुवारीतला कट्टा राजगडवर....

खाणे-पिणे आमच्या कडून...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Oct 2014 - 9:34 am | विश्वनाथ मेहेंदळे

Count me in !!! :-)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2014 - 10:03 am | टवाळ कार्टा

खरे साहेबांची गाडी फुल झाली की :)

मुक्त विहारि's picture

3 Nov 2014 - 4:11 pm | मुक्त विहारि

आपण अजून एक दुसरी गाडी बूक करू या...

हाकानाका...

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Oct 2014 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम फोटो... आम्हीही तिथे घरबसल्या एक चक्कर मारून आलो ! राजगडाचा ट्रेक म्हणजे भन्नाट झाला असणार हे सांगायलाच पाहिजे का ?

तुमचा अभिषेक's picture

8 Oct 2014 - 10:47 pm | तुमचा अभिषेक

एकापेक्षा एक भन्नाट फोटो आहेत !!!!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2014 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा

१० आणि ३१ नंबरच्या फोटूंनी - मार डाला!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/thumbs-up.gif

आवडला...

बोका-ए-आझम's picture

9 Oct 2014 - 9:16 am | बोका-ए-आझम

फोटो काहीच्या काहीच सुंदर आलेत.लेख पण मस्त!

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2014 - 9:22 am | श्रीरंग_जोशी

सुरेख सफर घडवली आहे राजगडाची.

अर्धवटराव's picture

9 Oct 2014 - 10:10 am | अर्धवटराव

क्लास.

सुहास झेले's picture

9 Oct 2014 - 10:18 am | सुहास झेले

कहर... कहर फोटो आलेत राव !!

स्पंदना's picture

9 Oct 2014 - 10:38 am | स्पंदना

जीव गेला फोटु पहाताना.
कला आहे लेका तुझ्या हातात.
बाकि अतृप्त आत्मा येताना अशी हवा बिवा टाईट होते हे माहिती नव्हत.
न्यायच ना त्यांनापण मांडी न मोडता गड चढले असते राव ते.

सौंदाळा's picture

9 Oct 2014 - 2:51 pm | सौंदाळा

+१

आमचे परममित्र स्पा यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेले फोटो टाकण्यासाठी जागा राखून ठेवीत आहे. बरेचसे लिहीलेले आहे तरी फोटो टाकल्यानंतर आणखी थोडे पाणी घालून धागा वाढवण्यात येईल.

मालोजीराव's picture

13 Oct 2014 - 2:25 pm | मालोजीराव

प्र चि १०,२७,३४ एकदम खल्लास रे स्पा, ट्रेक बाकी एकदम झकास झालेला दिसतोय

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Oct 2014 - 5:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

कातिल फोटु,
काही फोटो कॉपी करुन घेतले तर चालतील का?

बाकी त्या चंद्रकोर तळ्यावरची मज्जा परत अनुभवलीत का?

(गरजुंनी किसनदेवांच्या धाग्यातला ६६ नंबरचा फोटो पहावा)

पैजारबुवा,

पैसा's picture

13 Oct 2014 - 5:50 pm | पैसा

कहर फोटो आहेत! लिखाण नेहमीप्रमाणेच!

स्पा भाऊ, अप्रतिम फोटो आणि ट्रेक .. किसन तर एकदम डॉन दिसतोय

स्पा's picture

3 Nov 2014 - 2:56 pm | स्पा

माताय

गणेशा भौंची कमेंट
धन्य जाहलो

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2014 - 4:01 pm | टवाळ कार्टा

त्यांना फोटो दिसले... :)

किसन शिंदे's picture

3 Nov 2014 - 10:11 pm | किसन शिंदे

हायला!! तू रे कुटनं उगवलास आनी??

किल्लेदार's picture

3 Nov 2014 - 10:05 pm | किल्लेदार

नॉंस्टेल्जिक झालो .... मस्त

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Nov 2014 - 3:42 am | निनाद मुक्काम प...

मस्त रे स्पा
एवढेच लिहायचे होते कि परत येतांना गाडीतून उभ्याने प्रवास असण्यापेक्षा लाल डब्यातून बसून आला असता किंवा खाजगी बस नाहीतर शेअर वाहन करून आला असता मुंबई पुणे प्रवस बसून झाला असता.
बाकी गडावर रात्रीचा पाऊस ऐकतांना जी मानसिक शांतता मिळाली असेल ती पैसे बहरून मेडीटेशन क्लासेस मध्ये सुद्धा मिळणार नाही.

नंदन's picture

4 Nov 2014 - 5:39 am | नंदन

लेख आवडला. फोटो तर क्लासच!

पहाटवारा's picture

4 Nov 2014 - 6:06 am | पहाटवारा

१० नम्बर फोटो एक्दम दस्स-नम्बरी आलाय ! बाकिचेहि मस्तच !
-पहाटवारा