प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
4 Aug 2008 - 11:54 pm

माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं
"तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?"
त्यावर तो म्हणाला,
"त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे."
मी त्याला हे ऐकून म्हणालो,
"अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?"
हंसत,हंसत मला म्हणाला,
"आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो.
श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत.
माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी मी जणू हातात हात घालून शिकत होतो.
एकदा मी आणि माझा डॉक्टर मित्र, शास्त्रावर बोलण्याऐवजी श्रद्धेवर चर्चा करीत होतो.आम्ही दोघे भिन्न भिन्न रितीरिवाजात वाढल्याने त्याने मला विचारलं,
"तुला थोडक्यात एका वाक्यात सर्वांत महत्वाची तुझ्या धर्माची अगदी आंतरिक कल्पना सांगायची झाली तर तू ती कशी सांगशील? "
त्यावर क्षणभर मुग्ध झालो आणि जणू नकळत येणार्‍या श्वासाप्रमाणे मी म्हणालो,
"प्रत्येक व्यक्ति अमुल्य असते ही आमची धारणा आहे."
माझं वैदकीय शिक्षण पुरं होता होता माझी रेसिडेन्सी चालू झाली.आणि माझे आध्यात्मीक आयुष्याचे विचार हळू हळू दूर जायला लागले.लहान मुलांचे दुखण्यांचे हाल पाहून त्या दयाशील दयाघनाच्या अस्थित्वाशी माझं मन एक रुपता करू शकत नव्हतं.

एकदा,मी माझ्या राऊंडवर असताना एक जोडपं अत्यंत सद्गदीत होवून आपल्या छोट्याश्या बालकाच्या बेडजवळ त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करताना पाहून,मी तितकाच सद्गदीत झालो आणि आठवतं मला त्यांच्याकडे पाहून मनात म्हणालो,
"काही उपयोग आहे का याचा?"
त्यावेळी मी माझ्या आध्यात्माच्या श्रद्धेशी आणि त्यापासून दूर जाण्यार्‍या विचाराशी दुवा लावायला धडपड करीत होतो.
ज्याक्षणी मी माझ्या विशेष वैद्यकीय ज्ञानाची कसोटी लावत होतो,त्याचक्षणी माझ्या मनातल्या त्या श्रद्धेच्या फाटक्या झालेल्या लक्ताराच्या कडाकडांना शिवण्याचा प्रयत्न करीत होतो.

एकदिवशी माझ्याच प्रांतातल्या एका तज्ञाने मला एका कोवळ्या बालकाला बाहेरून आर्टीफिशीयल श्वास देवून- ते स्वतः श्वास घेवू शकत नसल्याने- कसं श्वास घ्यायला लावायचं ते शिकवलं.
त्यादिवशीच माझ्या आयुष्याला एक कलाटणी आली.दुसर्‍यांचं आयुष्य थोपवणारे ते श्वास, नथोपवण्याची मी जबाबदारी घेतली होती.माझ्या मनातलं ते आध्यात्म जागृत झालं.आता जेव्हां,जेव्हां आजार्‍याच्या श्वासाची उमळ, कान लावून ऐकत असताना, त्यांच्या फुफुसात प्राणवायू दाबूनदपटून घालताना,किंवा त्यांचं ब्लडप्रेशर कमी होत चाललेलं पाहून त्यावर चटकन उपाय करताना, अलगद त्यांचा हात हातात घेवून त्यांची आंसवं पुसताना,अक्षरशः त्यांच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा भास मी माझ्या मनात निर्माण करीत होतो.

मी त्याला विचारलं,
"असं करून तुला काय होत असेल नाही?"
तो म्हणाला,
"कदाचीत काही लोकांना,ही क्षमता एक प्रकारची अंगात आलेली ताकद वाटत असावी.पण मला ती जबरदस्त अबलता वाटत होती.माझ्या लक्षात यायचं की मी अशा पवित्र जागेवर उभा राहून त्या आजार्‍यांना सन्मान देण्यात कमी पडून त्यांच्या आयुष्याला धोका तर देत नाही ना?

प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे ही माझी धारणा माझ्या अंतःकरणापासून आहे.प्रत्येक वेळी मी माझ्या आजार्‍यावर कडी नजर ठेवून असतो आणि ते ज्यावेळी जास्तीत जास्त हतबल असतात त्यावेळी त्यांच संरक्षण करतो.त्यामुळे माझी श्रद्धा जीवंत होते,अगदी त्यांच्या प्रत्येक श्वासाकणीक."
हे त्याचं सगळं ऐकून मी त्याला नकळत माझ्या मनात म्हणालो,
"खरंच, तू पण ग्रेट आहेस आणि तुझा व्यवसाय पण ग्रेट आहे."

श्रीकृष्ण सामंत

कथाविचार