वाहनविश्व : भाग २ इतिहास

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in तंत्रजगत
30 Sep 2014 - 12:23 pm

आधीचा भाग :
वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना
___________________________________________________________
माणसाच्या उत्त्पत्तीपासुनचं प्रवास हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दोन पायावर चालणार्या, शिकारीमागे धावणार्या, कच्चं मासं, कंदमुळं खाणार्या माणसाला चाकाचा आणि आगीचा शोध लागला आणि आख्खं जगं झपाट्यानी बदलु लागलं. चाकं, चाकांचे हळुहळु विकसित झालेले उपप्रकार (गिअर्स, पुली, कॅम & फॉलोवर्स ई.ई.) आणि त्यापासुन विकसित झालेल्या वेगवेळ्या गतींचा वापर करुन माणसाच्या जगण्यामधे अमुलाग्र बदल होउ लागले. त्यातुनचं विकसित झालेला सगळ्यात महत्त्वाचा आविश्कार म्हणजे वाहनं. अती प्राचीन कालावधीतल्या बैलगाड्या, घोडागाड्या आणि रामायणं-महाभारतामधे युद्धभुमी गडगडवुन टाकणारे रथं इथुन सुरुवात होउन हजारो वर्षांनी जगातल्या सर्वात वेगवान अश्या हेनसे व्हेनम जी.टी. (ब्युगाटी वेरॉन चा रेकॉर्ड तुटला आता :( ) अश्या अत्याधुनिक वाहनांपर्यंतचा आग आणि चाकाच्या युतीचा प्रवास थक्क करणारा आहे.

Wheel

(माणसाच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा शोध: चाक)

वाहन उद्योगाच्या सुरुवातीला शेकडो संशोधकांनी एकट्यानी किंवा एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीची ईंजीनं तयार केली. तत्त्कालिन तांत्रिक मर्यांदांमुळे त्यांना म्हणावे तेवढे यश मिळु शकले नाही. माध्यम मर्यादेमुळे सर्वांविषयी स्वतंत्रपणे विस्तारानी लिहीणं शक्य नाही. जरी त्यांच्याविषयी आत्ता विस्तारानी माहिती देऊ शकत नसलो तरी एक मात्र नमुद करु ईच्छितो की त्यांचे शोधही बाकीच्या शोधांएवढेचं महत्त्वाचे होते. ह्या मालिकेच्या शेवटी ह्यातल्या जमेल तेवढ्या शोधांवर एक धागा नक्की काढायचा मानस आहे. ह्या लेखात मात्र आपण ज्यांच्या शोधामुळे खर्या अर्थानी वाहन उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली गेली त्यांच्याविषयी आणि त्यांच्या संशोधनांविषयी माहीती घेणार आहोत.

अग्नीज शक्ती आणि वाहने :

१. फार्डीअर व्हेपर ईंजीन
अग्नीज शक्ती आणि चाकांच्या संयोगातुन गती मिळणार्या पहिल्या वाहनाचा शोध लावायचे श्रेय निकोलस-जोसेफ कग्नॉट (फेब्रुवारी १७२५ ते ऑक्टोबर १८०४) ला जातं. काही एतिहासकारांच्या मताप्रमाणे फर्डिनांड वर्बिस्ट (जन्मतारीख उपलब्ध नाही) ह्याने १६७५ सालीच वाफेवर चालणारं पहिलं तीनचाकी वाहन बनवलं होतं. पण त्याच्या वाहनाने १० किलोपेक्षा जास्त ओझं ओढणं शक्य झालं नाही. अधि़कृत पुराव्यांप्रमाणे निकोलस-जोसेफ कग्नॉट हाच पहिल्या स्वयंचलित वाहनाचा संशोधक ठरतो.

pahili gadi

(पॅरीस मधील संग्रहालयात जतन केलेली १७७१ सालची गाडी, गाडीची चाकं मुळची नाहीत.)

गाडीच्या समोर जो एक प्रेशर कुकर सारखा भाग दिसतोय तो भाग म्हणजे ह्या गाडीचं ईंजीन होय. आतमधे पाण्याची तांब्याची री-ईन्फोर्स्ड टाकी बसवलेली होती. टाकीखाली पाण्याची वाफ करण्यासाठी आगीचं भांड (बाहेरचा भाग) असे. त्यामधे कोळसा टाकुन पेटवला जात असे. पाण्याची झालेली वाफ तांब्याच्याच नळ्यामधुन दोन दट्ट्यांना पुरवली जात असे. दाबाखाली असलेल्या वाफेमुळे एक दट्ट्या खाली-सरकत असे आणि दुसरा दट्ट्या वर येत असे. पिव्ह्ट मेकॅनिझम वापरुन ह्या दट्ट्यांच्या सरळ गतीला वर्तुळाकार गतीमधे परावर्तीत केलं जात असे. दट्ट्यांच्या बंद दाबभागाचं (कंप्रेशन व्हॉल्युम) घनफळ २.६५ लिटर क्षमतेचं होतं. पाण्याच्या टाकीची क्षमता ३० लिटरची होती. पुर्ण भरलेल्या टाकीमधे गाडी जास्तीत जास्त २ कि.मी. जाऊ शकत असे. गाडीचा जास्तीत जास्त वेग ४ कि.मी. प्रतितास होता. गाडीला कुठल्याही प्रकारची गतीनियंत्रण यंत्रणा नव्हती. वाफेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेऊन गाडी चालु किंवा बंद करता येत असे.

जगातला पहिला वाहन अपघात ह्याच गाडीकडुन नोंदवला गेला. वाफनियंत्रक झडप निकामी झाल्यामुळे गाडी सरळ जाऊन भिंतीला धडकली आणि तिचा प्रेशर कुकर उद्ध्वस्त झाला. सुदैवानी गाडीचा वेग किरकोळ असल्यानी प्राणहानी झाली नाही. (वाफ आगेपेक्षा बेकार असते. दाबाखाली असलेली वाफ सरळ सरळ कातडी उचकटुन काढु शकते.) खुद्द नेपोलिअन बोनापार्ट नी १७९८ ते १८०० च्या दरम्यान ह्या गाडीमधुन सफर केली होती. (गाडीच्या वेगाबद्दल नाखुष होऊन माझा घोडा काय वाईट असे उद्गार त्यानी काढले असावेत =)) ). जगाच्या प्रगतीमधे अमुलाग्र बदल घडवुन आणणारा हा अभियंता मात्र उतारवयात दारिदृयात खितपत गेला.

२. दे रिवाझ ईंजीन

दे रिवाज ईंजीनाचा शोध फ्रँकोईस इस्साक रिवाझ (डिसेंबर १७५२ ते जुलै १८२८ ह्या फ्रेंच संशोधकाने लावला. जगातलं पहिलं ईंटर्नल कंबशन ईंजीन बनवायचा मान रिवाज ला मिळतो. आजही ज्या प्रक्रियेवर सुरक्षितपणे नियंत्रण मिळवता आलेलं नाही त्या हायड्रोजन ईलेक्ट्रिक ईग्निशन ह्या पद्धतीचं हे ईंजिन होतं.

De Rivaz Engine

(फ्रँकोईस इस्साक रिवाझ आणि जगातली पहीली ईंटरनल कंबशन ईंजीन असणारी गाडी)

ह्याच काळाच्या सुरुवातीला हायड्रोजनचे स्फोटक गुणधर्म लक्षात आलेले होते. तोफगोळ्यांना ज्या पद्धतीने स्फोट करुन उडवले जाते त्याच पद्धतीनी दट्ट्याला गती देता येईल का ह्या कल्पनेनी रिवाझ ला पछाडले. ह्या गतीचा उपयोग करुन मग चाकाला गती देता येईल का ह्यावर त्याचे प्रयोग चालु झाले. त्याच्या ह्याच प्रयत्नांमधुन आज पेट्रोल ईंजिनांमधे वापरल्या जाणार्या स्पार्क प्लग चा शोध लागला.

एका जाड रबरी फुग्यामधे गॅस स्वरुपामधील हायड्रोजन आणि ऑक्सीजनचं मिश्रण भरलेलं असे. त्याला जोडलेल्या रबरी नळ्यांनी हे मिश्रण ज्वलन कक्षाला (इग्निशन चेंबर) ला पुरवले जात असे. त्या काळात असलेल्या तांत्रिक मर्यांदांमुळे कुठल्याही प्रकारचे टायमिंग मेकॅनिझम (ईंजीनांविषयीच्या भागामधे हे विस्तारानी वाचायला मिळेल) त्या काळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे ही संपुर्ण प्रक्रिया मानवी नियंत्रणाखाली असे. ईंधन जेव्हा ईग्निशन चेंबर मधे जात असे त्या वेळी दोन वायरर्स्च्या मधे अंदाजे १२,००० ते १८,००० व्होल्ट्सच्या प्रवाहाखाली ठिणगी निर्माण होत असे. त्याकाळच्या कपॅसिटर बँकेच्या मर्यादांमुळे ईंधनाचे अर्धवट प्रज्वलन होत असे. ठिणगीमुळे हायड्रोजनचा स्फोट होऊन दट्ट्या खाली ढकलला जात असे. एका रॅचेट मेकॅनिझम मुळे चाकाला गती मिळत असे. ह्या ईंजीनानी खराब व्हायच्या आधी जेमतेम ६८ कि.मी. चा प्रवास केला. त्याकाळी क्रॉसड्रील्ड ल्युब्रिकेशन सिस्टीम नसल्यानी ईंजीन गरम होऊन वेल्ड होत असे. ह्याच रिवाझ नी १८१३ मधे अजुन एक सुधारित गाडी बनवली. ह्या गाडीने सुमारे ३०० किलो वजन ओढुन त्याकाळी एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

ह्याच काळात जर्मन लोकही ईंटर्नल कंबशन ईंजीन बनवायच्या प्रयत्नात होते. बर्याच वेगवेगळ्या प्रकारची ईंजीनं आणि गाड्या बनविण्याचे प्रयत्र्न झाले. पण त्या ईंजीनांचं आयुर्मान वंगणाअभावी अतिशय कमी होतं. रिवाझ च्या यशानंतर वाहनांच्या इतिहासात मैलाचा दगड रोवला गेला तो तब्बल ६२ वर्षांनी (१८८५-१८८६) , ते कार्ल बेंझ आणि बर्था रिंगर-बेंझ ह्या जोडप्याद्वारे. १८८० साली बनवलेल्या ड्युगाल्ड क्लार्कच्या (मुळ स्कॉटीश: मे १८५४ ते फेब्रुवारी १९४४) वर्कशॉप मधे जगातल्या पहिल्यावहिल्या टु स्ट्रोक पेट्रोल ईंजिनाची धडधड सुरु झाली. ह्या ईंजीनांवर आणि ड्युगाल्ड क्लार्कवर एक वेगळा धागा ईंजिनांच्या माहीतीच्या वेळी येईल. ह्या ईंजीनांची धडधडीनी पुढे कल्पनाही करता येणार नाही एवढे अमुलाग्र बदल मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ईंजिनिअरींगमधे घडवुन आणले. ह्या ईंजिनांच्या सुधारीत आवृत्ती बनवुन कार्ल बेंझ आणि बर्था रिंगर-बेंझ ह्यांनी १८८६ मधे इतिहास घडवला.

३. बेंझ ईंटर्नल कंबशन ईंजिन (बेंझ पेटंट मोटरवॅगन)

विश्वास ठेवा अगर ठेवु नका, बेंझच्या साम्राज्याची सुरुवात एका साध्या सायकल दुरुस्तीच्या दुकानातुन झाली. १८८३ साली त्यानी ते दुकान / वर्कशॉप विकत घेतलं. बेंझला अगदी तरुण असल्यापासुन कुठल्याही प्राणी किंवा मानवी शक्ती शिवाय चालणार्या बग्गीच्या कल्पनेने पछाडलेलं होतं. कार्ल बेंझनी बनवलेलं पहीलं वाहनं कुठलं असेल तर ते म्हणजे चक्क एक तीनचाकी रिक्षा कम घोडालेस बग्गी होती. (पुण्यातल्या माजुर्ड्या रि़क्षावाल्यांचा भाड्याचा पहिला टप्पा ५०० रुपये कि.मी. ;) बेंझ ची रिक्षा आहे भौ नाद करायचा नाय!! ). आपली पत्नी बर्था कडुन १५०० डॉलर भांडवल घेऊन त्यानी कामाला सुरुवात केली.

Mr. and Mrs. Benz
(एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो: श्री. आणि सौ. बेंझ)

बेंझ मोटरवॅगन मधे कार्ल ने विकसित केलेलं ९५४ सी.सी. चं सिंगल सिलिंडर फोर स्ट्रोक ईंजीन बसवण्यात आलं होतं. ईंजीन ४०० फेर्यांना सुमारे १ अश्वशक्ती ताकद निर्माण करु शकत होतं. ईंजिनाच्या क्षमतेच्या तुलनेनी त्याच वजन अतिशय कमी म्हणजे सुमारे ११० किलीच्या आसपास होतं. ७५ किलो वजनाचं कास्ट आयर्न चं फ्लायव्हील ईंजीनाखाली बसविण्यात आलेलं होतं. मोटरवॅगन मॉडेलच्या सुरुवातीच्या काही गाड्यांना फ्युएल पंप्स आणि कारब्युरेटर्स बसवलेले नव्हते. त्याऐवजी एका अॅल्युमिनियम्च्या डब्यामधे कापसाचे बोळे दाबुन भरण्यात आले होते. पेट्रोल च्या टाकीतुन आलेलं पेट्रोल ह्या कापसाच्या बोळ्यांना भिजवत असे. पेट्रोल ची तयार झालेली वाफ ईंजीनाला पुरवण्यात येत असे. अर्थातचं पेट्रोल आणि हवेचं योग्य गुणोत्तरातलं मिश्रण ईंजीनाला मिळत नसे, आणि ईंजीनाच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होत असे.

Motorwagon Model 1

(जर्मनीमधील मर्सिडीझ-बेंझच्या गॅलरीमधे ठेवण्यात आलेली मोटरवॅगन ईंजीनाची चालु स्थितीतील एक आवृत्ती.)

मोटरवॅगन प्रोटोटाईप २ मधे मात्र स्लीव व्हॉल्व वाला कार्बुरेटर बसविण्यात आला होता. आणि ईंधन आणि प्राणवायुचं बर्यापैकी चांगलं गुणोत्तर ईंजीनाला पुरवता येऊ लागलं.

कार्ल बेंझ आणि बर्था रिंगर-बेंझ ह्यांनी संयुक्तपणे पेटंटसाठी अर्ज केला. बर्थाला ती एक स्त्री असल्याच्या कारणावरुन पेटंट नाकारण्यात आलं. (अनाहिंतांनो णीषेध पार्टी करा एक जोर्दार). कार्लला मात्र ३७,४३५ क्रंमांकाचं ऐतिहासिक पेटंट मिळालं. पेटंट मिळालं नाही ह्याचं जोरदार उट्टं बर्थानी एक रेकॉर्ड सेट करुन काढलं. १८८८ साली आपल्या नवरोबाला कळु नं देता चक्क ह्या बाईनी मोटरवॅगन मॉडेल ३ बाहेर काढली. आपल्या दोन मुलांना (युगेन आणि रिचर्ड) बरोबर घेऊन बाईसाहेब चक्क माहेरी निघाल्या. ह्या तिच्या ट्रिपमधे सुद्धा काही महत्त्वाचे शोध लागले. वाईल्स्लॉच येथील एका फार्मासिस्ट कंपनीला जगातील पहिलं फ्युएल स्टेशन बनायचा मान मिळाला. वाटेत ब्रेक खराब झाल्याने ब्रेकच्या पट्टीवर तिनी चक्क चामडं ठोकुन घेतलं आणि पहिल्या ब्रेक लायनर मटेरिअल चा शोध लागला. एकुण तीन दिवसात १२१ मैल प्रवास करुन तिने नवरोबा चे घर ते माहेर, आणि परत नवरोबाचं घर एवढा प्रवास पुर्ण केला. आजही दर दोन वर्षांनी तिच्या प्रवासाच्या मार्गावर (बर्था बेंझ मेमोरिअल राऊट) विंटेज कारची रॅली ह्या ऐतिहासिक घटनेचं स्मरण म्हणुन निघते.

आधी डेमलर-बेंझ आणि मग मर्सिडीझ-बेंझ, आज जगातल्या सर्वोत्कृष्ट गाड्या गाड्या बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे.

४. हेन्री विल्यम्स फोर्ड

Henry Williams Ford
(हेन्री विल्यम्स फोर्ड : अमेरिकन हीरो)

फोर्डबाबांचं नाव घेतल्याशिवाय वाहनगाथा पुर्ण होऊच शकत नाही. कुठल्याही ईंजिनाचा किंवा गाडीचा शोध नं लावताही फोर्ड गाड्यांच्या इतिहासामधे अजरामर झाला तो एक यशस्वी उद्योजक म्हणुन. अमेरिकेतल्या प्रत्येक मध्यमवर्गीयाला परवडेल अश्या किंमतीमधे गाडी द्यायचं स्वप्न फोर्ड नी पाहीलं आणि प्रत्यक्षातही आणलं. असेंब्ली लाईन्स आणि ईंटरचेंजेबल पार्ट्स वापरुन गाड्यांच्या किंमती प्रचंड प्रमाणात कमी करण्याला फोर्ड्ला यश आलं. फोर्ड च्या टी-मॉडेलनी तर अमेरिकेच्या वाहतुक क्षेत्रामधे दणकुन बदल केले. फोर्ड चं नाव हाच एक एतिहास आहे. ह्या इतिहासाच्या ओळखीमधे एका पॅराग्राफमधे त्याच्याविषयी लिहिणं हा त्याचा अपमान ठरेल. ज्यावेळी वाहन उद्योगातल्या प्रसिद्ध घराण्यांविषयी माहीती लिहीन तेव्हा त्याच्याविषयी अधिक जास्त माहीती लिहिन.

Sundar bala

(ती पाहता सुंदर बाला, माझा कलिजा खलास झाला : ड्रीम कार)

पुढच्या भागात : गाड्यांचे प्रकार, कार्यपद्धती आणि सिस्टिम क्लासिफिकेशन्स.

_______

*आवाहन : कोणाकडे अजुन काही महत्त्वाची माहीती आहे जी ह्या लेखात नाही त्यांनी कृपया ती प्रतिसादामधे लिहावी. लेखाचा आवाका बराच असल्याने हातात माहीती असुनही निम्म्याहुन कमी माहीती लिहीली आहे.

*चित्रे आं.जा. वरुन साभार.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

30 Sep 2014 - 1:21 pm | विजुभाऊ

पेट कॉक किंवा कोल गॅस चे इन्जीन वापरुन चालणार्‍या गाड्यांबद्दल लिहा ना.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Sep 2014 - 1:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हो ईंजिनांविषयी माहीती चालु झाली की त्यात येणारे ते सगळं.

मोदक's picture

30 Sep 2014 - 1:36 pm | मोदक

वाचतोय...

फोर्ड कंपनीच्या हेन्री फोर्ड-१ नंतरच्या प्रवासात ली आयकोकाने महत्वपूर्ण भूमीका बजावली..

आयकोकाचे आत्मचरित्र.

.

आणि डॅमलर क्राईसलर मर्जर संदर्भात असलेले हे पुस्तक नक्की वाचावे...

.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2014 - 7:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

IACOCCA हे पुर्वी मला एखाद्या संघटनेचा शॉर्ट फॉर्म वाटायचा. नंतर कधीतरी हे एका व्यक्तीचं नाव आहे हे समजलं. संधी मिळाली तर नक्की वाचीन. आपल्या इथे मिळतील का ही पुस्तकं अप्पा बळवंत चौकामधे?

मोदक's picture

1 Oct 2014 - 11:58 am | मोदक

आयकोका सहज मिळेल.

दुसरे पुस्तक थोडे अवघड आहे. मला बरीच शोधाशोध करावी लागली होती.

सौंदाळा's picture

30 Sep 2014 - 3:07 pm | सौंदाळा

वाचतोय
पुभाप्र

मस्त...माहितीपुर्ण लेख.

पु.भा.प्र.

उगा काहितरीच's picture

30 Sep 2014 - 7:17 pm | उगा काहितरीच

+1

हर्षच's picture

30 Sep 2014 - 8:10 pm | हर्षच

माहितीपुर्ण लेख.
येऊद्या पुढील भाग लवकर.

मुक्त विहारि's picture

30 Sep 2014 - 10:57 pm | मुक्त विहारि

मर्सिडीझ म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येतो तो त्याचा सिंबॉल...एक तारा...

आणि ह्या एक तार्‍यावरचे अप्रतिम पुस्तक.. (लेखकाचे नांव विसरलो, बहूदा डॉ.संजय ओक असावेत.)

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2014 - 11:03 pm | श्रीरंग_जोशी

ही लेखमालिका म्हणजे पर्वणी आहे.

उत्तम सादरीकरण व भाषाशैली.

पुढील भागांबरोबरच जाणकारांच्या प्रतिक्रियांमधून मिळणार्‍या माहितीच्या प्रतिक्षेत.

मार्मिक गोडसे's picture

30 Sep 2014 - 11:11 pm | मार्मिक गोडसे

बर्थाला ती एक स्त्री असल्याच्या कारणावरुन पेटंट नाकारण्यात आलं.

तरीच गॅरेजमध्ये स्त्री मेकॅनिक दिसत नाहीत.

मधुरा देशपांडे's picture

1 Oct 2014 - 12:24 am | मधुरा देशपांडे

दोन्ही भाग वाचले आणि आवडले. अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत.
एक बदल - "वाईल्स्लॉच" याचा योग्य उच्चार वीझलॉख असा आहे.
आपण उल्लेख केलेल्या तीनचाकी रिक्षा कम घोडालेस बग्गीचे एक मॉडेल ज्या शहरात हा शोध लागला तिथे ठेवण्यात आले आहे. आत्ता नेमका फोटो नाहीये पण टाकण्याचा प्रयत्न करेन.
बर्था बेंझला केवळ एक स्त्री म्हणून पेटंट मिळाले नाही हे निषेध करण्यासारखे आहेच पण त्याकाळातील जर्मनीतील पुरुषप्रधान संस्कृती बघता आश्चर्य वाटले नाही. पण इतके दूरवरचे अंतर (१०४ किमी) कापणारी ही पहिली गाडी होती आणि ती चालवण्याचा मान एका स्त्री कडे जातो. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2014 - 7:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक बदल - "वाईल्स्लॉच" याचा योग्य उच्चार वीझलॉख असा आहे.

लक्षात ठेवीन. ह्या ठिकाणाचे नावं तसं अजुन ७-८ वेळा येणार आहे. :)

पण इतके दूरवरचे अंतर (१०४ किमी) कापणारी ही पहिली गाडी होती

१२१ मैल म्हणजे जवळ जवळ १९५ कि.मी. आणि तिनी नुसती गाडीच चालवली असं नाही. प्रवासादरम्यान गाडीच्या मेकॅनिकचीही भुमिका पार पाडली. :)

स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.

लोकांचा आक्षेप स्त्रियांनी गाडी चालवण्याला नसुन उजवीकडचा ईंडीकेटर दाखऊन डावीकडे वळण्याला, दोन्ही पाय विमानाच्या पंखा सारखे बाजुला ठेऊन गाडी चालवायला, रस्त्यावर सटा-सट लेन बदलण्याला आहे. :)

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2014 - 7:27 am | टवाळ कार्टा

स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.

कोणास ठाऊक...तेव्हापासून काहिच फरक नसेल पडला तर :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2014 - 7:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सर्वांचे आभार. :)

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2014 - 7:35 am | टवाळ कार्टा

Bajaj Chetak, Bullet (Petrol आणि Diesel), Yezdi, RX-100 आणि RD-350 (आणि काशिनाथ घाणेकरच्या चालीवर) शिवाय हि मालिका अपूर्ण असेल :)

सामान्यनागरिक's picture

2 Oct 2014 - 3:51 pm | सामान्यनागरिक

तिरकी केल्याशिवाय चालु न होणारी स्कुटर बनवल्याबद्दल श्री बजाज यांचा खास उल्लेख व्हायला हवा.

अशी वदंता आहे की या मुळेच त्यांना विमाने बनवण्याचा परवाना मिळाला नाही.

आणि पूणेरी दुचाकीस्वारांचाही ! ही एक वेग़ळीच जमात आहे.

मदनबाण's picture

1 Oct 2014 - 4:16 pm | मदनबाण

उत्तम माहिती ! :) पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. :)
या धाग्यात जरी ४ चाकी गाड्यांचा उल्लेख आला असला तरी मध्यंतरी तू-नळीवर एका जबरदस्त बाईकचे व्हिडीयो पाहिले होते, ते इथे देण्याचा मोह टाळता येत नाही. ;) { Self-balancing Motorcycle }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2014 - 6:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखात ४ चाक्या, २ चाक्या आणि बहु चाक्या सगळं येणार आहे :)...२ चाक्यांबद्दल जास्तचं प्रेम असल्याने त्याविषयी थोडे जास्तचं येईल.

एस's picture

1 Oct 2014 - 7:28 pm | एस

जायरो तंत्रज्ञान दुचाकींमध्ये ही संकल्पना भन्नाट आहे. भारतात ह्यावर्षी ह्या गाड्या लॉन्च होणार होत्या ना? २४००० डॉलर्स ही किंमत जरा जास्तच वाटतेय पण. भारतात अशी मॉडेल्स चालायला हवी असतील तर ती थोडी सडपातळ हवीत, ग्राऊंड क्लिअरन्स जास्त हवा, किंमत कमी हवी आणि सर्वात महत्त्वाचे मायलेज परवडेबल हवे. :-)

सामान्यनागरिक's picture

2 Oct 2014 - 3:54 pm | सामान्यनागरिक

आखुडशिंगी ,सुलक्षणी, बहुदुधी- अजुन काय हवं हो ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Oct 2014 - 6:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

अप्रतिम लेख!! :) खुप आवडला!!!, वाहन उद्योगात इटली चे पण योगदान भरपुर!! :)

आदिजोशी's picture

1 Oct 2014 - 6:44 pm | आदिजोशी

विस्तारभयास्तव हातचं राखून लिहू नका. आम्ही वाचायला तयारच आहोत :)

आवडतय ! अ‍ॅड्या सांगतोय तसच म्हणेन , हात आखडु नकोस लिहिताना :)

उत्तम माहिती व छान मांडणी :)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Oct 2014 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/cars/moving-sports-car-smiley-emoticon.gif