ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?

खुशि's picture
खुशि in जे न देखे रवी...
19 Sep 2014 - 3:58 pm

जन्म कसा आणि कुठे घ्यायचा,
हातामध्ये नसे आपुल्या,
ह्रुदयामध्ये घर बाम्धु या,
अशा घराला दार कशाला?
कोण धर्म आणि जात कोणती,
हाती काहीच नसे आपुल्या,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
जातिभेद अन धर्म विसरुया,
साथ देउ या सुखदुखःला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
जिव्हाळ्याचा गाव असावा,
राग आणि रोष कशाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
परस्पराना समजुन घेऊ,
वाद आणि तक्रार कशाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
प्रेम दयेचा वसा घेउ या,
देवू आसरा दु:खी जिवाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?

धोरण

प्रतिक्रिया

हॄदयाचे शनी शिंगणापूर करुया.

काउबॉय's picture

20 Sep 2014 - 2:27 pm | काउबॉय

=))

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 4:40 pm | कवितानागेश

:)

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Sep 2014 - 11:38 pm | माम्लेदारचा पन्खा

भिन्ग्रीतै.....

खुप हस्तोय.....

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2014 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर

मैं बसाना चाहता हूँ, स्वर्ग धरतीपर,
आदमी जीसमे रहे बस आदमी बनकर।
उस नगर की हर गली तैयार करता हूँ,
आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ।

-चित्रपट: पहचान.

खुशि's picture

20 Sep 2014 - 3:25 pm | खुशि

सुंदर.

विलासराव's picture

20 Sep 2014 - 3:37 pm | विलासराव

जन्म कसा आणि कुठे घ्यायचा,
हातामध्ये नसे आपुल्या,

या ओळी सोडुन बाकिचे लिहील्याप्रमाणे आचरण केले तर "जन्म कसा आणि कुठे घ्यायचा,
हातामध्ये असे आपुल्या" असे म्हणता यावे. मग घर बांधा नका बांधु, दार बसवा नका बसवु क्या फर्क पडता है!!!!

आता यावर कोणीही वाद घालु नये, तसे करुन पहावे. पहायचे असेल तर.

ह्रुदय हे असं दिसतं. त्यात घर कसं काय बांधणार?

heart

* चित्र जालावरुन साभार.

पोटे's picture

22 Sep 2014 - 12:53 am | पोटे

बिनदाराच्या घरात जाणार तरी कसे ?