"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
19 Sep 2014 - 12:47 pm
गाभा: 

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे."

आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ?
* सर्व पक्ष अपने दमपे
* (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
*(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)

* किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

प्रतिक्रिया

त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन सांगा रे ..बाबा हा महाराष्ट्र आहे.यु.पी. नाही...युती तुटण्यात गुजराती मराठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.महाराष्ट्र विकत घ्यायचं मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेला दूत अमित शहा याची कालच्या सभेतली वक्तव्य अतिशय माजोरडी होती.शिवसेनेला अनुल्लेखाने मारण्यात आलं...त्यामुळे युती तुटली तर त्यात नवल काही नाही.केंद्रातील कॉंग्रेस सरकारपेक्षा राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच सरकार दोन -चार अपवाद(आव्हाड-छोटेपवार ,राणे) वगळता चांगल आहे.मोदींचा अतिप्रभाव आणि त्यातून साधली जाणारी व्यावसाईक गणित चुकवण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे.

बिल्कुल नाही ! आता जर ते परत सत्तेत आले तर ..? राष्ट्रपती राजवट परवडली.
मला कल्पना देखील करवत नाही !

नानासाहेब नेफळे's picture

20 Sep 2014 - 4:00 pm | नानासाहेब नेफळे

बिल्कुल नाही ! आता जर
ते परत सत्तेत आले तर ..?
राष्ट्रपती राजवट
परवडली.
मला कल्पना देखील करवत नाही>>>>
खरंय ,मी सुद्धा रामराज्य यायची वाट बघतोय.

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 3:30 pm | काळा पहाड

बास हो! उगीच गुजराती, मराठी, शेठजी-भटजी, महाराष्ट्र विकत घेणे आणि यंव आणि त्यंव. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एकूणच त्यांचे मतदार हे अतिशय जातीयवादी, जुन्या ९६ कुळी टाईप विचारांचे आणि अतिशय माजोरडे आहेत. बाकी महाराष्ट्र जर अमित शहा विकत घेणार असेल तर आत्तापर्यंत पवार, चव्हाण, देशमुख आणि तत्सम प्रभृती काय करत होत्या? महाराष्ट्र तुकडे पाडून विकायचंच काम चाललं होतं ना? राणे दर थोड्या दिवसांनी दिल्ली ला जायचे ना लोटांगण घालायला? चव्हाण आणि थोरले पवार दिल्लीत जावून पॉलीश करून येतातच ना दर थोड्या दिवसांनी? आणि न विकायला असं काय सोन्याचा करून ठेवलाय महाराष्ट्र या आघाडीने? सगळीकडे रस्ते उकरून ठेवलेत, रस्ते धुळीचे, खड्डे, पाणी शेतीच्या नावाखाली पळवणे..

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 3:41 pm | नानासाहेब नेफळे

पवारांनी लवासा आणलं, त्याआधी ठाकरेँनी अँम्बी व्हॅली आणलं
काँराकाँ ने टोल वाढवला ,त्याआधी माठकरीने एक्स्प्रेस वे ला टोल लावून, टोल कल्चर सुरु केले.
खाउजा धोरण भाजपाने सुरु केले. राज्य विकायला काढले सेनाबीजेपीने ते आधी कबुल करा.

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2014 - 4:14 pm | टवाळ कार्टा

जसे त्याच्या आधी स्वर्गच होता...ते ५५ उड्डाणपुल व्हायलाच ५५ वर्षे लागली...ते झाले त्यामुळेच वाहतुकीचा ताण थोडासा का होइना पण कमी झाला
हे साले हरा*** काँ.रा.काँ. वाले..त्यांनी टोलची मुदत वाढवायला सुरु केली

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 4:52 pm | नानासाहेब नेफळे

बीजेपी टोलमुक्ती गोष्ट करत आहे ,पण तो बनावच .गॅस सिलेंडरवर कॅप बसल्यावर बेंबीच्या देठापासुन कोकलणारे मोदी जेटली स्वराज आता गप्प का आहेत ?सत्ता आहे ना ,काढा कॅप, करा चालू अनुदान परत प्रत्येक सिलेंडरवर, नाहीतर जाहिर कबुली द्या कि सिलेंडरच्या बाबतीत काँग्रेसवर केलेली टीका चूकीची होती.

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 4:37 pm | काळा पहाड

अडाण्यासारखं बोलणं बंद करा. रोड बनवायची मराठी लोकांना जनतेला अक्कल नाही आणि पैसा नाही. टोलवाल्या कंपन्या फुकट तुमचे रोड बनवून तुमचा प्रवास सांभाळतील का? तुम्ही स्वतःला काय देशाचे राजे वगैरे समजता की काय की तुम्हाला त्यांनी फुकट गोष्टी बनवून द्याव्यात? काय स्थिती होती बीजेपी ने पुणे मुंबई एक्स्प्रेस वे बनवण्या अगोदर? पीपीपी ला बिझनेस मॉडेल म्हणतात. टोल ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे प्रगती हवी असेल तर. नाही तर मग सरकार करूदे रोड. पण साठ वर्ष खा खा करून खजिना रिकामा केल्यावर त्यात पैसे नको का रस्ते बांधायला? का लोकांनी तसाच प्रवास करूदे खड्ड्याच्या रस्त्यात? बाकी बिझनेस वगैरे गोष्टी मराठी लोकांना कळत नसल्याने त्यांनी यात गुढगेगिरीचं प्रदर्शन करू नये हे उत्तम.

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 5:15 pm | नानासाहेब नेफळे

रोड टॅक्स राज्यातली जनता देतच होती, तो घेऊन परत टोल कल्चर बीजेपीने राज्यात का आणले? एकिकडे पीडब्ल्युडीचे पंख छाटून बीओटी तत्वावर टोल कल्चर सुरु केले, आघाडीच्या नावाने बोंब कोणत्या नैतिक अधिकारावर मारणार?
एन्रॉन खड्ड्यात घालुन राज्याला पंधरा वर्ष भारनियमनाचा खाईत लोटणारे बिजेपीचे लोक आज विकासाच्या बाता करत आहेत,
२००२ला दुष्काळ पडलेला असताना आघाडीच्या राज्य सरकारने पाच हजार कोटींची मागणी वाजपेयी सरकारकडे केली, परंतु वाचपेयींनी फक्त पन्नास कोटी देऊ केले. तेव्हा भरीव मदत दिली असती तर राज्यातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्या नसत्या.

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2014 - 8:07 pm | टवाळ कार्टा

एन्रॉन खड्ड्यात घालुन राज्याला पंधरा वर्ष भारनियमनाचा खाईत लोटणारे बिजेपीचे लोक आज विकासाच्या बाता करत आहेत,

बीजेपी केंद्रात आली आहे...ते सुध्धा उणेपुरे १०० दिवसच झालेत
काँ.रा.काँ. गेली १० वर्षे महाराष्ट्रात काय झोपा काढते आहे मंत्रालयात? इतकीच जर भारनियमाची चिंता होती तर आणायचे होते परत एन्रॉनला...एन्रॉन नसेल येत तर दुसर्या कोणाला तरी बोलवायचे

आणि माझे प्रतिसाद वाचुन जर मी काँ.रा.काँ. विरोधक किंवा युतीसमर्थक आहे असा समज झाला असेल तर जरा अभ्यास वाढवा

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2014 - 1:35 pm | श्रीगुरुजी

युती तुटेल असं वाटलं नव्हतं. पण शिवसेनेने आपल्या अवास्तव ताकदीचा भ्रम अखेरपर्यंत दूर केला नाही. आपण भाजपपेक्षा ताकदवान आहोत आणि भाजप केवळ आपल्या दयेवर अवलंबून आहे असा शिवसेनेचा गैरसमज खूप पूर्वीपासून होता. भाजपला शिवसेनेचे ओढणे कधी ना कधी तरी दूर करावे लागणारच होते. आता ती वेळ आली आहे.

आपण भाजपपेक्षा खूप ताकदवान आहोत असा शिवसेनेचा भ्रम १९८६ पासून होता आणि तो पूर्ण खोटा होता. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेला लोकसभेत एकही उमेदवार निवडून आणला नव्हता (त्यावेळच्या इंदिरा लाटेत इंदिरा काँग्रेसने ४८ पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. पण इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेच्या हाती भोपळाच आला होता.)

त्यानंतर एप्रिल १९८० मध्ये भाजप स्थापन झाल्यावर लगेचच मे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागात १२ जागा मिळविल्या होत्या (कोकण, पुणे, ठाणे, मुंबई, मराठवाड, विदर्भ इ. सर्व भागात भाजपने १-२ आमदार निवडून आणले होते). पण तिथेही शिवसेनेच्या हाती भोपळाच लागला. त्यावेळी शिवसेना मुंबई व ठाण्याच्या बाहेर कोणालाही माहिती नव्हती तर भाजपचे अस्तित्व तुरळक प्रमाणात का असेना पण महाराष्ट्राच्या सर्व भागात होते. १९८५ मध्ये सुद्धा विधानसभेत भाजपचे १६ आमदार निवडून आले तर शिवसेनेचा फक्त १ निवडून आला होता.

१९८५ च्या सुमाराला अडवाणींनी पक्षसूत्रे हाती घेतल्यावर पक्षवाढीसाठी इतर पक्षांशी आघाडी करण्याची योजना आखली व त्यामुळेच सेना-भाजप युती जन्माला आली. पक्षवाढीसाठी भाजपने पडती भूमिका घेतल्याने शिवसेनेचा आपल्या ताकदीविषयी अवास्तव गैरसमज झाला.

२००५ मध्ये राज ठाकरे व राणे सोडून गेल्यावर आपला पक्ष अत्यंत दुर्बल झाला आहे हे शिवसेना मान्यच करायला तयार नाही. २००९ मध्ये १६९ जागा लढवून सेनेला फक्त ४४ जागा मिळाल्या तर ११९ लढवून भाजपने ४६ जागा जिंकल्या होत्या. २०१२ मध्ये बाळासाहेब गेल्यावर तर शिवसेना अजून दुर्बल झाली आहे. आता १८ खासदार निवडून आले ते स्वतःच्या ताकदीने आले नसून मोदींच्या प्रभावामुळे आले आहेत हे कबूल करायची सेनेची तयारीच नाही.

शिवसेनेत तसे विचारी नेते अगदी थोडे होते. सुधीर जोशी, मनोहर जोशी, सुरेश प्रभू इ. मोजकेच नेते विचारी म्हणता येतील. यापैकी सुधीर जोशी आता नाहीत व इतर दोघेजण निष्प्रभ आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत, रामदास कदम इ. वाचाळ नेते आगीत तेल ओतत आहेत. हे दोघे अनुक्रमे राज्यसभा व विधानपरिषदेवर असल्याने त्यांना आपली चिंता नाही.

भाजपला केंद्रात सेनेची गरज नाही. याउलट सेनेला आता व भविष्यात भाजपची कायम गरज लागणार आहे. तरी सेनेचा ताठा कायम आहे.

शिवसेनेने आपल्या ताकदीवर आता लढावे म्हणजे स्वत:चा आवाका लक्षात येईल. शिवसेनेत इनकमिंग जवळपास नाहीच. एकट्याच्या ताकदीवर शिवसेना ३०-४० जागा सुद्धा मिळवू शकणार नाही. शिवसेनेने आपला हट्ट पुढे रेटला तर शिवसेनेच्या शेवटाची ही सुरूवात असेल.

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 1:56 pm | नानासाहेब नेफळे

चांगलं विश्लेषण केले गुरुजी तुम्ही.
169 जागा लढून बेचाळीस मिळाल्या तेही थोरले ठाकरे असताना ,आता स्वबळावर तीस जागाही भेटायच्या नाहीत .एकतर मोदीच्या जीवावर अठरा जागा लोकसभेत आल्यात हे उद्धव ठाकरेलाही ठाऊक आहे, तरीही सेनेचा अडेलटट्टूपणा जात नाही .उद्या सत्तेवर आल्यास राज्याचे हित न बघता भांडतच बसणार. माझे मत आघाडीला द्यायचे नक्की केलेय, कारण मोदी केँद्रात फक्त पाट्या टाकायचं काम करत आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 2:04 pm | प्रसाद गोडबोले

माझे मत आघाडीला द्यायचे नक्की केलेय, कारण मोदी केँद्रात फक्त पाट्या टाकायचं काम करत आहेत.

एरव्ही काय तुम्ही शिवसेना भाजप युतीला मत द्यायच्या विचारात होता की काय ? *biggrin*

बाय द वे , तुमच्या मतदारसंघात पाण्याची सोय कशी आहे हो =))

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 2:34 pm | नानासाहेब नेफळे

प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व चांगल्या उमेदवाराला मत देतो.
मोदी केंद्रात पाट्या टाकतोय त्यामुळे त्याच्याकडून राज्याचा विकासाची अपेक्षा फोल ठरेल, राज्यात सक्षम व विचारी पक्षाच्या यादीत आघाडी योग्य वाटत आहे .भाजप व सेनेची पोरंटोरं त्या मोदीसमोर माना टाकणार ,गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक असल्याने मोदी महाराष्ट्राच्या वाट्याचं सगळं गुजरातकडे नेणार,( अदाणीला खुश करायला )व महाराष्ट्र मागे कसा राहील हेच मोदी पाहणार, त्यामुळे आघाडीला मत देणे योग्य ठरेल.
नुकतेच चीनचे पंप्र येऊन गेले ,सगळी इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये,
कोस्टल पोलिस ट्रेनिंग संस्था महाराष्ट्राला मिळाली ,ती मोदीने गुजरातला पळवली, इतका हा धुर्त व चालू माणुस आहे. आघाडी फार चांगली आहे असे नव्हे ,पण या मोदीला आवरायला हवे कुठेतरी, सगळंच याच्या ताब्यात गेले तर राज्याच्या जन्तेच्या हातात मोदी धत्तुरा देईल.
आमच्या गावात पिण्याचे पाणी भरपुर येते.

विटेकर's picture

19 Sep 2014 - 2:43 pm | विटेकर

राज्यात सक्षम व विचारी पक्षाच्या यादीत आघाडी योग्य वाटत आहे
खिक्क्क....

गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक असल्याने

फालतू समजूत करून घेवू नका स्वतःची. काय लायकी आहे मराठी लोकांची देशात ते जरा पहा. साठ वर्ष झाली सत्तेत येवून आणि इथल्या एका सत्तेवर असणार्‍या जातीला आरक्षण हवंय कारण त्यांना नोकर्‍या तयार करणं तर सोडाच, नोकरी करणं सुद्धा जमत नाहीय. ग्रॅज्युएट मराठी मुलांना साधा बँकेचा फॉर्म भरता येत नाही कारण कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी तो पर्यंत ग्रामपंचायतीची निवडणुक, या नेत्याचा प्रचार करणं, त्या नेत्याचा प्रचार करणं, मोर्चे काढणं, धरणे धरणं, प्राध्यापकांना काळं फासणं एवढच केलेलं असतं. मराठी मुलांना ना धड नीट इंग्रजीत बोलता येतं ना एखादा मुद्दा मांडता येतो. मराठी इंडस्ट्री म्हणजे (काही सन्माननीय अपवाद वगळता) एजंटगिरी. मराठीतल्याच आरटीओ, महसूल वगैरे ऑफिसर ना पैसे खावू घाला व लोकांची कामं करून द्या. याला ना डोकं लागतं ना प्रयत्न. मराठी दुकानं अकरा ते एक आणि चार ते साडे आठ चालतात. महाराष्ट्र प्रगत आहे कारण मुंबई प्रगत आहे आणि ती मराठी माणसांमुळे नक्कीच प्रगत नाही. कुणाला गमजा सांगताय स्पर्धक असल्याच्या?

मृत्युन्जय's picture

19 Sep 2014 - 4:40 pm | मृत्युन्जय

+ १०००००१ टु काळा पहाट. कडवट असले तरी सत्य आहे हे.

बॅटमॅन's picture

19 Sep 2014 - 5:11 pm | बॅटमॅन

फुंटी यांचा प्रतिसाद टिपिकल 'या वाड्यावर' छाप मेंटॅलिटी असलेल्या लोकांचा असतो तसा आहे.

ऊप्स प्रतिसादाची गल्ली चुकली.

पण हा प्रतिसाद प्रचंड बलीवर्दनेत्रभञ्जक आहे.

आमची उद्योग सोडा दुकान चालविण्याची लायकी नाही !
परवा औन्ध्या ( यमाई ) वरुन विट्याला येत होतो, वाटेत पुसेसावळी नावाचे गाव लागते . बाजाराचे गाव आहे , तालुक्याचे देखील ठिकाण नव्हे , तिथल्या मुख्य चौकातल्या कोपर्‍यावर मारवाड्याचे मिठाई चे दुकान होत ! सगळ्या पेठेत उठून दिसणारे ! इतर मिठाईबरोबर , कचोर्‍या आणि सामोसे ! दुकानावर फुल्ल टू गर्दी !
त्याच्या बरोबर समोर एक कळकट हात-गाडी वडापाव विकणारी ! ही खूप जूनी , किमान ३० वर्षांपासून आहे , मी औन्धाला जातोय तेव्हापासूनची ! माणसे बदलली , गाडी तीच ! गाडीवर मात्र शुकशुकाट !
गावाला त्याचे काही नाही , मारवाडी मस्त गबर झालाय !
टाळकंच हाललं !
पुसे सावळी गाव केव्ढ? पण मारवाडी बाहेरुन येउन गबर झालाय !

विवेक्पूजा's picture

19 Sep 2014 - 5:32 pm | विवेक्पूजा

लाख वेळा सहमत रे काळा पहाडा....

मृत्युन्जय's picture

20 Sep 2014 - 10:31 am | मृत्युन्जय

आमच्या गावात पिण्याचे पाणी भरपुर येते.

तुम्ही राष्टवादीला मत देता वाटते.

नानासाहेब नेफळे's picture

20 Sep 2014 - 11:07 am | नानासाहेब नेफळे

मी अपक्ष उमेदवाराला मत देतो ते वर लिहलेच आहे.

नानासाहेब नेफळे's picture

20 Sep 2014 - 2:16 pm | नानासाहेब नेफळे

:drinks: अगस्तींच्या नावाने....

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2014 - 1:00 pm | श्रीगुरुजी

>>> आमच्या गावात पिण्याचे पाणी भरपुर येते.

ते कसे काय? गावात/गावाजवळ एखादे धरण/बंधारा/तलाव आहे का?

उगा काहितरीच's picture

20 Sep 2014 - 1:50 pm | उगा काहितरीच

ओ साहेब , तुमचा कितीही विरोध असला तरी पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीचा एकेरी उल्लेख टाळा.

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 2:35 pm | काळा पहाड

पाट्या टाकायचं काम म्हणजे? जरा एक्स्प्लेन करा.

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 2:47 pm | नानासाहेब नेफळे

महागाई कमी करतो असे आश्वासन देऊन चार महीन्यात काय विशेष उपाय योजना केल्या मोदीने? एकही नाही.याला पाट्या टाकत बसणे म्हणतात.
ब्राझील जपान भूटान व आता अमेरिकेचे दौरे तेवढे करतोय व यातुन देशाला कमी व गुजरातलाच जास्त मिळतंय.
सातत्यानं गुजरातला मात देऊन महाराष्ट्र नंबर एकचे राज्य राहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर कसा राहिल याचेच आराखडे मोदी आखत असेल ,त्याच्यासमोर अडवाणी गप्प बसले तर देवेंद्र तावडे पंकजा वगैरे पोरंटोरं त्याला काय जाब विचारणार.ती पण गप्प बसणार व राज्य खड्ड्यात जाणार. त्यापेक्षा आघाडी काय वाईट आहे?

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 4:14 pm | काळा पहाड

अ) १.२५ बिलीयन लोक्स असलेल्या देशाची महागाई कमी करण्याबद्दल टीका करणे म्हणजे सचिन तेंडुलकर ने स्वीपचा फटका कसा नीट मारला नाही त्या बद्दल टीका करणे. ते ही ४ महिन्यात? अर्थकारणाबद्दल, त्यातल्या विविध घटकांच्या आंतर संबंधाबाबत काही माहिती आहे का? बाकी मोदींनी कांद्याचे भाव कमी केले तर शेतकरी मरतोय म्हणून तुमच्यासारखे लोकाच शंख करत होते ना?
ते असू दे. पेपर वाचता का? हा खालील लेख रॉयटर्स चा जून चा रिपोर्ट: http://in.reuters.com/article/2014/06/18/india-inflation-idINKBN0ES2KS20... (ते रॉयटर्सवाले आहेत. जिल्हा बँकेचे किंवा दूध संघाचे अहवाल लिहिणारे नाहीत एवढं लक्षात ठेवा).
आणि हा त्याचा परिणामः http://ibnlive.in.com/news/inflation-dips-to-5year-low-of-37-per-cent/49...
इन्फ्लेशन ३.७४% टक्केवर आलं आहे. हे पप्पू आणि मौनी ला गेली ५ वर्ष जमलं नाही. तेव्हा तुम्ही पाट्या टाकायचं सोडा आणि अभ्यास करा.
ब)

'ब्राझील जपान भूटान व आता अमेरिकेचे दौरे तेवढे करतोय व यातुन देशाला कमी व गुजरातलाच जास्त मिळतंय.
सातत्यानं गुजरातला मात देऊन महाराष्ट्र नंबर एकचे राज्य राहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर कसा राहिल याचेच आराखडे मोदी आखत असेल ,त्याच्यासमोर अडवाणी गप्प बसले तर देवेंद्र तावडे पंकजा वगैरे पोरंटोरं त्याला काय जाब विचारणार.ती पण गप्प बसणार व राज्य खड्ड्यात जाणार. त्यापेक्षा आघाडी काय वाईट आहे?

तसं असतं तर पुण्याला ऑटो टेक्नॉलोजी पार्क मिळालं असतं का? बाकी तुम्ही कालचे चायना बरोबरचे एमओयू पाहिले असतीलच. त्यातल्या गोष्टी गुजरात साठी होत्या काय? राज्य खड्ड्यात जाणार म्हणजे अजून जायचं राहिलंय असं वाटतंय का तुम्हाला? की आपण फार प्रगत राज्यात रहातोय असा भ्रम आहे तुम्हाला? महाराष्ट्र पिछाडीवर आहे तो आघाडीमुळे, मोदी मुळे नव्हे. किती जमीन सिंचनाखाली आणली दादांनी? महाराष्ट्रातले उद्योग गुजरात व कर्नाटकात पलायन का करतायत? चोवीस तास विजेचं काय झालं? विदर्भ आणि मराठवाड्याची काय हालत करून ठेवलीय? पाणी पळवायचे उद्द्योग कुणाच्या आशिर्वादाखाली झाले? जातिय तेढी आणि आरक्षणातून होणारी भांडणं कोणी लावल्या? आणि जमीनी पळवणारे (आणि वर दुसर्‍याला जातियवादी पक्ष ठरवणारे) पवार व तत्सम बरे की पुण्याला ४ महिन्यात ईंडस्ट्रीयल पार्क देणारं, मुंबईच्या विकासाच्या आराखड्याला मुंबई-शांघाई अ‍ॅग्रीमेंट द्वारे हात घालणारं मोदींचं सरकार बरं हे लोक ठरवतीलच. आपल्या कर्मा बद्दल दुसर्‍याला दोष द्यायचे प्रकार तुम्ही अशिक्षित जनते समोर (आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या "दादा तुमच्यासाठी काय पण" छाप दूधा आणि साखर कारखान्याचे अहवालच फक्त वाचू शकणार्‍या लोकांसमोर) चालू ठेवा पण मिपावर लोक सुशिक्षित आहेत! इथं फालतू बोललं तर लोक पप्पू करतात हे जरा लक्षात ठेवून असा.

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2014 - 9:15 pm | श्रीगुरुजी

आदरणीय श्री. रा. रा. नानासाहेब,

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा उल्लेख एकेरी न करता आदरार्थी करावा ही नम्र विनंती. मोदींचा एकेरी उल्लेख करायला ते आपल्या घरचे घरगडी किंवा शाळेतले सवंगडी नसून देशाचे पंतप्रधान आहेत याचे भान असू द्या.

>>> महागाई कमी करतो असे आश्वासन देऊन चार महीन्यात काय विशेष उपाय योजना केल्या मोदीने? एकही नाही.याला पाट्या टाकत बसणे म्हणतात.

१६ मे २०१४ या दिवशी आपल्या गावात पेट्रोलचे दर प्रति लिटर किती होता? आणि आज किती आहे?
१६ मे २०१४ या दिवशी महागाई निर्देशांक किती होता आणि आज किती आहे?

आजानुकर्ण's picture

19 Sep 2014 - 9:41 pm | आजानुकर्ण

आपल्या घरचे घरगडी किंवा शाळेतले सवंगडी नसून देशाचे पंतप्रधान आहेत याचे भान असू द्या.

हा हा हा. हे पटलं. आवडलं. हे सर्वच पंतप्रधानांना लागू आहे की फक्त मोदीमजकुरांना?

हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी मुक्ताफळे उधळताना हा आदर कुठे जातो काय माहिती.

मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते?

नानासाहेब नेफळे's picture

23 Sep 2014 - 3:19 pm | नानासाहेब नेफळे

तर काय! तुम्ही आडवाणींना पंतप्रधान समजत होता कि काय??? :ROFL:

हाडक्या's picture

23 Sep 2014 - 3:22 pm | हाडक्या

हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा पाटील-शेखावत या राष्ट्रपती होत्या हो.. नै म्हंजे म्हैत असावं म्हणोन.

काळा पहाड's picture

23 Sep 2014 - 3:51 pm | काळा पहाड

हो. ते पेपरमधून वाचल्यावर कळलं खरं. बंगला बांधायची बातमी, वस्तू घरी नेल्याची बातमी, त्यांच्या नवर्‍याबद्दल बातमी. काँग्रेसच्या अतिशय प्रतिभावंत कार्यकर्त्या खरंच. किती स्वच्छ प्रतिमा. तुमच्यासारखे चाहते त्यांच्या पाठीशी असल्यावर नवल नाही की त्यांनी इतका मोठा ठसा राष्ट्रपतीभवनावर उमटवला.

हाडक्या's picture

23 Sep 2014 - 4:48 pm | हाडक्या

अहो. तो नानासाहेबांच्या प्रतिसादाला उपरोध म्हणून होता. पण जाऊ द्या (आमचाच पोपट झाला म्हणायचा ;) )..

काळा पहाड's picture

23 Sep 2014 - 3:43 pm | काळा पहाड

तर काय! तुम्ही आडवाणींना पंतप्रधान समजत होता कि काय??? ROFL

नै ब्वा. पण आम्माला तर गेली पाच वर्ष प.पू.सोनियाजी पंतप्रधान आहेत काय असंच वाटत होतं. प.पू.राहुलजी उपपंतप्रधान आहेत हे तर आम्हाला माहीतच होतं.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2014 - 8:40 pm | श्रीगुरुजी

सोनिया निव्वळ पंतप्रधान नव्हत्या, तर त्या पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री इ. सगळे काही होत्या.

मनमोहन सोनियांची एडिट केलेली छायाचित्रे नाही दिसली का ? तेव्हा कुठे गेला होता हो आदरभाव वगैर...????

एकतर्फी का ठोकताय राव ??

या आदरभावाबद्दल मात्र सहमत.. हे मोदी फ्यान फार पक्षपाती पणा करतायत राव. हे काही बरोबर नाही. जसा आर्मीमध्ये रँकला सलाम असतो. तसाच इथे पदाला मान असतो ना. मग भले कठपुतळी का असेना. त्यावेळेस तुम्ही आदर दाखवायलाच हवा कारण तो पदाला काढलेआपला विरोध आपण मतपेटीतून दाखवलाच की.. अगदी कपडे काढले पार.
पण म्हणून दोन्ही बाजूनी सभ्यपणा सोडणे ही चूक.
थोडक्यात पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री इत्यादी पदांना तो आदर आहे तो त्यावेळी दिलाच पाहिजे. तुम्हाला तिथे बसलेली व्यक्ती पटो वा ना पटो.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी

+१

उद्या लालू, कलमाडी, दिग्विजय इ. नग पंतप्रधान झाले तरी त्यांना सुद्धा अतीव आदर दाखविलाच पाहिजे.

औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही 'हो' अर्थातच..
कारण मोदींबद्दलदेखील काही लोकांची अशीच भावना असेल त्यांनादेखील हाच सल्ला राहील.

आपली व्यवस्था तेवढी परिपक्व होत आहे हे कोणते 'नग' त्या पदांपर्यंत पोचू शकतील ही बाब दर्शवते.

बाकी तुम्हाला हवा तो पंतप्रधान झाला तर तुम्ही त्याचा आदर करणार आणि इतरांना त्याचा आदर करायचा (शहाजोग) सल्ला (नव्हे ऑर्डरच) देणार, हा तर निव्वळ दांभिकपणा झाला.

पंतप्रधान नाकर्ता असेल तर टिका करु शकता, नक्कीच, पण पदाचा आदर राखून. हे दोन्ही बाजूनी सत्तेत असताना होत असले पाहिजे, असे वाटते.

(तटस्थ) हाडक्या

आजानुकर्ण's picture

24 Sep 2014 - 12:17 am | आजानुकर्ण

__/\__ मस्त प्रतिसाद. मात्र पालथ्या घड्यावर पाणी होण्याची शक्यता जास्त आहे.

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 9:52 pm | नानासाहेब नेफळे

गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोलचे दर उतरले ,त्यात मोदींचे कतृत्व शून्य आहे. पेट्रोलच्या दरात कपात झाली पण डीझेलचे दर वाढले हे सांगायला भाजपचे लोक का तयार नाहीत?...

आजानुकर्ण's picture

19 Sep 2014 - 9:55 pm | आजानुकर्ण

मोदींना घाबरुन ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन वाढवले आणि मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ झाल्याने तेलाचे भाव कमी झाले असे व्हॉट्सअॅपवर ऐकले होते बॉ.

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2014 - 11:15 am | श्रीगुरुजी

पाऊस उशीरा सुरू झाल्याने पाहिजे तितक्या प्रमाणात भाव कमी झाले नाहीत. यात मोदींचा दोष शून्य आहे.

युपीएच्या काळातच ४-५ वर्षांपासून डिझेल दराचे नवीन धोरण सुरू आहे. त्या धोरणानुसार दर महिन्याला डिझेलचे दर प्रति लिटर ५० पैशांनी वाढविले जातात. यात मोदींचा दोष शून्य आहे. किंबहुना पुढील महिन्यापासून डिझेलचे दर स्थिर राहतील किंओवा काही प्रमाणात कमी होतील. पेट्रोलचे दर देखील अजून कमी होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेमुळे हे दर १ नोव्हेंबर नंतरच कमी होतील.

बादवे, १६ मे रोजी महागाई निर्देशांक किती होता आणि आज किती आहे?

पोटे's picture

20 Sep 2014 - 11:27 am | पोटे

काँग्रेसच्या काळातही अशीच कारणे आस्तित्वात होती ना ?

मृत्युन्जय's picture

20 Sep 2014 - 12:37 pm | मृत्युन्जय

लोकांचा खां ग्रेस ला विरोध फक्त इंधन दरवाढीच्या कारणावर होता का?

पोटे's picture

20 Sep 2014 - 10:53 am | पोटे

रिक्षाचे दर दोन रु वाढले.
टोम्याटो ८० रु किलो झाले.
रेल्वेचे दर वाढले.

नेमकं काय स्वस्त झालं ?

नानासाहेब नेफळे's picture

20 Sep 2014 - 11:03 am | नानासाहेब नेफळे

ज्यांचे गाल लाल असतात तेच फक्त टोमॅटो खातात.भाजपच्या नेत्याचा शोध.
http://www.esakal.com/esakal/20140730/5125861762891578810.htm

काळा पहाड's picture

20 Sep 2014 - 1:45 pm | काळा पहाड

हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची समजून अशी की ही कामे सरकारची आहेत. सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. त्यामुळे हे दर वाढले, ते दर वाढले असं बोलणे म्हणजे राष्ट्रवादीपद्धतीप्रमाणे (म्हणजे अडाणी, उद्धटपणे, गुढघ्यात मेंदू टाईप) विचार करणे होय. याला रिझर्वेशन द्या, त्याला रिझर्वेशन द्या, पैसे आणि दारू वाटा, नको असताना कांदा एक्स्पोर्ट करा, नको असताना साखर इंपोर्ट करा या गोष्टी पवार व तत्सम लोकांनी (ज्यांना मेंदू असण्याबाबतच शंका आहेत) करायच्या गोष्टी आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2014 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरकारचं काम नोकर्‍या देणं नाहीये तर नोकर्‍या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्‍या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.

+१००

सबसिडी, राखीव हे, राखीव ते, अर्ध्या दरात वीज, कर्ज माफ अशी भीक देऊन जनतेला इतके लाचार बनवले जाते आहे की त्यामुळे अगदी शिकलेसवरलेले लोक अभिमान विसरून कोण काय फुकट देतोय इकडेच लक्ष ठेवताना दिसतात.

सरकार हे पैसे छापून फुकट खिरापत वाटणारी संस्था नाही. तर लोकांना सक्षम होण्यासाठी पोषक वातावरण आणि समान संधीचे वातावरण तयार करणारी संस्था आहे. लोकांचेच पैसे (कराचे किंवा राष्ट्रिय कर्ज काढून) लोकांनाच सबसिडी म्हणून द्यायचे आणि वर ते आम्ही दिले असे सांगून शेंडी लावणे याला चलाखीला सुशिक्षित लोकही फसतात ही मोठी शोकांतिका आहे. भीक देऊन / किंमती बळजबरीने खाली ठेऊन परिस्थिती सुधारत नाही तर नागरिकांची आर्थिक क्षमता वाढवून सुधारते. किंमती बळजबरीने खाली ठेवण्याने एकतर उत्पादकाचे नुकसान होते किंवा नागरिकांच्या कराचा सबसिडीच्या स्वरूपात अक्षम्य व्यय होतो. दोन्हीत नेत्यांना मोठेपना मिरवता आला तरी एकूण नागरिकांचेच नुकसान होते. म्हणूनच सबसिडी नाईलाजाने थोड्या कालाकरिता केलेला उपाय म्हणून ठीक आहे, मुख्य तंत्र म्हणून नाही.

सरकारकडून आम्हाला सबसिडीचा मिंधेपणा नको आहे; तर सरकारने शिक्षण, पाणी-सांडपाणी, रस्ते-रेल्वे, इ ची व्यवस्था करावी आणि समान संधीची व्यवस्था निर्माण करावी, मग आम्ही आमचे उत्पन्न वाढवून सबल होऊन चढाओढीत भाग घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करू; असे म्हणणार्‍या नागरिकांचा देशच पुढे जाऊ शकतो.

नाहीतर १००० ची नोट घेऊन मतदान करणार्‍या आणि तोच नेता निवडून आल्यावर त्याला ५०,००० रुपये देऊन माझ्या मुलाला नोकरी दे असे सांगणारे काय कमी नाहीत... त्यांना हेच कळत नाही की त्यांना मताचे १००० मिळाले नाहीत तर ४९००० चा तोटाच झाला आहे. कारण नोकर्‍या निर्माण होतील असे वातावरण निर्माण करणे शासनाचे काम असते... नोकर्‍या विकणे नाही !

पोटे's picture

20 Sep 2014 - 7:22 pm | पोटे

ग्यास कोणत्या दराने घेता? स्वस्त की सबसिडीविरहीत ?

मोदी येण्यापुर्वी फेसबुकावर अशा ढीगभर पोस्ट फिरत होत्या. स्वस्ताईम्नसली तरी चालेल. सबसिडी मिंधेपणा नको. त्याला लाखो लाइक मिळाले होते.

मोदीनी घोषणा केली. ज्याना परवडते त्यानी महाग दराने ग्यास घ्या.

त्यासाठी फक्त तीन हजार लोकांनीच नोंदणी केली आहे म्हणे. ते लाखो लाइक देणारे कुठे गायबले ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2014 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३००० लोकांनी केलेली सुरुवात फार वाईट नाही... इतका काळ असलेली सवय सोडायला कठीण जाणारच आहे म्हणा ! शिवाय आम्ही हे फुकट देऊ / ते फुकट देऊ (आणि मनातल्या मनात "तुम्हाला आमचे मिंधे बनऊ") असे म्हणणार्‍या हितसंबंधींची फौज तयार आहेच ना ? तेव्हा ते सर्वसामान्य माणसाला जरा कठीण जाणं सहाजीकच आहे. पण आता केवळ तुम्ही विचारलंत म्ह्णून सांगतो की, पहिल्यापासूनच कोणतीही फुकट मदत घेताना खूप अवघड वाटत असल्याने वैध मार्गांनी स्वत:ची कमाई वाढवण्यावर भर आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर नव्हती तेव्हापासून "अंथरूण पाहून पाय पसरा" हा वडीलधार्‍यांनी दिलेला मंत्र पाळतो आहे. मात्र त्यात स्वतःची एक भर जरूर टाकलेली आहे :"अंथरूणाचा आकार वाढविण्यासाठी वैध मार्गांनी घडपड करण्यात काहीही वाईट अथवा कमीपणा नाही."

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2014 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि हो, मी जनतेसाठी आणि देशासाठी काय भले आहे ते व्यवस्थापनाच्या भाषेत सांगितले होते... राजकारणाच्या भाषेत नाही. कोणत्याही नावाच्या पक्षाने प्रामाणिकपणे चांगली कृती केली तर देशाचं भलेच होईल !

"क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी" हा खेळ खेळण्यात आम्हाला रस नाही. पण मिपावर इतरांनी तो खेळायला अजिबात ना नाही :) (आम्ही कोण लागून गेलोय नको म्हणणारे ?! :) )

चलने दो... केव्हापासून पॉपकॉर्न घेऊन पुढच्या सीटमध्ये बसलो आहे ;)

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2014 - 9:23 pm | श्रीगुरुजी

>>> हा थोडंसं विषयांतर होतंय पण सरकारचं काम पैसे वाटणं किंवा महागाई कमी करणे हे नसतं. सरकारचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सुद्धा नसतं. संसदेचं काम कायदे बनवणं आणि सरकारचं काम त्या कायद्याची अंमलबजावणी होतेय हे पहाणं असं असतं. पण राजे, महाराजे, छत्रपती, जमीनदार अशा मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या जनतेची ........

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

मोदी याच भूमिकेतून पुढे जात आहेत. तात्कालिक लालूच दाखविण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांवर त्यांचा भर दिसतोय. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची मर्यादा वार्षिक रू. १ लाख ऐवजी रू. १,५०,००० करणे, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविणे, पेट्रोलचे दर गेल्या ४ महिन्यात रू. ६ प्रति लिटर कमी करणे इ. निर्णयातून जनतेच्या खिशात जास्त उत्पन्न जाण्याचे मार्ग सुरू झाले आहेत. त्याच बरोबरीने काश्मिर मधील भयंकर पूरस्थितीत तिथे जाऊन नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबविले गेले. गेल्या वर्षी उत्तराखंड मध्ये देखील आपल्या प्रशासकीय कार्यक्षमतेची अशीच चुणूक दाखविली होती. परराष्ट्र धोरणात चीन व पाकिस्तान विरूद्ध बर्‍याच काळानंतर एक खंबीर भूमिका भारताने घेतली. एकंदरीत मोदी योग्य दिशेने जात आहेत.

पोटे's picture

21 Sep 2014 - 2:45 am | पोटे

पेट्रोल कमी केले की वैयक्तिक गाडीवाल्याला फायदा होतो.

पब्लिक ट्रान्सपोर्ट / वस्तु वाहतुक डिझेलवर जास्त कrun चालते ना ? आणि डिझेल महागच झाले आह ना ?

पोटे's picture

21 Sep 2014 - 2:56 am | पोटे

गेल्या तीन महिन्यात डिझेलच्या किमती तीनदा वाढल्या ना?

पेट्रोलच्या किमती कमी करुन व डिझेलच्य वाढवुन स्वस्ताई येते का ?

चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत..? हे मी काय पाहतोय ?

आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार..!!

सौंदाळा's picture

19 Sep 2014 - 2:48 pm | सौंदाळा

खि खि खि
हाडक्याशी सहमत

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 2:51 pm | नानासाहेब नेफळे

गुरुजींनी योग्य विश्लेषण केले, त्याला योग्य म्हण्टले तर कुठे बिघडले? विरोधासाठी विरोध करायला आम्ही भाजपेयी नाही.

तुम्ही कोण आहात ते आम्ही कोण सांगणार..! गुरुजीच ते 'व्यवस्थित' सांगु शकतील हो.. ;)
बाकी तुम्ही फार म्हणजे फारच शांत झाला आहात आणि खूपच मुद्देसूद बोलत आहात असे निरिक्षण नमूद करतो.. (ह्ये वागनं बरं नव्हं..!)

(अवांतरः माई दिसल्या नाहीत त्या बरेच दिवस ? काय आचार संहिता लागु व्हायची वाट बघतायत का त्या ? ;) )

मृत्युन्जय's picture

19 Sep 2014 - 2:48 pm | मृत्युन्जय

माझे मत तर बाबा भाजपालाच असेल (सेना बरोबर असेल तर सेना भाजपा युतीला). मोदी उत्तम काम करताहेत. देशाची प्रतिमा निर्माण करणे, परराष्ट्र संबंध इत्यादींबाबत १०० दिवसात योग्य पावले उचलली आहेत. अगदीच पाट्या टाकताहेत असे म्हणले तरीही काहिच न करणार्‍यांपेक्षा किंवा धरणात मुतु इच्छिणार्‍यांपेक्षा सुसंस्कृत भाजप नक्कीच चांगला.

होकाका's picture

19 Sep 2014 - 5:22 pm | होकाका

नेफळेसाहेब, आपण कोणाला मत द्यावंत हा फक्त आपलाच प्रश्ण आहे. फक्त एवढीच एक विनंती आहे की असे महाराष्ट्र विरुद्ध गुजराथ हे स्वरुप ह्या चर्चेला देऊ नका. अगदी एक नजीकच्या वर्तमानातलं उदाहरण द्यायचं तर केंद्रसरकारने भारतात आठ ठिकाणी electronics manufacturing hubs करण्याचं ठरवलं आहे, त्यात निवडलेली चार स्थळं महाराष्ट्रातली आहेत आणि तीन गुजराथमधील. महाराष्ट्रातली शहरं आहेतः ठाणे, औरंगाबाद, नागपूर, आणि नाशिक.

देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला सर्व बाबींचा विचार करावा लागतो, त्यात फक्त एकाच प्रांताचा विचार करणं हे ते करूच शकणार नाहीत. मोदींनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की त्यांचा भर त्या त्या राज्यांच्या शक्तीस्थळांना अजूनच मजबूत करण्यावर राहील.

मला सांगा, जर त्यांना फक्त गुजराथचेच हीत बघायचे असते, तर त्यांच्या सरकारने इराकमध्ये अडकलेल्या केरळी परिचारीकांना सुखरूपपणे परत आणण्याचे प्रयत्न केले असते का? तसंच, श्रीलंकेत आणि पाकिस्तानात अटक होऊन पडलेल्या मच्छिमार बांधवांना सोडवून आणण्याची तसदी घेतली असती का?

काळा पहाड's picture

20 Sep 2014 - 1:49 pm | काळा पहाड

अहो तसं त्यांनी केलं नाही तर त्यांच्या पक्षाची युएसपी (http://en.wikipedia.org/wiki/Unique_selling_proposition) काय? एकतर त्यांना काम करावं लागेल नाहीतर भुकं मरावं लागेल. लोक दगडं मारतील ते वेगळंच.

राजकारणात आपल कोण याबाबत अनेक वर्तुळ असतात.राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्त्व हे आपल असू शकत .भाजपची हिंदुत्त्ववादी भूमिका महाराष्ट्रात झिरपण कठीण आहे.हे लक्षात घेऊन मराठी माणसाच्या आणि खासकरून मुंबईच्या हितासाठी शिवसेना स्थापन झाली.मोदींचा कार्पोरेट चेहरा युवकांना भावला आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लाट देशभर उसळली .परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे .त्यामुळेच शरद पवार ते वसंतराव नाईक सगळ्यांनीच मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहील याला प्राधान्य दिले.जरी नेतृत्व विचारी नसलं तरी मुंबईतला सुशिक्षित मराठी समाज नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे .शिवसेनेचा आवाका आणि गरज ही मुंबईपुरता आहे हे ठाकरे पवार दोघही जाणून होते...त्यामुळे युती तुटली तरीही आश्चर्यकारक राजकीय समीकरणे महाराष्ट्रात अस्तित्वात येऊ शकतात...आगामी काळात सेना राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांची भाजप कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षातील लढत होताना दिसेल..

चौकटराजा's picture

21 Sep 2014 - 6:39 pm | चौकटराजा

.परंतु मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही शिवसेनेच्या हाती आहेत.
'शिववडा'चा टर्नओव्हर इतका वाढला काय ? शिवसेना काय पक्ष आहे?

खायचे वडे वेगळे असतात हो...दाखवायचे वेगळे....आता शिवसेना हा पक्ष नाहीये ? अमित शहा चावला कि काय तुम्हाला पुण्यात???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2014 - 1:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मुर्खपणा. ह्या दुफळीचा फायदा घेऊन परत आघाडी सत्तेत यायला नको म्हणजे झालं.

शिद's picture

19 Sep 2014 - 1:43 pm | शिद

अगदी हेच मनात आलं होतं बातमी वाचून.

पोटे's picture

19 Sep 2014 - 2:00 pm | पोटे

:)

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 2:08 pm | प्रसाद गोडबोले

युती तुटली हे एका अर्थाने चांगलेच झाले . आता शिवसेना भाजप दोघांनाही आपापली औकात कळेल निवडणुक हरल्यावर दोघेही होश मधे येतील !

शिवाय निवडणुक जिंकल्यावर आपल्या त्या निमित्तने का होईना पण राहुल बाबा चे दर्शन होईल , बरेच दिवस काही ओरीजीनल कॉमेडी ऐकली नाही राव !

बाकी आता पवार साहेब अन राजसाहेब ह्या दुफळीचा फायदा कसा उठराजसाहेब्पाहणे औत्सुक्याचे ठरेल :)

सौंदाळा's picture

19 Sep 2014 - 2:20 pm | सौंदाळा

आता राष्ट्र्वादीचे आमदार निवडणुकीनंतर लाली, लिपस्टीक लावुन उभे राहणार आणि जो जास्त पैसे देइल त्याच्याबरोबर जाणार काँग्रेस असो, भाजपा असो नाहीतर सेना.

पोटे's picture

19 Sep 2014 - 4:56 pm | पोटे

शिवसेना आणि इंदिरा काँग्रेस युती होती १९७९ साली !

तेंव्हा सेनावाले ओठाला काय लावुन बसले होते?

ते काय मला ठाऊक नाही विचारुन सांगा काही कळलं तर

मृत्युन्जय's picture

19 Sep 2014 - 2:49 pm | मृत्युन्जय

युती तुटली हे वाईटच झाले. आता परत नाकर्ते आणि माजोरडे लोक सत्तेवर येत्तील.

मित्रान्नो,

आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ?
१ सर्व पक्ष अपने दमपे

२ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)

विरुद्ध (कॉ + राकॉ + इ )

विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)

३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध

(कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध

(शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)

४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

मित्रान्नो,

आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ?
१ सर्व पक्ष अपने दमपे

२ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)

विरुद्ध (कॉ + राकॉ + इ )

विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)

३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध

(कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध

(शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)

४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

चौकटराजा's picture

19 Sep 2014 - 2:58 pm | चौकटराजा

मिपावर आम्ही नेहमीच एक पालूपद लावत असतो. आपली लोकशाही ही एक भंपक प्रक्रिया आहे. आतापर्यंत १२० कोटी लोकांपकी एकानेही आम्हाला " पक्ष" या शब्दाची व्याख्या नेमकी कोणत्या कायद्यात वा कोणत्या घटनेत सांगितलेली आहे हे इसकटून सांगितलेले नाही. लोकांचे मत हे आपल्या निवडणूक प्रक्रियेत फार फसवे आहे. त्याचे नीट प्रतिबिंब ना कायदा बनविताना होते ना सरकार बनविताना. कोण्त्याही विषयावर सार्वमत घेण्याची तर भारतात पद्धतच नाही. ते घेतले तर अल्पसंख्याकांचे राजकारण कसे खेळता येणार अशी अडचण असू शकेल. म्हणून कार्यकर्ता व राजकारणी यांची एक लुटारू जमात आपण १९५० साली जन्माला घातली आहे. पाच वर्षातून फक्त एकदा मत द्यायचे ते ही प्रमाणशीर महत्व नसलेले. यापलिकडे भारतीय जनतेच्या हातात आहे काय ? सत्तेच्या व्यापाराचा हा नंगा नाच वी द पीपल ऑफ इंडियाने सुरू केला आहे आणि त्याचे परिणाम आपणच भोगणार आहोत.

बरे झाले. दोघानाही स्वतःच्या मर्यादांची/ बलस्थानांची जाणीव होइल.

सुहास झेले's picture

19 Sep 2014 - 2:59 pm | सुहास झेले

युती तुटेल असे वाटत नाही..... तुटलीच तर सेनेला जास्त फायदा होऊ शकतो. भाजपाकडे महाराष्ट्रासाठी कोणताही चेहरा नाही. गोपीनाथ मुंडेंची कमतरता तर भासणार...

सुहास..'s picture

19 Sep 2014 - 3:14 pm | सुहास..

युती तुटली ? ती होणार ....निवडणुकांच्या आधी असो वा नंतर ....महाराष्ट्र कुणा ही एका पक्षाला मिळणार नाही हे धाग्यातला प्रतिसादातुनच दिसतय ...प्रश्न आहे की किंगमेकर कोण होणार :)

बाळ सप्रे's picture

19 Sep 2014 - 3:14 pm | बाळ सप्रे

अजुनही प्रश्नचिन्ह आहे!! पक्की बातमी नाही.

पण मोदीलाटेच्या जोरावर मिळालेल्या यशाबद्दल सेनेने कृतज्ञता दाखवायला हवी. कमी जागा आल्या तरी मीच मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा पवित्रा योग्य नाही.

मान्य पण पण भाजपाकडे तरी कुठे आहे मुख्यमंत्र्यासाठी योग्य उमेदवार ?? तावडे अभ्यासु आहेत ..आणि फडविसांना विदर्भाच्या पलीकडे जग आहे की नाही ते माहीत नाही ..बाकी तर पोर टोरंच आहे ...

काउबॉय's picture

19 Sep 2014 - 3:20 pm | काउबॉय

कंजूस's picture

19 Sep 2014 - 3:40 pm | कंजूस

होऊन जाऊदे एकदा तीनतेरा स्वबळाची ऐशी तैशी (तिकडे दिल्ली आणि इकडे मुंबई )

तोफा डागायला एकेक बुरुज वाढला प्रत्येक पक्षाकडे पण सामान्य माणसाकडे कांदे बटाटे तुरडाळ ठेवायला साधे कपाट नाही तिजोरी कुठून आणणार?

पिंपातला उंदीर's picture

19 Sep 2014 - 4:08 pm | पिंपातला उंदीर

मुंबईची ताकद काय ?

इंग्रज काळापासून मुंबई बेट आणि आताची मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिला हे रूप द्यायला हजारो उद्यमशील लोकांचा हातभार आहे.
हि मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी म्हणून संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनात अनेक लोक हुतात्मा झालेत
हि मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहावी ह्यासाठी आणि आपल दिल्लीदरबारी राजकारण अबाधित राहावं म्हणून वसंतराव नाईक , वसंतदादा पाटील ते शरद पवार सर्वांनी हस्ते परहस्ते मदत केलेली आहे
हा सगळा इतिहास झाला
आता मुंबईच भविष्य काय आहे ?
लोकांना वाटतंय कि मुंबईवर भाजपला सत्ता हवीय , पण कोणत्या भाजपला ?
फडणवीस ,तावडे, खडसेंच्या भाजपला कि मोदी शहांच्या भाजपला ?

मोदींना शहाना मुंबई मुळात नकोच आहे , त्यांना शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत.
मित्र पक्ष असला तरी त्याच खच्चीकरण करून आपली ताकत वाढवण हे प्रत्येकच धोरण असतच आणि त्यालाच राजकारण म्हणतात .
कालपरवाची मोदींची पावलं त्याच दिशेने पडतात आहेत.
चीनचे प्रधानमंत्री दिल्ली मुंबई सोडून आधी अहमदाबादमध्ये येतात , सामंजस्य करार करतात तोही गुजरात सरकारबरोबर ?
चीन बरोबर गुजरातच्या प्रधानमंत्र्यांनी जे करार केलेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या योजना गुजरातमध्ये नेल्या जात आहेत ते पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट आहे.

मुंबईत असणारे गुजराती फक्त पैशाशी बांधील आहेत त्यांना बाकी काही घेण देण नाही
मराठी अस्मिता आणि मुंबईशी असणारी भावनिक बांधिलकी ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसाच्या आहेत
गुज्जुना त्याच्याशी काही कर्तव्य नाही.
उद्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही
मुंबई शेअर बाजारचा आत्मा पैसा आहे , जर तिकड तितक्याच ताकदीचा शेअर बाजार उभा राहिला तर मग तो हि प्रश्न सुटेल

व्यापारी लोकांना काय कुठेही धंदा करायचा आहेच आणि जागतिकीकरणाच्या जमान्यात कुठेही बसून तुम्ही जगात व्यवहार करू शकता

आणि एकदा मुंबईच आर्थिक महत्व कमी झाल कि शिवसेनेचं कंबरडे मोडलच म्हणून समजा कारण शिवसेनेच्या राजकारणच आर्थिक स्त्रोत मुंबई आहे हे उघड आहे
मग खुशाल शिवसेना मुंबई आमची म्हणून बोंब मारू देत , आर्थिकदृष्ट्या महत्व कमी झालेलं आणि पायाभूत सुविधांवर पडणारा जास्तीचा ताण सहन करताना मरायला टेकलेल हे शहर शिवसेनेच्या ताब्यात असण म्हणजे ओसाड गावची पाटीलकी दिल्यासारखं आहे.

एकदा आर्थिक नाड्या आवळल्या कि शिवसेना खच्ची करण अजून सोप होईल

तेव्हा मुंबई गुजरातमध्ये जाणार म्हणून आवई उठवण्यात काही अर्थ नाही आणि शहा मोदींना त्यात रसही नाही

मराठी माणसाचा विरोध पत्करून हा उद्योग करण्यापेक्षा गुजरातमध्ये प्रतीमुंबई उभी करून आर्थिक राजधानी म्हणून अहमदाबाद किंवा एखाद नाव शहर पुढे आणायला त्यांना जास्त सोप जाईल

मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे .

श्रेय- आनन्द शितोळे (फेबु वरुन साभार) एक वेगळा मुद्दा. आप आपलि मत ताडुन बघा

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 4:13 pm | नानासाहेब नेफळे

छान प्रतिसाद अमोल. मी वरती त्याच आशयाचा प्रतिसाद दिलेला आहे.

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2014 - 4:19 pm | टवाळ कार्टा

पटतय...कदाचीत वेळ लागेल...पण असे होणे शक्य आहे :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2014 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादातिल सगळं काही वादासाठी खरं मानलं तरी... मुंबईची अशीच किंबहुना यापेक्षा जास्त प्रगती (कारण मुंबई शतकभर अगोदरपासून व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे) करायला कोणी आपले हात धरले होते/आहेत काय? "मुंबईची ताकद" म्हणून सुरुवात करायची आणि त्याच श्वासात "कोणी मुंबईचा गळा घोटतोय" असे म्हणायचे म्हणजे जरा जास्तच होतेय, नाही का ?!

बलवानाने "दुसर्‍या कोणी मला अजून बलवान व्हायला मदत करायला पाहिजे" असे म्हणुन दुसर्‍याचे मिंधे राहण्यापेक्षा आपल्या प्रगतीचे प्रयत्न स्वतः करावे. म्हणजे असे दुसर्‍याच्या नावाने गळे काढायची गरज राहत नाही. निदान गेले काही दशके भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून शेखी मिरवणणार्‍या राज्यातिल नागरिकाच्या तोंडी वरचा सर्वच प्रतिसाद दवणिय (हा शब्द मिपाच्या सौजन्याने :) ) आणि अगतिक वाटतो आहे. एक अभिमानी मराठी माणूस म्हणून मला हे वाचून खरंच अत्यंत शरमेचे वाटले !

महाराष्ट्र आणि मराठी माणूस काही इतका रस्त्यावर पडलेला नाही. जरा बरे सुजाण आणि सत्शिल नेते फार मोठा फरक घडवून आणू शकतील. मात्र ते सुजाणपणे निवडणे मराठी माणसाच्याच हातात आहे.

सरळ सरळ इतका कांगावा करण्याने बहुतेक हसेच होते... कारण इतरांना डोळे, कान व बुद्धी असते (हे कांगावा करण्याच्या भरात बहुतेक विसरले जाते :) )

ज्या देशांत "देशांतर्गत चढाओढ" आहे तेच देश इतर देशांशी चढाओढ करून जगात पुढे आलेले आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Sep 2014 - 8:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बरय की मग. तेवढेच ते यु.पी. बिहारी भैय्ये तिकडे जातील. महराष्ट्रावरचा ताण कमी होईल. आणि एक पुणेकर असुनही मुंबईचं कौतुक करतोय आता.

कुणीही कितीही काहीही केलं तरी मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. प्रती मुंबई गुजरातमधे उभी राहु शकेल पण तरीही मुंबई ती मुंबईच. एक म्हणजे मुंबईच्या अर्थकारणाचा आवाका लक्षात घेतला तर मुंबईमधला सेट व्यवसाय सोडुन गुजरातमधे नव्यानी व्यवसाय सुरु करण्याएवढे लोकं मुर्ख नाहीत. फार तर तिकडे शाखा सुरु करतील, तिकडुन कारभार चालवतील. पण आहे ती गुंतवणुक राहाणारच.

हा अपप्रचार फक्त आणि फक्त द्वेशापोटी चालु आहे.

(न.मो. फॅण)

द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही

हे इकडे करायला कोणी थांबवलंय? मुम्बै सोडा साधा सातार्‍यातही एखादा उद्योग उभा करायचा झाला तर तेथले नेते उद्योजकांकडे बर्‍याच मागण्या करतात. इथे असलेले उद्योग दुसर्‍या प्रान्तात जातात त्याबद्दल कोणी जराही वाटून घेत नाही.
प्रत्येक गावात एमआयडीसी ओसाड पडलेली दिसते. बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू करायला महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधलेले होते? अहमद नगरची कायनेटीक इंजीनियरिंग , सातार्‍याची महाराष्ट्र स्कूटर्स , हे कारखाने कित्येक वर्षे बंदच आहेत. क्षमता असूनही कोणतेच उत्पादन होत नाही. ही उदाहरणे बोलकी आहेत.
कॉम्ग्रेस असो की इतर कोणी. नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे.
दिल्लीत भाजप मधे महाराष्ट्राचे खासदार आहेत की ते असे प्रयत्न का करीत नाहीत महाराष्ट्रात केवळ शिवसेनाच उद्योग आणते असा भ्रम जोपासला आहे. सेनेने इथे असे कोणते नवे उद्योग आणले यांची कोणी यादी देईल का?

हाडक्या's picture

19 Sep 2014 - 4:31 pm | हाडक्या

+१ विजुभाऊ..!
आमच्या सातार्‍यात ओसाड एम.आय.डी.सी. पाहून खरच हळहळ वाटते..

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 8:07 pm | नानासाहेब नेफळे

मुजरे घाला आणखीन म्हंणजे विकास होइल

आम्ही त्यांना फाट्यावर मारतो.. तरीही मुजरे घालणारे भरपूर आहेत आणि आमच्या नशीबी जी शिवाजी महाराजांच्या नावे (त्यांच्या नावाला न शोभणारी) राजेशाही आलेली आहे त्याला काहीही उपाय नाही म्हणून जास्तच हळहळ, बाकी काही नाही.

तुम्ही परत तुमच्या वळणावर आलेले पाहून आनंद वाटला.. ;)

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 4:43 pm | काळा पहाड

मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही. हे लोक मजूर म्हणून सुद्धा काम करू शकत नाहीत. जिथे तिथे जातीयवादी आणि कंपूबाज गोष्टी करत असत्तात. जास्तीत जास्त हे लोक चहाची टपरी, वडापावची गाडी, लोकांना अडवणारे रिक्षावाले असली कामं करत फिरतात. आणि मग हा कसा बाहेरचा आहे, तो कसा भटजी-शेटजी पैकी आहे, तो कसा महाराष्ट्राला विकायला चाललाय आणि माझा जातिय्वादीपणा कसा चांगला आहे असल्या चर्चा करत बसतात. एक गंमत सांगतो. ईंटरव्ह्यू घेताना मुसलमान सुद्धा मराठी लोकांपेक्षा चांगली चमक दाखवतात.

धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा प्रयत्न आणि मराठी लोकांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचं जनरलायजेशन पाहून अंमळ गम्मत वाटली..
नक्की तुम्ही मराठी आहात का ? असल्यास आणि नसल्यास या तुम्हीच दर्शवलेल्या स्थितीपेक्षा वेगळे काही घडावे यासाठी आपला छोटासा का होईना पण प्रयत्न जाणून घ्यायची इच्छा आहे.
अन्यथा मराठी माणूस नुसता तोंडाची हवा दवडण्यात कुठेही कमी पडत नाही असेही म्हणू शकाल मग तुम्ही.

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 5:08 pm | काळा पहाड

१. मी मराठीतच लिहितोय नाही का? पण मी पर्फॉर्मन्स ला प्राधान्य देतो आणि तिथं मराठी लोक बरेच कमी पडतात. मी गुप्ता बरोबर काम करतोय की पटेल बरोबर की सुब्रमण्यम बरोबर यात मला फरक पडत नाही. पण मराठी लोक कंपूबाजी करून काम न करण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. अर्थात हा महाराष्ट्रातला अनुभव आहे. तामिळ्नाडू मधे कदाचित तामिळ लोक्स ही तसंच करू शकत असावेत पण त्याच्याशी माझा संबंध नाही.
२. मला या गोष्टीत कसलाही प्रयत्न करावा अशी माझी इच्छा नाही कारण त्यात माझा वेळ फुकट जातो. मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय.

पिंपातला उंदीर's picture

19 Sep 2014 - 5:11 pm | पिंपातला उंदीर

मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय

नका हो एवढा त्रास घेऊ . महाराष्ट्र / मराठी माणस दबून जातील उपकाराच्या 'पहाड ' खाली

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 5:31 pm | काळा पहाड

दबणे, उपकार, त्रास घेणे, मोडेन पण वाकणार नाही, अस्मिता, सहन करणार नाही, रक्त उसळणे, प्रेमात 'पडणे'.. मराठी माणसांची शब्दावली टिपीकल असते ना?

पिंपातला उंदीर's picture

19 Sep 2014 - 5:37 pm | पिंपातला उंदीर

युती तुटलेली परवडली पण यांचे 'typical ' प्रतिसाद आवर असे म्हण्याची वेळ आली

फुंटी's picture

23 Sep 2014 - 3:55 pm | फुंटी

खिक :-);-)

सुहास..'s picture

19 Sep 2014 - 5:04 pm | सुहास..

+१ टु विजुभाउ ...

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2014 - 10:41 am | प्रभाकर पेठकर

नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे.

सहमत.

मराठी माणसाची निष्क्रियता, शेरेबाजी आणि आळस माझ्या सारख्या लहानातलहान व्यावसायिकालाही जाणवतो.

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 11:53 am | प्रसाद१९७१

पुण्याच्या आसपास च्या उद्योग वसाहतीत कॉ आणि रा़काँ च्या लोकांची खंडणीखोरी इतकी वाढली आहे की छोट्या उद्योजकाला धंदा करणे शक्यच नाही. मोठे उद्योजक थेट वरच पैसे पुरवतात आणि निभावुन नेतात, छोटे आणि मध्यम उद्योजक पार मेले आहेत ह्या गुंडगीरीने.

पिंपातला उंदीर's picture

19 Sep 2014 - 4:33 pm | पिंपातला उंदीर

@विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाशी सहमत . . वरचा मी दिलेला प्रतिसाद हा एक नवीन perception म्हणून फेबु वरून शेयर केला . पण त्या प्रतिसादातल्या bottomline शी मात्र मी सहमत आहे .

मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे

आमच परभणी शिवसेनेचा औरंगाबाद आणि मुंबई पेक्षा मोठा बालेकिल्ला . वर्षानु वर्ष सेनेचे आमदार आणि खासदार इथून सतत निवडून जात आहेत . पण शहराला ओरबाडून खाण्याशिवाय आणि लोकांना भडकावून दंगे करण्याशिवाय त्यांनी काहीही केल नाही . परभणी पुरत (आणि महाराष्टात अशी अनेक शहर आहेत ) बोलायचं झाल तर सेना निवडून नाही आली तर परभणी साठी चांगलाच होईल . Fingers crossed

विटेकर's picture

19 Sep 2014 - 4:56 pm | विटेकर

पन मुंबईच्या श्रीमंतीचा मराठी माणसाला काय उपयोग झाला ? मराठी माणूस कष्टकरी तो कष्ट्करीच राहीला, पूर्वीही म्हणजे शिवसेनेच्या बहारीच्या काळात आणि त्यापूर्वी ही मुंबईवर अर्थिक वर्चस्व पारसी - गुजराती लोकांचेच होते आणि आहे. दक्षिण मुंबई परिसरात पूर्वी ही आणि आता किती मराठी माणसे आहेत ? दादर - गिरगावातील मराठी माणूस केव्हाच उपनगरात चालता झाला. गिरण्यांबरोबर मुंबईतला मराठी टक्का ही घसरला.
मग आज ज्या स्वरुपात मुंबई आहे , ती नेमकी कुणाची आहे ? की मराठी राज्यकर्ते असले म्हणजे मुंबई मराठी होते ?
आणि या मराठी राज्यकर्त्यांनी मुंबईचे मराठीपण ... मराठीपण जाऊ द्या , मुंबईपण टिकावे म्हणून काय केले?
तुम्ही म्हणता तशी , मोदी - शहा अशी गुजराती जोड-गोळी काम करत असेल तर ती गुजरातच्या उत्कर्षासाठी करते आहे
मुंबईच्या खच्चीकरणासाठी नाही . मुंबईचे शांघाय करण्यापासून मराठी राज्यकर्त्यांचे हात कोणी बांधले होते? दोन्हीकडे तर कॉन्ग्रेसचीच सत्ता होती. दुसर्‍याची पुसण्यापेक्षा , तुम्ही तुमची रेष मोठी ओढा ना !
आणि व्यक्तिश: मला आता गुजरात मध्ये मोदिना काही इन्ट्रेस्ट असेल असे वाटत नाही. तसे असते तर त्यांनी बडोड्याची जागा सोडून दिली नसती. ते आता वरच्या पातळीवर आहेत. चीन चे करार अहमदाबाद मध्ये झाले असतील तर त्यांचा गुजरात हा कंफर्ट झोन आहे इत्काच अर्थ आहे. मोदी काय आणि शहा काय , दोघे ही आता राष्ट्रिय पातळीवरचे नेते आहेत.
युती बाबत -
बाळासाहेब काय आणि प्रमोद महाजन काय ( विथ ड्यु रिस्पेक्ट टू बोथ ) , पक्के सत्तापिपासू होते आणि सत्तेसाठी वाट्टेल ते .. करायला तयार होते अश्यातून या कृत्रिम युतीचा जन्म झाला. या शिवसेनेच्या हट्टापायी नारायण राणे सारख्या नामचीन गुण्डाला मुख्यमंत्री मह्णून स्वीकारावे लागले ! दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत / होते. कितीदिवस मारुन - मुटकुन एकत्र राहणार ? अपयशाचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्यापलिकडे तसेही युतीत फार सख्य राहीले नव्हते. बाळासाहेब - उद्धव - आदित्य ही वारसदारी भाजपच्या लोकांनी पसंद पडणारी नव्हतीच. मोदी- शहांनी ७५ वर्षावरील आप्ल्याच नेत्यांना घरी बसविले , ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल ) शिवाय भाजपच्या मातृसंघटनेला शिवसेनेचे अजिबात प्रेम नव्हते / नाही. संघाची ताकद हवी असेल तर शिवसेनेला बाजूला सारायला हवे हा धोरणीपणा मोदी - शहा आणि तावडे - फडणवीस यांच्याकडे आहे.
प्रमोद महाजन ष्टाईल, सेना-राष्ट्रवादी संस्कृतीने राजकारण करण्याकडे आता भाजपचा कल नाही असे दिसते.

आजानुकर्ण's picture

19 Sep 2014 - 5:28 pm | आजानुकर्ण

ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल

प्रतिसादाशी सहमत. मुंबईची वाट लावण्याचे संपूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. निव्वळ राडासंस्कृती आणि भावनिक ब्लॅकमेलिंग या आधारावर इतकी वर्षे हा पक्ष टिकून आहे. पुढेही टिकेल. मात्र महाराष्ट्रापुरत्या भाजपामध्ये घराणेशाहीचा एखादा अपवाद नसून रक्षा खडसे, पूनम महाजन, पंकजा मुंडे, असे किमान तीन अपवाद माहिती आहेत. मागील निवडणुकीत हीना गावित हाही एक नवा अपवाद त्यांनी अंतर्भूत केला आहे असे दिसते.

तो अख्खा पक्षच अपवाद आहे हो.. ;)

विजुभाऊ's picture

19 Sep 2014 - 7:18 pm | विजुभाऊ

हाडक्या काका एकदम बरोबर.
तो पक्ष म्हणजे "पार्टी विथ डिफरन्स" आणि स्वयंसेवकांचा पक्ष आहे.
ज्या सेनेचा घराणेशाहीला कडाडून विरोध होता त्या सेनेची सुरवातच घराणेशाहीतुन झाली आहे. प्रबोधनकार नसते तर सेनेला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. काँग्रेसला वरवर विरोध करताना मुम्बैतील कामगार चळवळ कोणी सम्पवली ते सगळेच जाणतात. उगाच नव्हे सेनेला त्यावेळेस "वसंतसेना" म्हणायचे.
सेनेने इंदिरा गांधीना विरोध करतानाच आणिबाणीत काय वर्तन केले होते तो इतिहास काही पुसला गेलेला नाहिय्ये.
राजीवगाम्धीना घराणेशाही मुळे नावे ठेवताना सेनेने अगोदर मुलगा आणि नंतर नातू असा प्रवास चालू ठेवलाय.
वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते. सेनाप्रमुखाना त्यानी नम्तर स्पष्टीकरण दिले होते. त्या खासदारावर सेनेकडून कोणतीच कारवाई झाली नाही.
एन्रॉन समुद्रात बुडवायची गर्जना रीबेका मार्कंच्या भेटीनंतर कुठे आणि कशी बुडाली हे जनतेच्या विस्मरणात गेले असेल. पण त्यातले व्यवहार सर्वसामान्यानाही ओळखता येतील.

श्रीरंग_जोशी's picture

19 Sep 2014 - 8:01 pm | श्रीरंग_जोशी

वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते.

स्व. नरसिहरावांचे सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात असताना सेनेचे तत्कालीन खासदार मोहन रावले अनुपस्थित राहीले होते हे वाचले होते.

दुश्यन्त's picture

19 Sep 2014 - 11:18 pm | दुश्यन्त

बरोबर माहिती देत येत नसेल तर किमान चुकीची माहिती पसरवू नका. मोहन रावले हे नरसिम्हा राव सरकारच्या अविश्वासमता वेळी गैरहजर होते. वाजपेयी सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच साथ दिली होती. वाजपेयी समता - ममता-जयललिता वगैरे मुले बेजार झाले होते तेव्हा आपल्या कोट्यातील मंत्रिपद कमी करून यांना द्या असे बाळासाहेबांनी वाजपेयींना सांगितले होते. १९९९ ला एक मताने सरकार पडले कारण ऐनवेळी जयललिता पलटल्या. शिवसेना आणि अकाली दल या दोघांनीच केंद्रात कायम भाजपला साथ दिली आहे.

पोटे's picture

19 Sep 2014 - 5:05 pm | पोटे

ती पंचतंत्रातील गोष्ट आहे.

एक बेडुक इतर बेडकाना संपवायला साप आणतो.

शिवसेनेने साप आणला. आता साप त्यानाच खातोय

सुधीर's picture

19 Sep 2014 - 5:10 pm | सुधीर

१ महिन्यापूर्वी वाचलेला हा लेख आठवला.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/transits-to-modi-shah-era-may-cr...

मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आणि राष्ट्रवादी जर एकत्र आले (छुप्या वा उघड) रीतीने, तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा भा ज प आणि मनसे जर उघड रीतीने एकत्र आले, (सोबत राष्ट्रवादी छुप्या रीतीने), तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा शिवसेना व कॉंग्रेस (छुप्या रीतीने) एकत्र आले, तर राजकीय समीकरण काय असेल ?

मृत्युन्जय's picture

19 Sep 2014 - 5:42 pm | मृत्युन्जय

भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र आले (म्हणजे राकॉला सत्तेत स्थान मिळाणार असेल तर) तर मी एकवेळ आयसिसला मत देइन पण या दोघांपैकी एकाला देणार नाही. असला भडभुंजेपणा भाजपा करणार असेल तर मी आजन्म काँग्रेस बरोबर जाइन. भाजपा आणि मनसेने युती केली तर भाजपा मनातुन उतरेल पण तरीही त्यालाच मत देइन. भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. शिवसेनेने काहिही केल्यास मला फरक पडत नाही पण त्यांनी राष्ट्रवादीशी युती केल्यास त्यांच्यासारखे मुर्ख तेच असतील.

असो. १३० जागांवर समाधान मानुन भाजपा युती पुढे चालु ठेविल याबाबत सध्या तरी शंका नाही आहे. थोड्या वेळापुर्वी ही बातमी खरी वाटली होती. पण आत्ता त्यात दम नाही. भाजपाला सेनेबरोबरची युती तोडणे महागात पडेल कारण अजुन राज्यसभेत ते संख्याबळात कमी आहेत. सद्यपरिस्थितीत किमान जॉईंट सेशनमध्ये तरी त्यांना आघाडी आहे. सेना बाहेर पडल्यास ते ही अवघडच जाइल.

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 6:00 pm | प्रसाद गोडबोले

तर मी एकवेळ आयसिसला मत देइन

>>>> =))))

बॅटमॅन's picture

19 Sep 2014 - 6:01 pm | बॅटमॅन

आयसिसचा दुसराही अजून एक लाँगफॉर्म आहे बरंका प्रगो ;)

http://en.wikipedia.org/wiki/Institute_for_the_Secularisation_of_Islamic...

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 7:07 pm | प्रसाद गोडबोले

अगं बाब्बो .... हे आयसिस तर मुळ आयसीस पेक्ष्क्षा ब्येक्कार आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2014 - 8:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन.

आवडलं... फक्त जराशी कंजूशी झालीय... "१०००००००१ वेळा" असं लिहायला पाहिजे होतं, जास्त भारी वाटलं असतं. या निवडणूकीपुरते तरी तुम्ही सुरक्षित आहात ;)

अक्षरमित्र's picture

19 Sep 2014 - 5:48 pm | अक्षरमित्र

काही झाले तरी पुढील सीएम शिवसेनेचा असेल.

तिमा's picture

19 Sep 2014 - 7:23 pm | तिमा

कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ दे, मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.

विजुभाऊ's picture

19 Sep 2014 - 7:36 pm | विजुभाऊ

मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.

हो ना. केंद्रात पंतप्रधान ठरवायच्या अगोदर सुद्धा अश्शीच गोग्गोड चर्चा चालू होती. काय झाले हे सर्वाना ज्ञातच आहे.
भिगवण चौकाच्या वार्डात कोणता उमेदवार उभा करायचे ठरवायचे कोणी याची देखील अश्शीच चर्चा होईल काही दिवसानी.

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 7:42 pm | नानासाहेब नेफळे

इतका काँन्फीडन्स बरा नव्हे ,पोट निवडुकात काय झाले ठाऊक आहे ना?

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2014 - 9:07 pm | श्रीगुरुजी

>>> इतका काँन्फीडन्स बरा नव्हे ,पोट निवडुकात काय झाले ठाऊक आहे ना?

पोटनिवडणुकांच्या निकालाविषयी देशात प्रथमच इतकी गंभीर चर्चा सुरू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. १९४७ नंतरच्या कोणत्याही पोटनिवडणुकीच्या निकालाची इतकी चर्चा झाली नसेल किंवा त्या निकालाच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठला नसेल.

असो. जरा सविस्तर निकाल पाहू. मे २०१४ नंतर १०-१२ राज्यांमधील एकूण ४७-४८ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक झाली. ३ लोकसभा मतदारसंघामध्ये पण पोटनिवडणुक झाली. काही राज्यात फक्त १-२ मतदारसंघात पोटनिवडणुक झाली तर ३ राज्यात ९-११ जागांवर पोटनिवडणुक झाली.

त्यात म.प्र.मध्ये भाजपने ३ पैकी २ व काँग्रेसने १ जागा जिंकली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने २ व भाजपने १ जिंकली. पंजाबमध्ये काँग्रेस १ आणि अकाली द्ल १, उत्तराखंडमध्ये काँग्रेस ३, प. बंगालमध्ये तृणमूल १, भाजप १ , आसाममध्ये काँग्रेस, भाजप व तिसरा पक्ष प्रत्येकी १, उ.प्र.मध्ये सप ८/भाजप ३, गुजरातमध्ये भाजप ६/काँग्रेस ३, बिहारमध्ये भाजप ४/राजद्+संजद्+काँग्रेस ६ अशी साधारण परिस्थिती होती.

या निकालांवरून मोदी लाट ओसरली, मोदींविषयी जनतेचा भ्रमनिरास झाला, जनतेने मोदींना धडा शिकविला, काँग्रेस परत येत आहे, भाजप बॅकफूटवर, इ. मांडे खाणे सुरू झाले. लोकसभेच्या ३ जागांवर जैसे थे स्थिती राहिली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर मे २०१४ प्रमाणेच मतदान झाले हे दिसून आले. जर मोदी लाट ओसरली असती तर भाजपला बडोद्याची जागा का मिळाली असती? तसेच काँग्रेसला तेलंगणातील जागा का मिळाली नाही?

गंमत म्हणजे काँग्रेसने दिल्लीसकट अनेक शहरांमध्ये पोटनिवडणुकीतील निकालांचा विजयोत्सव साजरा केला. पोटनिवडणुकीत मिळालेल्या २-४ जागांचा देशभर जल्लोष करावा इतकी वाईट वेळ कॉंग्रेसवर आली आहे.

बिहार विधानसभेत मे २०१४ मध्ये एकमेकांविरूद्ध लढलेल्या राजद, संजद व काँग्रेसने एकत्र निवडणुक लढल्याने भाजपविरोधातील मतविभागणी टळल्याने त्यांना १० पैकी ६ जागा मिळाल्या हे उघड आहे. या परिस्थितीतसुद्धा भाजपला ४ जागा मिळाल्या. सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे व मतविभागणी टाळणे हा मोदींविरूद्ध कौल कसा होऊ शकतो? डिसेंबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हे संधीसाधू पक्ष एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण एकूण २४३ पैकी राजद व जदयु काँग्रेसबरोबर युती करून प्रत्येकी फक्त १०० च्या आसपास जागा लढविणे व काँग्रेसला ४३ जागा सोडणे अशक्य आहे. दोन्ही पक्ष किमान १५० जागांचा आग्रह धरतील. त्यामुळे ही संधीसाधू युती फक्त या पोटनिवडणुकीसाठी होती. या निकालांचा व मोदींच्या कारभाराचा काहीही संबंध नाही.

उ.प्र.मध्ये सप ने ११ पैकी ८ जागा जिंकल्या. काँग्रेसला भोपळा मिळाला. पण काँग्रेसवालेच जास्त उड्या मारताहेत. प्रत्यक्षात बसप आणि सप यांच्या छुपा समझोता होऊन बसपने आपले उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे बसपला मिळणारी सर्व मुस्लिम मते व काही दलित मते सप कडे गेली व त्यातूनच सप ला ८ जागा मिळाल्या. मोदी कारभाराचा व या विजयाचा काहीही संबंध नाही. २०१७ मध्ये उ.प्र. च्या विधानसभा निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व जागा लढवेल व त्यामुळे या पोटनिवडणुकींच्या निकालाची पुनरावृत्ती होणार नाही.

गुजरातमध्ये ९ पैकी ३ जागा गमाविल्या तरी ६ जिंकल्या आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली या विधानात तथ्य नाही. इतर राज्यात १-२ जागाच असल्याने निवडणुक फक्त स्थानिक प्रश्नावरच लढली गेली. तिथेही मोदी लाटेचा काहीही संबंध नाही.

एकंदरीत काही राज्यातील २-४ पोटनिवडणुकीच्या निकालावरून मोदींच्या जेमतेम १०० दिवसांच्या राजवटीविषयी भाकीत करणे हा मूर्खपणाचा कळस आहे.

नानासाहेब नेफळे's picture

19 Sep 2014 - 11:54 pm | नानासाहेब नेफळे

गुजरातमध्ये ९ पैकी ३, राजस्थानात ४ पैकी ३ जागा काँग्रेसला मिळाल्यात, यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते.युपीत ७२ लोकसभा सीट जिंकणारे बीजेपी १०० दिवसात ११ विधानसभेपैकी फक्त २ जागा जिंकतात, यावरुन मोदी लाट संपुष्टात येत आहे हे स्पस्ट आहे. बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2014 - 1:07 pm | श्रीगुरुजी

>>> यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते.

हो का? उ.प्र. मधील विधानसभेच्या ११ जागांपैकी किती जागा काँग्रेसला मिळाल्या हो? आणि लोकसभेच्या ३ जागांवरील पोटनिवडणुकांमध्ये किती जागा काँग्रेसने पटकावल्या? काँग्रेस होतेय असा तुमचा भ्रम झालाय म्हणून विचारतोय.

>>> बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे.

मुळात तो व्होटर बेस मे २०१४ मध्ये भाजपाकडे नव्हताच. त्यामुळे तो भाजपा ऐवजी सपाकडे वळला हे विधान असत्य आहे. सपा ला स्वतःची व बसपची अशी दुप्पट मते मिळाल्याने पोटनिवडणुकीत ८ जागा मिळाल्या हे लक्षात घ्या. त्याचबरोबर हेही लक्षात घ्या २०१७ मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व ४०३ जागा लढवेल व त्यावेळी पुन्हा एकदा ही मते सप कडून बसप कडे येतील व भाजपविरोधी मतांचे पुन्हा एकदा विभाजन होईल. त्यामुळे मोदी लाट ओसरली, काँग्रेस रिव्हाईव्ह होतेय अशा गैरसमजूतीतून दूर व्हा.

नानासाहेब नेफळे's picture

20 Sep 2014 - 1:53 pm | नानासाहेब नेफळे

बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत!
मे मध्ये ती मते भाजपकडे गेली नाहीत हा दावा आपण कोणत्या आकडेवारीतून करत आहात? जरी मान्य केले तरी १०० दिवसाच्या प्रचंड यशस्वी मोदीसरकारचा तिथल्या सपा बसपाच्या वोटरवर काहीच परिणाम झाला नाही का ?
याचे दोनच अर्थ आहेत, पोटनिवडणुकित मत देणारे एक दोन कोटी मतदार मुर्ख आहेत किंवा मोदी लोकांना विकासाच्या नावाखाली फसवत आहेत व लोकांच्या लक्षात ही फसवणुक आली आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2014 - 9:01 pm | श्रीगुरुजी

>>> बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत!

मुळात बसपचे (आणि सप चे सुद्धा) मतदार विकास, सुशासन, योग्य प्रशासन या मुद्द्यांवर मतदान करतच नाहीत. जात आणि धर्म यांवरच ते मतदान करतात. त्यामुळे मोदी विकासपुरूष असले किंवा नसले, मोदींनी महागाई कमी केली का नाही या मुद्द्यांवर मतदान न करता ते आपल्या जात/धर्म विचारांवर आधारीत जो पक्ष योग्य वाटतो त्यालाच मतदान करतात. बसपच्या अनुपस्थितीत त्यांना सप आपलासा वाटला यात काहीच नवल नाही. मे २०१४ मध्ये त्यांची मते बसप आणि सप या दोघात विभागली गेली होती. बसपच्या अनुपस्थितीत ती सप कडे गेली आणि म्हणून सप ला जास्त जागा मिळाल्या.

नानासाहेब नेफळे's picture

21 Sep 2014 - 9:12 am | नानासाहेब नेफळे

बसपाचे मतदार जात बघून मतदान करतात याची काही आकडेवारी द्याल का? बसपाची एकही लोकसभा सीट लागली नाही याचा अर्थ सपा बसपा यांचा वोटर मोदींकडे वळला होता, परंतु १०० दिवसाच्या गुजरातधार्जिण्या मोदींचा कारभार बघुन पुन्हा माहेरी परतला,हे पोटनिवडणुकीत स्पष्ट होते. राज्यातही काँ राकाँच्या पारंपारिक मतदाराने भाजपला वोट दिले, परंतु आता त्यांनाही मोदीच्या फक्त तोंडाच्या वाफा दवडण्याच्या सवयीचा साक्षात्कार झाल्याने राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.

नानासाहेब नेफळे's picture

20 Sep 2014 - 2:00 pm | नानासाहेब नेफळे

युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो .देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे.
ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही .

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2014 - 9:15 pm | श्रीगुरुजी

>>> युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो .

या निवडणुका रा़ज्यात झाल्या. केंद्रात नव्हे. त्यामुळे मोदींचा इथे संबंधच नाही. मोदी तिकडे प्रचाराला फिरकले पण नव्हते. लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सर्व पक्षांनी आपापल्या जागा राखलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मे २०१४ मध्ये जो कल होता तोच आज कायम आहे.

प. बंगालमध्ये २ पैकी १ जागा भाजपने मिळविली. तुमच्या विचित्र तर्कशास्त्रानुसार याचा अर्थ तिथे मोदींची लाट आली आहे असा घ्यावा लागेल.

>>> देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

शिवसेना नेते काय बडबडतात यावर तुम्हीच विश्वास ठेवा. बर. खालीच बातमी वाचा आणि मोदी लाट परत आल्याचे कबूल करा.

छत्तीसगड

>>> ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही .

कशावरून? सध्या मे २०१४ सारखीच जैसे थे परिस्थिती आहे. कोणाचेही रिव्हाईव्हल होत नाहीय्ये आणि कोणीही डीप्राईव्ह होत नाहीय्ये.

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 8:42 pm | काळा पहाड

अपमान करू नका हो. "शरदचंद्ररावसाहेबजी पवार".

कानडाऊ योगेशु's picture

20 Sep 2014 - 10:14 am | कानडाऊ योगेशु

आमचे प्रेरणास्थान आणि माननीय हे विसरलात हो!

फुंटी's picture

23 Sep 2014 - 3:58 pm | फुंटी

खडसे म्हणाले काल...युती तुटण्यामागे पवारांचा डाव आहे....

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2014 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक चर्चा !

@ नानासाहेब नेफळे : धाग्याचा ट्यार्पी वाढवायचा सद्या काय रेट आहे ?! ;)

(प्रामाणिकपणे केलेली विचारणा जमल्यास हघ्या :) )

हाडक्या's picture

19 Sep 2014 - 9:52 pm | हाडक्या

एक्का साहेब.. तुमचे धागे असे पण पापुलर असतेत.. कशाला नानासाहेबांना सुपारी देताय.. तुमच्या धाग्यांवर आले म्हन्जे २००-३०० शिवाय थांबायचे नाहीत ते.
बादवे, असे पण ते फक्त राजकारणाच्या धाग्यांचे स्पेशालिष्ट आहेत..
तुमी तसला धागा काडला म्हनजे त्यांना 'विसरु' नका म्हणजे झालं. ;)

आनन्दा's picture

20 Sep 2014 - 12:56 am | आनन्दा

नानासाहेब की जय हो!

लोटीया_पठाण's picture

20 Sep 2014 - 7:23 pm | लोटीया_पठाण

मी तरी भाजपालाच मत देईन. हे काँग्रेसी दर दोन वाक्यांमागे पुरोगामी महाराष्ट्राची टेप लावण्या पलीकडे काहीही करत नाहीत.
सेना नेतृत्व अन इतर रडत राऊत यांच्याकडून काहीही होप्स नाहीत, यांच्या हातात सत्तासूत्रे गेली तर महाराष्ट्राची मुंबई महानगर पालिका करून टाकतील.

* नेव्हिल maxwell / ब्रूक्स हेंडरसन अहवालावरून भाजपा ने केलेलं घुमजाव मात्र पटलं नाही. कॉंग्रेसवर बरेच आरोप केले अन जेव्हा वेळ आली तेव्हा काँग्रेसी कारणेच पुढे केली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2014 - 5:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंच युती मोडली का उगाच चर्चा सुरू आहेत? मटात ही बातमी दिसत्ये -
जागांवरून बाणराव टेचात, कमळाबाई पेचात!

आणि एक - मराठी मुस्लिमही असतात आणि ते मराठीच असतात. मराठी म्हणजे बाय डीफॉल्ट मुस्लिमेतर नव्हेत.

बघा जमतंय का ते...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Sep 2014 - 10:28 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही.

"महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते.चेन्नई,हैद्राबादचे ह्यांचे एक दिवंगत मित्रही 'मराठी माणसे गटबाजी करतात्' ह्या मताचे होते.काही प्रमाणात तामिळ लोकही हा प्रकार करतात पण राज्याबाहेर 'आपण व आपले काम' हेच धोरण असते.

>> पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका."

ज्याअर्थी तुम्ही मिपावर आहात त्याअर्थी तुमचं हे सारं झालंय असं गृहीत धरायला हरकत नसावी. :)

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2014 - 12:50 pm | श्रीगुरुजी

>>> "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते.

याच धर्तीवर - "महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भरमसाठ डू आय काढण्याच्या भानगडीत पडू नका." असे म्हणता येईल. हो की नाही हो नानासाहेब?

नानासाहेब नेफळे's picture

23 Sep 2014 - 1:15 pm | नानासाहेब नेफळे

मला काय विचारताय! ते माईसाहेबच सांगतील, कारण तो त्यांचा प्रतिसाद आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी

तुम्ही आणि माईसाहेब काही वेगळे आहात का? तुम्ही 'दो बदन एक जान' असे २-इन-१ आहात.

नानासाहेब नेफळे's picture

23 Sep 2014 - 8:58 pm | नानासाहेब नेफळे

@संपादक मंडळ,माईसाहेब ह्या मिपाच्या एक सन्मानिय स्त्री सदस्या आहेत ,त्यांच्याशी माझे नाव वारंवार जोडून माझे व त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न अनेकदा श्रीगुरुजी या आयडीने केला आहे. कृपया आपण त्यांना योग्य ती समज द्यावी.