फेसबुक मानिया

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
10 Sep 2014 - 1:23 am

एका प्रोफाईल लॉगीनने समोर दिसतात असंख्य मने
चांगुलपणाचे पुतळे ,आदर्श आभासी व्यक्तिमत्त्वे ,
सद्वर्तनी ,भावूक ,अंतरंगाला हमखास हात घालणारीच स्टेटस
त्यावर सहमतीचे लोणी ,
आदर्श विचारांनी ओथंबून वाहणाऱ्या आदर्श पोस्ट
त्यावर तसल्याच गुळमुळीत कमेंटची पखरण
आदर्श फेसबुक जीवन ,रेडी टू सर्व्ह ....
प्रेमाचे समुद्र ,उमाळ्याचे नद ...
हळुवार ,सेन्सेटिव ,अलगद चालणारी
इनबॉक्स मधली खलबत
दुसरीकडे बुरखेधाऱ्यांचे राडे,
अतृप्त इच्छांच्या तारेवर उलटी लटकलेली मने
चाळीशीनंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ...
संभ्रमात आहे फेसबुक ....
झुगारावी सो कॉल्ड संस्कृती ....
की मिरवाव भाऊराया ,ताई म्हणून....
लोगिन ने वाढत जाणारे मित्र
आणि संवादावाचून हरवत चाललेले मैत्र
यांच्या लॉगऑउट क्लिकवर कर्सर नेऊन ...
मी डिस्कनेक्ट......

कविता

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

10 Sep 2014 - 3:17 pm | वेल्लाभट

जबर ! तिटकारा येतो खरं कधी कधी फेसबुकी आयुष्याचा. काय करणार, आजकाल एखादी चांगली गोष्ट लाईक करायला फेसबुकावरच वेळ असतो ना लोकांना, तिथेच भेटतात लोकं; जी प्रत्यक्ष भेटूनही न भेटल्यासारखी असतात. मग काय? करा लॉगिन !

कवितानागेश's picture

11 Sep 2014 - 6:11 am | कवितानागेश

संवादावाचून हरवत चाललेले मैत्र!!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2014 - 7:57 am | अत्रुप्त आत्मा

पांडू मोड़ ऑन >>>
बरं मग?????
पांडू मोड़ ऑफ !
<<<
आता पळा.............ssssss ! :-D