वंगाळ !

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
28 Aug 2014 - 2:20 am

साद झलकेची ,
मना मंदी चाळं,
शरावणातल बेडकं स्साल,
वंगाळ वंगाळ

गव्हाळ मानंखाली
तीळ मस्त काळं
चवचाल जीभ स्साली
वंगाळ वंगाळ

लाजुन पाठमोरी
बसली दातखीळं
कलिजा खल्लास स्साला
वंगाळ वंगाळ

पदराला पुरना कापड
अंगी रतीच मुळं
दमच निघना स्साला
वंगाळ वंगाळ

दोन चंद्राची रात म्हणं
गारवा आनं ढगाळं
सरना च आज स्साली
वंगाळ वंगाळ

शृंगारमुक्तक

प्रतिक्रिया

क्या बात! अनपेक्षित.. मस्तच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2014 - 6:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तच..रे..

-दिलीप बिरुटे

चाणक्य's picture

28 Aug 2014 - 6:14 am | चाणक्य

भारी. एकदम कसदार

मस्त जमलंय, वंगाळ प्रकर्ण..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Aug 2014 - 11:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी

दोन चंद्राची रात म्हणं
गारवा आनं ढगाळं
सरना च आज स्साली
वंगाळ वंगाळ

लईच बेक्कार...