कामधेनु

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
23 Aug 2014 - 5:44 pm

जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर मनात आलेले विचार....

हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.

चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.

त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
डोकावुनी तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.

स्वत:ची लाज वाटली
का ओळखू शकलो नाही
प्रेम तिचे?

थरथरत्या हातानी
तिचा हात घट्ट पकडला
कापऱ्या आवाजात म्हणालो
भीती वाटते मला.

खंबीर आवाजात ती म्हणाली
काही नाही होणार तुम्हास्नी
मी आहे ना.

त्या क्षणी ती मला
यमराजाशी झुंज देणारी
सावित्री सम भासली.

प्रेमाच्या माणसांसाठी
सर्वस्व अर्पण करणारी
संसारात सुखाचे
रंग भरणारी.
खरोखरीची
कामधेनूच ती.

मुक्तक

प्रतिक्रिया

एस's picture

23 Aug 2014 - 6:26 pm | एस

:-)

एसमाळी's picture

23 Aug 2014 - 7:21 pm | एसमाळी

छान.

अजय जोशी's picture

23 Aug 2014 - 7:53 pm | अजय जोशी

मस्त.

सस्नेह's picture

23 Aug 2014 - 9:33 pm | सस्नेह

आणि त्या नर्सबाईचे काय झाले हो ?

विवेकपटाईत's picture

24 Aug 2014 - 9:46 am | विवेकपटाईत

गेल्या ७-८ वर्षांत ४ वेळा नर्से बाईंचे दर्शन घेतले आहे. आता अधिक घेण्याची इच्छा नाही. भारत सरकार बिल भरते त्यांच्या नियम प्रमाणे पण खिश्यातून ही भरपूर खर्च होतो शिवाय सुट्ट्या ही खर्च होतात. एकदा ६ महिने बेडवर होतो आणि आता ही ३ महिने अर्थात सप्टेंबर संपेपर्यंत सुट्टीवरच आहे. शिवाय डॉक्टर लोक आपल्या शस्त्राने शरीराचे काय हाल करतात ते सांगणे नकोच. शिवाय +३ चष्मा असल्या दूरचे दिसत ही नाही. अधिक काय सांगावे. आता कल्पनेतच नर्स बाईंचे दर्शन घेतो ...