औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Aug 2014 - 7:24 pm
गाभा: 

इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते. Marathi language portal/translations येथे आपणही माहिती भरू शकाल. त्याच पद्धतीने https://en.wikibooks.org/wiki/Marathi_language_portal/Learn_with_pictures आणि https://en.wikibooks.org/wiki/Marathi_language_portal/Learn_with_ease असे दोन वेगळे प्रयोगही केले आहेत त्यात माहिती भरण्यात अथवा त्या बद्दल आपल्या अभिप्रायाचे स्वागत असेल. हा एक भाग झाला.

गूगलवर कोण काय किती शोधत आहे याचा अंदाजा गूगल ट्रेंड्सच्या माध्यमातून येतो म्हणून मी Learn Marathi आणि learn marathi तसेच सोबतीला Learn english असाही सर्च गूगल ट्रेंडला दिला. पहा १ पहा २ हे शोध मला जरासे अनपेक्षीत ठरले Learn Marathi आणि learn marathi चे शोध जास्त करून भारताबाहेरून अथवा महाराष्ट्राबाहेरून असतील असा अंदाज होता तर रिझल्ट पाहून नाही म्हटलेतरी जरासे आश्चर्यच वाटले. औरंगाबाद आणि चिंचवड येथून शोध सर्वाधीक आहेत त्या खालोखाल मुंबईचे लोक गूगलवर Learn Marathi अथवा learn marathi हे शोधत असावेत. चिंचवड आणि मुंबईत बाहेर राज्यातील व्यक्ती अथवा विद्यार्थी असतील म्हणून असा शोध येत असेल तर समजण्यासारखे आहे पण तो औरंगाबादेतून का येतो आहे हे नीटसे उमगले नाही. पर्यटक असतील का विद्यार्थी असा जरासा प्रश्न पडला.

दुसर्‍या बाजूला परदेशातन Learn Marathi अथवा learn marathi ला काहीच शोध नाहीत याचेही खेद पुर्वक आश्चर्य वाटले. परदेशात पुरेशी मराठी एन आर आयांची मुले असतील तर त्यांना मराठी शिकण्याची थोडी फार तरी इच्छा होऊन काही गूगल शोध व्हावयास हवेत तसे होताना दिसत नाही. मग मराठी शिकवीण्याचे धडे बनवताना नेमका कोणता ऑडीअन्स समोर ठेऊन बनवायचे असा जरासा प्रश्न पडतो आहे.

इतर राज्यांमधून नाही म्हणायला Learn Marathi अथवा learn marathi चा थोडा फार शोध कर्नाटक, गुजराथ, आंध्र, दिल्ली आणि तामीलनाडूतून येतो आहे. दिल्ली व्यतीरीक्त उत्तरेतल्या राज्यांचा यात समावेश नाही म्हणजे महाराष्ट्रातलेही औरंगाबाद मुंबई चिंचवडचे शोध हिंदी भाषकांकडन येत असतील असे नेमके सांगता येत नाही. हिंदी भाषक कदाचित हिंदीतून शोधत असतील अशी शक्यता थोडी फार असू शकते पण औरंगाबाद मुंबई चिंचवड पुणे येथील इंग्रजी शाळातील विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांकडून असा शोध घेतला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Learn english चा शोध घेण्यात भारतातील तामीळनाडू, पाँडेचेरी, आंध्र, कर्नाटक (दक्षीणेत केरळ मिसींग आहे आणि त्यांच मल्याळम विकिपीडियाच कामही जोरात चालू आहे रोचक योगायोग) हिंदी पट्ट्यातल्या दिल्ली उत्तराखंड आणि मध्यप्रदेशाची नावे येताहेत महाराष्ट्रासहीत इतर राज्ये मिसींगला आहेत.

महाराष्ट्रातील लोक Learn english तर गूगलवर शोधत नाहीत पण बाकी सर्व शोध इंग्रजीतन घेतात. गेल्याच आठवड्यात स्मिता तळवलकरांचा देहांत झाला त्यांच्या शोधांची आकडेवारी अभ्यासली तर त्यांच्या नावाचे केवळ २% शोध मराठी भाषा वापरून घेतले गेले ९८ टक्के शोध इंग्रजीतन घेतले गेले हे सर्वशोध महाराष्ट्रातनच घेतले गेले इतर राज्यातन नाही. विकिपीडियावरचेही अनुभव हेच सांगतात की अद्याप ९८ टक्के महाराष्ट्रीय जनता इंग्रजीतूनच शोध घेते. एकुण मराठी जनतेला इंग्रजीतन शिक्षण हव असेल पण इंग्रजीचा फार उमाळाही नाही आणि ऑनलाईन देवनागरी टाईपणं शिकण्यातही माघारच आहे. मी मागे मिपाच्या वाचकांच अलेक्साच्या आकडेवारीच्या साहाय्याने जे विश्लेषण केल त्यात मिपाकडे असा मराठी न टायपणारा वाचक वर्ग बराच असावा कारण त्याची वाचनवारी दिसते लेखन दिसत नाही.

या ऑगस्टच्या सुरवातीस मराठी विकिपीडियावर मराठीत कसं टायपाव याची मोठी आघाडी उघडली. मराठी विकिपीडियावर टायपिंग कस कराव याचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आढळला पण प्रत्यक्ष लेखनात मराठी माणूस मागे उभ टाकण्याच चित्र फारस बदललेल नाही.

यावर कुणी काही वेगळ विश्लेषण अथवा मत मांडू शकेल ?

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Aug 2014 - 10:16 pm | पैसा

चिंचवडला आयटीवाले पब्लिक आहे. ते मराठी बहुसंख्य असतील असे नाही. पण मुलांना शाळेत वगैरे मराठी भाषा एक विषय म्हणून शिकावी लागते. त्यामुळे तिथे मराठी शिकण्यासाठी गुगल सर्च वापरला जात असेल. तीच परिस्थिती मुंबईत. औरंगाबादचे स्थानिक कारण प्रा.डॉ. बिरुटे सर सांगू शकतील.

मराठी टायपिंग आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना आवडत नाही. माझ्या ओळखीतल्या एका मुलाचे शिक्षण सेंट्रल स्कूलच्या अभ्यासक्रमात झालेले. घरात मराठी फक्त बोलली जाते. मराठी वाचन पालकांचेही फार नसावे. तो लहान असताना "ग्रासचा कलर ग्रीन असतो" टाईप मराठी त्याच्याकडून ऐकून धन्य झाले होते. नंतर एकदा तो साधारण १२ वीत वगैरे असताना त्याच्या फेसबुक वॉलवर मी मराठीत काहीतरी पोस्ट सवयीने लिहिली होती. लगेच त्याचा मेसेज आला की माझ्या वॉलवर मराठीत लिहू नको, मित्र हसतात. त्यानंतर मी त्याच्याशी फेसबुकवरून संवाद बंद केला.

हा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि स्वतःचे कुटुंब चालवील, तेव्हा त्याच्या घरात मराठी भाषा कुठे असणार आहे हे सांगायला कोणी तज्ञाची गरज नाही. उच्च मध्यमवर्गात बर्‍याच अंशी असेच चित्र असावे असं मी समजते.

चौथा कोनाडा's picture

14 Aug 2014 - 11:44 pm | चौथा कोनाडा

सध्या नविन पिढीत "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " इंग्लिश मुळे मराठी "गावंढळ" दिसायला लागली आहे. हा शोर्टफोर्मी बाप्तिस्मा घेतल्या शिवाय मराठी काय इतर ही भाषांचे ही अवघड आहे. "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " ही आख्या जगाची भाषा बनू पाहतेय. या वर आहे का काही उपाय ?

प्रभाकर पेठकर's picture

14 Aug 2014 - 1:06 am | प्रभाकर पेठकर

कित्येकांना मराठीत संवाद साधण्यात कमीपणा वाटतो. तसेच गुगलवर मराठीतून शोध घेतल्यास कमी आणि इंग्रजीतून शोध घेतल्यास भरमसाठ जोडण्या (लिंक्स) सापडतात. मराठीतला शोध अगदीच निष्फळ असतो असे मी म्हणणार नाही. कधी कधी हवे ते सापडते तर कधी कधी निराशा होते. अशा निराश क्षणी इंग्रजीतून शोध घेतल्यास मात्र हवे ते सापडते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2014 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..!

आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ?
-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

14 Aug 2014 - 12:06 pm | माहितगार

आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ?

बहुधा अगदीच तस नसाव नेटावरची लीड बहुधा अद्यापही मुंबई पुण्याकडेच असावी (अर्थात पुणेतर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा औरंगाबादकर नेटावर अधीक पडीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या करता प्रत्यक्ष सर्वेक्षणाची गरज असावी). खरेतर डिटेल आकडे प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळावावयास हवेत. २०११च्या जनगणणे पासून अल्प माहिती मिळ्वली जात असावी असे वाटते (चु.भू.दे.घे.)

पण कोणत्या जिओग्राफीक लोकेशनचे लोक जास्त आहेत याचा अप्रत्यक्ष अंदाज घेण्याच चांगला मार्गक शोधक सोडतात म्हणजे त्यांच स्वतःच्या गावा शहरांवर लय भारी प्रेम असंत (किमान नेटावर शोध देताना) भारत या विषयावर शोध महाराष्ट्र पेक्षा जास्त जातील हे सहाजीक आहे पण भारतातल्या इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा ते अधीक असतील. अर्थात याला आपण थोड फार सहाजिक म्हणू शकतो.

पण महाराष्ट्रातून महाराष्ट्र शब्दावर शोध जास्त येतात त्या खालोखाल मराठी शब्दावर येतात नंतर इतर शहरांची यादी चालू होते. मी या पहिल्या गूगल ट्रेंडात http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Kolhapur%2C%20S... औरंगाबाद आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील शहरे घेतलीत त्यात औरंगाबाद निश्चित आघाडीवर आहे.

नाशिक आणि औरंगाबादकरांची नेटावर जवळपास बरोबरी आहे पण नागपूर या दोन शहरांच्या दुपटीपेक्षाही पुढे असावे. पुण्या सोबतची तुलना पहाण्या आधी ही नागपूर नाशिक सोबतची तुलना पाहून घ्यावी म्हणजे फरक लक्षात येईल http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nas...

आता या पुढच्या गूगल ट्रेंड शोध लिंकेत पुणे सुद्धा जोडले आहे आणि फरक पहा
http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nas...

आता मुंबई जोडलंय आणि फरक पहा
http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nas...

सुहास..'s picture

14 Aug 2014 - 10:07 pm | सुहास..

अरे , हे औरंगाबाद , युपी/ बिहार मधलं तर नाही ना ?

माहितगार's picture

14 Aug 2014 - 12:32 pm | माहितगार

मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे.

असं असेल याहून आनंदाची गोष्ट कोणती ? आमच्या कडन आपल्याला तूप+साखर :)

आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..!

हि शक्यता अगदीच नाकारता येत नाही. Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर नेहमीच चिक्कार शोध जातात हे माहिती आहे ढगांना चंदेरी किनार म्हणजे हे शोध वाढताहेत http://www.google.co.in/trends/explore#q=Marathi%20Font%2C%20Marathi%20T... याचा गूगल ट्रेंड पहा पण तरीही मी या केवळ चंदेरी किनार म्हणतो कारण Marathi Font हे शब्द शोधणार्‍यांचा उद्देश मराठी टायपींग शिकण हाच असतो पण आमच्या कोणत्याही ग्रेट मराठी तंत्रज्ञानांना हे मुळीच पटत नाही. गूगलवर Marathi Font https://www.google.co.in/search?q=Marathi+Font&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rl... हा शोध देऊन पहा प्रॉपर टायपिंग टुल्सपाशी शोधणारा नवागत सहज पोहोचू शकला तर शप्पथ Marathi Typing शब्दद्वयाचा शोध २००७ नंतर सुरु झाला तरी २०११ नंतर त्यात वाढ झाली (बहुधा गूगलची टायपींग पद्धती या शोधात चटकन सापडते आणि मराठी टायपणारे ४४ टक्के लोक गूगल टायपींग वापरतात म्हणून कदाचित) एनी वे Marathi Typing या शब्द द्वयाच्या शोधावर अगदी आदर्श स्वरुपाची मदत उपलब्ध होते असे नाही पण मराठीत टायपींग करु इच्छिणार्‍याच्या हाती काहीतरी लागते.

सांगण्याचा मुद्दा शोधणार्‍यांना आदर्शपद्धतीने शोधता येत नाही हे समजता येते. पण वेबमास्टर्स हि या क्षेत्रातली जर जाणकार मंडळी असतील तर शोधणार्‍यांना जे हव ते व्यवस्थीत देण्याची यांची जबाबदारी नाही का ? आमचे मराठी वेबमास्टर्स आपल्या मातृभाषेतील लोकांना सुविधा सुयोग्य पद्धतीने पोहोचवू शकत नसतील तर ते अगदी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ग्राहकांना जे हव ते योग्य पद्धतीने देण्यात सक्षम आहेत अस समजता येईल का ? हा तसा अवांतर प्रश्न असला तरी त्यांच्या स्वतःच्या व्यवसाया बद्दल मराठी व्यावसायीकांचे भले व्हावे वाटणार्‍या कुणालाही काळजी वाटणार नाही का ? किमान मला तरी वाटते.

(संपादन खिडकीतील साहाय्यचिन्हे गायब असल्यामुळे पुरेसे फॉर्मॅटींग करता आले नाही क्षमस्व)

माहितगार's picture

14 Aug 2014 - 1:04 pm | माहितगार

Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर विशीष्ट शहरातून अधिक शोध आहेत. Marathi Font शब्दद्वयाच्या शोधात अनुक्रमे कोल्हापूर, सोलापूर, Pimplad (गूगल मॅपानुसार नाशिक जवळ कुठेतरी) औरंगाबाद, नांदेड उल्हासनगर, वलसाड, नागपूर, चिंचवड आणि पुणे (नागपूर, चिंचवड आणि पुणे येथील लोकांना मराठी टायपींग शिकण्यासाठी Marathi Font सर्वात योग्य शोध नाही हे माहिती असेल किंवा तेवढी इच्छा नसेल Marathi Fontचा शोध न घेण्यात मुंबई पुढे आहे त्यांच नेटावरील एकुण प्रमाण लक्षात घेता, व्यस्त प्रमाणाच नेमक कारण अधिक अभ्यासण्याची गरज असावी)

Marathi Typing असा अधीक व्यवस्थीत शोध देणार्‍यात Pimplad चा नंबर पहिला आहे, नंतर नांदेड , सोलापुर मग औरंगाबाद (बिरुटेसरांच्या म्हणण्यात अंशतःतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही) कोल्हापूर उल्हासनगर आणि चिंचवड

आता उपरोक्त शहरनावांच्या यादीत वलसाड कस ते माहित नाही मुंबईचे इतर भाग नाहीत आणि एकदम उल्हासनगरच नाव कस येतय हे एक सध्यातरी कोडं आहे.

माहितगार's picture

14 Aug 2014 - 1:08 pm | माहितगार

एकतर उल्हासनगरचेच लोक लर्न मराठी भरपूर शोधत असावेत अथवा पुर्ण मुंबईतन लर्नमराठीवर शोध शालेय कारणाने जात असावा पण त्या शोधकांना Marathi Font आणि Marathi Typing यात फारसा रस नसावा

आमच्या चिंचवडचं नाव आल्याने डोळे पाणावले.

पिलीयन रायडर's picture

14 Aug 2014 - 12:24 pm | पिलीयन रायडर

हो ना.. माझेही..

माहितगार's picture

14 Aug 2014 - 12:42 pm | माहितगार

:)

गूगल ट्रेंडानुसार मिपाचा सर्वाधिक शोध चिंचवडातनच घेतला जातो (मुंबई, पुणे, बंगलोर अहमदाबाद दिल्ली दुबई नंतर येतात) तेव्हा चिंचवडकरमंडळींनी अधिक मिपाकट्ट करण्याचा जरूर विचार करावा. http://www.google.co.in/trends/explore#q=maayboli%2C%20misal%20pav%2C%20...

म्हणजे चिंचवडात छुपे मिपाकर बरेच दिसताहेत. ;)

मराठीचे क्लासेस सुरु करावे का काय? ;)

माहितगार's picture

14 Aug 2014 - 3:02 pm | माहितगार

नेमकी शहर निवडली तर नक्कीच चालावयास हवीत असे वाटते.

आदूबाळ's picture

14 Aug 2014 - 7:15 pm | आदूबाळ

मुळात ज्याला मराठी येत नाही तो हा बोर्ड वाचणार कसा ?
एक शणका !!

बाकी माहितगारकाका इतक्या हिरीरीने सगळं करतात हे बघून कौतुक वाटतं.

माहितगार's picture

14 Aug 2014 - 3:04 pm | माहितगार

आदूबाळांच्या शब्दात हा एक वेगळा मंत्रचळच आहे.

माहितगार's picture

14 Aug 2014 - 3:04 pm | माहितगार

आदूबाळांच्या शब्दात हा एक वेगळा मंत्रचळच आहे.

सूड's picture

14 Aug 2014 - 3:08 pm | सूड

पण तो चांगला आहे. :)

मराठी कथालेखक's picture

16 Aug 2014 - 7:13 pm | मराठी कथालेखक

मुंबई , ठाणे , पुणे ई पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये इतर राज्यातील बरेच लोक नौकरी निमित्ताने येत आहेत कारण औरंगाबादमध्ये अनेक औषधनिर्माण, वाहनक्षेत्रातील व इतरही कंपन्या आहेत. या बाहेरुन आलेल्या लोकांना मराठी शिकण्याची गरज वाटत असावी. तसे तिथे हिंदीचा बराच वापर होतो पण तरी काही वेळा अडचण आल्यास अशा लोकांना मराठी शिकावेसे वाटू शकते.