इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते. Marathi language portal/translations येथे आपणही माहिती भरू शकाल. त्याच पद्धतीने https://en.wikibooks.org/wiki/Marathi_language_portal/Learn_with_pictur… आणि https://en.wikibooks.org/wiki/Marathi_language_portal/Learn_with_ease असे दोन वेगळे प्रयोगही केले आहेत त्यात माहिती भरण्यात अथवा त्या बद्दल आपल्या अभिप्रायाचे स्वागत असेल. हा एक भाग झाला.
गूगलवर कोण काय किती शोधत आहे याचा अंदाजा गूगल ट्रेंड्सच्या माध्यमातून येतो म्हणून मी Learn Marathi आणि learn marathi तसेच सोबतीला Learn english असाही सर्च गूगल ट्रेंडला दिला. पहा १ पहा २ हे शोध मला जरासे अनपेक्षीत ठरले Learn Marathi आणि learn marathi चे शोध जास्त करून भारताबाहेरून अथवा महाराष्ट्राबाहेरून असतील असा अंदाज होता तर रिझल्ट पाहून नाही म्हटलेतरी जरासे आश्चर्यच वाटले. औरंगाबाद आणि चिंचवड येथून शोध सर्वाधीक आहेत त्या खालोखाल मुंबईचे लोक गूगलवर Learn Marathi अथवा learn marathi हे शोधत असावेत. चिंचवड आणि मुंबईत बाहेर राज्यातील व्यक्ती अथवा विद्यार्थी असतील म्हणून असा शोध येत असेल तर समजण्यासारखे आहे पण तो औरंगाबादेतून का येतो आहे हे नीटसे उमगले नाही. पर्यटक असतील का विद्यार्थी असा जरासा प्रश्न पडला.
दुसर्या बाजूला परदेशातन Learn Marathi अथवा learn marathi ला काहीच शोध नाहीत याचेही खेद पुर्वक आश्चर्य वाटले. परदेशात पुरेशी मराठी एन आर आयांची मुले असतील तर त्यांना मराठी शिकण्याची थोडी फार तरी इच्छा होऊन काही गूगल शोध व्हावयास हवेत तसे होताना दिसत नाही. मग मराठी शिकवीण्याचे धडे बनवताना नेमका कोणता ऑडीअन्स समोर ठेऊन बनवायचे असा जरासा प्रश्न पडतो आहे.
इतर राज्यांमधून नाही म्हणायला Learn Marathi अथवा learn marathi चा थोडा फार शोध कर्नाटक, गुजराथ, आंध्र, दिल्ली आणि तामीलनाडूतून येतो आहे. दिल्ली व्यतीरीक्त उत्तरेतल्या राज्यांचा यात समावेश नाही म्हणजे महाराष्ट्रातलेही औरंगाबाद मुंबई चिंचवडचे शोध हिंदी भाषकांकडन येत असतील असे नेमके सांगता येत नाही. हिंदी भाषक कदाचित हिंदीतून शोधत असतील अशी शक्यता थोडी फार असू शकते पण औरंगाबाद मुंबई चिंचवड पुणे येथील इंग्रजी शाळातील विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांकडून असा शोध घेतला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
Learn english चा शोध घेण्यात भारतातील तामीळनाडू, पाँडेचेरी, आंध्र, कर्नाटक (दक्षीणेत केरळ मिसींग आहे आणि त्यांच मल्याळम विकिपीडियाच कामही जोरात चालू आहे रोचक योगायोग) हिंदी पट्ट्यातल्या दिल्ली उत्तराखंड आणि मध्यप्रदेशाची नावे येताहेत महाराष्ट्रासहीत इतर राज्ये मिसींगला आहेत.
महाराष्ट्रातील लोक Learn english तर गूगलवर शोधत नाहीत पण बाकी सर्व शोध इंग्रजीतन घेतात. गेल्याच आठवड्यात स्मिता तळवलकरांचा देहांत झाला त्यांच्या शोधांची आकडेवारी अभ्यासली तर त्यांच्या नावाचे केवळ २% शोध मराठी भाषा वापरून घेतले गेले ९८ टक्के शोध इंग्रजीतन घेतले गेले हे सर्वशोध महाराष्ट्रातनच घेतले गेले इतर राज्यातन नाही. विकिपीडियावरचेही अनुभव हेच सांगतात की अद्याप ९८ टक्के महाराष्ट्रीय जनता इंग्रजीतूनच शोध घेते. एकुण मराठी जनतेला इंग्रजीतन शिक्षण हव असेल पण इंग्रजीचा फार उमाळाही नाही आणि ऑनलाईन देवनागरी टाईपणं शिकण्यातही माघारच आहे. मी मागे मिपाच्या वाचकांच अलेक्साच्या आकडेवारीच्या साहाय्याने जे विश्लेषण केल त्यात मिपाकडे असा मराठी न टायपणारा वाचक वर्ग बराच असावा कारण त्याची वाचनवारी दिसते लेखन दिसत नाही.
या ऑगस्टच्या सुरवातीस मराठी विकिपीडियावर मराठीत कसं टायपाव याची मोठी आघाडी उघडली. मराठी विकिपीडियावर टायपिंग कस कराव याचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आढळला पण प्रत्यक्ष लेखनात मराठी माणूस मागे उभ टाकण्याच चित्र फारस बदललेल नाही.
यावर कुणी काही वेगळ विश्लेषण अथवा मत मांडू शकेल ?
वाचने
14222
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिंचवड ला आयटी वाले
सध्या नविन पिढीत "स्मार्ट
In reply to चिंचवड ला आयटी वाले by पैसा
असही होतं...
आश्चर्य
आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त
In reply to आश्चर्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे , हे औरंगाबाद , युपी/
In reply to आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त by माहितगार
मला दोन कारणं वाटतात एक मुलं
In reply to आश्चर्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Marathi Font आणि Marathi
In reply to मला दोन कारणं वाटतात एक मुलं by माहितगार
उल्हासनगर आणि मुंबई
In reply to Marathi Font आणि Marathi by माहितगार
आमच्या चिंचवडचं नाव आल्याने
हो ना.. माझेही..
In reply to आमच्या चिंचवडचं नाव आल्याने by प्रचेतस
(No subject)
In reply to आमच्या चिंचवडचं नाव आल्याने by प्रचेतस
ताजी बातमी चिंचवडकारांना डोळेपाणवण्याची अजून एक संधी
In reply to आमच्या चिंचवडचं नाव आल्याने by प्रचेतस
म्हणजे चिंचवडात छुपे मिपाकर
In reply to ताजी बातमी चिंचवडकारांना डोळेपाणवण्याची अजून एक संधी by माहितगार
मराठीचे क्लासेस सुरु करावे का
नेमकी शहर निवडली तर नक्कीच
In reply to मराठीचे क्लासेस सुरु करावे का by सूड
ड्वाळे पाणावले होते माझे
In reply to मराठीचे क्लासेस सुरु करावे का by सूड
मुळात ज्याला मराठी येत नाही
In reply to ड्वाळे पाणावले होते माझे by आदूबाळ
बाकी माहितगारकाका इतक्या
आदूबाळांच्या शब्दात हा एक
In reply to बाकी माहितगारकाका इतक्या by सूड
आदूबाळांच्या शब्दात हा एक
In reply to बाकी माहितगारकाका इतक्या by सूड
पण तो चांगला आहे.
In reply to आदूबाळांच्या शब्दात हा एक by माहितगार
मुंबई , ठाणे , पुणे ई पाठोपाठ