माझे कुणा म्हणावे ...

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
31 Jul 2014 - 7:33 pm

वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना
माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना

जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा
चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना

ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना
तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना

जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना
ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना

सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या
जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना

(हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)

मुक्तक

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 8:59 pm | कवितानागेश

आहा! :)

यशोधरा's picture

31 Jul 2014 - 9:12 pm | यशोधरा

सुरेख!!

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 10:14 pm | प्यारे१

>>>सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या
>>>जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना

खिक्क्क. भावानुवाद म्हणत लईच लिबर्टी घेतली की मुकेश सेठ. ;)

आवडला.

मदनबाण's picture

31 Jul 2014 - 10:31 pm | मदनबाण

सुरेख... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }

आयुर्हित's picture

31 Jul 2014 - 10:36 pm | आयुर्हित

वाह व्वा! क्या बात है!! खुप छान गज़ल आहे ही.
'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले'

मला भावलेला सकारात्मक अर्थ असा आहे:

येवु द्या हवा जरा, ह्लतील पाने जरा जरा,
कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

थांबू नका मधेच, अत्याचार होता जरा,
अजुन थोडेच दिवस होईल हा त्रास जरा,
कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

ध्येय असे स्वतःहुन आपल्याजवळ येईल जरा,
अरे मित्रांनो, काफिला तर चालु द्या जरा,
कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

शहर असो कि गाव, आपल्याच घरात जरा,
आपूलकीच संपली तर निघु या आता जरा,
कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

जफर लिहि गज़ल, प्रत्येकाची भेट घेवू जरा,
कोण कसे आहे, हे तरी कळु द्या हो जरा
कोण'आयुर्हित'आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2014 - 10:38 am | ज्ञानोबाचे पैजार

आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल.

व्हिडो दिसला नाहि तर इथे क्लिकावे

@ मुकवाचक,
आपण केलेला प्रयत्न भावला
पैजारबुवा,

आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल.

विडीयोत असलेल्या गाण्याच्या चालीवर आयुर्हीत साहेबांची कविता म्हणून पाहीली तर एकदम चाल जुळतेय. *lol*

@ मुकवाचक,
आपण केलेला प्रयत्न भावला

+१...असेच म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा

मूकवाचका..................झकास रे!!!!!!!!!
माझ्या अवडत्या गझलेचं तितकच सुरेख रुप भावलं. *i-m_so_happy*

इनिगोय's picture

31 Jul 2014 - 11:07 pm | इनिगोय

ज्याने 'हलाल' केले, कित्येक काफिल्यांना
तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना

.. हे कडवं सर्वात आवडलं.

स्पा's picture

1 Aug 2014 - 9:42 am | स्पा

मस्तच

मूळ ग़जल ऐकली. संपूर्ण वेगळी नज़ाकत आहे:

कोई पत्ता हिले, हवा तो चले,
कौन अपना है, ये पता तो चले ।

तू सितमसे ना खिंच हाथ अभी,
और कुछ दिन, ये सिलसिला तो चले ।

मंज़िले खुद करीब आयेगी,
ए अज़िज़ानों, काफ़िला तो चले ।

शहर हो, गांव हो, या घर अपना,
आबोदाना ही उठ गया, तो चले ।

हर किसीसे मिला करो की ज़फर
कौन कैसा है, कुछ पता तो चले ।
___________________

किमान या ग़ज़लेचा उल्लेख न करता, काय लिहीलंय ते डकवलं असतं तरी ठीक होतं कारण कितीही स्वैर झालं तरी मूळ अर्थाला, इतका बेक्कार धक्का मारु नाही.

आयुर्वेदाचार्यांनी त्यावर जो काय गोंधळ घातलायं तो म्हणजे, पुन्हा नवी मजा आहे.
__________________

असो, सकाळी एक सुरेख चिज ऐकायला मिळाली त्याबद्दल आभार.

स्पा's picture

1 Aug 2014 - 9:41 am | स्पा

एक डाव माफी द्या सर

नया हे वह.. जमेल हळु हळु

संजय क्षीरसागर's picture

1 Aug 2014 - 10:40 am | संजय क्षीरसागर

मूळातच हुकल्यावर काय जमणार?

शहर हो, गांव हो, या घर अपना,
आबोदाना ही उठ गया, तो चले ।

हा त्या ग़ज़लेतला एक अत्यंत सुरेख शेर आहे. त्याचा अर्थ असायं :

(कोणतही) शहर असो, की गाव, की आपलं स्वतःच घर; आता सगळीकडेच एक बेचैनी आहे. आब-ओ-दाना ही उठ गया, (म्हणजे, आता अन्न-पाणी सुद्धा मिळत नाही अशी बिकट परिस्थिती झाली) की चलू.

दुसर्‍या अर्थानं आबो-दाना उठ जाना म्हणजे मृत्यू. सध्या अवस्था इतकी संभ्रमाची आहे, की कुठेही गेलं तरी तीच बेचैनी आहे. आता मृत्यू आलाकीच... निघू.

कोई पत्ता हिले, हवा तो चले.
कौन अपना है, ये पता तो चले ।

(या तप्त जीवनात) जरा थोडी वार्‍याची झुळूक येऊ दे. आशेची पानं डोलू देत. जिच्यामुळे या उदास आयुष्याला रंग येईल अशी ती आहे तरी कोण, याचा (मला जरा) पत्ता लागू दे!

psajid's picture

1 Aug 2014 - 11:52 am | psajid

मूळ गझल उत्कृष्ट आणि भावानुवाद सुरेख !

नक्की नज़ाकत का आहे, ते पाहा :

तू सितमसे ना खिंच हाथ अभी,
और कुछ दिन, ये सिलसिला तो चले ।

साधारणतः प्रियकरानं पहल करावी अशी रीत आहे. पण ज़फ़रचा अंदाज़े बयां बघा:

तिचा हात तुझ्या हातात आहे पण इतक्यात तिला जवळ घेऊ नकोस, तो जुलूम होईल.
हा अंतर राखून चालणारा प्रणयाचा सिलसिला अजून काही दिवस चालू दे.
एकदा तीनं पहेल केली की मग आयुष्य उजळून निघेल!
मग, कोई पत्ता हिलेगा, कोई हवा चलेगी आणि नक्की कोण आपलं आहे ते कळेल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2014 - 12:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

तु इतक्या कृरतेने, खेचू नको हाताला,
अजुनी बरेच दिवस, हाताचे(च) काम आहे

(डफर) पैजारबुवा,

मूकवाचक's picture

1 Aug 2014 - 11:22 pm | मूकवाचक

संजयजींचं शैलीदार भाष्य आवडलं.

तिचा हात हातात असताना, तिने पहल करण्याच्याचीच काय ती प्रतिक्षा असताना स्पष्टपणे अभिव्यक्त झालेला 'हर किसीसे मिला करो की ज़फर, कौन कैसा है कुछ पता तो चले' हा जफरचा दिलकश अंदाज म्हणा व्यावहारिक दृष्टीकोन म्हणा दाद देण्याजोगा वाटतो. :)

सस्नेह's picture

1 Aug 2014 - 12:16 pm | सस्नेह

दिलतोड भावानुवाद !

भावानुवाद आवडला. सुंदर आहे.

मात्र संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. मुळची गझल आशावादी आहे तर तुमच्या गझलेत खिन्नतेचे, उदासिनतेचे सूर आहेत.

सुधीर's picture

1 Aug 2014 - 9:50 pm | सुधीर

संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे.
+१
संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.

मूकवाचक's picture

1 Aug 2014 - 9:16 pm | मूकवाचक

प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना मन:पूर्वक धन्यवाद.

पैसा's picture

1 Aug 2014 - 11:25 pm | पैसा

रचना आवडली.

राघव's picture

4 Aug 2014 - 6:51 pm | राघव

चांगली रचना झालीये. आवडली. :)