संत ज्ञानेश्वर व आपण

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
22 Jul 2014 - 10:23 am
गाभा: 

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी धर्मज्ञान प्राकृतात असावे असा आग्रह धरला व आपले धर्मविषयक विचार `पाली’ या तत्कालीन लोकभाषेतून लोकांसमोर मांडले. धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली.

यासारख्या महापुरुषांच्या शिकवणीतून काही गोष्टी आपल्या सगळ्यांना शिकता येतील का ?
माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते.
माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.

प्रतिक्रिया

पोटे's picture

22 Jul 2014 - 12:35 pm | पोटे

ती फुलराणी , पिग्मेलियन आधीच लिहुन झालय की

एस's picture

22 Jul 2014 - 1:00 pm | एस

माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते.
माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.

केवळ बोलीभाषेची शुद्धता वा आचरण, वर्ण, पेहराव, आहार यांच्या सवयींनुसारही कुणाचे कुठल्या कॅटेगरीत वर्गीकरण केले जाऊ नये. एवढेच नव्हे तर, वैविध्य ही समाजाची सहजप्रवृत्ती असते आणि त्यात वावगं काही नाही. उलट एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे. समानतेच्या चळवळींचे म्हणणे ही विविधता टाकून द्या असे कधीच नव्हते. पण त्यातून पेटणारा अन्याय वा त्या अन्यायाचे समर्थन करण्याची वृत्ती मात्र चुकीची आहे असेच या सगळ्या विद्रोहांचे प्रतिपादन होते.

प्रत्येकाला केवळ माणूस म्हणूनच वागवणे आपल्याला कधी जमणार आहे कुणास ठाऊक. त्याआधी स्वत:ची ओळख केवळ माणूस एवढीच ठेवणे व त्यावरील सत्ता-प्रतिष्ठा-जन्म-धनरूपी अहंकाराची जळमटे झाडून टाकावयास हवीत. स्वत:तील माणूस कळला तरच दुसर्‍यातील माणूस दिसू शकेल.

स्वॅप्ससर,

"एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे."

ज्याप्रमाणे फुलांना काहीही त्रास न देता भुंगा त्यामधील मध गोळा करतो(यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद:),
त्याप्रमाणे या धाग्यातून सारभूत असलेल सगळ सत्वच, आपण या ओळीत विशद केले आहे.
मान गये आपको !

तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल का प्लिज? इट्स सो कॉम्प्लिकेटेड. आय अ‍ॅम कन्फ्युज्ड विथ अ‍ॅन इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स. ;)

___/\___

एस's picture

23 Jul 2014 - 8:08 pm | एस

"Liberté, Égalité, Fraternité"

मला याहून सोप्पं मराठी येत नाही. क्षमस्व.

'सिम्प्लिसिटी इज द मोस्ट कॉम्प्लेक्स थिंग टू अचीव्ह.'

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा

@ धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif
मी या भूमिकेचा सर्मथक..प्रचारक आहे.
आणि अल्पप्रमाणात प्रसारकही होतो/असेन. :)

vikramaditya's picture

22 Jul 2014 - 1:34 pm | vikramaditya

माउलींचे कार्य अलौकिक आहे. फारच छान विचार मांडला आहे.

ह्या विषयावर अजून लिखाण व्हावे.

बाकी मला असे वाटते की सारे वैज्ञानिक ज्ञान पण प्रकृतात असावे. तुम्हाला काय वाटते?

आता समोरचा, वैद्यानिक/शास्त्रीय कशाला समजतो ? त्यावर बरेच काही अवलंबून आहे. उदा. काही लोक ज्योतिषगीरीला शास्त्र म्हणतील, म्हणू देत बापुडे. आपला काही ऑब्जेक्शन नाय. कोणी सांगावे, इंद्राला आवाहन करून पाऊस पाडण्याचे शास्त्र सुद्धा असेल कदाचित आर्यांकडे. (आर्य म्हणजे फ़ारफ़ार वर्षापूर्वी, सिंधुभूमीत आलेले. कृपया नोंद घ्यावी, कि मी याठिकाणी "आर्य" असं 'आजच्या कोणत्याही सामाजिक, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, भाषिक लोकसमूहाला' उद्देशून उल्लेखलेलं नाही)
बाकी मला असे वाटते की "सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेतच आहे", असे कोणी सुज्ञ म्हणूच शकत नाही, असं मला वाटत. तुम्हाला काय वाटते?

पगला गजोधर's picture

23 Jul 2014 - 11:36 am | पगला गजोधर

ऑन सेकंड थॉट, जर तुमची प्रतिक्रिया "सारे वैज्ञानिक ज्ञान पण प्रकृतात असावे." म्हणजे
"All Scientific Knowledge Should be avilable in native language" अशी, मी इंटर्प्रेट केली असता, तर माझा प्रतिसाद असा आहे की "सर्व ज्ञात माहिती, सर्व भाषेत उपलब्ध व्हावी", म्हणजेच "जो जे वांछील तो ते लाहो"

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jul 2014 - 7:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तुमचे ते विकिपिडियावाले जे काही करतात ती पहिली पायरी आहे का?

विकीपेडियावाले जे काही करत आहे, ते म्हणजे माझ्यामते,
अत्यंत साध सरळ सुंदर उपयुक्त काम आहे, आजच्या
संस्कृतीतील हीच ऐक ज्ञानगंगा …