सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी धर्मज्ञान प्राकृतात असावे असा आग्रह धरला व आपले धर्मविषयक विचार `पाली’ या तत्कालीन लोकभाषेतून लोकांसमोर मांडले. धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली.
यासारख्या महापुरुषांच्या शिकवणीतून काही गोष्टी आपल्या सगळ्यांना शिकता येतील का ?
माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते.
माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.
वाचने
5718
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
चांगला विचार आहे.
यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद:
In reply to चांगला विचार आहे. by एस
तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल
In reply to चांगला विचार आहे. by एस
मराठी!
In reply to तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल by प्यारे१
@ धर्मज्ञान सर्वांसाठी खुले
ज्ञानेश्वर
बाकी मला असे वाटते की सारे
सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेत नाही
In reply to बाकी मला असे वाटते की सारे by आनन्दा
ऑन सेकंड थॉट
In reply to सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेत नाही by पगला गजोधर
तुमचे
आजच्या संस्कृतीतील हीच ऐक ज्ञानगंगा …
In reply to तुमचे by माईसाहेब कुरसूंदीकर