मावा केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
19 Jul 2014 - 4:43 pm

साहित्य- १५० ग्राम मैदा
१५० ग्राम मावा/खवा (मावा उपलब्ध नसल्यास रिकोटाचीज चा मावा बनवावा.)
१२५ ग्राम तूप/लोणी
२०० ग्राम साखर
४ अंडी
१ चहाचा चमचा वॅनिला इसेन्स
१ चहाचा चमचा बेकिंग पावडर
पाव कप दूध
१चिमूट मीठ

कृती- मावा पुरणयंत्रातून मो़कळा करुन घ्या.
मैदा,बेकिंग पावडर व मीठ एकत्र करुन घ्या आणि मोकळा केलेला मावा हलक्या हाताने त्यात मिक्स करा.
तूप/लोणी फेटून घ्या.
त्यात साखर घालून फेटा.
अंडी घालून बिट करा.
वॅनिला अर्क घाला ,२ मोठे चमचे दूध घाला.
मैदा व माव्याचे मिश्रण थोडे थोडे घाला व हलक्या हाताने फेटा.
मिश्रण घट्ट वाटले तर एखादा चमचा दूध घाला.
सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
अवन १८० अंश से. वर प्रि हिट करुन घ्या.
१८० अंश से. वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
(नेहमीसारखेच)केक झाला की नाही ते (त्याच्या)पोटात सुरी खुपसून पहा.
नंतर जाळीवर घालून थंड झाला की स्लाइस करा.
मावा केक खूप स्पाँजी होत नाही पण चवीला फार सुरेख लागतो.
मोठ्या केकपॅन ऐवजी पेपरकप्स मध्ये केकचे मिश्रण घालून मावा कपकेक्स सुध्दा करता येतील.

.

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

19 Jul 2014 - 5:10 pm | मधुरा देशपांडे

मावा/खवा तुला इकडे कुठे मिळाला? की तु घरी केलास? ग्रेट. कधी येउ खायला :)

आणि हो, मी पहिली.

स्वाती दिनेश's picture

19 Jul 2014 - 5:13 pm | स्वाती दिनेश

रिकोटा चीजचा मावा केला ग, नाहीतर इथे कुठला मावा मिळायाला.. आणि कधीही ये की खायला.. फोन करुन तू येईपर्यंत केक तयार.. :)
स्वाती

मधुरा देशपांडे's picture

19 Jul 2014 - 5:16 pm | मधुरा देशपांडे

याची पण कृती सांग ना कसा करायचा ते.

स्पंदना's picture

19 Jul 2014 - 5:13 pm | स्पंदना

ए मेरे को कब चान्स मिलेगा?

मधुरा देशपांडे's picture

19 Jul 2014 - 5:21 pm | मधुरा देशपांडे

*yahoo* आमचे जर्मनी वाल्यांचे सेटिंग होते. *blum3*

स्पंदना's picture

19 Jul 2014 - 5:31 pm | स्पंदना

हिटलर कुठल्या!!
बोलता बोलता माझा बिचारा दुसरा प्रतिसाद्पण रसातळाला गेला. *sad*

स्पंदना's picture

19 Jul 2014 - 5:12 pm | स्पंदना

मी पयला!!!

ढ्ञाण टडञाण!!

ही रेसेपी फार म्हणजे फार शोधत होते. जवळ जवळ २० वर्षापुर्वी एकदा केला होता, पण लिहुन नव्हती ठेवली. आता मात्र ही चुक करणार नाही. फंटास्टिक चव असते. अन स्लाईसेस काय दिसताहेत स्वातीताई!!
सल्युट!!

प्यारे१'s picture

19 Jul 2014 - 5:27 pm | प्यारे१

.............

___/\___

स्वाती दिनेश's picture

19 Jul 2014 - 5:29 pm | स्वाती दिनेश

एका नॉनस्टीकपॅनमध्ये रिकोटा चीज घाला व मध्यम आचेवर परता. सारखे परतावे लागते. साधारण २५-३० मिनिटे तरी लागतात.आधी चीज पात्तळ होते ,निराश न होता ढवळत रहा. नंतर हळूहळू घट्ट होऊन खवा होतो.
साधारण जेवढे चीज असेल त्याच्या निम्मा मावा होतो.
स्वाती

मधुरा देशपांडे's picture

19 Jul 2014 - 5:36 pm | मधुरा देशपांडे

धन्यवाद स्वाती ताई.

धन्यवाद

गुलाबजामसाठी मी इव्हॅपोरेटेड मिल्कमध्ये मिल्क पावडर मिसळुन खवा करते. अगदी थोड अन्सॉल्टेड बटर मिसळायच अन मावेत १२ मिन्ट गरम करायच. दर २ मिनिटांनी ढवळायच.

हवालदार's picture

21 Jul 2014 - 3:45 pm | हवालदार

हो तुमची पध्दतच अत्तापर्यन्त ऐकली आहे. पण सन्गितल्या बद्दल पुन्ह एकदा धन्यवाद :-)

मनीषा's picture

19 Jul 2014 - 5:45 pm | मनीषा

मावा केक छान दिसतो आहे .
करून बघावा म्हणते आहे

प्यारे१'s picture

19 Jul 2014 - 6:09 pm | प्यारे१

>>> करून 'बघावा'

का हो? उपास काय? ;)

आम्ही बघायला शिल्लक राहणार नाही असं बघू :D

सखी's picture

21 Jul 2014 - 5:24 pm | सखी

हेच म्हणते, छानच दिसतोय, करावाच लागणार.

रेवती's picture

19 Jul 2014 - 6:29 pm | रेवती

फोटूत केक इतका लुसलुशीत दिसतोय की लगेच करावा असे वाटतेय. नेहमीप्रमाणेच पाकृ आवडली. रिकोटाचीजच खवा मी एकदा केला होता. चांगला झाला होता.

आई ग्गां! काय दिसतोय तो फोटो! मार डाला!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2014 - 6:56 pm | अत्रुप्त आत्मा

केक खाण्यापुरतं ;) गवताळ धोरण सोडावं म्हणतो!

मुक्त विहारि's picture

19 Jul 2014 - 7:43 pm | मुक्त विहारि

बिना अंड्याचा पण केक मिळतो म्हटले...

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2014 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

ते म्हायत्ये हो........! :-/

पण माझ्यासारख्या अट्टलास असें वांटतें..कीं.. अंड्याशिंवायच्या क्येंकाची चंव ही आत्म्याशिवायच्या देंहां इतकिंच बेचंव असणार.................कसें........अंsssssssssss????? *biggrin*

म्हणून म्हटलें..कंरावेंच एकदां पाप! =))

मुक्त विहारि's picture

19 Jul 2014 - 7:46 pm | मुक्त विहारि

जमल्यास करून बघीन...

मंजूताई's picture

19 Jul 2014 - 7:53 pm | मंजूताई

दिसतोय. अंड्याला पर्याय?

दिपक.कुवेत's picture

19 Jul 2014 - 8:06 pm | दिपक.कुवेत

टेम्टींग दिसतोय. फोटोतुन तर लगेच उचलुन खावासा वाटतोय. हे बेकिंग एकदा शीकायचयं.

मदनबाण's picture

19 Jul 2014 - 10:53 pm | मदनबाण

मला कधी खायला बोलवणार ? :)

मदनबाण.....
आत्ताची बदलेली सही :- Tune Maari Entriyaan... :- GUNDAY

सानिकास्वप्निल's picture

19 Jul 2014 - 11:09 pm | सानिकास्वप्निल

कसला लुसलूशीत दिसतोय केक ..यम्मी!!!!
मावा केक खूप आवडतो आणितो मावा तू रिकोटा चीज वापरुन बनवलास हे उत्तम म्हणजे आता आम्हाला ही रिकोटा चीज वापरून हा केक बनवता येईल :)

नंदन's picture

20 Jul 2014 - 2:30 am | नंदन

'काफे उंड कुकन'साठी परफेक्ट! :)

(अलीकडेच बंद झालेल्या 'मेरवान'च्या आठवणी पुन्हा छळून गेल्या.)

हवालदार's picture

20 Jul 2014 - 8:52 pm | हवालदार

एकदम खावासा वाटतोय

सुहास झेले's picture

21 Jul 2014 - 10:21 am | सुहास झेले

जबरा !!!!

आहाहाहाअ..... काय मस्त दिसतोय गं केक. लगेच उचलुन खावासा वाटतोय.

स्पा's picture

21 Jul 2014 - 3:57 pm | स्पा

कहर

बेक्कार यम्मी

फोटु पाहून वारल्या गेले आहे.

इशा१२३'s picture

22 Jul 2014 - 2:37 pm | इशा१२३

मस्त फोटो..सोपा वाटतोय.

कवितानागेश's picture

22 Jul 2014 - 3:58 pm | कवितानागेश

आह्हा!!! यम्मी....

किसन शिंदे's picture

22 Jul 2014 - 4:22 pm | किसन शिंदे

पाककृतीपेक्षा फोटोच लय खतरा!! जीभ चाळावली त्या स्लाईसेसनी..

उदय के'सागर's picture

22 Jul 2014 - 9:14 pm | उदय के'सागर

व्वा मस्तं दिसतोय केक. हाच केक मायक्रोवेव मधे करता येइल का? सोलो मायक्रोवेव मधे? मी साधे केक बनवतो तेंव्हा पाच किंवा सात मिनिटे हाय मोड़ वर केक बेक करतो आणि केक मऊ स्पौंजी होतो. तसाच हां मावा केक होउ शकेल का मायक्रोवेव मधे?

उदय के'सागर's picture

22 Jul 2014 - 9:14 pm | उदय के'सागर

व्वा मस्तं दिसतोय केक. हाच केक मायक्रोवेव मधे करता येइल का? सोलो मायक्रोवेव मधे? मी साधे केक बनवतो तेंव्हा पाच किंवा सात मिनिटे हाय मोड़ वर केक बेक करतो आणि केक मऊ स्पौंजी होतो. तसाच हां मावा केक होउ शकेल का मायक्रोवेव मधे?

तुषार काळभोर's picture

23 Jul 2014 - 11:39 am | तुषार काळभोर

मला काही दिवसांपुर्वी मिपावर मिळालेली ही काही उत्तरे:
१. मायक्रो मोड(हा एकच मोड आहे) मध्ये कोणते पदार्थ करता येतात?>>> या मोडमधे पदार्थ गर्म करण्याखेरीज रवा/ शेंगदाणे भाजणे, साबुदाण्याची खिचडी, गाजर हलवा वगैरे पदार्थ करता येतात. 'अन्न शिजवणे' या प्रक्रियेसाठी मायक्रोवेव मोड असतो.

२. खूप पाककॄतींमध्ये ओवन ठराविक तापमानाला प्रीहीट करावा लागतो. आणि ठराविक तापमानाला ठराविक वेळ पदार्थ शिजवावा लागतो. पण या ओवन मध्ये तापमानाचं ऑप्शन नाहीये. २ मेकॅनिकल कंट्रोल आहेत. एकः पॉवर-min(२०% ), ४० (=डिफ्रॉस्ट), ६०, ८० आणि max(१००%=८०० Watts). दोनः टाईमर
"१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते.
३. रोजच्या कोणत्या गोष्टी मायक्रोवेव्ह मध्ये करता येतात?(भाज्या, भात, वरण, चहा, पापड, अंडी, चिकन, मटन)>>> पापड मस्त एकसारखे भाजले जातात. अंडी मायक्रोवेवमधे उकडायला ठेवू नका, मायक्रोवेवमधे अंड्यांचा स्फोट होतो. चहा/ दूध गरम करता येईल. भाज्या करताना कडधान्ये, फ्लॉवर, गाजर, फरसबी, तोंडली इत्यादी भाज्या मायक्रोवेवमधे शिजवून घेऊन मग गॅसवर फोडणीला टाकता येतील. मायक्रोवेवमधे कमी वेळात भाज्या शिजतात.

४. इन्पुट पॉवर १२०० वॉट्स आहे. म्हणजे फुल्ल पॉवरला अंदाजे तासाला १.२ युनीट वीज=१०रुपये. सवलतीबाहेरच्या ९३० रु च्या गॅसच्या तुलनेत कितपत किफायतशीर आहे?>>> या प्रश्नाला पास

(श्रेयाव्हेरः हसरी )

उदय के'सागर's picture

23 Jul 2014 - 1:03 pm | उदय के'सागर

धन्यवाद पैलवान.

"१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते.

मला हे फारसं पटलं नाही कारण वर म्हंटल्याप्रमाणे, मी ज्या काही केक च्या रेसेपी आहेत त्या सोलो मायक्रोवेव मधे हाय मोड वर ५-७ मिनीटे बेक करुन उत्तम केल्या आहेत, त्यामूळे ते अगदीच होणार नाही असं वाटत नाही. अर्थात कन्व्हेक्शन असल्यास ते अजून उत्तम दर्जाचं होत असेल ह्यात शंका नाही.

स्वाती दिनेश's picture

23 Jul 2014 - 1:10 pm | स्वाती दिनेश

मायक्रोव्हेव -मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरणे.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो.
साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे)
साध्या मायक्रोव्हेव अवन मध्ये केक करताना साधारण ८०० वॅट वर ६ मिनिटे वेळ लागतो. वॅटेज कमीजास्त असेल त्या प्रमाणात वेळ अ‍ॅडजस्ट करावा लागेल.

अधिक माहितीसाठी हे वाचावे.
स्वाती

उदय के'सागर's picture

23 Jul 2014 - 1:41 pm | उदय के'सागर

धन्यवाद स्वाती-दिनेश आणि दिलेला विदा अतिशय माहितीपूर्ण आहे.

पैसा's picture

1 Aug 2014 - 11:08 pm | पैसा

कसला खल्लास दिसतोय हा केक!