केक करताना..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
8 Feb 2011 - 6:10 pm

केक करणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे, मी आजवर अनेक केकृ येथे दिल्या (काही जणांची जळजळ होत असली तरी अजूनही केकृ देणार आहे, हे काही निरोपाचे भाषण नाहीये.. )
आणि त्यात काही शंका बर्‍याच लोकांनी बरेचदा विचारल्या असे लक्षात आले.
उदा- मला केक करणे कसे जमेल?
मायक्रोव्हेव मध्ये केक कसा करायचा?
आमच्याकडे अवन नाही..
आम्ही अंडी खात नाही..
वाटी/चमचा/कप .. असे प्रमाण नाही का देता येणार?
इ.इ. प्रश्न..एक ना दोन..
प्रतिसादात त्या प्रश्नाचे उत्तर दिले तरी FAQ क्याटेगरीत काही प्रश्न येतच राहतात.म्हणून ही एकत्रित माहिती-
केक करताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

केक करताना घटक पदार्थांचे प्रमाण अतिशय करेक्ट घेणे आवश्यक असते, नाहीतर केक बसतो,जड होतो, फुगत नाही, पोरस होत नाही, खूपच टेंडर होतो, तुटतो, मध्ये फुगतो आणि बाजूने चपटा राहतो इ. इ. इ....
म्हणूनच केकचे प्रमाण देताना मी बरेचदा ग्राम मध्ये देते.
केकसाठी मुख्य घटक जे मी ग्राम मध्ये वापरते ते म्हणजे मैदा,साखर, बटर -
यांची वाटी ची प्रमाणे पुढीलप्रमाणे- (वाटी- आमटीची वाटी )
१ फ्लॅट वाटी मैदा- १०० ग्राम
१ फ्लॅट वाटी साखर- १५० ग्राम
१ फ्लॅट वाटी बटर- १२५ ग्राम
हे प्रमाण लक्षात घेऊन दिलेल्या केकृ करता येतील. (थोडे गणित करावे लागेल.:))

अंडी- अंडी उत्तम केक बाइंडर आहेत, तसेच केक फ्लफी, पोरस आणि हलका होण्यासाठी अंडी हा महत्त्वाचा घटक आहे.
शाकाहारी मंडळी अंडी खात नाहीत, खरं तर शाकाहारी अंडी बाजारात उपलब्ध असतातच, तरी ज्यांना बिनाअंड्याचा केक करायचा आहे त्यांनी एगलेस केकची ही कृती पहावी.
अंड्याला रिप्लेसमेंट म्हणून दही, कोक, कन्डेन्स्ड मिल्क असे पर्याय आहेत. काही एगलेस केकृ देईन लवकरच.
पण त्सेंटा आजीच्या मते साधारण पणे अंड्याला पर्याय वापरायचाच असेल तर..
१ अंडे- १ टेबलस्पून कॉर्न स्टार्च + २ टेबल स्पून पाणी एकत्र करणे किवा १ अंडे- १ टेबलस्पून पोटॅटो स्टार्च+ २ टेबल स्पून पाणी एकत्र करुन घेणे
दिलेल्या केकृ मध्ये अंड्याऐवजी हा पर्याय वापरुन एगलेस केकृ करु शकता.

मोल्डमेकिंग करताना केक पॅनला सर्व बाजूंनी बटर लावणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर केक भांड्याला चिकटतो.
केकपॅन जरी टेफलॉन कोटेड/नॉनस्टिक असेल तरीही ग्रिसिंग करणे आवश्यक.
केकपॅन जर वर्तुळाकार असेल आणि मध्ये केक जास्त फुगत असेल तर केकचे मिश्रण पॅन मध्ये ओतताना कडेने जास्त व मध्ये कमी ओतावे म्हणजे केक बेक झाल्यावर इव्हनली फुगेल.

अवन नाही, पर्याय काय?
मायक्रोव्हेव -मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरणे.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो.
साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे)
साध्या मायक्रोव्हेव अवन मध्ये केक करताना साधारण ८०० वॅट वर ६ मिनिटे वेळ लागतो. वॅटेज कमीजास्त असेल त्या प्रमाणात वेळ अ‍ॅडजस्ट करावा लागेल.

केकपात्र- अवन नसेल तर केकपात्रात केक करता येतो. एका तव्यावर वाळू घालून त्यावर केकपात्र ठेवायचे आणि वरुन दुसरा तवा ठेवायचा, त्यावरही वाळू घालायची.
केकपात्र नसेल तर अ‍ॅल्युमिनियमचे पसरट भांडे किवा कुकरचे भांडे ठेवता येते.
केक करताना आच मध्यम ठेवा.
(अ‍ॅल्युमिनियम हा उत्तम उष्णता वाहक असल्यामुळे त्याचा वापर केला जातो.)

कुकर-कुकर मध्ये एक ताटली उलटी ठेवायची, कुकरमध्ये पाणी घालायचे नाही. कुकरच्या भांड्यात केकचे मिश्रण घालायचे आणि शिट्टी/प्रेशर न लावता कुकर गॅसवर ठेवायचा, प्रथम ५ मिनिटे तेज आच, नंतर मध्यम आच.. साधारण १८-२० मिनिटात केक होतो. पण केकचा वास यायला लागला की चेक करणे आवश्यक.नाहीतर केक (आणि कुकर )जळेल.

केक झाल्यावर-
केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा. मिश्रण न चिकटता सुई/सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या.
केक नेहमी थंड झाल्यावर कापावा म्हणजे स्लाइस तुटत नाहीत.
केक कापल्यावर स्लाईस उघड्यावर ठेवायच्या नाहीत,त्या कोरड्या पडतात.

ह्या काही गोष्टी लक्षात घेऊन केक केला तर तो तुमच्या आनंदाचा भाग होईल.
शुभेच्छा!

प्रतिक्रिया

वाह स्वातीताई माझ्या सारख्या नवशिक्याला याचा चांगलाच फायदा होईल. :)

टारझन's picture

8 Feb 2011 - 6:55 pm | टारझन

माझ्या सारख्या जुण्याजाणत्या आणि अणुभवी कुक ला सुद्धा ह्याचा चांगलाच फायदा होईल. :)

- मनपा

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2011 - 11:01 am | llपुण्याचे पेशवेll

असेच म्हणतो.
माझ्यासारख्या नस्वैपकी माणसाला याचा नक्कीच फायदा होईल.

यशोधरा's picture

8 Feb 2011 - 6:57 pm | यशोधरा

स्वातीताई, मस्त लिहिलेस. धन्यवाद गं :)

खुप छान लिहले आहेस. थँक्स. :)

पर्नल नेने मराठे's picture

8 Feb 2011 - 7:21 pm | पर्नल नेने मराठे

साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे)

हे वाचुन मन खट्टु झाले :(

मस्त कलंदर's picture

8 Feb 2011 - 7:24 pm | मस्त कलंदर

एक मोठ्ठा थँक्यू गं ताई... आता मीही केक करून पाहणारच..

अवांतरः शीर्षकावरून तुला केक करताना काय काय वाटलं, वाटतं असा शेंटिमेंटल लेख असेल असं मला वाटलं होतं!!! :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Feb 2011 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला बोलावशील तेव्हा कर गं केक! ;-)

स्वातीताई, हा लेख मात्र वाचला हां मी.

निवेदिता-ताई's picture

8 Feb 2011 - 7:34 pm | निवेदिता-ताई

धन्यवाद..............धन्यवाद.............अश्शीच समग्र माहिती हवी होती.

प्यारे१'s picture

9 Feb 2011 - 9:50 am | प्यारे१

>>>खरं तर शाकाहारी अंडी बाजारात उपलब्ध असतातच

यांची पाकृ????

प्यारे१'s picture

9 Feb 2011 - 9:54 am | प्यारे१

प्रकाटाआ

कच्ची कैरी's picture

9 Feb 2011 - 10:53 am | कच्ची कैरी

बिन ओवनचा केक कसा करावा याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! बाकी सर्वच माहिती खूपच उपयुक्त आहे ,पुन्हा एकदा धन्यवाद!

स्वैर परी's picture

9 Feb 2011 - 11:27 am | स्वैर परी

धन्यवाद ग स्वाती ताई! :)
या विकांताला घरी नक्कि करणार! :)

कॉफी केक क्न्व्हेक्शन मोड मधेच केला होता. अर्थात फक्कड झाला होता.
इतरही टिप्स लक्षात ठेवण्यायोग्य.. धन्यु!!

अरे प्लीज ते वाचनखुणांचं मनावर घ्या रे!!

धनुअमिता's picture

9 Feb 2011 - 12:43 pm | धनुअमिता

स्वाती ताई या केकच्या महत्वाच्या माहिती बद्दल धन्यवाद. अशीच माहिती देत रहा.

माहिती पुर्ण, संशोधन करुन केलेले लिखाण. अभिनंदन.

ह्या विषया वर आधुनिक संशोधन पश्विमात्त देशात झालं असलं तरी मुळे हि भारतीय पुराणात सापडतात.
केक करणं हे वाटतं तितकं सोपं नाहि. सगळ्याना केक करावासा वाटला तरी काहिंनाच तो जमतो. पण एकदा सराव झाला कि अगदि मध्य रात्री सुध्दा उठुन करता येतो.
अनुभवा वरुन असे सिध्द झाले आहे कि कप केकस नेहमी छान गोल फुगलेले आणि नरम असणे महत्वाचे. मग अंडि घाला नाहितर घालु नका. चेरीने सजवले असेल तर अति उत्तम. बनाना केक हा मात्र जसा नरम होतो तशी मजा जाते. असे होउ नये म्हणुन काहि लोकं रसायने वापरतात. कसे हि करुन केक चा आनंद लुटता आला म्हणजे झालं.

परत एकदा लेखना बद्दल अभिनंदन.

काही जणांची जळजळ होत असली तरी अजूनही केकृ देणार आहे, हे काही निरोपाचे भाषण नाहीये.. )

=)) =)) आमचे सुट्टीचे यायचे निमंत्रण मनावर घ्या! :-)

आम्ही अंडी खात नाही..

अरे रे, कोण हे कमनशिबी लोक? अंड्याच्या कवचात पाणी टाकुन जीव का देत नाहीत? असो.

पाकृ न वाचताच केक करणार्‍या मित्रजनांना फॉरवर्ड केली आहे. लवकरच केक खायला मिळेल मग प्रतिसाद देउच. ;-)

प्राजु's picture

10 Feb 2011 - 9:36 am | प्राजु

प्रचंड .. प्रचंड ... प्रचंड.. उपयुक्त माहिती.. ! धन्स स्वातीताई. :)
आजकाल मी सुद्धा केक करायला लागले आहे. नविन केकृ टाकेनच लवकर. :)

युवा वर्गात केक करणे लोकप्रिय असते. केक च्या प्रकारां बद्दल उत्सुकता हि असते.
केक करुन पहाणे जरुरीचे. जर केक केला नसेल तर जरुर करुन पहा. नक्की कोणत्या प्रकारचा केक कोणाला आवडेल हे केक करुनच समजेल. केक एकट्याने करण्यात तशी येवढि मजा नाहि पण काहि लोकांना दुसरा काहिच उपाय नसतो.
केक करण्याची इतकी प्रचंड... प्रचंड ... प्रचंड माहिती मिळाल्यामुळे मिपा वरील लोकं उत्साहित झाले आहेत.

प्रचंड माहिती मिळाल्यामुळे मिपा वरील लोकं उत्साहित झाले आहेत.

ते दिसतंच आहे त्यांच्या प्रतिसादात पण तुम्ही का हिस्टेरिक होउन राह्यले?

ज्योति प्रकाश's picture

10 Feb 2011 - 1:03 pm | ज्योति प्रकाश

धन्यवाद स्वातीताई,वाटीचे प्रमाण दिल्याबद्दल आता त्याप्रमाणे नक्कि करून बघते.अर्थात थोडस गणित करूनच.

सखी's picture

23 Jul 2014 - 9:16 pm | सखी

किती समग्र आणि उपयुक्त माहीती दिली आहेस स्वाती.

इशा१२३'s picture

24 Jul 2014 - 6:34 pm | इशा१२३

धन्यवाद स्वातीताई..केक शिकायची प्रचंड ईच्छा आता पुर्ण होइल..प्रत्येक वेळी काहितरी बिनसतच त्यामुळे नाद सोडून दिला होता.आता परत प्रयत्न करते.मुख्य म्हणजे मायक्रोव्हेवमधे केक करण्याची नेमकी पद्धत कळली.
पण तरीही एक शंका आहेच कि ओवन प्रिहिट करतात तस मायक्रोव्हेव मधे करायच नाहि का?मायक्रोव्हेव प्रिहिट कसा करणार?