दूरदेशी...

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
30 Jul 2008 - 4:41 pm

गेलो जरी तुला मी सोडून दूरदेशी
येइन धावुनी मी जेव्हा तु साद देशी
डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा
माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा
असशील तु उदास, वा खिन्न तू मनात
मी ही तिथे असेन तुझियाच आठवात
स्मरशील तू मला अन येइल मन भरोनी
तेव्हा तुलाच सखये पाहीन मी ही स्वप्नी
असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी
घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

30 Jul 2008 - 4:48 pm | आनंदयात्री

>>घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी

मस्त !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2008 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी

अनिल हटेला's picture

30 Jul 2008 - 4:52 pm | अनिल हटेला

क्या बात है"

मस्तच "

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनीषा's picture

30 Jul 2008 - 4:58 pm | मनीषा

कविता खुप छान आहे... आवडली

असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी
घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी ... हे खुप आवडले

मिसळपाव's picture

30 Jul 2008 - 5:04 pm | मिसळपाव

फुलवा, भावपूर्ण कविता आहे. 'तू लांब दूर तेथे, हूरहूर मात्र येथे' या जुन्यातल्या भावगीताची आठवण झाली.

शितल's picture

30 Jul 2008 - 5:57 pm | शितल

तुमच्या कडुन अजुन एक सुदंर कविता.
:)

प्राजु's picture

30 Jul 2008 - 6:59 pm | प्राजु

काय सुंदर लिहिली आहे कविता...सगळ्याच ओळी सुंदर.

डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा
माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा

या जास्ती आवडल्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

30 Jul 2008 - 10:57 pm | संदीप चित्रे

>> डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा
>> माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा

खूपच सुरेख लिहिलं आहेस :)

बेसनलाडू's picture

31 Jul 2008 - 5:19 am | बेसनलाडू

कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू

चतुरंग's picture

31 Jul 2008 - 5:41 am | चतुरंग

(रविकिरण मंडळातल्या एखाद्या कवीची असावी असे भासले!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

31 Jul 2008 - 2:06 pm | विसोबा खेचर

फुलवा, कविता छानच आहे...

मदनबाण's picture

1 Aug 2008 - 11:20 am | मदनबाण

फारच सुंदर कविता..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

पारिजातक's picture

1 Aug 2008 - 1:02 pm | पारिजातक

एक नम्बर कविता... भरून आल हो एकदम (हे उपरोधाने बोलने नव्हे. ) !!!!
:''(
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!