माझी पाखरे

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
30 Jul 2008 - 3:53 pm

गडबड वेड्या वस्तीमध्ये
शाळा पाखरांची
पोपट मैना आणि कबुतर
लगबग चिमण्यांची

डेरदार त्या वृक्षावरती
घर आणिक शाळा
सकाळ सायंकाळी भरतो
प्क्ष्यांचा मेळा

कावळा मास्तर शाळेमध्ये
पोर चिमणा-चिमणी
कावळा शिकवी धडे-कविता
मुले गाती गाणी

किलबिल किलबिल किती तयांची
आसमंत दाट्तो
मैना गाइ सुरेल गाणे
पोपट तो नाचतो

अवतीभवती मनुष्यप्राणी
लोभी हलकट
मारामारी आणि भांडणे
नुसता हवरट

स्वार्थापायी या अधमाने
कुर्हाड हो आणलि
घर आणिक शाळा त्यांची
झरझर हो तोडली

घिरट्या घालीत होते पक्षी
घर हरवले कोठे
आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या
आसमंत दाटे

किलबिल किलबिल हरवून गेली
सुने सुने झाले
माझी पाखरे माझे पक्षी
दूर उडून गेले

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

30 Jul 2008 - 4:08 pm | आनंदयात्री

आवडली !

मिसळपाव's picture

30 Jul 2008 - 4:10 pm | मिसळपाव

'...माझी पाखरे माझे पक्षी
दूर उडून गेल....''
या ओळींमुळे, 'माझी पाखरे' नावामुळे हे नुसतं वर्णन न वाटता खरोखरंच कवीचा कळवळा जाणवतो.

सहज's picture

30 Jul 2008 - 4:16 pm | सहज

नुकतेच आमच्या शेजारील गर्द झाडी पाडून एक नवे संकुल उभे रहात आहे. गुगल अर्थ मधुन पहीले असता गर्द हिरवा दिसणारा तो पट्टा एकदम बोडका झाला.
गेले आठवडाभर संध्याकाळी घरात बरेच पतंग/फुलपाखरु, वेगळेच रंगीत किडे दिसले बहुदा तिथुनच विस्थापीत झालेलेच असावेत.
खूप वाईट वाटले.

ही कविता त्यांची कहाणी सांगून गेली असे वाटले.

प्राजु's picture

30 Jul 2008 - 7:16 pm | प्राजु

कवितेतून कथा छान मांडली आहे.
किलबिल किलबिल पक्षी बोलती गाण्याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jul 2008 - 1:34 am | llपुण्याचे पेशवेll

बाकि तू कुठले झाड तुटताना पाहीलेस गड्या.
पुण्याचे पेशवे

धनंजय's picture

31 Jul 2008 - 2:47 am | धनंजय

बळेच जोडल्या आहेत असे वाटले.

पहिली चार कडवी स्वतंत्र आवडली. पुढची चार कडवी स्वतंत्र आवडली.