आर्थीक घोटाळ्यांचे/गैरव्यवहारांचे अर्थशास्त्रीय समर्थन होऊ शकते ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
28 May 2014 - 11:55 am

भ्रष्ट आचरण म्हणजे भ्रष्टाचार ह्या शब्दात पथभ्रष्ट म्हणजे आदर्श अथवा नैतीक मार्गापासून ढळलेला असा एक अर्थ पुर्वी गृहीत असावा. त्यामुळे मुळ शब्दाचा अर्थ सब्जेक्टीव्ह, अधिक व्यापकपणे वापरता येईल असा असावा पण शब्दांच्या अर्थछटा काळानुरूप बदलत जातात तसे इतर अर्थछटा मागेपडून आर्थीक गैरव्यवहार ही अर्थछटा अधिक पुढे येते आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नैतीकता या दृष्टीने या शब्दाचे प्रयोजन या विषयावर एक वेगळा लेख होऊ शकेल तो येत्या काळात सवडीनुसार लिहिण्याचा बेत आहेच). प्रस्तुत लेखात भ्रष्टाचार (आर्थीक गैरव्य्वहार) हा विषय, नैतीकता हा मुद्दा तुर्तास बाजूला ठेऊन अभ्यासण्याची इच्छा आहे.

जपान सारख्या देशातही भ्रष्टाचार आहे म्हणजे तो विकासात अडथळा नाही असा मुद्दा मांडण्याचा एक प्रयत्न काही वेळा दिसून येतो. याताला तर्कदोष असाकी उत्पादन झाले तर निर्यात होईल जिथे उत्पादनच नाही तीथे निर्यात कशी वाढेल ? जर एखादा रस्ता बांधल्याचे दाखवून त्यावर प्रत्यक्षात रस्त्याच्या बांधकामावर खर्चच झाला नसेल अथवा रस्ता नीट बांधला नसेल तर एखाद्या गावाच्या आर्थीक विकासास खीळ बसू शकते या अर्थाने भ्रष्टाचार झाला तरी आर्थीक विकास होऊ शकतो हा मुद्दा अंशतः खोडला जातो. भ्रष्टाचाराने आर्थीक विकासाचे प्राधान्यक्रम बदलून जातात गुंतवणूक आणि उत्पादना एवजी तात्काळ उपभोगाच्या चूकीच्या दिशेने चलनाचा प्रवास होतो, किंमतवृद्धी होते, काही झालेचतर महागाईस कारणीभूत होऊ शकतो.

भ्रष्टाचाराच्या दुसर्‍या समर्थनाचा गट आवश्यकतावादाच्या स्वरुपात पुढे येतो, इथे कार्य/खरेदीचे निर्णय घेणार्‍याने स्वतःच्या व्यक्तीगत आर्थीक उत्पनाच्या मर्यादेची अपरीहार्यता मांडलीतर वस्तुतः समर्थनीय होत नाही. पण अशा माणसांकडून आपले न्याय्य इप्सित काम करून घेताना साम ने जमले नाही तर अपरिहार्य असल्यास दाम देणे बरेचजण योग्य/अपरिहार्य मानून स्विकारतात. अर्थात अबकडला तुम्ही चुकीची सवय लावत आहात हा आक्षेप येथे शिल्लक असतोच. इप्सित काम केवळ स्वतःचा आर्थीक फायदा पाहणारे असेल तर अजिबातच समर्थनीय होत नाही. जिथ पर्यंत कायद्याचा संबंध आहे तुम्ही तुमचे न्याय्य काम करून घेण्यासाठी पैसे देत आहात का स्वतःचा व्यक्तीगत स्वार्थ साधण्यासाठी यात फरक करणे सहसा कायद्यास अवघड असते. इन एनी केस, आर्थीक घोटाळ्यांचे/गैरव्यवहारांचे अर्थशास्त्रीय समर्थन होऊ शकत नाही.

अर्थकारणविचार

प्रतिक्रिया

अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे उदा. भ्रष्टाचार न केल्यास अर्थशास्त्राच्या तत्वांचे उल्लंघन होइल अशा अर्थी अपेक्षित आहे का? पण तसे असेल तर भ्रष्टाचार हेच एक अर्थशास्त्रीय तत्त्व बनल्यासारखे होइल.
इतर समर्थन वि. अर्थशास्त्रीय समर्थन असे अपेक्षित आहे का? अर्थशास्त्रीय समर्थन म्हणजे काय म्हणायचे आहे ते नीट कळत नाहिये.अजून एक लेख येणार आहे का?

आत्मशून्य's picture

28 May 2014 - 12:12 pm | आत्मशून्य

त्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन होते ज्याला व्यापक जनाधार लाभतो. कायदा तेथे काहीही विषेश प्रभावीत करु शकत नाही. उदा. पायरसी... वगैरी वगैरे. आता अशा विवीध गोष्टींना जनाधार नेमका का लाभतो याची सामाजीक व आर्थीक कारणे व परिणाम अभ्यासुनच आपल्या प्रश्नावर अचुक मत व्यक्त करता येउ शकते पण अर्थातच... मोघपणे बोलायचे तर उत्तर परिस्थीतीनुसार इतकेच आहे.