इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या, व वरवर पाहता विस्कळित, असंबंधित भासणाऱ्या घटनां असून, त्यामागे काही योजनेचे सूत्र असते; म्हणजे ह्या घटनांत एक साचा, आकृतिबंध (पॅटर्न) असतो; इतिहासात उलगडत जाणाऱ्या ह्या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो हा आकृतिबंध समजून घेण्यानेच, आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तींमुळे जो भविष्य वर्तमानातून अटळपणे उद्भवणार आहे, तो भविष्यकाळ ह्या साऱ्यांचे आकलन होऊ शकते”
(संदर्भ: मराठी विश्वकोश)
"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.
हे वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या गेल्या ५-६ वर्षात दिसून आलेल्या महागाई, भ्रष्टाचार, अराजकतेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते, जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले. जर्मनीला वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली, सोबत जोसेफ गोबेल्सचा झंजावाती प्रचार होताच (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर हा नं २ चा नेता ), नंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर ती हिटलरची त्सुनामी होती असे आपण म्हणू), यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या शिस्तबद्ध सेमी मिलिटरी संघटनेची व संघटनेच्या स्वयंसेवकांची मदत मिळाली (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर...जाऊ दे, नाव नाही घेत ), यावरुन हे लक्षात यावे. हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा कोणत्या मुद्द्यावर तो निवडून आलेला होत ते पहा
- लाखो लोकांची बेकारी (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर भारतात जवळजवळ १० टक्का) )
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील हास्यास्पद पत (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर १ डॉलर = ६५ रु (गेल्या काही महिन्यातील ) )
अर्थात ज्यूंवरचे अत्याचार व गॅसचेंबर्समधील अमानवीपणा या पशूपेक्षाही हीन पातळीवरच्या योजनांनी हिटलरच्या आत लपलेल्या राक्षसाचेच दर्शन घडते. (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर तो हिटलरचा हिडन अजेंडा होता असे आपण म्हणू)
हिटलर का ये इतिहास आज भी हमारे लिए बहुत अर्थ रखता है. इसलिए नहीं कि इतिहास हमेश कोई ना कोई सबक़ देता है बल्किन इसलिए क्योंकि इतिहास से हमें चेतावनी भी मिलती है. आर्थिक संकट में लाखों लोगों ने एक ऐसे व्यक्ति को अपना नेता मान लिया जो केवल इसलिए करिश्माई बन गया क्योंकि वो लोगों के डर, उनकी आशा और अपनी परेशानियों के लिए दूसरों को ज़िम्मेदार ठहराने की आदत का लाभ उठाना जानता था.
लेकिन लाखों लोगों को इसके गंभीर परिणाम भुगतने पड़े.------( रेफ: आर्टिकल 'मामूली आदमी से तानाशाह तक हिटलर का सफर' लॉरेंस रीस (इतिहासकार))
प्रतिक्रिया
22 May 2014 - 6:14 pm | सुबोध खरे
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचे भाषांतर वाचल्यासारखे वाटले.
असो आपण ज्या रंगाचा चष्मा लावला जग तसेच दिसते
23 May 2014 - 4:32 pm | विनोद१८
*lol* *lol*
हा मणिशंकरने हळुवारपणे घेतलेल्या चाव्यापासून झालेल्या जंतुसंसर्गाचा परिणाम असावा असे वाटते...दुसरे काय ???
22 May 2014 - 6:20 pm | तिमा
कोणाचीही राजकीय मते काहीही असू शकतात, पण नव्या सरकारचा अजून जन्मही झाला नाहीये. त्यांना निदान काम तरी करु दे, तेवढी तरी वाट बघण्याचे सौजन्य दाखवावे अशी अपेक्षा.
22 May 2014 - 6:31 pm | आदूबाळ
बराच वेळ विचार करत होतो हे काय असावं. मग "धी टाईम्स ऑफ ईंडिया", "सटैंडरड वैकुअम ओयल कंपनी" वगैरेची आठवण झाली आणि "ऐस ऐस"चं कोडं ऐसेच सुटलं.
22 May 2014 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाय हो !
पगला साय्बांना भौतेक मड्डमनी किंवा शैजाद्यानं कायपण म्हटलं की "एस, एस" म्हणणारी गुलामांची फौज असं म्हणायचं असेल.
22 May 2014 - 6:34 pm | हाडक्या
तिमा +१ ..
ह्ये नुस्तं ट्यारपी वडायला बगतंय आसं वाटतय बगा.. काय बी प्रतिक्रिया द्यायची गरज नाय.
(अवांतरः साम्य दाखवणार्यानी हिटलरचे पहिल्या दहा वर्षातील देश उभारणीतील काम, त्याच्या त्या काळातील अद्वितीय प्रशासकिय व्यवस्थेची निर्मिती आणि मोडकळीस आलेल्या देशाला पुन्हा प्रगतीशील अर्थव्यवस्था बनवण्यातील त्याचे योगदान या बाबी देखील अभ्यासल्या असतील असे समजतो..
हिटलरने जे काही केले ते निंद्य अगदी वाईट वाईट असले तरी पण त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास न करता फक्त असली उथळ तुलना करण्यासाठी केलेला वापर पाहूपाकीव कराविशी वाटली. )
22 May 2014 - 6:37 pm | शिद
कहना क्या चाहते हो पगले?
22 May 2014 - 6:47 pm | शिद
वरचेवर हे घेत चला म्हणजे होणारी जळजळ थांबेल.
23 May 2014 - 4:30 pm | जेम्स बॉन्ड ००७
हिरवं द्या त्यांना
22 May 2014 - 6:38 pm | विकास
देशात सर्वप्रकाराचे भेद जागृत ठेवणारे काँग्रेस अथवा त्याच प्रकारातील (+ नक्षलवादी, काश्मीर अतिरेकी समर्थक) असलेले आप यांचा धुव्वा उडालेला आहे. त्यामुळे हिटलरी वृत्ती नामोशेष झालेली आहे. त्या व्यतिरीक्त, "हा हंत हंत गज नलिन्युच्चहार" (अर्थात "कमळाने हत्तीचा पाडाव केला") घडले आहे, जी निवडणुका आणि भारतीय राजकारणात आश्वासक अशी घटना आहे.
आता "सबका साथ सबका विकास" म्हणणारे नेतृत्व आणि विचारसरणी राज्यावर आली आहे. थोडक्यात काळजी नसावी. बर्याचदा "आपल्याला माहीत नाही हेच आपल्याला माहीत नसते" असे होते... अथवा कळले तरी वळणे तर त्याहूनही अवघड असते... तेंव्हा अगदीच फार त्रास होत असेल काळजी वाटत असेल तर हे अवश्य आणि हवे तितके घ्यावेत.
23 May 2014 - 12:38 am | राही
अवतरण (जर मुळाबरहुकूम द्यायचे असेल तर) थोडी चुकले आहे. अर्थ तर उलटच घेतला आहे.
पूर्ण श्लोक असा आहे : रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् | भास्वान् उदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री: | इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे | हा हन्त, हन्त नलिनीं गज उज्जहार || अर्थ : कमलकोशात शिरलेला भुंगा असा विचार करीत होता की रात्र निघून जाईल, प्रभात होईल, सूर्य उगवेल, कमळे फुलतील, (आणि आपली सुटका होईल.) पण अरेरे ! तो असा विचार करीत असतानाच हत्तीने ती कमलवेल उपटून टाकली.
अर्थात या श्लोकावरून वेगळे वचन बनवले असेल तर गोष्ट निराळी.
23 May 2014 - 6:47 am | विकास
मुद्दामच उलटे लिहीले होते... या निवडणुकीत कमळाने (भाजपाने) हत्तीला (बसपाला) उडवून लावले म्हणून :)
22 May 2014 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
नमो लाटेचे साईड ईफेक्ट
22 May 2014 - 6:48 pm | धन्या
पगला गया का गजोधरभईया?
22 May 2014 - 6:59 pm | प्रसाद प्रसाद
"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.
ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे.
अवांतर - कुठलेतरी संदर्भ कुठेतरी जोडणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
22 May 2014 - 7:36 pm | आदूबाळ
ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं भाषांतर आहे. कानिटकर तरी काय करतील बिचारे?
23 May 2014 - 1:40 pm | प्रसाद प्रसाद
ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं भाषांतर आहे. कानिटकर तरी काय करतील बिचारे?
नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक विल्यम शिररच्या कोणत्याही पुस्तकाचं एकटाकी भाषांतर नाही आहे. पुस्तकाची प्रस्तावना वाचून जे काही यासंबंधी कळते ते असे नाझी भस्मासुराचा उदयास्त वि. ग. कानिटकर- राजहंस प्रकाशन 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही लेखमाला 'माणूस' नियतकालातून जून १९६४ पासून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्याचे हे पुस्तकरूप.
त्याचबरोबर पुस्तकाच्या यशाचा वाटा लेखक विल्यम शिरर, अॅलन बुलॉक, विन्स्टन चर्चिल आणि आणखी दोघा तिघांना प्रस्तावनेत देतो. ह्या लोकांच्या विचारांचा प्रभाव लेखकावर आहे हे स्पष्ट आहे, पण पुस्तक भाषांतरीत नाही आहे. पुस्तकातले विचार वि. ग. कानिटकर यांचेच आहेत हे स्पष्ट आहे.
23 May 2014 - 9:59 am | llपुण्याचे पेशवेll
ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे.
ज्यू कत्तलींचे समर्थन हा उद्देश नाही पण त्या रोषाला ज्यू कारणीभूत नसतीलच असेही नाही. अशीच ज्यू कत्तल २० व्या शतकाच्या सुरुवातीस रशियामधे झाली होती. त्यास पोग्रॉम असे म्हणतात. अशा ज्यू कत्तली युरोपात अन्य ठीकाणीही होऊन गेल्या. मिपावरील एका चर्चेत अरेबियन नाईटसच्या अल्लदिनच्या कथेत बनेल ज्यू व्यापारारी आणि भला अरबी व्यापारी अशी तुलना पण केलेली दिसते. कदाचित ज्यूंचे वर्चस्व वेगवेगळ्या वेळेला वेगवेअळ्या लोकांना असह्य होऊन त्यांनी ज्यूंची कत्तल केली. अर्थात आश्चर्य याचे वाटते की तरीही ज्यू लोक अजूनही जगामधे अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवून आहेत.
बाकी अर्थातच चालूद्या.
25 May 2014 - 9:00 am | असंका
म्हणजे " कदाचित ज्यू लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली असेल.हा विषय आता संपला. बाकी कुठ्ल्या विषयावर बोला" असं म्हणायचं आहे का?
फक्त इथल्या वाचकांच्या ज्ञानासाठी आपल्या मौल्यवान वेळेतून थोडा आणखी वेळ काढून, एकच सांगा - दुसर्या महायुद्धात किती ज्यू नागरीक मारले गेले? माहित असेलच आपल्याला. त्याशिवाय का इतक्या अधिकारवाणीने आपण वरचा निकाल दिलात...त्यामुळे शोधाशोध न करता हा आकडा सांगा ही विनंती. वाट्ल्यास एका मर्यादेत सांगा, म्ह्णजे १०-२०, १००-२०० वगैरे.
(सहसा मी खोड्कर प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून स्वस्थ बसतो. पण ज्यू लोकांचे हत्याकांड हा माणुसकीवरचा इतका मोठा डाग आहे, की जगण्यावरचा विश्वास उडावा....केवळ त्यामुळे आपल्याला मी हा प्रश्न विचारायचं धाडस केलं आहे. )
29 May 2014 - 2:25 pm | बॅटमॅन
ज्यूंचा कसलाही दोष नव्हता. उगीच त्यांच्या कत्तलीचे समर्थन करू नका. दुसर्या महायुद्धात हिटलरने एकट्यानेच ६० लाख ज्यू मारले. अजूनही कैक लोक मेले.
22 May 2014 - 7:16 pm | आत्मशून्य
हु आर यु ?
22 May 2014 - 7:35 pm | मुक्त विहारि
ह्या बाबतीत "एकमत".
ड्युड, हु आर यु?
22 May 2014 - 7:40 pm | विकास
या निवडणुकीत पडलेल्यांच्या "ऐस ऐस" संघटनेतील स्वयंसेवक असावेत. म्हणून अचानक असले आयडी उगवतात आणि लपून छ्पून लिहीत बसतात! ;)
23 May 2014 - 8:32 am | आत्मशून्य
पण आपली सहमतिअसहमती मजला द्खलपात्र नाही हे नम्रपणे बोल्ड करतो.
22 May 2014 - 7:42 pm | बाबा पाटील
आम्ही भारतीय जरा सनकी आहोत.उठ सुठ कधीही कुनाच्याही मागे अविचाराने पळत नाही.जस डोक्यावर घेवुन नाचतो ना तस वेळ आली की पार डोक्यावरुन टाकतो पण शिवाय आमची आर्मी उठ सुठ दिला पंतप्रधानाने किंवा जनरलने आदेश म्हणुन घेतला देश ताब्यात असा काही प्रकार करत नाही.जर वरिष्ठ अधिकारी देशविघातक आदेश देत असेल तर त्याला स्पष्ठ शब्दात इथला शिपाईगडीपण नकार देतो.त्यामुळे इथे तुमचा हिटलर जन्म घेइल असला काय विचार करुन स्वतःच नाव सार्थक करु नका.
22 May 2014 - 7:50 pm | मुक्त विहारि
जबरा प्रतिसाद.
22 May 2014 - 7:54 pm | हुप्प्या
हिटलर शनिवारी जन्मला. हा नराधम शनिवारी जन्माला आला. आजच्या काळाचा संदर्भ, भारताचा आजचा नेता रविवारी जन्मला. म्हणजे एक पाऊल पुढे! म्हणजे हा हिटलरच्याही दशांगुळे वर असणार की काय?
हिटलरला त्याची ती खास नाकाखाली असणारी मिशी होती. त्यामुळेच त्याला असे अत्याचार करायचा मोह झाला. आजच्या काळाचा संदर्भ, आज जो भारतीय नेता म्हणून मिरवतो आहे त्याला तर पूर्ण मिशी आणि दाढी आहे, तीही पांढरी स्वच्छ! म्हणजे हिटलरच्याही दोन पावले पुढे!
हिटलरने बंड केले आणि त्याला तुरुंगात डांबले होते. तिथे त्याने माईन काम्फ (माझा संघर्ष) असे आत्मचरित्र लिहिले. भारताचा भस्मासूर ना तुरुंगात गेला ना आत्मचरित्र लिहिले. म्हणजे आपले नीच उद्दीष्ट गुप्त ठेवण्यात हिटलरच्या दोन पावले पुढेच!
शिवाय हिटलरला दोन डोळे होते, दोन हात होते, दोन पाय होते, दोन कान होते. आता हे सगळे भारताच्या सर्वोच्चपदी बसलेल्या राक्षसालाही आहेत हे एखाद्या दूधखुळ्यालाही कळेल!
तर अनेक बाबतीत हिटलरशी साम्य तर अनेक बाबतीत हिटलरच्या पुढे असणार्या ह्या नेत्याकडे बघून आम्हाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. लवकरच जग सोडून अन्यत्र जावे म्हणतो!
अस्तु अस्तु!
22 May 2014 - 8:03 pm | बबन ताम्बे
अजून काही साम्ये !! सही प्रतिक्रिया!
हिटलरची एक प्रेयसी होती - इव्हा ब्राऊन. यांची कोणीच नाही. म्हणजे अजून एक पाऊल पुढे ?
23 May 2014 - 5:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
जब्राट!!!
23 May 2014 - 4:33 pm | जेम्स बॉन्ड ००७
*ROFL*
29 May 2014 - 2:20 pm | हरकाम्या
तुम्ही कमालखान्चे अनुकरण करायला काहीच हरकत नही. तोही असाच भारत सोडुन गेला
22 May 2014 - 7:57 pm | आनन्दा
मला असे वाटते की ते आपले नाव सार्थ करत आहेत], तेव्हा शहाण्यांनी त्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य.
22 May 2014 - 8:18 pm | आनन्दा
असो. असाच उत्साह पुढची ५ वर्षे टिकवा म्हणजे झाले..
22 May 2014 - 7:58 pm | विवेकपटाईत
राग मानू नका पण गजोधार साहेब, तुम्हाला मोदी आणि गुजरात बाबत काहीच माहित नसावी किंवा कळत असूनही वळत नाही वाली गत आहे. जो व्यक्ती सर्वाना घेऊन चालतो. जिथे अल्पसंख्यक देशात सर्वात जास्त सुरक्षित आहे. (प. उत्तर प्रदेशच्या अल्पसंख्यकाना विचारा दिवसासुद्धा ते सुरुक्षित नाही, नेताजींची कृपा )(मे महिन्यात एक आठवडा मी त्या भागातल्या एका गावात होतो माझ्या माहिती प्रमाणे त्यांनी ही मोदींच्या नावावर मतदान मोठ्याप्रमाणात केले आहे.(३०-५०% टक्के पर्यंत) गाजियाबाद येथे तर सर्वांची जमानत जब्त झाली. अल्पसंख्यकानी सर्वात जास्त प्रगती गेल्या १२ वर्षात गुजरात मध्ये केली आहे. पोलीस दलात ही सर्वात जास्त अल्पसंख्यक गुजरात मधेच भर्ती झाले आहे (मोदींच्या राज्यात). अल्पसंख्यक मंत्रालयाने सुद्धा१५ सूत्री कार्यक्रम चांगल्या रीतीने राबविल्याने गुजरात ची स्तुती केली आहे. शिवाय अल्पसंख्यक लोकांना वाचविण्या सर्वात जास्त दंगेखोरांना गुजरात पोलीसने कंठस्नान घातले आहे (विश्वास नसेल तर RTI टाकून सर्व राज्यातल्या दंग्यांची आणि पोलीस कार्यवाही ची माहिती मागवून घ्या, निश्चित डोळ्यांत अंजन पडेल)
22 May 2014 - 8:12 pm | असंका
निकालानंतर मिसळपाववर एक विशिष्ट गोष्ट जाणवते आहे. लक्षात येतेय का बघा....इथे विरोध होत नाहीये तुमच्या बोलण्याला.
असं का असावं हा प्रश्न नाही पडत तुम्हाला?
22 May 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी
कशाला उगाच ताकाला जाऊन भांडे लपविता? शीर्षकात स्पष्टपणे "मोदी भस्मासुराचा उदयास्त" असे लिहायला हरकत नव्हती.
22 May 2014 - 9:05 pm | विकास
मला वाटते ते राहूल अथवा केजरीवालांच्या बाबतीत म्हणत असतील. कारण मोदींचा अजून तरी उदयच होत आहे. बा़इ दोन पात्रांचा उदय पण होऊन गेला आणि अस्त देखील झाला! ;)
22 May 2014 - 9:52 pm | आजानुकर्ण
गजोधरशेठ,
गुजरातेत दंगल झाली म्हणून भारतातही तसेच होईल असे नाही. दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.
22 May 2014 - 10:00 pm | मुक्त विहारि
तेंव्हातरी बोलतील की नाही कुणास ठावूक.
मुझफ्फर दंगल आणि आझाद मैदान दंगल ह्या दोन्ही साक्ष आहेत.
22 May 2014 - 10:06 pm | आजानुकर्ण
सहमत. मात्र बोलताना पुरावे हवेत. अन्यथा कोर्टात खटले टिकणार नाहीत.
22 May 2014 - 10:14 pm | विकास
१९६९ साली काँग्रेसच्या राज्यात दंगलींना सुरवात झाली. असे म्हणले जाते की तो टर्निंग पॉइंट होता. आता असे म्हणता येऊ शकते की असले अंतर्गत विभाजन हे काही न करता सत्ता आबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. १९८४ -८५ च्या शिख दंगलींनी मात्र निचांक गाठला असे म्हणावेसे वाटते. गुजरातेत हे अगदी मोदी मुख्यमंत्री झाले त्याकाळापर्यंत म्हणजे अगदी ते मुख्यमंत्री आल्यानंतर २ महीने चालू राहीले. पण नंतर गेल्या १२ वर्षात गुजरातमधे नुसत्या दंगलीच झाल्या नाहीत असे नाही तर काँग्रेस तीन निवडणुका हरली...
थोडक्यात जे काही १९६९ ला चालू झाले होते ते मोदी राज्यात पूर्ण बंद झाले. तेंव्हा काही काळजी करू नका.
22 May 2014 - 10:23 pm | आजानुकर्ण
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे. शिवाय शीख समुदायाविरोधात काँग्रेसची वर्षानुवर्षे चालू असलेल्या कारवाया ममोसिंगासारख्या बाहुल्याला पंतप्रधानपदावर बसवून कमी होणाऱ्या नाहीत.
अच्छे दिन आने वाले हय त्यामुळे काळजी नाहीच.
22 May 2014 - 10:36 pm | विकास
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे.
अच्छा म्हणजे ३०००+ शिखांना भारतभर मारले गेले ह्या पेक्षा त्यामुळे गुजरात दंगलींचे गांभिर्य कमी झाले याचे तुम्हाला दु:ख आहे. छान छान!
बाकी गेल्या दहा वर्षात काँग्रेसने पंतप्रधानपदाचे पोतेरे केले खरे, पण मनमोहनसिंगांनी स्वतः निवृत्त होत असताना अनेक ठिकाणी अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, काँग्रेसला बुडवून एका अर्थी सूड उगवला असेच म्हणावे का काय कळत नाही!
22 May 2014 - 11:00 pm | आजानुकर्ण
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या.
काय सांगता? मला वाटले होते की दंगली या एखाद्या धर्माच्या अनुयायांविरुद्ध उमटलेली संतप्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया असते व सत्ताधारी दंगली घडवून आणत नाहीत.
22 May 2014 - 11:18 pm | विकास
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या.
समर्थन कोणीच केले नाही. पण गुजरात दंगलीचा गैरवापर मात्र डाव्यांनी, काँग्रेसने आणि स्युडोसेक्यूलर विचारवंतांनी केला. टिस्टा सारख्या बाईने तर त्याचा गैरवापर पैसे हडप करण्यासाठी देखील केला अशी तक्रार आहे. गुजरात दंगलीनंतर जितक्या त्वरीत कारवाई मोदी सरकारने करण्याचा प्रयत्न केला तिच्या एक दशांश कारवाई देखील शिख हत्याकांडाच्या वेळेस केली गेली नाही. त्यातले प्रमुख आरोपी हे उजळ माथ्याने काँग्रेसचे खासदार झाले. आयोगांवर आयोग चालू राहीले... त्या ऐवजी गुजरातमधल्या दंगलीत सुप्रिम कोर्टापर्यंत सर्वांनी आयोग स्थापले त्यांचे निकाल देखील लागले. कदाचीत मोदी हे पहीले मुख्यमंत्री असतील जे स्वतः चौकशीला सामोरे गेले. इतर वेळेस एकाही मुख्यमंत्र्यास सामोरे जावे लागले नाही. अगदी ९२/९३च्या मुंबई दंगलीत देखील नाकर्तेपणाबद्दल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यास (मला वाटते सुधाकरराव नाईक होते) सामोरे जावे लागले नाही. तेंव्हा समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. पण मोदी-भाजप-संघ विरोधकांनी त्याचा गेली १२ वर्षे बदनामी करण्यासाठी गैरवापर केला ही वस्तुस्थिती आहे, इतकेच.
22 May 2014 - 11:21 pm | आजानुकर्ण
मीदेखील हेच म्हटले होते. दंगली झाल्यानंतर चर्चा करता येईल. दिल्लीत शीखविरोधी किंवा गुजरातेत मुसलमानविरोधी दंगल झाली म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात होईलच असे नाही.
23 May 2014 - 3:10 pm | प्रसाद१९७१
मुळात शीख विरोधी दंगल आणि मुसलमान विरोधी दंगल ह्या एकाच पारड्यात तोलणे ही मोठी चुक आहे, कारण तसे करुन शीख आणि मुसलमान एकाच पारड्यात तोलता आहात.
हा शीख लोकांवर मोठा अन्याय आहे.
22 May 2014 - 11:05 pm | अनुप ढेरे
हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का?
22 May 2014 - 11:10 pm | आजानुकर्ण
हो.
(Explain the sarcasm and ruin it!!)
22 May 2014 - 11:20 pm | विकास
हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का?
अर्थातच! तुम्हाला माहीत नाही का की राहूल गांधी मंत्रीमंडळात नसूनही काही वाट्टेल ते बोलले तर मनमोहनसिंग त्यांना कसे सुनवायचे ते? ते कसे काय बाहुले म्हणता तुम्ही?
22 May 2014 - 10:09 pm | तुमचा अभिषेक
कल्पक लक्षवेधक दिलखेचक लेख !
22 May 2014 - 10:42 pm | पैसा
22 May 2014 - 10:53 pm | विकास
"निकालानंतर सुपातले सगळेच जात्यात गेले", असे काहीसे म्हणायचे आहे का आपल्याला?
22 May 2014 - 10:53 pm | असंका
पीठ निघायला धान्य आणि दगड यांच्यात घर्षण व्हायला हवे....इथे वरती नावाला तरी घर्षण आहे का? एक बाजू बोलत सुटली आहे...त्यांना एकाने तरी प्रत्युत्तर दिले आहे का?
असं का असावं?
22 May 2014 - 11:16 pm | पैसा
आधीच निवडणुका म्हैनाभर चालू होत्या. मग निकाल लागले. आता पुढच्या निदान विधानसभा निवडणुका येईपर्यंत तरी दम खावा राव! पब्ळिक कट्टाळलय राजकारणाबद्दल ऐकून!
22 May 2014 - 11:23 pm | विकास
कंटाळा आला हे खरे आहे हो. पण निकाल पचायला अवघड जात आहे. त्यामुळे पोटशूळ खूपच गंभीर आहे या वेळचा. त्यामुळे आजार पटकन बरा होईल असे समजू नका!
23 May 2014 - 12:34 am | निनाद मुक्काम प...
आल्याकी दिल्लीच्या निवडणुका
झाडू वाल्यांच्या अंगात येईल आता
23 May 2014 - 8:56 am | आनन्दिता
अंगात येईल.... आईशप्पथ!! एकदम परफेक्ट शब्द वापरलात या झाडूवाल्यांना... नौटंकी, वगैरे शब्द अगदी थिटे पडत होते आजकालचं त्यांचं वागणं बघुन.
23 May 2014 - 10:04 am | llपुण्याचे पेशवेll
टूडे ग्रुपच्या सो सॉरी मधला झाडू डान्स लई गाजला. पाहीला आहे का?
23 May 2014 - 12:32 am | निनाद मुक्काम प...
मला एक भीती वाटत आहे ,
समजा पगला गजोधर म्हणतात तसे भारतात झाले व कुणी त्यांच्या हितचिंतकाने त्याचे हे लिखाण संबंधीत यंत्रणेकडे नेले तर
चेंबर मध्ये त्यांचा नंबर लागायचा.
आता भारतात मुंबईत महानगर पालिकेच्या कृपेने जी उघडी गटारे असतात ती काही चेंबर हून कमी खतरनाक नसतात.
म्हणा,
संजय गांधी ह्यांनी उत्तर प्रदेश मध्ये नसबंदी असो किंवा अजून काही
ज्या पद्धतीने योजना राबविल्या ते पाहता भस्मासुराचा उदय झाला अशी आवई उठे पर्यंत त्यांचा उदयास्त झाला.
इदिरा इज इंडिया म्हणणारे व आणीबाणी लादणारे सुद्धा ह्याच देशात होऊन गेले ,
23 May 2014 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पगलाई गये हो का गजोधर भैय्या? कल भांग जादा पी ली का?
हिटलर आणि अस्तंगत झालेल्या पार्टीची पण तुलना करु की आता मग.
१. ज्यांच्या हातात आत्ता सत्ता आली आहे आणि ज्यांच्याकडुन जास्त चांगली कामं झाली आहेत ते हिटलर का वर्षानुवर्ष जाती-धर्मात सेक्यलरतेच्या नावाखाली संघर्ष घडवुन आणणारे हिटलर?
२. हिटलरनी खुलेआम ज्युंची कत्तल केली आणि भारतीय हिटलरनी ६० एक वर्ष रक्त शोषलं भारतीय जनतेचं. काँग्रेस पेक्षा हिटलर लाख पटीनी चांगला होता काही बाबतीत. जसं की योजनाबद्ध नियोजन. ढिसाळपणाला अजिबात वाव नसणं ईत्यादी.
३. हिटलरचा देशाभिमान कुठे आणि ह्यांची देश विकुन खायची वृत्ती कुठे? हिटलरला स्विस जवळ असुन स्विस बँकेत काळा पैसा ठेवल्याचं ऐकीवात आहे का? नाहीतर आमच्याकडे लाखाचे हजारो कोटी करणारे जावई आहेतचं. "साधी राहणी हुच्च विचारसरणी" वाल्या हिप्पोक्रीट लोकांना कुठलही घटनात्मक पद नसताना खासगी वापरासाठी एअर फोर्सच्या विमानाची गरजं का पडते हो? जाल तिथे ह्या गां* लोकांच्या नावानी योजना, यंव गां* आवास योजना, त्यंव गां* रोजगार हमी योजना. बरं योजना आहेत म्हणाव तर तिथे येवढ्या कागदाच्या सुरऴ्या करायला लागतात की लाभार्थींना कागदाच्या सुरळ्यांसाठी वेगळं कर्ज काढायची वेळ यावी. कोणं बरा म्हणायचा मग? हिटलर का हे खादाडखाउ **खाव लोकं?**
४. आमच्या सैनिकांची शिरं कापली जातात मृतदेहांची विटंबना केली जाते ती पण आपल्या हद्दीत येऊन. आपल्या 'मुक'नायकानी निषेधाचे खलिते पाठवण्याशिवाय काय केलं? हिटलर त्याच्या सैन्याच्या हिताच्या द्रुष्टीनी निर्णय घ्यायचा. सैनिकांमधे त्यांच्यातलाच एक होऊन वावरायचा. आमच्याकडे संसदेवर हल्ला झाला तेव्हा मरणारे कोण होते? फक्त सैनिक शहिद झाले. "खाते" मंडळी आतमधे सुरक्षित होती. एकाच्याही अंगावर साधा ओरखडाही निघाला नाही. मुंबई हल्ल्यामधे मरणारे कोण होते हो? आर्मीमन, पोलिस आणि सामान्य नागरिक फक्त. "हमे उनकी कुर्बानी पे फक्र है" हे ईंग्लिश टेक्स्ट मधे हिंदीत वाचुन दाखवणार. कसला बोडक्याचा फक्र रे? काय केलं त्यांच्या घरच्यांसाठी? किरकोळ नुकसानभरपाई दिली असेल त्यातसुद्धा "कर्तबगार" प्रशासकीय लोकांनी हात मारला असेल ह्याची खात्री आहे. असो.
५. हिटलरनी उद्योग धंद्यांना प्रोत्साहन दिलं. आज जर्मनी मेकॅनिकल आणि एकुणच टेक्नॉलॉजी जायंट्स आहेत त्यामधे दुसर्या महायुद्धाचा आणि हिटलरचा मोलाचा वाटा आहे. आमच्याकडे वाटा तर सोडाच पण वाटमारी भरपुर आहे.
ह्या हरामखोरांच्या काळात असलेल्या टॅक्सेस, किचकट नियम, सोयीसुविधांचे अभाव, चलता है वृत्ती, ह्यांच्या पक्षांच्या कामगार संघटना (सर्वपक्षिय लुटालुट) ह्यांनी उद्योजक आणि उद्योग दोन्ही डबघाईला आलयं. आपल्या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमधे का स्थलांतरीत होत आहेत? कुठलाही उद्योजक बिझनेस सिक्युअर्ड वातावरण असल्याशिवाय व्यवसाय नेईल का तिकडे? कोण स्वतःहुन सो कॉल्ड हिटलरच्या गुहेत जाईल?
दुसर्या महायुद्धकाळापासुन जर्मनीमधे किती ईन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासुन किती इन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? जर्मनीत ईन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्थलांतरीत केलेल्या लोकांना स्थलांतरीत जागेवर नोकर्या, १००% भरपाई दिली गेली. आमच्या कडे धरणग्रस्तांच्या २ पिढ्या मरुन सुद्धा अजुन विस्थापितांना नुकसान भरपाई नाही. कोणाचा दोष आहे हा? कोण सत्तेत होतं एवढी वर्ष?
शिवाय त्यांची धरणं फक्तं पाण्यानीच भरतात.
आत्ता सत्तेवर आलेल्यांना किमान १० वर्ष सलग सत्ता मिळाली तर ते बदल घडवुन आणु शकतील तेही "हिटलर शाही" नं करता. त्याला गरज आहे तुमच्या सारख्या स्युडो सेक्युलर लोकांनी डोळ्यावर लावलेले पुर्वग्रहाचे चष्मे काढायची.
23 May 2014 - 9:43 am | मुक्त विहारि
सहमत...
23 May 2014 - 10:33 am | ऋषिकेश
दोन्हीत काही साम्यस्थळे आहे हे खरे, पण दोन्ही वेळच्य परिस्थितीत काही अंतरही आहे.
बाकी लेखात काही माहिती तथ्याला सोडून आहे. (जसे ९९.९९%) हिटलरला एकट्याला बहुमतही मिळाले नव्हते. काही पक्षांचे खिचडी सरकार त्याला स्थापावे लागले होते.
24 May 2014 - 12:59 am | हुप्प्या
देवीतुल्य भारतसम्राज्ञी (बहुधा आता माजी) सोनियाजी गांधी ह्यांचे पिताश्री स्टेफ्यानो माइनो हे द्वितीय महायुद्धात हिटलरच्या वेअरमाख्टच्या बाजूने सोविएटच्या बाजूने लढले होते. ते स्वतःला मुसोलिनीच्या फाशिष्ट पार्टीचा निष्ठावान अनुयायी असे अभिमानाने मानत असत.
मोदींच्या हिटलरशी असणार्या बादरायण साम्यापेक्षा हा थेट संबंध जास्त गंमतीचा आहे हो की नाही?
24 May 2014 - 1:35 am | विकास
इंटरेस्टींग... मला हे माहीत नव्हते. पण असल्या गोष्टीवर (कुणावर अविश्वास दाखवायला म्हणून नाही पण) खात्री करण्यासाठी मला संदर्भ बघायला आवडतात. तेंव्हा आउटलूकचा हा संदर्भ दिसला. त्यातील खालील भाग इंटरेस्टींग आहे. त्यातून हिटलर समर्थकांबद्दल आउटलूकमधील (पक्षि: डाव्यांची) भुमिका देखील समजते... :)
या माहितीबद्दल धन्यवाद!
23 May 2014 - 1:43 pm | मृत्युन्जय
भारताचा हिटलर १९८४ सालीच मेला. रुडोल्फ हेस हिटलर बद्दल म्हटला होता "हिटलर इज जर्मनी, जर्मनी इज हिटलर" . बाईंबद्दलही त्यांच्या एका भक्ताने असेच उद्गार काढले होते " इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया". बाईंनी आणि त्यांच्या गुरुंनी दोघांनीही लोकशाहीचा बलात्कार केला. गुरुंनी विरोधकांना गॅस चेंबर्स मध्ये मारले तर बाई थोड्या दयाळु असल्याने त्यांनी फक्त सरसकट सगळ्यांना तुरुंगात कोंबले. भारतातल्या नाझी भस्मासुराचा उदयास्त तर कधीच झालाय हो. कशाला काळजी करताय?
23 May 2014 - 1:46 pm | प्रसाद प्रसाद
लोकं प्रतिसाद देताहेत...... भलते निष्कर्ष लेखात काढून, काडी टाकून लेखक महाशय कुठे गेलेत कुणास ठाऊक......
23 May 2014 - 4:11 pm | पगला गजोधर
इथे होतो I am here
25 May 2014 - 5:13 pm | होकाका
अहो पगला गजोधर, जर आपणांस क्रिटीकल थिंकींगची एवढी तळमळ होती, तर मग मोदींविरुद्ध २००२ ते २०१३-१४ या काळात मिडिया आणि सो कॉल्ड विचारवंत टिकेची आणि गलिच्छ शिव्यांची गरळ ओकत होते, तेव्हा आपण का नाही मोदींच्या बाजूने उभे राहिलात? तेंव्हा कुठे होती आपली टेन्थ मॅन स्टँडींग ची ड्यूटी?
की तेंव्हा आपणांस माहीतच नव्हते की आपण "भारतमातेची ऐक संतान" आहात ते?
23 May 2014 - 3:39 pm | _मनश्री_
टूडे ग्रुपच्या सो सॉरी मधला झाडू डान्स लई गाजला. पाहीला आहे का?
झाडू डान्स
http://youtu.be/dmoRsoovWOA
23 May 2014 - 8:34 pm | सुबोध खरे
पादर्याला पावट्याचे निमित्त
http://yahooindiaelections.tumblr.com/post/86589478750/congress-blames-i...
23 May 2014 - 10:21 pm | विकास
=))