भारतीय वकीलातीतला अनुभव

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
17 May 2014 - 2:38 am

विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो .
मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे . मग तिने तीच्या अंदाजाने काय कागदपत्रे लागतील ते सांगितले .इथे दुसर्या एक कंपनी (BLS )ला outsource केले आहे . म्हणजे सारख्या वकिलाती मध्ये खेपा घालाव्या लागु नयेत .कारण आम्ही राहतो तिथे बरेच भारतीय राहतात पण वकिलाती मात्र २ ते २. ३० तासांच्या अंतरावर आहे . आणि कामाची वेळ देखील सकाळी १० ते १२ फक्त.
फोन वरच्या बाईनी सांगितल्याप्रमाणे कागपत्रे घेवून शिवाय आम्हाला जी आवश्यक वाटली तीहि कागदपत्रे घेवून त्या ऑफिस मध्ये गेले . १०. १० ची वेळ दिली होती . १०. ३० ला आम्हाला विचारले गेले . कागद पाहून झाल्यावर शांतपणे म्हणाली कि तुम्हाला वकिलाती कडून affidavite आणावे लागेल . शिवाय लग्नानंतरचे नाव लावायाचे असल्याने नवरा बायकोचा एकत्र फोटो हवा तोदेखील पासपोर्ट साईझ फोटोग्राफ मध्ये. साईट वर कुठेही या गोष्टीचा उल्लेख नव्हता . शिवाय फोन वरील बाईने देखील याबद्दल काहीच माहिती दिली नव्हती .
शेवटी एक दिवस नवर्याने सुट्टी काढली . आम्ही असतील नसतील तेवढी सगळी कागदपत्र घेवून वकिलातीत थडकलो . भारतीय वकिलाती ज्या भागात आहे त्याच भागात इतर देशांच्या वकिलाती सुद्धा आहेत . पण भारतीय वकिलातीच्या इमारतीची अवस्था बघान्यासारखी होती . माझा वकिलातीला भेट देण्याचा पहिलाच प्रसंग .लहान मुलगा सोबत असल्याने तो बाबागाडीत होता . बंगलेवजा इमारत आहे पण मुख्य दरवाजा बंद . ८-१० पायर्या उतरून मागच्या बाजूने (मागच्या दरवाजाने ) प्रवेश होता . लिफ्ट किंवा स्लोप नसल्याने मुलाला उचलून घेतले आणि नवर्याने बाबागाडी उचलून खाली आणली . बरोबर १० आजता आम्ही दारात होतो , पण दार उघडले नव्हते . १०. १० ला दर उघडले . आत गेल्यावर एक छोटासा १० फुट रुंद आणि १५ फुट लांब एवढा hall होता . तिथे खुर्च्या मांडल्या होत्या .परंतु तिथून counter दिसत नव्हता . दार उघडते तिथे समोर दोन counter होते . हळूहळू करत एक एक जन आत येत होता . परतू counter वर कोणीच दिसेना . मग एक शिपाई वाटेल असा माणूस आला . त्याने सगळ्यांना एक एक करून तिथेच काय करायचे ते विचारले . मोठ्या आवाजात काहीही privacy न ठेवता . आणि एवढ विचारून साहेब येतील एवढ सांगून गायब झाला . तोपर्यंत १०. ३० झाले होते . १०.४० ला राणा नावाचा एक बडा अधिकारी आला . blazer वगैरे घालून होता आणि त्याच्या एकूण व्यक्तिमत्ववरुन हा माणूस इथला साहेब असावा आणि निदान याला सगळी माहिती असावी असे वाटले . आम्ही आपले आपला पहिला नंबर म्हणून आपल्याला पहिले विचारेल याची वाट पाहत बसलो तर तो आला कुणाकडे न बघत आपल्या केबीन मध्ये गेला . शेजारच्या एक दोघांना विचारल्यावर त्यांनी हा माणूस नक्की काम करेल असे सनगितले. मग परत त्याची वाट बघा . आता सगळी मानस त्याच्या केबिन च्या आसपास घुटमळत होती . कारण नंबर वगैरे प्रकार नाही . जो आधी नजरेस पडेल , जो आधी बोलेल त्याच काम होणार हे कळून चुकल होत . राणा साहेब केबिन मधून बाहेर पडल्यावर आधी माझ्या नवर्याने त्यांना पकडल . काय कागदपत्र हवीत नको विचारलं . सुदैवाने त्याला खरच सगळी माहिती होती . त्याने संगीतालन त्याप्रमाणे कागदपत्र तयार केली . तोपर्यंत तो बकिंच्याकडे जावून परत एकदा दुसर्या खोलीत गेला . आता सगळे जन त्या दुसर्या खोलीपाशी घुटमळायला लागले . परत तो बाहेर आला . कागदपत्रावरून नजर फिरवली . आणि नवीन document तयार करण्यासाठी त्याच्या केबिन मध्ये गेला . परत सगळ्यांचा मोर्चा त्याच्या खोलीकडे वळला . मग एकदा शेवटी affidavite झाल . मग जेव्हा त्याचे पैसे भरायची वेळ आली तेव्हा त्या दरवाजाच्या समोरच्या counter वर एक व्यक्ती आली . कार्ड पेमेंट केल . त्या राणा साहेबाला २ दा धन्यवाद म्हटलं आणि बाहेर पडलो . हे सगळ होईपर्यंत १२. ३० झाले होते .
नंतर दुसर्या दिवशी BLS च्या कार्यालयात जावून पासपोर्ट साठी फॉर्म भरला .
त्यापुढील आश्चर्य म्हणजे चक्क एका महिन्यात आला . कारण पासपोर्ट इथे प्रिंट होत नाही . त्यासाठी तो दिल्लीला पाठवतात . त्यामुळे आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती कि पासपोर्ट एवढ्या लवकर येईल . आला खरा .मात्र मधले दोन दिवस त्या वकिलातीत आणि दुसर्या BLS च्या ऑफिस मध्ये खेटे घालायला लागून खूप मनस्ताप झाला.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 May 2014 - 6:18 am | यशोधरा

परदेशात असताना माझ्या पासपोर्टची मुदत संपली होती. वकिलातीत फोन केला होता तेह्वा व्यवस्थित माहिती मिळाली होती तसेच वेबसाईटवरही व्यवस्थित माहिती होती. त्या माहिती आधारे व फोन करुन मिळालेली माहिती ह्यावरुन सांगितलेली कादगपत्रे व पासपोर्ट / अर्ज वगैरे पोस्टाने पाठवून दिले व १५ दिवसांत नवीन पासपोर्ट आलाही.

फारएन्ड's picture

17 May 2014 - 8:07 am | फारएन्ड

सॅ फ्रा. ची वकिलात पूर्वी एकदम उदास असायची. एक छोटा हॉल ई. पण गेल्या ३-४ वर्षांत बराच फरक पडला आहे. माझा अनुभव २०१० चा आहे - तेव्हा बरेच नवीन लोक आले असावे तेथे. सर्विस एकदम चांगली होती, तेथील लोक व्यवस्थित बोलून माहिती देत होते. नंबर घेण्याची सिस्टीमही चांगली होती.

नविन पासपोर्ट मिळाल्याबद्दल अभिनंदन.एँन्जाय माडी.

:-)

मुक्त विहारि's picture

17 May 2014 - 9:46 am | मुक्त विहारि

अभिनंदन...

जय गांधी, जय नेहरू....

पिवळा डांबिस's picture

17 May 2014 - 9:48 am | पिवळा डांबिस

आजवर विविध भारतीय वकिलातींमध्ये विविध कारणांसाठी पत्रव्यवहार करण्याचा प्रसंग आला आहे. जर त्यांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार जर त्यांना योग्य ती कागदपत्रे पुरवली तर काहीही त्रास न होता आवश्यक ते प्रमाणपत्र घरबसल्या हाती मिळाले आहे...
अगदी अलीकडलाच (एक महिन्यापूर्वीचा) अनुभव म्हणजे माझ्या मुलाचे ओसीआयचे नूतनीकरण त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुरवल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदर घरपोच मिळालेली आहेत...
उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!

नगरीनिरंजन's picture

17 May 2014 - 12:19 pm | नगरीनिरंजन

इथल्या भारतीय वकिलातीत अतिशय चांगली व्यवस्था होती (आऊटसोर्सिंगनंतर तिथे जाण्याची वेळ आलेली नाही.)
लोकांना बसायला चांगली जागा, टोकन सिस्टिम आणि हसतमुख कर्मचारी.
कधीही वाईट अनुभव आलेला नाही.

स्पंदना's picture

17 May 2014 - 6:43 pm | स्पंदना

गचाळ बिल्डींग, गचाळ बाग विसरलात काय हो नगरी?
त्याच रस्त्यावर पुढे जाउन ब्रिटीश कौन्सील आहे. तिचा थाट बघा अन आपला गचाळ कारभार पहा!

नगरीनिरंजन's picture

17 May 2014 - 10:50 pm | नगरीनिरंजन

त्याला नाईलाज आहे हो; श्रीमंत लोकांच्या गरीब देशातले आपण. सुंदर बाग आणि चकाचक इमारतींचे चोचले सार्वजनिक बाबतीत परवडत नाहीत आपल्याला.

यशोधरा's picture

17 May 2014 - 7:47 pm | यशोधरा

उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!

मलाही भारतीय वकिलातींचा वाईट अनुभव असा आला नाहीये कधीच.

इतका वाईट नसला तरी जरा काळजी करायला लावणारा अनुभव आला आहे. आम्हा दोघांच्या पापोचे नुतनीकरण करण्यावेळी (याला बरीच वर्षे झालीत, कदाचित आता सेवा बदलली असेल) २ महिने लावले. त्यांनी वेबसाईट्वर सांगितलेलीच कागदपत्रे जोडली, नंतर एक महिना झाला तरी काही उत्तर नाही. मध्ये मध्ये न उचलला जाणार्‍या क्रमांकावर अनेकदा ट्राय मारून झाले, इमेला पाठवल्या पण उपयोग नाही. एकदा मात्र दिवसभर फोनसाठी प्रयत्न केल्यावर "आता आणखी एक कागद लगतो, (नवीन नियम आहे) तो पाठवा." असे समजले. याचा उल्लेख वेबसाईटवर केला नव्हता पण ते आपण बोलायचे नसते. नव्या कागदाची पाठवणी केल्यावर मात्र महिनाभरात दोघांचेही पापो आले.

सखी's picture

17 May 2014 - 7:42 pm | सखी

शिकागो आणि टोरांटो इथल्या भारतीय वकिलातचा अनुभव विशेष चांगला नव्हता आला होता. उद्दाम कर्मचारी हीच मुख्य डोकेदुखी होती. आतासुध्दा एका ऑफीसची वेळ ९:३० ते १२:३० आणि ३:३० ते ५:०० इतकीच आहे, म्हणजे फक्त ४:३० तासच ऑफीस लोकांसाठी चालु असते. मग नाही करायची म्ह्टले तरी तुलना होतेच कारण बाकीची बरेचशी ऑफीसे ७:३० ला उघडतात, किंवा ९ ला उघडली तर दिवसभर चालु असतात ६-७ वाजेपर्यंत.

रेवती's picture

17 May 2014 - 8:55 pm | रेवती

हो. या वेळांमुळे कचेरिस सुट्टी घ्यावी लागते. मला शिकागो व न्यूयॉर्कवाल्यांचा अनुभव आहे. शिकागोतल्या हापिसात पापो तयार होऊन पडला होता. तो ८ दिवसातच आला असल्याची नोंद होती पण आम्हाला बोलावले ते १ महिन्यानी. प्रवासाच्या तारखा उगीच पुढे गेल्या. पोष्टाने कागदपत्रे पाठवली तर माझ्या मामेबहिणीला पापो ४ महिन्यांनी मिळाला. अशावेळेस तुलना होते, वैताग येतो व कागदपत्रांची काळजी वाटते. बरे, तुमच्याकडून काही कागदांची चूक आहे का? तर तीही नाही. मग प्रश्न येतोच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2014 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतीय वकिलातींमधिल व्यवस्था आणि सेवा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायला खूप मोठे फरक करावे लागतील... आणि ते केवळ इंटिरियर डेकोरेशनपुरते मर्यादित नसतील. इतकेच पुरे.

हुप्प्या's picture

17 May 2014 - 10:25 pm | हुप्प्या

सान फ्रान्सिस्कोची भारतीय वकिलात ही अन्य भारतीय वकिलातींप्रमाणेच कळकट, बेशिस्त आहे असा अनुभव आहे. पण एका खाजगी कंपनीकडे ते काम दिल्यापासून खूपच सुधारणा आहे. वकिलातीचे तोंडही बघावे लागत नाही हा त्यातील मुख्य भाग. कामाची वेळ थोडी वाढली आहे. कामे सुरळित होतात. मात्र फोनवर कुणी सापडत नाही. नीट उत्तरे मिळत नाहीत. काही कामांकरता नको इतका वेळ लावणे वगैरे समस्या आजही आहे. वेबवरील सूचना पूर्ण नसणे, चुकीच्या असणे ही दुखणी अजूनही आहेतच.

कुंदन's picture

18 May 2014 - 1:07 am | कुंदन

दुबैला पण BLS कडे आहे काम. एकच फेरी मारावी लागली कागदपत्रे द्यायला.
फोटो फक्त तिथेच काढावे लागले , योग्य आकारातले फोटो बरोबर नेउन सुद्धा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2014 - 2:15 am | निनाद मुक्काम प...

अबुधाबी , लंडन येथे चांगला अनुभव आला आहे
म्युन्शन मध्ये सुद्धा अनुभव चांगला आहे. म्हणजे फोन उशिरा जरी उचलला तरी व्यवस्थित माहिती देतात, आमच्या जर्मन मराठी मंडळातील आमच्या दोन स्नेही ह्या दुतावसात काम करतात त्यांनी मंडळीत सर्व सदस्यांना तांत्रिक माहिती हवी असल्यास इमेल किंवा फोन तर्फे संपर्क साधायला सांगतात.
सुद्ध मराठीत सर्व माहिती मिळते.
तरीही जर्मन दुतावासात अबुधाबी व मुंबईत जाण्याचा योग आला , त्यांची कस्टमर सर्विस अप्रतिम आहे,
पण गंमत म्हणजे तेथील भारतीय कर्मचारी जर्मन मधून संवाद साधतात आणि कहर म्हणजे आपली काही लोक जर्मन भाषेत उत्तर देतात ,आम्हाला जर्मन येते हे सिद्ध करण्यासाठी
माझी पत्नी हे पाहून चकीत झाली
एखादा जर्मन मुंबई मधील जर्मन वकालती मध्ये हिंदी मध्ये सुसंवाद करतांना कसे दिसतील अगदी तसे वाटले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2014 - 2:17 am | निनाद मुक्काम प...

स्वसंपादन करण्यापेक्ष्य एवढेच सुचवितो की गंमत म्हणजे नंतर चा अनुभव हा म्युन्शन मधील इंडियन दूतावासाचा आहे.

दिपक.कुवेत's picture

18 May 2014 - 6:08 pm | दिपक.कुवेत

ईंडियन एंबसीने त्यांची काहि ठरावीक कामे आउटसोर्स केली आहेत त्यामुळे पासपोर्ट वगैरे तरी डॉक्युमेंट सबमीट केल्यापासुन ३ दिवसात मिळतो.

मालविका- तुमच्या अनुभवाबद्द्ल दिलगिरि.
मला पापो नविन घेन्यासाथि शिकागो भारतिय वकिलातित चान्गला अनुभव आला आहे.
जून- २०१२.
वेबसाइत मधे अपूर्न माहिति असल्याने इमेल केल. व्हि.सि. ने दूसरया दिवशि रिप्लाय करून समपूर्न माहिति दिलि. लाम्ब राहत असल्याने सर्व कागदपत्र पोस्ताने पाथिवलि. चारच दिवसानि नविन पापो पोस्ताने मिलाला.
तात्परय- १.दिल्लित प्रिन्त साथि पापो पाथवन शिकागो भारतिय वकिलातित दोन वर्शा पूर्वि नव्हते. (BLS )ला outsource केले नव्हते.
२. outsource = इन्वेसतरचा फायदा & कनझुमरचा तोता.
समिर१२३.

श्रीरंग_जोशी's picture

19 May 2014 - 5:31 am | श्रीरंग_जोशी

काही वर्षांपूर्वी शिकागोच्या भारतीय वकिलातीमध्ये प्रत्यक्ष जावे लागले. अनुभव चांगला होता. वर रेवती यांनी म्हंटल्याप्रमाणे कार्यालयीन वेळा जरा गैरसोयीच्या आहेत. अन त्यात हे कार्यालय डाऊनटाउन मध्ये आहे. लांबच्या उपनगरातून गाडी चालवत गेल्यास रहदारीत अडकण्याची शक्यता असते. आपात्कालिन गरजांसाठी शनिवारी वकिलात ११ ते १२ दरम्यान सुरू असते.

गेल्या वर्षीच माझ्या बायकोचे पारपत्र नुतनीकरण होऊन दोन आठवड्यांत घरपोच मिळाले.

मैत्र's picture

19 May 2014 - 12:40 pm | मैत्र

लहान मूल असल्यास त्याचा पासपोर्ट करताना जर पालकांपैकी कोणी भारताबाहेर असेल तर त्या देशातल्या वकिलातीकडून एक फॉर्म / अ‍ॅप्रूव्हल आणि पालकाची सही भारतातल्या पासपोर्ट ऑफिसला पाठवावी लागते.
हेग मध्ये नेदरलँड्स मधल्या बहुतेक वकिलाती आहेत. नेहमीप्रमाणे आजूबाजूला अत्यंत लहान देशांच्या सुंदर नेटक्या इमारती आणि बागा. भारताच्या कॉन्सुलेटसाठी पुण्यात पत्ता शोधण्याप्रमाणे धडपड करावी लागते.
मागच्या बाजूने एक छोटे दार. फार तर २० बाय १० ची एक खोली.
असाच एक शिपाईवजा इसम. भय्या हिंदी, इंग्रजी यथा तथाच. सगळा ओपन कारभार आणि मोठ्याने बोलून प्रत्येकाला काम विचारणे.
एक निळ्या ब्लेझरमधला मनुष्य येईपर्यंत काही काम झालं नाही.
आणि नेटवर जी फी लिहिली होती त्यापेक्षा साधारण ९ का १२ युरो जास्त घेतले आणि चक्क त्या वाढीव पैशांची पावती दिली - इंडियन कम्युनिटी वेल्फेअर / कल्चरल अ‍ॅक्टिव्हीटीज वगैरे तत्सम नावाखाली. आणि त्यातही दोन वेगळ्या पावत्या. अगदी १००% सरकारी.
तो इतका महत्त्वाचा फॉर्म जो तिथे सह्या शिक्के करून भारतात पाठवायचा तो चक्क सायक्लोस्टाईल! म्हणजे फोटो कॉपीही नाही. अगदी १५-२० वर्षांपूर्वी नीट शाई न उठल्याने बटबटीत झालेली अक्षरे असायची सायक्लोस्टाईल तस्सा! पोस्टाच्या फॉर्म्स सारखा.
काम व्यवस्थित झालं एका फेरीत पण अव्यवस्थितपणा लक्षणीय होता..

मराठे's picture

20 May 2014 - 10:12 pm | मराठे

मुलाच्या पासपोर्टच्या संदर्भात एकदा शिकागो वकिलातीला इमेल पाठवलं होतं. आणि काही तासांनी वकिलातीमधून चक्क फोन आला आणि सगळी माहिती दिली गेली. भडभडून आलं हो!

अमेरिकेतील भारतीय दुतावासांनी व्हिसा, ओसीआय, पीआयओ वगैरेंसाठी ज्या BLS International Services ला काँट्रॅक्टर म्हणून नेमलं होतं, त्यांची मान्यता तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. नव्या काँट्रॅक्टरकडे कागदपत्रं परत पाठवावी लागणार आहेत, मे १० - मे २० या कालावधीत ज्यांनी अर्ज पाठवले असतील ती (माझ्यासारखी!) बरीच मंडळी या गोंधळात लटकली आहेत :-(

BLS International Services च्या विषयी अनेक सुरस तक्रारी आंतर्जालावर प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच भारतीय वकिलातींनी हे पाउल उचलले असावे (काल आणि आजही त्यांचे कोणतेही फोन 'स-मानव' चालू नाहीत, फोन केल्यावर 'प्रतीक्षा करा, आपण रांगेत आहात' या प्रकारची टेप वाजत रहाते..), पण या सर्व प्रकारात भारतात प्रवासास येऊ इच्छिणार्‍या सर्वांनाच खूपच मनस्ताप होणार आहे.

बहुगुणींनी सांगितलेले खरेच मनस्ताप वाढवणारे आहे. यानंतर तुमचे पासपोर्टस व्यवस्थित येवोत अशी इच्छा करते. अशाच गोंधळानंतर माझ्या मामेबहिणीच्या नवर्‍याला भारतात गेल्यानंतर परत येताना एयरपोर्टवर मुंबैला पासपोर्ट खोटा आहे या शंकेपायी परत घरी येऊन भारतात २ महिने अडकावे लागले होते. त्यात पापो अधिकार्‍याची चूक न्म्तर लक्षात आली. माझ्या मुलाचा पासपोर्ट अगदी तान्हे बाळ असताना केला होता त्यातही दोनदा चुका केल्या (दोनदा वेगळे पापो करावे लागले)व निघण्याच्या आधी २ दिवस लक्षात आले. मग जास्तीचे दीड हजार रुपये घेऊन तेथील अधिकार्‍यांनी दुसर्‍या पापोवर सही करून हा खरा आहे असे लिहून दिले. मुलाच्या बाबतीत घडलेले खूप जुने असले तरी मामेबहिणीच्या बाबतीतले ३ वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे पापो आल्यावर कृपया शक्य तितका बारकाईने तपासा.