पंगत

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
9 May 2014 - 6:59 pm

आजकाल बर्याचश्या कार्यक्रमांमधे जेवणाच्या वेळी बुफे ही पद्धत रुड झालेली आहे . सोयीच्या दृष्टीने,अन्न वाया ना जाण्याच्या दृष्टीने ती निश्चीतच चांगली आहे.पण तरीही मला मात्र पुर्वी पासूनच पंगत हाच प्रकार खूप आवडतो .

आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.एक तर सगळ्यानाच ते आवडत आणि दुसर महणजे इतके दिवसानंतर आता तस बसल्याशिवाय जेवण पोटभर होत नाही असाच वाटत.कदाचित हे वाटण मानसिक सुध्हा असेल . पण अलीकडेच ऋजुता दिवेकर च्या एक पुस्तकात तिने हेच सांगितलाय तेव्हा मात्रा मला खूप बर वाटल .
आमच्याकडे अजूनही कोणी पाहुणे आले तर पूर्वीसारख पुरुषांची पंगत आधी आणि मग बायकांची असाच असत.काहीजनाना हे मागासलेल् वाटेल पण मला मात्रा सवय झालीए.आधी पुरुषांची आणि पाहुण्यांची पंगत (मग बायका असतील तर त्याही)आणि मग घरातील बायकांची पंगत.पाहुणे नसतील आणि घरतीलच काही कार्यक्रम असेल तर मग पुरुष आणि मूळ आधी आणि मग बायका . पण आमच्यकडे कधीच अस वाटल नाही की पुरुषांची जेवण झाल्यवर उरल सुरल बायका खात आहेत.कारण आमच्या आजीच्या थोड्या पण कडक नियामांमुळे घरात मुळातच जास्त जेवण केलेल असायच की कधी ते कमी पडून उरल सुरल खायची वेळ यावी.कोकणातली सगळीच भात प्रिय असल्याने बायकांच्या पंगतीला भात मात्र नवीन ताजा टाकून गरम गरम आणला जायचा.पुरुषांची पंगत आधी म्हणून पुरुष जेवण झाल की पण खात गप्पा मारत बसलेत अस मात्र कधी व्ह्यायच नाही.बायकांच्या पंगतीला वाढायला पुरुष आपणहून यायचे.वाढताना थोडा गोंधळ व्ह्यायचा पण ते मनापासून केलेल असे.कोणीही कुणाशीही बरोबरी करण्याचा प्रयत्ना नसे .
पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे.घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात.श्लोक म्हणतात.जेवताना ४ लहान घास बाजूला काढून ठेवतात.जेवताना खाली वाकून जेवाव लागत,बाहेर कुठे ना सांडता, दुसर्याला हाट ना लागता.जेवनार्यप्रमाणेच वाढनर्यानेही काय क्रमाने वढायचे हे ठरलेल असत.साधारण पणे सुरवातीचा वरण भात हा अगदीच नैवेध्य पुरता असतो त्यामुळे मग आधी भात,त्यापाठोपाठ वरण आणि तूप हे क्रमाने वढायाल आणायचे.आमटी असेल तर ती आणायची.आणि मग हळूहळू भाजी,कोशिंबीर. साधारण भात संपत आला अस दिसल की मग जे पक्वान्न असेल ते वाढायला आणायच.आग्रह करून झाला की परत एकदा भात विचारायचा.या वेळेस भाताबरोबर आवर्जून ताक न्यायच.वाढताना पानात एका वेळी भरपूर वाढल नाही गेल पाहिजे तसाच अगदी कमिही नाही वाढता कामा हे अशा अंदाजाने वढायच.आमटी,ताक हे द्रव पदार्था वाढताना वाटीच्या बाहेर सांडणार नाहीत ना याकडे लक्षा द्याव लागत .वाढताना कुठे साडी पायात येत नाही की कुठे ड्रेस चा गळा खाली येत नाही याही गोष्टीची काळजी घ्यावी लागते . जेवणारा एखाद्या पदार्थाची वाट बघत बसलाय असाही होऊन नाही चालत.ज्या भांड्यात जेवण केल ते भांड घेऊन कधीही वध्याला जायच नाही अस आजी सांगायची.कारण जर चुकून कमी असेल तर जेवनर्याचया ते लक्षात येऊन तो कमी जेवेल,जे आपल्या आचार विचारत बसत नाही.तसाच ज्या भांड्यतून वाढणार त्या भांड्यात वेळीच तो पदार्थ काढून घ्यावा.पदार्थ संपताना जो भांड्याचा आवाज येतो तसा आल्यास पाहुण्यना आणखी घेताना अवघडल्यासाखे होते जेवनार्याने पण शक्यतो सगळे पदार्थ खावेत आणि पान स्वच्छ करावे जेणेकरून खरकट उचलताना त्या माणसाला घान वाटू नये . जे काही टाकायचे असेल (आमसूल, मिर्ची वगैरे ) शक्यतो आमटीच्या वाटीत गोळा करून ठेवावे .

हे आणि असेच आणखीही बारीक सारीक अलिखित नियम पंगतीत पाळावे लागतात .आणि हे नियम स्वच्छता आणि नीटनेटेकपाणा यावर आधारित आहेत म्हणजेच आपल्याला आपसूकच या नियमाची सवय होते आणि आपल्या जडणघडणीत यांचा अजाणतेपणी का होईना हातभार लागतो

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

9 May 2014 - 7:52 pm | जेपी

मी



ला.
बाकी नाव वाचुन तुमी पिडां काका सारखी मिपाकरांची पंगत भरवली काय असा विचार आला.

कुठल्या जमान्यातील लेख आहे हा?

नशिब मुपी (आपलं आवडतं मुक्तपीठ ओ...) मध्ये नाही टाकला हा लेख नाहीतर प्रतिसादांची अशी काही पंगत बसली असती की विचारता सोय नाही. *scratch_one-s_head*

म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं...इथे प्रतिक्रिया द्यायच्या नसतात का सरसकट सगळ्यांनी? पण मी हे तर इथे लिहिलं...मग मी हेपण लिहायला नको होतं का?

संजय क्षीरसागर's picture

9 May 2014 - 8:39 pm | संजय क्षीरसागर

त्यात लेखन इतकं बेशुद्ध की हे वाक्य वाचल्यावर :
`ज्या भांड्यात जेवण केल ते भांड घेऊन कधीही वध्याला जायच नाही अस आजी सांगायची.'
...त्या वेळी जेवण केलेलं भांडं घेऊन वढ्यावर जायची पद्धत होती का असा प्रश्न पडला. त्या `ओवीच्या' वेळीच डायरी द्यायची होती पण पब्लिकनं प्रोत्साहन दिल्यानं पुन्हा हा धागा आला! घ्या एकदम प्राचिन डायरी, घरच्याघरी सरावासाठी.

.

आत्मशून्य's picture

9 May 2014 - 9:27 pm | आत्मशून्य

.

बॅटमॅन's picture

10 May 2014 - 6:57 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

डायरी भेट द्या कुणीतरी.

संजय क्षीरसागर's picture

9 May 2014 - 9:16 pm | संजय क्षीरसागर

आता पंगतीतल्या विनोदांची मजा घ्या

आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.

सुरुवातीला मला, यांच्याकडे डायनींग टेबलवर मांडी घालून बसतात की काय असं वाटलं!

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 May 2014 - 11:31 am | ज्ञानोबाचे पैजार

नाही हो सर,
डायनिंग टेबल त्यांनी कपडे वाळत घालायसाठी विकत घेतले असावे.
असतात एखाद्याचे वेगळे विचार.

शैलेन्द्र's picture

10 May 2014 - 12:39 pm | शैलेन्द्र

लेखात बराच पंक्ती-प्रपंच घडलाय..

बाकी आपण काही असं करत नाही बॉ.. डाव्या हाताला गरमागरम बेसन्/मेथीची लसुन टाकुन केलेली आमटी/मटनाचा रस्सा/मटकीची उसळ यातलं काहीही एक, उजव्या हाताला भाकरी/पोळी आणि वरती एखादी चटणी असली तर असली. जर वाढणार्‍याची जागा चुकली तर सरळ ताट फिरवून घ्यायचं, पाहुणे आले तर एखादा पदार्थ जास्त, बाकी काही नाही..

मी जेवताना इतरांना आग्रह करत नाही, आणि मला कोणी केलेला फारसा आवडत नाही.. आग्रह जेवणाची वाट लावतो..

खाताना मोकळं वाटल पाहीजे राव..

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 2:02 pm | तुमचा अभिषेक

पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे.

जर मी चुकत नसेल तर ....
आमच्या कोकणात चपाती अलीकडे ठेवतात आणि भाजी पलीकडे,
याउलट देशावरचे चपाती पलीकडे ठेवतात आणि भाजी अलीकडे.
अश्यावेळी अश्या मित्रांकडे गेल्यावर वाढलेले ताट १८० अंशात फिरवून घ्यावे लागते.

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 2:06 pm | तुमचा अभिषेक

घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात.

ईंटरेस्टींग !

खास करून दुपारचे जेवण, स्वतालाच उकडले तर गरमागरम जेवण खायची मजा नाही असे काही लॉजिक आहे का यामागे ?

चहा पिताना मी दरवेळी पंख्याचा स्पीड असा अ‍ॅडजस्ट करतो की चहा थंड होऊ नये, त्याचबरोबर मलाही गरम होऊ नये जेणे करून गरम पेय पिण्याचा आनंदच गंडेल.

मुक्त विहारि's picture

10 May 2014 - 2:43 pm | मुक्त विहारि

आमच्या रत्नांग्रीच्या घरात पण अशीच पद्धत होती.

चिगो's picture

10 May 2014 - 5:56 pm | चिगो

घरी पंगत घालून जेवत नसलो, तरी समारंभात पंगत आवडायची. (बादवे, डायनिंग टेबल असतांना पंगत का, आणि पंगत घालायची पद्धत असेल तर डायनिंग टेबल का? हा प्रश्न पडलाच) पंगतीत एक सोशल मॅनर पाळला जायचाच, तो म्हणजे शेवट्च्या व्यक्तीचं जेवण होईपर्यंत कुंईच पंगतीतून उठायचं नाही. आताच्या धावपळीच्या आयुष्यात हा वेळेचा अपव्यय वाटेल, पण समोरच्याला ऑकवर्ड वाटेल, असे न वागण्याचा संस्कार ह्या साध्या गोष्टीतून आपोआप व्हायचा.
तसेच, माझ्यामते पंगतीत अन्नाची नासाडी कमी व्हायची असे माझे वैयक्तिक मत आहे..

मात्र, अगदी महिन्याभरापुर्वीच एका मंदीरातल्या पुजेच्या भंडार्‍यात "बुफे" पाहिला, आणि पंगत संपलीच ह्याची खात्री पटली.. :-(

लेख जरा विस्कळीत वाटला.. आणि लेखनाच्या शुद्धतेकडे लक्ष द्यावे, ही विनंती..

मुक्त विहारि's picture

10 May 2014 - 7:06 pm | मुक्त विहारि

जमिनीवरच जेवतो.

डायनिंग टेबलचा उपयोग , ज्यांना मांडी घालून जेवता येत नाही, त्यांच्या साठीच.

आत्मशून्य's picture

10 May 2014 - 9:32 pm | आत्मशून्य

आपण फार् सुरेख लेखन करत आहात. हे अंतरजाल आहे. इथे नतद्रष्ट प्रव्रुत्तिंची कमतरता अजिबात नाही. त्यांचे प्रतिसाद मध्यवर्ती जागी मारणे. आणी आपले लेखन असेच चालु ठेवा. नवीन आहात म्हणून कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार मिळत नाही हे ध्यानी असुध्या. मोर्ल सपोर्टसाठी अनाहीता जॉइन करा. पण आपले कसलेही लेखन असो इत्र्हे आवर्जुन लिहा. इतुके आशयप्रधान आजकाल वाचायला मिळत नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 May 2014 - 4:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान लिहिलय. टी.व्ही.बघत पिझा खाणारे लोक लेखनातल्या चुका काढत ढेकर देतील.पण असल्या लोकांना फाट्यावर माराय्ला शिक. बाकी, जुन्या पंगतीची मजा काही औरच असायची.

पैसा's picture

11 May 2014 - 5:35 pm | पैसा

वाचताना णॉस्टॅल्जिक वाटतं. पण बायकांनी सगळ्यात शेवट ४/साडेचार वाजता जेवणे ही पद्धत मला कधीच आवडत नाही. करणारी तेव्हा इतकी दमून गेलेली असते की तिला जेवनाची चव पण लागत नाही.

पंक्तीत शर्ट काढण्यावरून एक महाविनोदी किस्सा पाहिला आहे. मी एका छोट्या ब्रँचमधे काम करत होते तेव्हा मी आणि मंगलोरचा मॅनेजर असे दोघेच ब्रँचमधे. तो दुपारी जेवायला घरी जायचा. शर्ट काढून जेवायचा आणि मग जरा वेळ डुलकी काढून परत यायचा. एकदा असा डुलकी काढून बँकेत आला. पाऊस पडत होता म्हणून रेनकोट घालून आला होता. बँकेत पोचून रेनकोट काढतो तर काय, आत शर्टच नाही! मी आणि शिपाई आ वासून बघत राहिलो.

रेनकोट काढताच साहेबाच्याही ते लक्षात आलं. त्याने तसाच रेनकोट परत चढवला आणि शर्ट आणायला घरी धावला! *ROFL*

आत्मशून्य's picture

11 May 2014 - 6:00 pm | आत्मशून्य

=)) ,

=)) ,

=))