उन्हाळा-१

दोयल's picture
दोयल in जनातलं, मनातलं
28 Jul 2008 - 7:58 am

होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत
आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल,
धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे. परसदारी अनेक झाडांची मांदियाळी होती, घराला खेटुन गुलमोहोर, मागच्या दारा पासुन थोडे पुढे विलायति चिंच, मोठ्ठा कडुनिंब, पायरि आणि रायवळ आंबा, दोन पेरु, काहि रामफळ, सिताफळ, डाळिंब, ए़कांडी पपइ, कारंजा आणि चार मोठी मोठी पांगार्याचि झाडे.
थोडा मोगरा, एक गुलाबाचा ताटवा आणि अजुन काहि अबोली, शेवंति, झेंडु, हजारि मोगरा, कण्हेर अशी फुलझाडे. सकाळी दात घासताना परसदारी मोगर्याच्या कळ्या मोजणे,
डाळींबाची फुले मोजणे असले उद्योग चालयाचे. आंघोळीला कढत पाणी लागत नसल्याने हिवाळ्या प्रमाणे चूल फुंकायची, त्यात सारण सारायची गरज नसे , आई गॅसवरच पटकन
पाणी काटा मोडे पर्यंत तापवायची.
हा असा सुखनैव कार्यक्रम सुरू असताना, आई बाबांकडे माझी भुणभुण सुरू होई ..बाहेर कधी पासून जायच झोपायला? चढता उन्हाळा आमच्या कौलारू घरालाही सोडत नसे.
रात्रि उकाड्याने झोपमोड होणे सुरू होत असे. पंखा जरी असला तरी त्याची हवा मच्छरदाणित फारशी शिरत नसे. नदी किनारी घर आणि आजुबाजुला रान, त्यामुळे मच्छरदाणी हि आमचि कवचकुंडलेच म्हणा, तिच्याशिवाय झोपणे हि अशक्यच. बाहेर झोपण्याविषयीच्या माझ्या भुणभुणीवर आईच एकच उत्त्तर असे.. " परि़क्षा संपल्यावर"
रात्री जेवल्यावर अंगणात शतपावली घालताना बाबांजवळ वशिला लावयाचा प्रयत्नही मी करून पहात असे. बाहेर झोपल्याने चांगली झोप येऊन मेंदु तरतरीत होईल आणि परि़क्षेत
चांगले मार्क पडतील असा युक्तिवादही मी नित्यनियमाने करीत असे. अर्थातच ते कधिच दाद देत नसत.
होता होता परिक्षा जवळ येई, सुरू होई आणि संपूनहि जाई.
-क्रमशः

वाङ्मय

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

28 Jul 2008 - 8:06 am | अरुण मनोहर

आठवणी गुंगवून टाकणार्‍या आहेत.
भर उन्हाळ्यात कुणी एकच घोट थंडगार पन्हे दिल्यासारखे वाटले.

स्वाती दिनेश's picture

29 Jul 2008 - 12:01 pm | स्वाती दिनेश

आठवणी गुंगवून टाकणार्‍या आहेत.
हेच!
भर उन्हाळ्यात कुणी एकच घोट थंडगार पन्हे दिल्यासारखे वाटले.
हे आवडले. अगदी असेच वाटले.
पुढचा भाग जरा मोठा येऊ देत.
स्वाती

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 8:20 am | यशोधरा

छान सुरुवात...

दोयल's picture

29 Jul 2008 - 7:50 am | दोयल

अरूण मनोहर आणि यशोधरा धन्यवाद , पुढचे भाग टाकते लवकरच..

विसोबा खेचर's picture

29 Jul 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

छान आहे, येऊ द्या अजूनही..

पुढला भाग याहून थोडा जास्त लिहिलात तर बरं होईल..

तात्या.

प्राजु's picture

29 Jul 2008 - 11:38 pm | प्राजु

सुंदर झाली आहे सुरूवात. पण भाग अगदीच छोटा झाला आहे. पुढचे भाग लवकर येऊदेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अथांग सागर's picture

30 Jul 2008 - 5:49 am | अथांग सागर

खरचं, वाचतांना माझ्या डोळ्यासमोर माझं घर उभं राहिलं.

-(घरी जाण्यासाठी आतुर झालेला) अथांग सागर

II राजे II's picture

30 Jul 2008 - 11:32 am | II राजे II (not verified)

खरचं, वाचतांना माझ्या डोळ्यासमोर माझं घर उभं राहिलं.

-(घरी जाण्यासाठी आतुर झालेला) अथांग सागर

अगदी हेच म्हणतो !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

दोयल's picture

30 Jul 2008 - 9:03 am | दोयल

सर्वांना धन्यवाद. टंकायची सवय नसल्याने थोडे थोडे लिहिले जात आहे पण फिकिर नाहि..लवकरच सवय होईल :)