अरविंद बरोबर दीड तास!

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
20 Mar 2014 - 1:24 pm

India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.

स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.

प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं.

या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

उपास's picture

21 Mar 2014 - 11:29 pm | उपास

काल रात्री जागून (एक ते अडीच) मुलाखत नीट ऐकली. अर्धवटराव, तुमचा प्रतिसाद तंतोतंत.. आवडलाच!
एकूणात मुलाखत प्रश्न त्यांची उत्तरे द्यायचा केलेला प्रयत्न आवडला, (पण ते कैक वेळा नेमक्या क्षणी खोकणे डोक्यात जाते राव... ) पण मुळात आपवर केजरीवालचं स्वतःचं नियंत्रण नाही हे कुठेतरी जाणवतय.. त्यांचा कुठलाही नेता जबाबदार आणि विश्वासार्ह नाही आणि दिल्ली प्रकारानंतर आणि एस्सेम्मेस हवं तेव्हा मागवायच्या 'जनमत'चाचणीच्या खेळामुळे नको त्या गोष्टींचं उदात्तीकरण होतय असं वाटू लागलय.
आप ने पर्याय दिलाय हे स्पृहणीय आहे नक्कीच आहे! पण डोक्यात हवा जाऊन तमाम भारतियांच्या आशांना ते सुरुंग लावणार नाहीतच असं नक्कीच वाटत नाही!
अशाच स्वरुपाची मोदींची मुलाखत बघायला आवडेल, कुणाकडे लिंक्स असतिल तर देणार का?

सव्यसाची's picture

22 Mar 2014 - 12:01 am | सव्यसाची

India Today Conclave मध्येच नरेंद्र मोदी यांचे भाषण आणि प्रश्नोत्तरे झाली होती. साल २०१३ आहे.
भाषण
प्रश्नोत्तरे

तसेच Network 18 Think India Dialogue मध्ये भाषण आणि प्रश्नोत्तरे (साल २०१३)
भाषण आणि प्रश्नोत्तरे
बरेचसे मुद्दे सारखेच आहेत पण काही गोष्टींवरती ठोस उपाय पण दिसले. जसे कि रेल्वे, उर्जा क्षेत्र, भ्रष्टाचार वगैरे.

Hindustan Times Leadership Summit मधील भाषण बरेच जुने आहे परंतु प्रश्नोत्तरांचा भाग अतिशय चांगला आहे.
भाषण आणि प्रश्नोत्तरे

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2014 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि लेखातले) एकाच प्लॅट्फॉर्मवर बोलतानाचे व्हिडिओ पाहिले.

कोणतेही "संतुलीत" मत बनविण्याआधी दोन्ही बाजू बघणे जरूरीचे आहे.

व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी आणि व्यावसायिक असल्याने असेल पण मला असे वाटते की फक्त समस्यांच्या नावे ओरडत राहण्यार्‍यांपेक्षा असेल त्या परिस्थितीत त्या समस्या प्रत्यक्ष सोडवून दाखवणार्‍या माणसांवर जास्त विश्वास ठेवला तर फायद्याचे असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2014 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि लेखातले) एकाच प्लॅट्फॉर्मवर बोलतानाचे व्हिडिओ पाहिले.

कोणतेही "संतुलीत" मत बनविण्याआधी दोन्ही बाजू बघणे जरूरीचे आहे.

व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी आणि व्यावसायिक असल्याने असेल पण मला असे वाटते की फक्त समस्यांच्या नावे ओरडत राहण्यार्‍यांपेक्षा असेल त्या परिस्थितीत त्या समस्या प्रत्यक्ष सोडवून दाखवणार्‍या माणसांवर जास्त विश्वास ठेवला तर फायद्याचे असते.

विटेकर's picture

21 Mar 2014 - 1:49 pm | विटेकर

कमालच आहे गुजरात च्या जनतेची ! असल्या विकास न करणार्‍या आणि निव्वळ पोकळ दावे करणार्‍या माणसाला गुजरात पुनःपुन्हा निवडून देते आहे ! किती हा मूर्खपणा ! अच्र्त बावल्ट कुथले !
हे तारणहार केजरीवाल आले नसते तर भारतीयांचे खरे नव्हते ! कल्की कल्की अवतार म्हणतात तो हाच असावा की काय ? ( जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच ) की नॉस्त्रेडेमस चे भविष्य खरे ठरु लागले आहे ?
.
.
.
.
.
.
.
आवरा !

प्रचलित व्यवस्था बदलून टाकू, भ्रष्टाचार संप वू, रामराज्य (सगळं आलबेल असलेलं प्रशासन नि सुशासन ह्याला काही लोकांनी दिलेलं नाव) आणू, सगळे समान असतील अशा प्रकारच्या आशा/ स्वप्नं सामान्य माणसाला दाखवायची नि स्वतःच्या वागण्यानं पूर्वीच्या लोकांपेक्षा प्रचंड वेगानं दाण्णकन जमिनीवर असं आपटायचं की पुन्हा सुशासनाचं स्वप्न बघण्याचं धाडस सामान्यांनी करु नये.

३००-३५० वर्षं एकाच शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची वेळ आपल्यावर येत राहते. अजून किती वर्षं येत राहील कुणास ठाऊक.
(आज महाराज असते तर त्यांना लोकांनी काय त्रास दिला असता कुणाला माहिती)

मुक्त विहारि's picture

21 Mar 2014 - 10:26 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद दिला नाही.

काय हे?

पैसा's picture

21 Mar 2014 - 10:45 pm | पैसा

'शामची आई' पुस्तक वाचून लोकांची आयुष्यं बदलतात आणि केजरीवाल यांचा व्हिडिओ बघून लोकांचा त्यावर विश्वास बसतो. आणि या दोन्ही गोष्टींवर लोकांचा विश्वास बसतो, यावरून सत्ययुग नक्की येणार याची खात्री पटली आहे. तसं तर बिचारे राहुल गांधीसुद्धा फार प्रामाणिकपणे अर्णवला उत्तरे देत होते पण तुम्हा इंटरनेटवाल्यांनी त्या कार्यक्रमाचं विनोदी कार्यक्रमात रूपांतर की हो केलं! कुठे फेडाल ही पापं?!

मुक्त विहारि's picture

21 Mar 2014 - 11:10 pm | मुक्त विहारि

मिपा वर

डू आय डी घेवून.

निर्लज्ज होवून.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2014 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा

=))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2014 - 12:59 am | निनाद मुक्काम प...

केजुहून प्रभावी व हृदयस्पर्शी , प्रेरणादायक मुलाखती एकेकाळी
वाजपेयी, महाजन , अडवाणी ह्यांच्या असायच्या. त्यांच्या भाषणाचे चाहते भारतात अनेक होते त्यात कितीतरी त्यांचे निस्सीम समर्थक होते. पण जेव्हा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा प्रशासन करण्यास ते अयशस्वी ठरले त्याची परिणीती शेवटी सत्ता जाण्यास आली.

नानासाहेब नेफळे's picture

22 Mar 2014 - 10:06 am | नानासाहेब नेफळे

कारगिल युद्धातल्या शहिद जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार करण्यापर्यंत भाजपाची मजल गेली होती.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2014 - 1:09 pm | श्रीगुरुजी

>>> कारगिल युद्धातल्या शहिद जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार करण्यापर्यंत भाजपाची मजल गेली होती.

ग्रेटथुंकर,

हा आरोप जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर करण्यात आला होता. ते जरी भाजपचा पंतप्रधान असलेल्या सरकारमध्ये मंत्री होते, तरी ते भाजपमध्ये कधीही नव्हते. असो.

२००४ च्या निवडणुकीच्या प्रचारात केला गेलेला हा धादांत खोटा आरोप होता. आरोप करणारे २००४ मध्ये सत्तेवर येऊन सुद्धा त्यांनी या प्रकरणाची साधी हवालदाराकडून सुद्धा चौकशी केली नाही, कारण मुळातच आरोप पूर्णपणे खोटा होता. यावर कडी म्हणजे आरोप करणार्‍यांच्याच पक्षातील संरक्षणमंत्री श्री. प्रणव मुखर्जी यांनी प्रत्यक्ष लोकसभेत अधिकृत निवेदन देऊन असा कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर हा विषय तिथेच संपला. या अधिकृत निवेदनानंतर हा खोटा आरोप करणार्‍यांनी परत कधीही या खोट्या आरोपाचा आजतगायत पुनरूच्चार केलेला नाही.

परंतु ग्रेटथुंकरांसारखे गोबेल्स अजूनही डू आय रूपाने अशी पिचकारी टाकून जातात हे अत्यंत हास्यास्पद आहे.

नानासाहेब नेफळे's picture

22 Mar 2014 - 1:26 pm | नानासाहेब नेफळे

प्रणवजींनी निवेदन दिले आणि आपण मान्य केले!!!!मग याच न्यायाने, भारताचा लक्षणीय विकास युपीए १ ,२च्या काळात झाला असे ते वारंवार म्हणतात. त्यावरही आपला विश्वास आहे तर.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2014 - 8:13 pm | श्रीगुरुजी

>>> प्रणवजींनी निवेदन दिले आणि आपण मान्य केले!!!!मग याच न्यायाने, भारताचा लक्षणीय विकास युपीए १ ,२च्या काळात झाला असे ते वारंवार म्हणतात. त्यावरही आपला विश्वास आहे तर.

ग्रेटथुंकर उपाख्य टॉपबिअर्ड फिलॉसॉफर उपाख्य नाने,

एखादी विशिष्ट घटनेचा उल्लेख करून विशिष्ट व नेमका आरोप करणे ही टँजिबल कृती असते. पण विकास झाला किंवा भ्रष्टाचार झाला अशी टँजिबल नसलेली जनरल विधाने कायमच होत असतात. त्याला अर्थ नसतो.

उदा. 'गुजरातमध्ये २०१०-११ या वर्षात शेतीउत्पादन ११.१ % वाढले' हे टँजिबल विधान आहे. त्याला आकडेवारीची जोड असते. हे विधान खोडायचे असेल तर खोडणार्‍याने त्या काळातील प्रत्यक्ष आकडेवारी समोर आणून विधान खोडणे आवश्यक आहे. पण "आमच्या काळात शेती उत्पादन खूप वाढले" हे जनरल विधान झाले. अशा विधानांना पुराव्याशिवाय व आकडेवारीशिवाय महत्त्व नसते.

त्यामुळे "शवपेटी खरेदीत भ्रष्टाचार झाला" हा निवडणुक प्रचाराच्या काळातील स्पेसिफिक व खोटा आरोप प्रत्यक्ष संरक्षणमंत्र्यांनी नाकबूल केला, असा कोणताही भ्रष्टाचार झालेला नव्हता असे लोकसभेत अधिकृत निवेदन केले व युपीएला आपलेच खोटे आरोप मागे घ्यावे लागले ही वस्तुस्थिती आहे. याउलट प्रणव मुखर्जी किंवा अजून कोणी असे म्हणत असतील की "आमच्या काळात खूप विकास झाला", तर तुलनात्मक आकडेवारीशिवाय व पुराव्यांशिवाय या जनरल विधानाला अर्थ नाही.

बादवे, २००५ नंतर युपीएच्या कोणत्याही नेत्याने या आरोपाचा पुनरूच्चार केला नाही. त्याआधी २००४ पासून सत्तेत असून सुद्धा या आरोपाची साधी प्राथमिक चौकशीसुद्धा करण्याचे धाडस युपीए मध्ये नव्हते, कारण मुळात आरोप धादांत खोटा होता. यावरून आपण बोध घ्यावा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2014 - 1:00 am | निनाद मुक्काम प...

ज्यांनी भरभरून मते दिली त्यांनी शेवटी नाकारले.
केजू चे दिल्ली प्रकरणाने नेमके हेच होणार आहे.
मोदी , पर्रीकर , चौहान ह्यांना यशस्वी प्रशासन करण्याचा अनुभव आहे त्यांना तसे करू देण्यासाठी त्यांच्या राज्यातील जनता त्यांच्या पाठीशी आहे.
ह्याच जोरावर ह्या निवडणुकीत ते मतांचा जोगवा मागत आहेत.
केजू ह्यांच्याकडे अनुभव नाही ,पक्षात अनेक हवशे नवशे आले आहेत.
त्यांना हाताळण्यात केजू चा अर्धा वेळ जातो.
बोलबच्चन वर जनतेला मूर्ख बनवण्याचे दिवस सरले.
नमो नमः
उद्या नमो ह्यांनी राम मंदिरांचा मुद्दा उठवला व त्यांच्यासमवेत संधीसाधू , साधू संत , महंत , भणंग जमा झाले देशात धार्मिक उन्माद निर्माण झाला तर त्याला माझा पाठिंबा राहणार नाही.
नमो ह्यांचा आंधळा समर्थक मी नक्कीच नाही आहे.
केजू ह्यांच्या समर्थकांनी त्याला प्रश्नच नाही विचारले तर तो त्याची एकाधिकारशाही पक्षात निर्माण करेल.
सध्या त्याच्यामुळे कम्युनिस्ट व इतर अनेक पक्षातील स्वयंभू तारे प्रसार माध्यमांनी नजरेआड केले आहेत.
एवढे मात्र नक्की

चिगो's picture

22 Mar 2014 - 12:28 pm | चिगो

देशोद्धारक, निर्मोही आणि "अखंड स्थितीचा निर्धारु" आदरणीय राजमान्य राजश्री अरविंद केजरीवालांचं राखी बिडला हीला लोकसभेचं टिकीट देण्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर होते, "वादा तोड दिया तो क्या गलत किया?"ही विनम्र मुजोरी मला त्यांच्या धिंगाण्याचा फॅन बनायला भाग पाडते, बघा.. ;-)

सखारामगटणे's picture

22 Mar 2014 - 12:39 pm | सखारामगटणे

अतिरंजतिकरण आहे पण नक्की पहा..मी एके समर्थक नाहीये पण बंदेमे कुछ है

चिगो's picture

22 Mar 2014 - 12:54 pm | चिगो

चांगला व्हिडीयो, आणि जबरा एडिटींग..

नानासाहेब नेफळे's picture

22 Mar 2014 - 1:08 pm | नानासाहेब नेफळे

रिलायन्ससारख्या टग्या कंपनीचे कॅग ऑडीट करणारे केजरीवाल कुठे आणि गॅस प्राईसिंगवर मूग गिळुण गप्प बसणारे मोदी कुठे.चार डॉलर प्राईज ठरलेली असताना आठ डॉलर उकळणार्याची गळाभेट घेणारे विकासपुरुष ,सत्ता आल्यावर काय करतील याचा अंदाज येतोच आहे.

क्लिंटन's picture

22 Mar 2014 - 1:52 pm | क्लिंटन

रिलायन्ससारख्या टग्या कंपनीचे कॅग ऑडीट करणारे केजरीवाल कुठे

कोण केजरीवाल? ऑडिट करायचा आदेश देऊनही ते पूर्ण व्हायच्या आधीच त्याच डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना ३७२ कोटींची सबसिडी अ‍ॅप्रोप्रिएअशन बिलमधून देणारा--बरोबर? त्यांच्या मते या कंपन्या अकाऊंटिंगमध्ये फेरफार करून तोट्यात आहोत असे दाखवितात आणि लोकांना जास्त दराने वीज विकतात. त्यातले सत्य काय ते शोधायला ऑडिट करायचा आदेश दिला होता.मग ते पूर्ण व्हायच्या आधीच अशी खैरात वाटणे कसे समर्थनीय आहे? आणि हाच मनुष्य आणि त्याचे आंधळे समर्थक केजरीवाल किती स्वच्छ, किती प्रामाणिक अशी बाष्कळ बडबड करत फिरणार.

"On Friday when Kejriwal resigned as chief minister, he also piloted the appropriation bill in the Delhi assembly to earmark Rs 372 crore towards subsidy dues to power companies. The sum was drawn from the consolidated fund under PWD and infrastructure heads." यातले शेवटचे वाक्य सर्वात महत्वाचे आहे.हा लेकाचा रिलायन्सच्या नावाने लोकांमध्ये धुराळा उठवून स्वतःची कॉलर ताठ करणार आणि त्याच लोकांसाठी अन्यथा खर्च केले असते ते पैसे उचलून (अनील अंबानींच्या) रिलायन्सला देणार. हा माणूस म्हणजे काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांच्या बेरजेपेक्षाही जास्त नालायक निघाला आहे.

(केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा--- आआपला विरोध करणे हे भ्रष्टाचारी असल्याचे लक्षण असेल तर जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचारी) क्लिंटन

प्रतिसादकांच्या विचारसरणीनं चकित झालो!

एक एप्रिलपासून गॅस एक्सट्रॅक्शनसाठी डबल रेट देण्यात येतोयं (8.4 $ per mmbt) आणि याचा जबरदस्त फायदा रिलायंसला होणार आहे. सरकारवर याचा भार प्रतिवर्षी ५४,५०० कोटी पडणार आहे. रंगराजन कमिटीनं हा दर इथून पुढे होणार्‍या (नव्या) एक्सट्रॅक्शनसाठी द्यावा असं सुचवलं होतं तरी तो दर सरसकट सर्व ठिकाणी देण्यात येईल. दिल्लीतल्या चार नामवंत नागरिकांनी याबाबतीत राज्यसरकारकडे तक्रार केल्यावर केजरीवाल सरकारनं लगोलग मोईली, देवरा, रिलायंस आणि मुकेश अंबानी यांच्यावर FIR दाखल केला आहे. या दरवाढी विरुद्ध यापूर्वी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायलयाचा निकाल यायचा आहे. नरेंद्र मोदी अंबानींच्या विमानातून फिरतायंत आणि केजरीवालांनी इतक्या मोठ्या उद्योगसमूहाला आव्हान दिलंय.

गोष्टी इतक्या उघड आहेत पण आपल्याला कसली पडलीये तर केजरीवालांना (दम्यामुळे) येणारा खोकला, उगीच इकडच्या तिकडच्या शेरोशायरीच्या क्लिप्स, मोदी लाट आहे की नाही यावर त्यांची वक्तव्यं (ज्यातलं एक त्यांच्या गुजराथ दौर्‍यापूर्वी असण्याची शक्यता आहे), इंटरव्यू संपल्यावर अर्णब घोषशी झालेलं संभाषण (जे केवळ प्रतिसादाचा आशय तोच ठेवून तो संपादित करण्यासारखं आहे).

त्यातल्या त्यात अरांनी चर्चा घडावी अशी काही निरिक्षणं नोंदवली आहेत. आणि इक्कांचा हा प्रतिसाद :

दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि लेखातले) एकाच प्लॅट्फॉर्मवर बोलतानाचे व्हिडिओ पाहिले.कोणतेही "संतुलीत" मत बनविण्याआधी दोन्ही बाजू बघणे जरूरीचे आहे. व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी आणि व्यावसायिक असल्याने असेल पण मला असे वाटते की फक्त समस्यांच्या नावे ओरडत राहण्यार्‍यांपेक्षा असेल त्या परिस्थितीत त्या समस्या प्रत्यक्ष सोडवून दाखवणार्‍या माणसांवर जास्त विश्वास ठेवला तर फायद्याचे असते.

मला मंजूर आहे.

India Today Conclave २०१३ मध्ये नरेंद्र मोदींच झालेलं भाषण मी देखिल संपूर्ण आणि अत्यंत शांतपणे ऐकलंय. पण २.१८ तासांच्या मोदींच्या विडिओत ज्या प्रश्नानं २.१६ व्या मिनीटाला ते कमालीचे अस्वस्थ झालेत तो प्रश्न जर सुरुवातीलाच विचारला गेला असता तर सगळी मुलाखत उधळली गेली असती हे नक्की.

मग त्या अस्वास्थ्याच्या कारणाचा तितक्याच निष्पक्षपणे शोध घेतला तेंव्हा ही 2002 Gujarat violence लिंक सापडली.

युद्ध आणि हिंसा या गोष्टी मी कदापीही वाचत किंवा बघत नाही. मोठ्या अनिच्छेनं पण तरीही तटस्थ राहात मी ती लिंक वाचली. शेवटापर्यंत मी स्वतःला कोणतंही मत बनवू दिलं नाही. पण या ओळींनी मी अंतर्बाह्य ढवळून निघालो :

On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.This speech was initially withheld by the Gujarat government from the SIT. In January 2010, the Supreme Court ordered the government to hand over the speech and other documents to the SIT.

"What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ..."[185]

मोदी दंगल का रोखू शकले नाहीत, त्यांचं वागणं हेतुपुरस्सर होतं का याचा निवाडा केंव्हाही होईल. आणि मला त्यात पडायचं देखिल नाही. पण रिलिफ कँप्सची मदत रोखणं? इतका अमानुषपणा? आणि कारण काय तर :

Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way?

अशीच जर प्रगती आणि विकास साधायचा असेल तर भारताची प्रगती झाली नाही तरी बेहत्तर पण इतकं हिणकस नेतृत्व या देशाला कदापीही नको हा माझा तरी निश्चय झाला.

सव्यसाची's picture

22 Mar 2014 - 1:38 pm | सव्यसाची

इंटरव्यू संपल्यावर अर्णब घोषशी झालेलं संभाषण (जे केवळ प्रतिसादाचा आशय तोच ठेवून तो संपादित करण्यासारखं आहे).

मला वाटते आपणास अर्णब घोष नाही पुण्यप्रसून वाजपेयी म्हणायचे आहे . आणि जर आपणास अर्णब घोषच म्हणावयाचे असल्यास ते अर्णब गोस्वामी असावे असे वाटते.
धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2014 - 1:50 pm | संजय क्षीरसागर

पुण्यप्रसून वाजपेयी.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Mar 2014 - 9:41 am | मंदार दिलीप जोशी

:D

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2014 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

>>> India Today Conclave २०१३ मध्ये नरेंद्र मोदींच झालेलं भाषण मी देखिल संपूर्ण आणि अत्यंत शांतपणे ऐकलंय. पण २.१८ तासांच्या मोदींच्या विडिओत ज्या प्रश्नानं २.१६ व्या मिनीटाला ते कमालीचे अस्वस्थ झालेत तो प्रश्न जर सुरुवातीलाच विचारला गेला असता तर सगळी मुलाखत उधळली गेली असती हे नक्की.

१. बारा वर्ष सी बी आय, एस आय टी, कोर्ट इ अनेक गोष्टींचा ससेमिरा लावूनही नंतर आणि एकदाही आरोप सिद्ध झालेला नसताना परत तेच तेच उगाळत बसले तर अस्वस्थ काय त्याबाबत उघड राग आला तरी ते मानवी स्वभावाला धरून होईल असे "संतुलित" विचार केल्यास वाटेल.

२. वर उल्लेखलेले एक मिनीट स्वतंत्र उल्लेख करण्याइतके महत्वाचे वाटले पण प्रश्नोत्तरांच्या सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारे एकच मुद्दा (आणि तोही त्या दिवशीच्या सभेच्या विषयाला धरून नसलेला) पकडून अगदी इतर बरेच उपस्थित लोक इरिटेट होईपर्यंत अ‍ॅंकरने विचारलेल्या प्रश्नांत जवळजवळ खर्च झालेला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लक्षात आला नाही किंबहुना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले... संतुलित विचार केल्यास हे काही "संतुलित" वाटले नाही.

बाकी अंध व्यक्तीपूजेचे राजकारण चालू द्या... हल्ली त्यावर आम्ही अ‍ॅड्रिनॅलिन खर्च करून रक्तदाब वाढवायचे सोडून विनोदाचा प्रकार म्हणून मोफतचे मनोरंजन करून घ्यायला शिकलो आहे.

अवांतर : मला स्वतःला सुरुवातीला केजरिवालांकडून काही चांगले घडण्याच्या अपेक्षा (अगदी आशा म्हणा) होत्या. पण त्यांच्या गेल्या काही दिवसातील कृतींनी त्याविरूद्ध एक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तेही ठीक. पण अशा नेत्यांपेक्षा जास्त धोका 'अंध व्यक्तीपूजेमुळे' किंवा 'काही एक गुप्त उद्देश मनात धरून' शब्दांचे खेळ करणार्‍या त्याच्या पाठीराख्यांमुळे होतो... वाईट इतकेच की त्या धोक्याचे परिणाम सर्व देशाला भोगायला लागतात.

("नेत्याला देव मानून अंध व्यक्तीपूजा न करणार्‍या; हाडामासाचा, चुका करू शकणारा माणूस समजणार्‍या; आणि त्याच्या चुकांना चुका असे म्हणण्याची हिंमत बाळगणार्‍या देशबांधवांचे क्रिटिकल मास भारतात केव्हा येईल?" असा विचार करणारा) इए

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2014 - 10:19 pm | संजय क्षीरसागर

१. बारा वर्ष सी बी आय, एस आय टी, कोर्ट इ अनेक गोष्टींचा ससेमिरा लावूनही नंतर आणि एकदाही आरोप सिद्ध झालेला नसताना परत तेच तेच उगाळत बसले तर अस्वस्थ काय त्याबाबत उघड राग आला तरी ते मानवी स्वभावाला धरून होईल असे "संतुलित" विचार केल्यास वाटेल.

मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे.

या लॉजिकवरनं मला कलमाडींच्या निलाजरेपणाची आठवण झाली. आत्ता तुरुंगातून सुटलेत, भ्रष्टाचार उघड दिसतोयं आणि स्टँड काय तर अजून आरोप सिद्ध कुठे झालायं? द्या मला तिकीट! अश्या माणसाला कुणी भीक देखिल देणार नाही आणि ही इज आस्किंग अ वोट!

चला त्यावरही मला काही म्हणायचं नाही पण रिलिफ कँप्सची मदत रोखणं? ती तर रेकॉर्डेड वस्तुस्तिथी आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे गुजराथ सरकारला तो पुरावा SIT ला देणं भाग पडलं. नाही तर मोदींनी स्वतःला `प्रतिगांधीच' म्हणायला सुरुवात केली असती.

आणि त्या उप्पर गुजराथ सरकारची ही मुजोरी (तिथेच नमूद केलीये):

Relief camp organisers alleged that the state government was coercing refugees to leave relief camps, with 25,000 people made to leave eighteen camps that were shut down. Following government assurances that camps would not be shut down, the Gujarat High Court bench ordered that camp organizers be given a supervisory role to ensure that the assurances were met

इतक्या घृणास्पद वृत्तीबद्दल कोणाताही संवेदनाशिल माणूस व्यथित होईल.

आणि विकास घडवण्याच्या प्रक्रियामागे जर ही मानसिकता असेलः

We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ...

तर असला विकास पुरुष काय कामाचा? तो देशात दुफळी माजवून सगळा देश अशांत करुन टाकेल.... हीच तर हिटलरची धारणा होती.

या बॅकग्राउंडवर केजरीवालांची संवेदनशिलता (वर दिलेल्या विडिओत) लक्षणीय आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्यावर कार्यकर्त्यांनी बिजेपीच्या कार्यालयावर जाण्याची गरज नव्हती असं त्यांनी म्हटलंय. आणि हिंसकपणा कोणत्याही परिस्थितीत निंदनीय आहे अशी कबुली देऊन प्रांजळपणे माफी मागितली आहे.

आता व्यक्तीपूजा कोण करतंय ते पाहा. बहुदा तुम्हाला मोदी देव वाटतायंत त्यामुळे त्यांचा अमानुषपणाही `सामान्य चूक' वाटतेयं. आणि अत्यंत किरकोळ प्रश्नांवर त्यांनी दाखवलेली (थोडीफार) मॅच्युरिटी `ग्रेट' वाटतेयं.

मोदींवर हत्याकांडाचा आरोप सिद्ध होणं न होणं हा प्रश्नच नाही. जातीय विषवल्ली त्यांच्या संपूर्ण विचारात भिनलीये. असला खुनशीपणा सत्ता मिळवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि आपलं उदिष्ट साध्य करण्यासाठी, आपण `देशभक्तीचंच काम' करतोयं असं भासवतो. इतकी नादान मानसिकता व्यक्तीला कोणत्याही थराला नेऊ शकते. रिलीफ कँप्सला मदत रोखणं हा केवळ उघड झालेला भाग आहे. पण पुरता सूड घेतल्यावरसुद्धा मरणासन्न व्यक्तींना मदत रोखणं अत्यंत नीचपणा आहे.

त्याही पुढे जाऊन अशा व्यक्तीला आपण योग्य आहोत असंच मन सांगत राहातं, एकहाती सत्ता मिळाल्यावर तर त्या विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्यासारखी होते आणि मग तो उन्माद बेफाम होतो. पण ही विषवल्ली देशाच्या भविष्यासाठी, एकसंधतेसाठी आणि ज्या वाचून काहीही विधायक होणं असंभव आहे त्या शांततेसाठी, घातक आहे.

नानासाहेब नेफळे's picture

22 Mar 2014 - 10:39 pm | नानासाहेब नेफळे

+१११११११११११११११११११११,हातोडा प्रतिसाद.
परंतु इंग्रजीचे भाषांतर करुन लिहा इथल्या काही लोकांना मोदींप्रमाणेच इंग्रजीचा कोणताही गंध नाही.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Mar 2014 - 9:46 am | मंदार दिलीप जोशी

नमस्कार नानासाहेब नेफळे उर्फ ग्रेटथिन्कर उर्फ टॉपगिअर्ड फिलोसॉफर उर्फ च'वहाण'

अर्धवटराव's picture

23 Mar 2014 - 12:22 am | अर्धवटराव

हे दुर्दैवी कांड का झालं, त्याची पुर्वोत्तर परिस्थिती काय होती हा एक अत्यंत सब्जेक्टीव्ह विषय आहे. त्यात दोषी कोण, कोणि काय भुमीका घेतल्या, हा देखील संवेदनाशील विषय आहे. ते मॅसेकर नव्हतं...ति दंगल होती... व त्यात 'सर्वधर्म समभाव' उफाळुन समोर आला.
हि घटना जर गुजरातच्या बाहेर घडली अस्ती तर एव्हाना भारतात नविन काश्मिर जन्माला आलं असतं. पण गुजराती माणसाचा स्वभाव आणि थोडंफार राजकीय सामंजस्य एकत्र आल्यामुळे या ज्वालामुखीवर कोणाला आपली पोळी शेकता आलि नाहि व आज गुजरात आपल्या नेत्याला प्रधानमंत्री बनवायचे प्रयत्न करतोय.
मोदि बाकि काहि असेल नसेल, पण तो पक्का गुजराती नक्की आहे. गोडधोड खाणं, श्रीमंतीची कास धरणं आणि आपल्या धंद्याकडे लक्ष देणं हा त्यांचा मुळ स्वभाव. कुठल्याहि सद्भावाला जागुन नाहि, तर आपल्या मुळच्या बनिया व्यक्तीमत्वाला अनुसरुन गुजराती माणुस देशविभाजनाचे उपद्व्याप करणार नाहि. त्यात त्यांचा काहि फायदा नाहि, हितसंबंध नाहि.

केजरीवालांच्या बॉडीलँग्वेज आणि भाषणावरुन त्यांच्या सद्भावनेचे तर्क मांडायचे झाल्यास मला तरी फार आशादायक चित्र दिसत नाहि. मुस्लीम मंच्यावर बसलेला केजरीवाल आम आदमीची टोपी घालत नाहित तर 'ति' टोपी घालतात. वंदे मातरम वा भारतमाता कि जय म्हणत नाहि तर इन्कलाब झिंदाबाद म्हणतात. मुलाखतीत केजरीवाल जेंव्हा निरुत्तर होतात तेंव्हा समोरच्या माणसाला खाऊ कि गिळु असा त्यांचा चेहेरा होतो. आता कोणि कुठली टोपी घालावी किंवा कुठला नारा द्यावा हा त्याचा चॉईस आहे... पण ड्बल स्टॅण्डर्ड्च्या बाबतीत हे साहेब अगदी तोडीस तोड आहेत व त्यांचा तोल रॉकसॉलीड तर सोडाच पण ओल्या चिकण्मातीएव्हढा तरी बजबुत आहे काय अशी शंका वाटते.

राहिला मुद्दा रिलीफ कँपचा... कुटुंब नियोजन आणि रिलीफ कँप एकाच परिघात येण्याचं कारण हे पण असतं कि रिलीफ कँपलाच (शरणार्थी कँपला देखील)आपलं कायमस्वरुपी वास्तव्याचं ठिकाण बनवणं असे प्रकार घडत असतात. सरकारला कधि ना कधि त्याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. अर्थात, ति वेळ आलि होति कि कसं माहित नाहि... व नसायचे चान्सेस जास्त वाटतात. मोदि व त्यांच्या माणसांना त्याबद्दल फार काहि सहानुभुती असावी असंही वाटत नाहि.
हे सगळं गृहीत धरुनसुद्धा व्हेन इट कम्स टुअ‍ॅबीलिटी अ‍ॅण्ड इंटिग्रिटी, मोदि केजरीसाहेबांपेक्षा खुपच उजवे वाटतात. अर्थात, हे आमचं सध्याचं वैयक्तीक मत.

हा प्रतिसाद म्हणजे उत्तम उदाहरण आहे. नेमका मुख्य मुद्दाच शेवटी घेतलायं त्यामुळे तिथून सुरुवात करु:

राहिला मुद्दा रिलीफ कँपचा... कुटुंब नियोजन आणि रिलीफ कँप एकाच परिघात येण्याचं कारण हे पण असतं कि रिलीफ कँपलाच (शरणार्थी कँपला देखील)आपलं कायमस्वरुपी वास्तव्याचं ठिकाण बनवणं असे प्रकार घडत असतात. सरकारला कधि ना कधि त्याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. अर्थात, ति वेळ आलि होति कि कसं माहित नाहि... व नसायचे चान्सेस जास्त वाटतात. मोदि व त्यांच्या माणसांना त्याबद्दल फार काहि सहानुभुती असावी असंही वाटत नाहि.

हा अत्यंत पोकळ आशावाद आणि अत्यंत कमकुवत समर्थन आहे.... तुम्ही स्वतःच त्याचं खंडन केलंय (अर्थात, ति वेळ आलि होति कि कसं माहित नाहि... व नसायचे चान्सेस जास्त वाटतात.)

त्याही पुढे जाऊन तुम्ही म्हटलंय : 'मोदि व त्यांच्या माणसांना त्याबद्दल फार काहि सहानुभुती असावी असंही वाटत नाहि.' त्यामुळे तुमचा सगळा युक्तीवाद व्यर्थ आहे.

कारण माझा मूळ मुद्दाच तो आहे : On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.

त्यामुळे खरं तर तुमच्या पुढच्या प्रतिसादाला उत्तर देण्याची गरज नाही.....पण एनी वे,

तुमची सुरुवात अशी आहे :

ते मॅसेकर नव्हतं...ति दंगल होती... व त्यात 'सर्वधर्म समभाव' उफाळुन समोर आला.

किती सावरणार? जे गेले ते सर्वधर्मीय नव्हते. जेंव्हा एका धर्मीयांनी हल्ला केला तेंव्हा दुसर्‍या धर्माचे गेले आणि दुसर्‍यांनी केला तेंव्हा पहिल्या धर्माचे गेले. याला 'सर्वधर्म समभाव' म्हणणं म्हणजे कहर आहे.

हि घटना जर गुजरातच्या बाहेर घडली अस्ती तर एव्हाना भारतात नविन काश्मिर जन्माला आलं असतं. पण गुजराती माणसाचा स्वभाव आणि थोडंफार राजकीय सामंजस्य एकत्र आल्यामुळे या ज्वालामुखीवर कोणाला आपली पोळी शेकता आलि नाहि

हत्याकांडाचा हेतू सूड होता आणि तो पुरेपूर उगवला गेला. त्यामुळे कुणाला पोळी भाजता आली नाही हा दांभिकपणा ठरतो. दोन्ही गोष्टी अमानवी आहेत. जशी पहिली घटना गैर होती तितकंच दुसरी घटना निंदनीय आहे. घटना कुठे घडली हा तर कमालीचा संकुचित विचार आहे. आणि देशाची एकसंधता विचारात घेता तो चुकीचा आहे.

मोदि बाकि काहि असेल नसेल, पण तो पक्का गुजराती नक्की आहे. ..... कुठल्याहि सद्भावाला जागुन नाहि, तर आपल्या मुळच्या बनिया व्यक्तीमत्वाला अनुसरुन गुजराती माणुस देशविभाजनाचे उपद्व्याप करणार नाहि. त्यात त्यांचा काहि फायदा नाहि, हितसंबंध नाहि.

इथे जात हा प्रश्नच नाही. रिलीफ कँप्सची मदत रोखली याचा रेकॉर्डेड पुरावा आता SIT कडे आहे.

जर उत्तराकडून प्रश्नाकडे जायचं तर ही वृत्तीच (दंगली घडवून आणायला कारणीभूत ठरली असं `सिद्ध करता' आलं नाही तरी) दंगल न थोपवायला कारणीभूत ठरली असा किमान आणि सरळ निर्देश करते.

केजरीवालांच्या बॉडीलँग्वेज...किंवा कुठला नारा द्यावा हा त्याचा चॉईस आहे... पण ड्बल स्टॅण्डर्ड्च्या बाबतीत हे साहेब अगदी तोडीस तोड आहेत व त्यांचा तोल रॉकसॉलीड तर सोडाच पण ओल्या चिकण्मातीएव्हढा तरी बजबुत आहे काय अशी शंका वाटते... वगैरे वगैरे.

ही तुमची वैयक्तिक मतं आहेत आणि माझी त्याच्या नेमकी विरुद्ध आहेत.

हे सगळं गृहीत धरुनसुद्धा व्हेन इट कम्स टुअ‍ॅबीलिटी अ‍ॅण्ड इंटिग्रिटी, मोदि केजरीसाहेबांपेक्षा खुपच उजवे वाटतात. अर्थात, हे आमचं सध्याचं वैयक्तीक मत.

तुमच्या वैयक्तिक मताला मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण कोणत्याही बाजूनं मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत याचा प्रतिवाद तुम्ही करु शकलेला नाही.

नानासाहेब नेफळे's picture

23 Mar 2014 - 12:44 pm | नानासाहेब नेफळे

संजयजी, तुमच्या प्रतिसादाशी सहमत.
+११११११११११११११११११

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 12:50 pm | श्रीगुरुजी

>>> इथे जात हा प्रश्नच नाही. रिलीफ कँप्सची मदत रोखली याचा रेकॉर्डेड पुरावा आता SIT कडे आहे.

हे पुरावे शेअर कराल का?

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2014 - 1:24 pm | संजय क्षीरसागर

दिलेल्या लिंकमधेच हे सर्व आलंय.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 1:28 pm | श्रीगुरुजी

>>> दिलेल्या लिंकमधेच हे सर्व आलंय.

दिलेल्या लिंकमध्ये फक्त भाषण आहे. मी तुम्हाला मोदींनी कॅम्प्स बंद केले होते किंवा कॅम्प्सची मदत थांबविली होती याचे पुरावे मागतोय. भाषण म्हणजे कृती नव्हे.

समजा नसतील पुरावे तर तसं सांगा. आम्ही समजून घेऊ.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 1:50 pm | श्रीगुरुजी

तुमच्याकडे पुरावे नव्हतेच. ते नसणारच याची मला खात्री होती. निराधार व पुराव्यारहीत आरोप करणे हा 'आप'वाल्यांना घटनेने दिलेला हक्क आहे. वाटेल ते आरोप आम्ही करू, तुम्ही पुरावे मागू नका असेच 'आप'चे धोरण आहे.

जरा हे वाचा.

http://www.gujaratriots.com/index.php/2010/07/myth-17-gujarat-government...

http://expressindia.indianexpress.com/news/fullstory.php?newsid=46538

या वृत्तांतातील काही परिच्छेद -

The Gujarat Government spent a lot of money for providing relief to the riot victims. None other than the UPA Government’s MoS for Home Sriprakash Jaiswal said this in the Rajya Sabha that too in a written reply on 11 May 2005. He said an amount of Rs 1.5 lakh was paid by the government to the next of kin of each person killed and Rs 5,000, Rs 15,000, Rs 25,000 and Rs 50,000 to those injured up to 10, 30, 40 and 50 per cent respectively.

In addition, Jaiswal said relief was also extended by the state government to the victims of the riots under the heads of cash doles and assistance for household kits, foodgrains to Below Poverty Line (BPL) families in affected areas, housing assistance, rebuilding earning assets, rehabilitation of small business, assistance to industries/shop and hotel and so on.

The state government, Jaiswal said has informed that a total of Rs 204.62 crore has been incurred by it towards relief and rehabilitation measures. The Gujarat government has also informed that they had published the data as recommended by the NHRC, he added.

And the Gujarat Government in an advertisement given in weekly India Today dated 6 May 2002 said-

“ At the rate of Rs 30 per person, the Government is spending Rs 35 lakh a day on providing foodgrains to the 1.1 lakh inmates of the 99-odd relief camps in the state, 47 of them in Ahmedabad.

The relief operations at the camps are being directly looked after by IAS officers of the rank of secretary to the state Government.

The camps in Ahmedabad have been divided into six groups. Each group is being monitored by a bureaucrat of the rank of secretary. The secretaries have been looking after the minutest problems of the inmates. Teachers were deputed in each camp to help the children prepare for the exams and the state Health Department has been taking special steps to look after the well being of the inmates. In order to rehabilitate the rural inmates, the Government has floated the Sant Kabir Awas Yojana as per the directions of Prime Minister A. B. Vajpayee. The scheme will enable the inmates to build houses.”(And in these camps were 1 lakh Muslims and 40,000 Hindus as well).

Not just this, the then Central Government of Atal Bihari Vajpayee also gave several packages to the victims- both Hindus and Muslims. He announced one on 4 April 2002 on his visit to Gujarat and gave another one on 1 May 2002 of Rs 150 crore.

हे वाचल्यानंतर मोदींविषयींचे सर्व गैरसमज व पूर्वग्रह दूर झाले असतील अशी आशा आहे.

दूर झाले असतील अशी आशा आहे?

केंद्र सरकारनं ३२ कोटी रुपये आर्थिक मदत केलीये आणि गुजरात सरकारनं केलेली मदत अशीये :

The state government initially offered compensation payments of 200,000 rupees to the families of those who died in the Godhra train fire and 100,000 rupees to the families of those who died in the subsequent riots, which local Muslims described as discriminatory.[179] Subsequently, the government set the compensation amount at 150,000 rupees.

पण हा सगळा पश्चात प्रकार आहे. आणि तो देखिल गुजराथ हायकोर्टानं प्रकरणाची दखल घेतल्यामुळे असावा.

मोदींचा मूळ स्वभाव हा आहे :

"What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way?

या उप्पर जर मोदी तुम्हाला सालस, सदगुणी आणि `सर्वधर्म समभावी' वाटत असतील तर तो तुमचा गैरसमज आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 8:53 pm | श्रीगुरुजी

>>> केंद्र सरकारनं ३२ कोटी रुपये आर्थिक मदत केलीये आणि गुजरात सरकारनं केलेली मदत अशीये :

सुरूवातीला तुम्ही रेटून खोटं सांगत होता की मोदींनी रिलीफ कॅम्प्स बंद केले आणि मदत देखील थांबविली. आता निदान मोदी सरकारने केलेल्या मदतीचे आकडे देताय, हेही नसे थोडके.

>>> The state government initially offered compensation payments of 200,000 rupees to the families of those who died in the Godhra train fire and 100,000 rupees to the families of those who died in the subsequent riots, which local Muslims described as discriminatory.[179] Subsequently, the government set the compensation amount at 150,000 rupees.

हे कुठे वाचले तुम्ही? विकीपिडीयावर का?

>>> मोदींचा मूळ स्वभाव हा आहे :

"What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way?

याविषयी पूर्वीच्या ३-४ प्रतिसादात लिहून तुमच्या दृष्टीकोनातील फोलपणा व पूर्वग्रह दाखवून दिलेला आहे.

>>> या उप्पर जर मोदी तुम्हाला सालस, सदगुणी आणि `सर्वधर्म समभावी' वाटत असतील तर तो तुमचा गैरसमज आहे.

तुमचा स्वत:चाच पूर्वग्रहदूषित गैरसमज झालेला आहे. कोणतेही पुरावे नसताना तुम्ही वारंवार मोदींना खुनशी, द्वेषी समजून त्याच्यावर सातत्याने टीका करत आहात.

बादवे, रिलीफ कॅम्प्स बंद झाले नव्हते व त्या कॅम्प्समध्ये पुरेशी मदत दिलेली होती हे सिद्ध करणारे पुरावे मी दिले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो. मोदींनी रिलीफ कॅम्प्सची मदत थांबविली व ते कॅम्प्स बंद केले, या तुमच्या खोट्या आरोपांच्या आधारासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का? पुरावे नसतील तर आपली चूक करून खोटे आरोप मागे घेणार का?

अर्धवटराव's picture

23 Mar 2014 - 8:01 pm | अर्धवटराव

नाण्याची दुसरी बाजु मांडतोय फक्त.

किती सावरणार? जे गेले ते सर्वधर्मीय नव्हते. जेंव्हा एका धर्मीयांनी हल्ला केला तेंव्हा दुसर्‍या धर्माचे गेले आणि दुसर्‍यांनी केला तेंव्हा पहिल्या धर्माचे गेले. याला 'सर्वधर्म समभाव' म्हणणं म्हणजे कहर आहे.

सुरुवात झाली गोध्रापासुन. तेही एक निमित्त झालं.तत्पपुर्वीच्या अनेक छोट्यामोठ्या दंगलींची धग लोकांमधे साचुन होती. गोध्राने काडि लावली. तुम्हाला जर वाटत असेल कि मोदि मुख्यमंत्री बनले, लागलीच त्यांनी लोकांना "मॅसेकरचे" आदेश दिले व आरामात ढोकळे खात बसलेले लोक लगेच तलवार घेउन कापाकापी करत सुटले ... सॉरी, आय डिसॅग्री. आणि या दंगलीची झळ केवळ एकाच समुहाला बसली असं तुमचं म्हणणं असेल तर अगेन सॉरी, आय डिसॅग्री.

हत्याकांडाचा हेतू सूड होता आणि तो पुरेपूर उगवला गेला. त्यामुळे कुणाला पोळी भाजता आली नाही हा दांभिकपणा ठरतो. दोन्ही गोष्टी अमानवी आहेत. जशी पहिली घटना गैर होती तितकंच दुसरी घटना निंदनीय आहे. घटना कुठे घडली हा तर कमालीचा संकुचित विचार आहे. आणि देशाची एकसंधता विचारात घेता तो चुकीचा आहे.

दंगलींपश्चात भाजपला गुजरातमधुन संपवण्याचे, कायमचं सामाजीक धृवीकरण घ्डवुन आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. सुदैवाने ते पुरेशे यसस्वी झाले नाहित. आज केजरीवाल देखील त्याच मृतांच्या टाळुवरचं लोणि खायला आतुर झाले आहेत. एव्हढं सगळं होऊन गेल्यावर सुद्धा आजपावेतो गुजरातने आपला तराजु घ्ट्ट धरुन ठेवला आहे. हेच जर युपी, बिहार, आंध्र, बंगाल वगैरे राज्यात झालं असतं तर ताचे परिणाम वेगळे असते.

इथे जात हा प्रश्नच नाही. रिलीफ कँप्सची मदत रोखली याचा रेकॉर्डेड पुरावा आता SIT कडे आहे.जर उत्तराकडून प्रश्नाकडे जायचं तर ही वृत्तीच (दंगली घडवून आणायला कारणीभूत ठरली असं `सिद्ध करता' आलं नाही तरी) दंगल न थोपवायला कारणीभूत ठरली असा किमान आणि सरळ निर्देश करते.

आय डोण्ट थिंक सो. हा बादरायण सबंध मला नाहि पटत.

तुमच्या वैयक्तिक मताला मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण कोणत्याही बाजूनं मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत याचा प्रतिवाद तुम्ही करु शकलेला नाही.

अमुक एक व्यक्ती धर्मांध, खुनशी आहे किंवा नाहि हे कोणि ,कुणाला ,कसं पटवुन देणार? संजय क्षीरसागर नामक आयडीचा प्रतिवाद करायला म्हणुन हा लेखन प्रपंच नाहि. जे काहि दिसतय , समजतय , ते आपल्या शब्दात मांडणं हाच एकमेव हेतु आहे. केजेरीसाहेबांच्या दुटप्पी वागण्याचे, त्यांच्या असंयमी, प्रसंगी हिंस्त्र वाटावी अशा बॉडी लँग्वेजचे कितेही पुरावे दिले तरी ते तुम्हाला पटणार नाहि. शेवटी प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन आहे, इन्फर्न्स काढण्याची पद्धत आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 8:59 pm | श्रीगुरुजी

>>> तुमच्या वैयक्तिक मताला मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण कोणत्याही बाजूनं मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत याचा प्रतिवाद तुम्ही करु शकलेला नाही.

अजून किती वेळ तुम्ही खोटं बोलत राहणार आहात?

मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत याचा एकही पुरावा तुम्ही आतापर्यंत देऊ शकलेला नाही. मोदींनी रिलीफ कॅम्प्स बंद केले होते याबद्दल तुमच्याकडे कणभरही पुरावा नाही. मोदी हेच दंगलीकरता जबाबदार होते हे सिद्ध करता येणार नाही हे तुम्हीच मान्य केले आहे. मोदी धर्मांध व खुनशी हे तुमचं फक्त वैयक्तिक मत आहे. तुमचं पूर्वग्रहदूषित वैयक्तिक मत हा पुरावा नव्हे.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 1:08 pm | श्रीगुरुजी

>>> चला त्यावरही मला काही म्हणायचं नाही पण रिलिफ कँप्सची मदत रोखणं? ती तर रेकॉर्डेड वस्तुस्तिथी आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे गुजराथ सरकारला तो पुरावा SIT ला देणं भाग पडलं. नाही तर मोदींनी स्वतःला `प्रतिगांधीच' म्हणायला सुरुवात केली असती.

रिलीफ कॅम्प्सची मदत मोदींनी रोखली याचे काही पुरावे आहेत का? "मी अशा कॅम्प्सच्या विरोधात आहे" असे म्हणणे म्हणजे कॅम्प्स बंद केले किंवा मदत रोखली असा होत नाही.

>>> Relief camp organisers alleged that the state government was coercing refugees to leave relief camps, with 25,000 people made to leave eighteen camps that were shut down. Following government assurances that camps would not be shut down, the Gujarat High Court bench ordered that camp organizers be given a supervisory role to ensure that the assurances were met

वर ठळक केलेले शब्द नीट वाचा. कॅप्सच्या सुपरवायझरने असा आरोप केला आहे. आरोप करणे खूप सोपे असते. पण अशा आरोपांचे पुरावे आहेत का? २५००० लोकांना कॅम्प्स सोडायला भाग पाडले असा वर आरोप आहे. कॅम्प्स सोडायला लागलेल्या किमान २५० लोकांची नावे पुराव्यासहीत देता येतील का? तसे नसेल तर पुराव्यारहीत केलेल्या अशा आरोपांना अर्थ नसतो. मोदींविरूद्ध जे असंख्य खोटेनाटे आरोप आहेत, त्यातलाच हा एक बिनबुडाचा आरोप दिसतो.

>>> We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ...

यावर मी याच पानात कालच प्रतिसाद दिला आहे. तुम्ही कदाचित वाचला नसावा किंवा माझा प्रतिसाद पूर्णपणे पटला असावा.

>>> तो देशात दुफळी माजवून सगळा देश अशांत करुन टाकेल.... हीच तर हिटलरची धारणा होती.

ही टिपिकल दिग्विजय, मनमोहन, पवार इ. च्या तोंडातील वाक्ये आहेत. अशा वाक्यांना काहीही अर्थ नाही.

>>> या बॅकग्राउंडवर केजरीवालांची संवेदनशिलता (वर दिलेल्या विडिओत) लक्षणीय आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्यावर कार्यकर्त्यांनी बिजेपीच्या कार्यालयावर जाण्याची गरज नव्हती असं त्यांनी म्हटलंय. आणि हिंसकपणा कोणत्याही परिस्थितीत निंदनीय आहे अशी कबुली देऊन प्रांजळपणे माफी मागितली आहे.

आधी काचा कोणी फोडल्या ते सांगा ना. काचा भाजप कार्यकर्त्यांनी फोडल्या का स्वतःच काचा फोडून भाजपवर आरोप करण्याचा खोटारडेपणा केला ते आधी स्पष्ट करा. जानेवारीत राखी बिर्लानेसुद्धा गाडीला चेंडू लागल्यावर थयथयाट केला होता. एकंदरीत स्वत:च गाडीच्या काचा फोडणे आणि भाजपवर ढकलणे ही 'आप'ची मोड्यूस ऑपरँडी दिसतेय.

>>> आता व्यक्तीपूजा कोण करतंय ते पाहा. बहुदा तुम्हाला मोदी देव वाटतायंत त्यामुळे त्यांचा अमानुषपणाही `सामान्य चूक' वाटतेयं. आणि अत्यंत किरकोळ प्रश्नांवर त्यांनी दाखवलेली (थोडीफार) मॅच्युरिटी `ग्रेट' वाटतेयं.

तुम्हीच केजरीवाल पूजा करत आहात. त्यांच्या प्रत्येक वाक्याचं तुम्हालाच अफाट कौतुक आहे. त्यांच्या प्रत्येक विसंगत व बेकायदेशीर कृतीला तुम्ही "आमचा अरू ना, लहानपणापासून बघा अस्सा लब्बाड आहे" असे कौतुकाचे बोल बोलून कौतुक करत आहात. आम्हाला मोदी देव वाटत नाहीत आणि त्याचबरोबर ते अमानुषही वाटत नाहीत. त्यांनी १२ वर्षांहून अधिक काळ कार्यक्षम राजवट चालवून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यांची उक्ती आणि कृती यात विसंगती नसते.

>>> मोदींवर हत्याकांडाचा आरोप सिद्ध होणं न होणं हा प्रश्नच नाही.

हा का प्रश्न नाही? त्यांच्यावर गेली १२ वर्षे हत्याकांडाचे आरोप झाले व प्रत्येक वेळी हे आरोप खोटे ठरले. तरीसुद्धा तेच चर्‍हाट सुरू.

>>> जातीय विषवल्ली त्यांच्या संपूर्ण विचारात भिनलीये.

ती कशावरून?

>>> असला खुनशीपणा सत्ता मिळवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि आपलं उदिष्ट साध्य करण्यासाठी, आपण `देशभक्तीचंच काम' करतोयं असं भासवतो.

ते खुनशी नाहीत. तुमच्या डोक्यात कमालीचा पूर्वग्रह आहे.

>>> इतकी नादान मानसिकता व्यक्तीला कोणत्याही थराला नेऊ शकते.

कोणत्या थराला?

>>> रिलीफ कँप्सला मदत रोखणं हा केवळ उघड झालेला भाग आहे.

रिलीफ कॅम्प्सची मदत रोखली याचे पुरावे आहेत का?

>>> पण पुरता सूड घेतल्यावरसुद्धा मरणासन्न व्यक्तींना मदत रोखणं अत्यंत नीचपणा आहे.

परत तेच. पुरावे द्या. खोटे आरोप करू नका.

>>> त्याही पुढे जाऊन अशा व्यक्तीला आपण योग्य आहोत असंच मन सांगत राहातं, एकहाती सत्ता मिळाल्यावर तर त्या विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्यासारखी होते आणि मग तो उन्माद बेफाम होतो. पण ही विषवल्ली देशाच्या भविष्यासाठी, एकसंधतेसाठी आणि ज्या वाचून काहीही विधायक होणं असंभव आहे त्या शांततेसाठी, घातक आहे.

तुमचे विचार अत्यंत एकांगी व पूर्वग्रहदूषित आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2014 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे.

आता कठीण आहे. संतुलित या शब्दाची व्याख्या बदलायला निघालात तर. तसे भारतीय राजकारणात बरेच नवे शब्दकोश लिहिले गेले आहेत त्यात हे नवीन नाही म्हणा...

सर्वप्रथम याची नोंद करा की माझे मस्तक कोणत्याही एका माणसाला अथवा पार्टीला वाहिलेले नाही, तो हक्क केवळ माझ्या देशाचा आहे... आणि असे असले तरच या बाबतीत " संतुलित" विचार करता येईल.

आता तुमच्या सो कॉल्ड संतुलित विचारातली विसंगती पाहूया:

१. विसंगती क्र. १:
मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे.

याला "प्रायव्हेट लॉजिक" म्हणतात. हे वाचून हसू का रडू असं झालं. पण असो. असं होतं खरं वारंवार. पण ते सोडून संतुलित विचार करूया. मुख्य म्हणजे स्वतःचे प्रायव्हेट लॉजिक दुसर्‍यावर थोपवणे बंद केले आणि दुसरा काय म्हणतो हे "नीट" वाचले तरी "खर्‍या संतुलित" विचाराच्या दिशेने वाटचाल सुरू होईल.

मॅसॅकर झालं... अगदी सत्य. ते कोणी केलं हे कोर्टात सिद्ध करून दाखवण्यासाठी बारा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने जंगजंग पछाडूनही त्यांच्या विरोधी पक्षात असलेल्या माणसाविरुद्ध सरकार (यात सीबीआय, पोलीस, इ सह सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व संस्था येतात) आणि गैरसरकारी संस्था कोर्टाला मान्य होऊन गुन्हा सिद्ध होईल असा पुरावा का जमा देउ शकले नाहीत?

का तुम्हाला म्हणायचे आहे की कोर्ट मुद्दामून सरकार विरोधी निकाल देत आहे? का सरकार आणि त्याच्या संस्था इतक्या गलथान आहेत की १२ वर्षातही ते सत्य शोधू शकले नाहीत? की तुमच्या माहितीच्या आणि समजुतीच्या पलीकडे काही आहे? विचार करा.

२. विसंगती क्र. २:

कलमाडी आणि सद्याच्या चर्चेतल्या मुद्यात काही विसंगती दिसत नाही आणि हे उदाहरण ओढून ताणून इथे आणून चर्चा भरकटावीशी का वाटली ! ही जर विसंगती वाटत नसली तर हे टोलवाटोलवी आणि मूळ मुद्दा भरकटवण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून नोंद करू ठेवा. तसे खरंच नसल्यास जास्त सिरीयस केस होते, तेव्हा ते राहूद्या.

३. विसंगती क्र. ३:

Relief camp organisers alleged that the state government was coercing refugees to leave relief camps, with 25,000 people made to leave eighteen camps that were shut down. Following government assurances that camps would not be shut down, the Gujarat High Court bench ordered that camp organizers be given a supervisory role to ensure that the assurances were met

या मुद्द्यावर मागच्याच प्रतिसादात लिहिणार होतो. पण मूळ मुद्द्याला भरकटवायला नको म्हणून सोडून दिला. पण आता परत हा मुद्दा उपस्थित केला गेला म्हणून त्याबद्दल लिहीत आहे:

हा दुवा विकीवरचा आहे... जेथे कोणीही कशीही भर घालू शकतो आणि त्याबाबत जर कोणी महत्त्वाच्या व्यक्तीने अथवा संस्थेने तक्रार केली तरच विकीचे अधिकारी ती भर काढून टाकण्याचा विचार करू शकतो... पण काढेलच असे नाही.
याचा अर्थ समजला नसल्यास (किंवा प्रायव्हेट लॉजिक वापरून अनर्थ करू नये म्हणून): विकीवरच्या "ज्ञानावर" वाचकाने आपल्या सारासार विवेक बुद्धीचा वापर करून विश्वास ठेवायचा असतो. याचा अर्थ विकीवर आहे ते सगळे खरे आहे असे नाही. त्या लेखनाचा विश्वासूपणा तपासून पाहण्याची जबाबदारी वाचकावर असते, विकीवर नाही.

तर मग वरच्या माहितीचा खरेपणा कसा तपासून बघणार ? तो असा...

विकीवरच्या तुम्ही कोट केलेल्या या 2002_Gujarat_violence त्या लेखातच त्या माहितीचा स्रोत दिलेला आहे. तो असा आहे:
१८५. "News Analysis: In absolving Modi, SIT mixes up Godhra, post-Godhra perpetrators". The Hindu. 15 May 2012.
जर स्वतःचे मत बनवण्यापूर्वी आणि विशेषतः ते पब्लिक फोरमवर टाकण्यापूर्वी हा सहज उपलब्ध असलेला दुवा मुळातून वाचणे हे "संतुलित" मतासाठी आवश्यक होते. कारण...

कारण कोट केलेली माहिती "हिंदू" या उघड मोदीविरोधी वृत्तपत्रातील "बातमी" आहे. शिवाय असे असूनही त्याच बातमीत खालील नोंदही आहे:

The SIT concludes: “In the light of the aforesaid discussion, the interpretation made on alleged illegal instructions … appear to be without any basis.” Because, “everywhere the genesis and intention was one and the same, i.e., to punish the culprits responsible for the Godhra incident in an exemplary manner, so that such incidents did not recur ever again.”

जर बातमी पूर्ण वाचली असलेली असेल तर या प्रकाराला "सिलेक्टीव्ह मेमरी लॉस" असे म्हणतात असे नमूद करू इच्छितो.

इन एनी केस (तुम्हाला अश्या इंग्लिश फ्रेजेस लिखाणात पेरायला आवडतात म्हणून ही खास तुमच्यासाठी :) ) एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे कोर्ट, एस आय टी, इ च्या निकालांंना (ज्याना काहीतरी वैधानिकता / कायदेशीरपण आहे) कमी लेखणे हे "संतुलितपणात" काय पण वैचारिकपणात पण बसत नाही :) कदाचित हा कोर्टाचा अवमानही असावा !

एक फार महत्त्वाचे वैयक्तिक मानसशात्रिय निरीक्षण...

केजरीवाल समर्थक आणि मोदीविरोधक यांच्या शाब्दिक कोलांट्याउड्या, चर्चा भरकटवणे, आणि विचित्र प्रायव्हेट लॉजिक वाचत आहे. हे दोघे नेते कसे आहेत यापेक्षा या कोलांट्याउड्यांचा सर्वसामान्य विचारी माणसावर होणारा परिणाम केजवालांना भारी पडेल आणि मोदींना फायद्याचे होईल असेच दिसते... कारण नैसर्गिकपणे मानवी स्वभावात हेकटपणे सतत टार्गेट केलेल्या माणसांबद्दल कणव निर्माण होते आणि सतत विदुषकी चाळे व शब्दांचे खेळ करणार्‍यांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होते.

बघुया काय होते ते. घोडा मैदान जवळ आहे.

आता शेवटी माझ्या देशबांधवांना कळकळीचे आवाहनः

आपण भाग्यवान आहोत. कशी का असेना, भारतात लोकशाही आहे. कोणती पार्टी आपली म्हणायची, कोणता नेता आपला म्हणायचा, कोणाला मत द्यायचे याचे आपल्या पूर्ण अधिकार आहेत. त्याचबरोबर या गोष्टी ठरवताना आपले डोळे, कान आणि मेंदू वापरायचा अधिकारही आपल्याला लोकशाहीने दिला आहे... तोही कृपया पूर्णपणे बजावावा. कारण आज आपण दिलेले मत आपले स्वतःचे, आपल्या पुढच्या पिढीचे आणि एकूण देशाचे भवितव्य ठरवत असते... आपण सिस्टिम सिस्टिम म्हणतो तिची सुरुवात आपणच अशी करत असतो.

******
असो. हा माझा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद.

तुमचा फोकस `मोदींनी दंगल घडवली हे सिद्ध होत नाही तस्मात ते दोषी नाहीत' असा आहे आणि त्यासाठी तुम्ही हा पुरावा देतायं :

The SIT concludes: “In the light of the aforesaid discussion, the interpretation made on alleged illegal instructions … appear to be without any basis.” Because, “everywhere the genesis and intention was one and the same, i.e., to punish the culprits responsible for the Godhra incident in an exemplary manner, so that such incidents did not recur ever again.”

इक्का, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, कोणत्याही Chief Minister नं दंगल घडवण्याच्या Instructions दिल्या हे सिद्ध करणं असंभव आहे इतपत समज प्रत्येक सुजाण व्यक्तीला हवी. तस्मात मोदीं मॅसॅकरला जवाबदार होते हा आरोप कधीही सिद्ध होऊ शकणार नाही.

पण मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत का हे कुणीही संवेदनाशिल माणूस त्यांच्या या वक्तव्यावरनं ठरवू शकतो:

"What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ..."

एखादं अमानुष कृत्य कोर्टात सिद्ध होणं वेगळं आणि त्याबद्दल स्वतःला शरम वाटणं वेगळं, हा बहुदा आपल्या विचारसरणीतला (किंवा संवेदनाशिलतेतला) फरक असावा.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी

>>> इक्का, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, कोणत्याही Chief Minister नं दंगल घडवण्याच्या Instructions दिल्या हे सिद्ध करणं असंभव आहे इतपत समज प्रत्येक सुजाण व्यक्तीला हवी. तस्मात मोदीं मॅसॅकरला जवाबदार होते हा आरोप कधीही सिद्ध होऊ शकणार नाही.

जर हा आरोप कधीही सिद्ध होऊ शकत नसेल, तर मोदीच याला दोषी आहेत हे विधाने कशाच्या आधारावर करता? तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, काँग्रेस सरकारने गेली अनेक वर्षे जंग जंग पछाडून सुद्धा मोदींविरूद्ध कणभरसुद्धा पुरावा मिळालेला नाही. पण तरीसुद्धा तेच दोषी आहेत हे वारंवार सांगण्याचा आटापिटा कशासाठी?

>>> पण मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत का हे कुणीही संवेदनाशिल माणूस त्यांच्या या वक्तव्यावरनं ठरवू शकतो:
>>> "What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ..."

पुन्हा एकदा तेच चर्‍हाट! मी माझ्या याआधीच्या २-३ प्रतिसादात तुमचे निष्कर्ष कसे चुकीचे व पूर्वग्रहदूषित आहेत हे दाखवून दिले आहे. त्याच्याविरूद्ध लिहिण्याऐवजी पुन्हा पुन्हा तेच चर्‍हाट सुरू आहे.

>>> एखादं अमानुष कृत्य कोर्टात सिद्ध होणं वेगळं आणि त्याबद्दल स्वतःला शरम वाटणं वेगळं, हा बहुदा आपल्या विचारसरणीतला (किंवा संवेदनाशिलतेतला) फरक असावा.

तुम्ही वारंवार पुराव्याशिवाय खोटे आरोप करत आहात. तुमचे आरोप धादांत खोटे आहेत हे सिद्ध करणार्‍या लिन्स मी दिलेल्या आहेत. आता तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2014 - 9:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

इक्का तुमच्या आणि माझ्या वैचारिकतेत जमीनास्मानाचा फरक आहे

ते तर आहेच. एकदम सहमत !

१. मी कोणालाही सबळ पुराव्याशिवाय आरोप झाले आणि ते माझ्यासाठी सोईचे आहेत या कारणाने डोळे मिटून कोणालाही दोषी मानत नाही. मग तो माझा मित्र नसला किंवा शत्रू असला तरी.

२. कोणावरही आरोप करण्यापूर्वी प्रत्येक पुरावा योग्य तेवढा तपासून त्याच्या विश्वासर्हतेची खात्री पटवणे हि एक सुबुद्ध नागरीक या नात्याने माझी जबाबदारी आहे असे मी समजतो. माझ्या मताविरुद्ध सबळ पुरावा कोणी नजरेत आणला तर त्यानुरुप माझे मत बदलायला मला लाज वाटत नाही... किंबहुना तसे केले नाही तर ते मला लाजीरवाणे वाटते.

३. माझा उच्च स्तराच्या भारतिय न्यायसंस्थेवर, राजकारण्यांपेक्षा खूप अधिक विश्वास आहे.

इतकेच पुरे आहे नाही का?

बादवे, तुमच्याशी सहमती दाखवलीय ;) तेव्हा यावर प्रतिक्रिया अपेक्षित नाही :)

वेताळ's picture

22 Mar 2014 - 6:06 pm | वेताळ

केजरीवाल च्या म्हणण्यानुसार त्याच्या गॅस उत्खनन कंपनीला मोदी मुळे फायदा पोहचणार आहे हे धांदात खोटे आहे
कारण केजी बेसीन मधला वायु हा एल्पीजी नसुन तो वायु रासायनिक खते व औद्योगिक वापरासाठी वापरला जातो
एलपीजी हा वायु तेल रिफायनरीचे बाय प्रोड्क्ट आहे.त्याची किंमत तसेच केजी बेसीन मधला वायु ह्या दोन्हीची किंमत केंद्रसरकार ठरवते.त्यात मोदीचा हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही.
२००६-०७ च्या दरम्यान एलपीजी सिंलेंडर्ची किंमत २७५ ते ३२५ रुपये दरम्यान होती ,नंतर केंद्र सरकारने त्यावरील सब्सिडी कमी केल्यामुळे ते आता १३५० च्या आसपास भेटते. ही किंमत मोदी ठरवत नाही तर आंतरराष्ट्रिय बाजार ठरवतो. आता ह्यात मोदीचा काय संबध?
आता केजी बेसीन मधला वायु हा फक्त कारखाने व खत निर्मीतीत वापरत असल्यामुळे त्याची किंमत वाढवली तरी त्याचा सरळ ग्राहकावर परिणाम होणार नाही. कारण एलपीजी किंवा वाहनात तो वापरला जात नाही.तरीही त्याची किंमत रिलायन्स वाढवणार आहे व त्याला मन्यता केंद्र सरकार देनार आहे. ह्यात मोदीचा काय हात आहे हे जरा लिहाना.उद्या जरी भाजपाचे सरकार आले तरी पुर्वीच्या करारानुसार रिलायन्सला किंमत वाढवुन द्यावीच लागणार आहे.
खेचरवाल वडाचे साल पिंपळाला लावत आहे. वेळीच जागी व्हा व त्याला त्याच्या जागीच ठेवा.

ही खाण्याची गोष्ट नाही. जर FIR बोगस असेल तर केजरीवालांविरुद्ध बदनामीची केस दाखल होऊ शकते. त्यामुळे कोणताही आगापिछा नसतांना FIR दाखल होत नाही. आणि आजपर्यंत तरी अशी कोणतिही केस दाखल झालेली नाही.

मुळात ही तक्रार प्रतिष्ठित व्यक्तींनी केली होती (Former cabinet secretary T.S.R. Subramanian, former chief of naval staff Admiral (retired) R.H. Tahiliani, leading lawyer Kamini Jaiswal and E.S. Sharma) आणि त्यावरनं हा FIR फाईल झालायं.

केजरीवालांनी म्हटलंय : If the rate of gas increases to $8 per unit from April 1, as decided by the Centre, it would lead to overall inflation as not just price of CNG, but that of power and fertilisers would also increase. आणि त्याचा परिणाम किंमती वाढण्यावर होईल.

तुम्ही विचारलंय : `ह्यात मोदीचा काय हात आहे हे जरा लिहाना'

त्यात मोदींचा हात आहे असं मी म्हटलेलं नाही. मुकेश अंबानी सरकारला लुटतायंत (54,000 Crores), मोदी त्यांच्या विमानातून निवडणूक प्रचारासाठी फिरतायंत आणि केजरीवालांनी त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्याचं साहस केलंय!

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2014 - 7:55 pm | श्रीगुरुजी

>>> Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way?

अगदी योग्य प्रश्न आहे हा. कुटुंब नियोजनाला काही लोक 'आमच्या धर्मात कुटुंब नियोजन निषिद्ध आहे' असे सांगून विरोध करतात. त्यामुळेच चीनसारखे कुटुंब नियंत्रण कायद्याने सक्तीचे करता येत नाही.

काही दिवसांपूर्वीच एक बातमी वाचली. एका मोलमजुरी करून जगणारे पति-पत्नी व त्यांचा ४-५ वर्षांचा मुलगा दुर्दैवाने एका अपघातात गेले. त्यांच्यामागे त्यांच्या ७ मुली अनाथ झाल्या आहेत. केवळ मुलगा हवा या हव्यासापायी ऐपत नसताना ८ मुलांना जगात आणणारे हे गुन्हेगार आहेत. खरं तर १ किंवा जास्तीत जास्त २ मुलांपेक्षा जास्त मुलांना जन्म देण्यास कायद्याने बंदी हवी. परंतु काही लोकांच्या विरोधामुळे हे होऊ शकत नाही. या गोष्टीचा धर्माच्या पलिकडे जाऊन विचार व्हायला हवा. दुर्दैवाने तसे होत नाही आणि तसे व्हावे असे कोणी बोलून दाखविले तर तो लगेच फॅसिस्ट, जातीयवादी, प्रतिगामी, हुकूमशहा, मानवतेचा शत्रू इ. इ. ठरविला जातो.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी

>>> पण या ओळींनी मी अंतर्बाह्य ढवळून निघालो :

On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.This speech was initially withheld by the Gujarat government from the SIT. In January 2010, the Supreme Court ordered the government to hand over the speech and other documents to the SIT.

"What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ..."[185]

>>> मोदी दंगल का रोखू शकले नाहीत, त्यांचं वागणं हेतुपुरस्सर होतं का याचा निवाडा केंव्हाही होईल. आणि मला त्यात पडायचं देखिल नाही. पण रिलिफ कँप्सची मदत रोखणं? इतका अमानुषपणा? आणि कारण काय तर :
______________________________________________________________________________

तुम्ही दिलेल्या वरील इंग्लिश वाक्यातून मोदींनी रिलीफ कॅम्प्सची मदत रोखलेली आहे असा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला? त्यांनी रिलीफ कॅम्प्स बंद केलेले नव्हते किंवा कॅम्प्सची मदत थांबविलेली सुद्धा नव्हती ही वस्तुस्थिती आहे. असे असताना त्यांनी अमानुषपणे रिलीफ कॅम्प्सची मदत रोखली असा थेट सोयिस्कर निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे झालात. पूर्वग्रहदूषित निष्कर्ष काढण्याआधी जरा सारासार विचार तरी करा.

>>>> अशीच जर प्रगती आणि विकास साधायचा असेल तर भारताची प्रगती झाली नाही तरी बेहत्तर पण इतकं हिणकस नेतृत्व या देशाला कदापीही नको हा माझा तरी निश्चय झाला.

तुमचे निश्चय तुमच्यापाशी. पण निदान सुतावरून तरी स्वर्ग गाठू नका आणि खोटे निष्कर्ष काढू नका.

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2014 - 11:34 pm | संजय क्षीरसागर

On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.

इतक्या ढळढळीत विधानला `सुतावरनं स्वर्ग गाठणं' म्हणणं म्हणजे मोदी भक्तीची परिसिमा झाली! आणि त्यांच्या भाषणाची सुरुवातच पाहा :

"What brother, should we run relief camps?

अर्थात, तुमच्या यापूर्वीच्या प्रतिसादावरनं बहुदा `समविचासरणीला' सारासार करता येणं अशक्य वाटतं.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 12:47 pm | श्रीगुरुजी

>>> On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.

या ओळीचा अर्थ असा होतो की मोदी रिलीफ कॅम्प्सच्या विरोधात आहेत.

पण विरोधात आहे असे बोलून दाखविणे आणि त्यानुसार खरोखर कृती करणे यात खूप अंतर आहे. तुम्ही या ओळीवरून असा सोयिस्कर अर्थ लावलात की मोदींनी कॅम्प्सची मदत थांबवून कॅम्प्स बंद केले. त्यांनी हे कॅम्प्स बंद केले असा या ओळीचा अजिबात अर्थ होत नाही. तुम्ही असा सोयिस्कर चुकीचा अर्थ काढलेला आहे. आणि खरोखरच कॅम्प्स बंद केले असतील तर त्याचे पुरावे द्यावेत. तुमच्या 'आप' समर्थकांचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही फक्त बोलण्यावरच विश्वास ठेवता व प्रत्यक्ष कृती बोलण्याच्या पूर्ण विसंगत असली तरी त्याकडे डोळेझाक करता. केजरीवालांच्या उक्ती आणि कृतीचे तुम्ही जर तटस्थ राहून विश्लेषण केले असते, तर केजरीवालांबद्दलचे तुमचे सर्व गोड गैरसमज दूर झाले असते. पण म्हणतात ना, 'झोपलेल्याला जागे करता येईल, पण झोपेचे सोंग घेणार्‍याला कसे जागे करणार?'.

>>> इतक्या ढळढळीत विधानला `सुतावरनं स्वर्ग गाठणं' म्हणणं म्हणजे मोदी भक्तीची परिसिमा झाली! आणि त्यांच्या भाषणाची सुरुवातच पाहा : "What brother, should we run relief camps?"

मोदींच्या विधानावरून त्यांनी कॅम्प्सची मदत रोखली व कॅम्प्स बंद केले असा ठाम सोयिस्कर निष्कर्ष काढणे म्हणजे आंधळ्या मोदीद्वेषाची परीसीमा झाली.

अर्थात, तुमच्या यापूर्वीच्या प्रतिसादावरनं, आंधळे केजरीवालप्रेम आणि पूर्वग्रहदूषित मोदीद्वेष यातून तुम्हाला बाहेर येणे अशक्य वाटतं.

नानासाहेब नेफळे's picture

23 Mar 2014 - 1:04 pm | नानासाहेब नेफळे

मदत रोखणे एक व बोलने वेगळे..

बोलण्यातुन मानसिकता कळत नाही काय???
प्रखर राष्ट्रवादाच्या
बोलाच्याच कढीला रोज उत आणुन भाषिक आणि वैचारीक शुद्धीची जहागिर फक्त आपल्याकडे असल्याचा राग आळवणार्या संघिष्ट रागदरबारींनी," बोललेत फक्त, केलेय का? असा आगाऊ प्रश्न विचारणे म्हणजे कमालच झाली.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 1:14 pm | श्रीगुरुजी

>>> बोलण्यातुन मानसिकता कळत नाही काय???

बोलण्यातून मानसिकता समजली असती तर राहुल, मनमोहन इ. नी आपल्या टोळीतील सदस्यांना गेली १० वर्षे देशाला लुटून दिले नसते. काही जणांच्या बाबतीत बोलणे आणि प्रत्यक्ष कृती यात महद्अंतर असते.

नानासाहेब नेफळे's picture

23 Mar 2014 - 1:23 pm | नानासाहेब नेफळे

व्वा !बरे झाले!! म्हणजे 'मोदी फक्त बोलतात परंतु ऊक्ती प्रमाणे कृती करत नाहीत, हेच आपण सिद्ध केलेत.

लोटीया_पठाण's picture

23 Mar 2014 - 11:31 pm | लोटीया_पठाण

म्हणजे या एका बालिश निष्कर्षासाठी इतका फाफट पसारा मांडला ??

कशाला असम्बद्ध प्रतिसाद येताहेत..तुझे बिन्ग फुटले आहे.

सरांनी मनाच्या व्यापारातु बाहेर पडुन राजकारणावर एक बिडो टाकुन का होइना जिलबि टाकली, हेच पाहुन भरुन आलंय,

बाकी चालु द्या

पैसा's picture

23 Mar 2014 - 3:18 pm | पैसा

त्यावर कित्ती मट्ठा ओतलाय ते पण बघ ना!

सुहास झेले's picture

24 Mar 2014 - 12:38 pm | सुहास झेले

होऊ दे खरच, मिपा आहे घरचं ;-)

दल(ब)दलीत अडकलेली लोकशाही नामक पंचवार्षिक योजना एकोण पन्नास दिवस दिल्लीत तरी गर्तेतून बाहेर येण्यासाठी धडपडली अन साठ वर्षे एकही प्रश्न न विचारणारे पक्ष अन त्यांचे कार्यकर्ते जाहीरनामा ह्या दुर्लक्षित गोष्टी कडे कॅलेंडर नव्हे तर घडयाळ घेउन बसले होते अन सेकंद काट्याकडे डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेऊन होते हे केजरीवाल आणि आपचे योगदान तरी मान्य केले पाहिजे.

असो. बरीच वर्षे झाली नकारात्मक मतदान करून ह्यावेळी मात्र कुठल्या पक्षाला मनापासून मत देता येईल. हारणे जिंकणे विषय वेगळा.

संपत's picture

24 Mar 2014 - 10:59 am | संपत

१०० % सहमत. मीदेखील पहिल्यांदाच सकारात्मक मतदान करणार आहे. माझ्या इथे आआपचा उमेदवार निवडून येईल ह्याची शक्यता फारच थोडी आहे. पण हारणे जिंकणे विषय वेगळा.

नानासाहेब नेफळे's picture

24 Mar 2014 - 11:11 am | नानासाहेब नेफळे

छान, आपल्याला शुभेच्छा.

होय. संपूर्णपणे सहमत. चार राज्यात एकदम सरकारं बदलली. पण बातम्या फक्त एकाच्याच. का?

यावेळी मत देणार.

केदार-मिसळपाव's picture

22 Mar 2014 - 6:19 pm | केदार-मिसळपाव

मला वाटत कि असच प्रतिसाद सर्वांना हवा आहे. चर्चा वाचली. एकुणच लोकांना कोण्यातरी तारणहाराची गरज आहे असे दिसते. तोपर्यंत त्यांना प्रस्थापित राजकारणी चालतील असेही दिसते. अरविंद ने खरच चुक केली राजकारणात येउन. त्याला पैशाचा भ्र्श्टाचार संपवायचा होता. त्यासाठी तो प्रयसुद्धा करत होता. लोकांना सगळे कसे पटकन आणि व्यवस्थीत हवे आहे. बघुया या वेळी मतदानाला कोण जाते ते. मला वाटते कि अरविंद ने निवडणुकीनंतर राजकारणातुन बाहेर पडावे आणि स्वार्थ बघावा. देशासाठी मोदी गांधी ठाकरे आहेतच.

विकास's picture

23 Mar 2014 - 6:44 pm | विकास

केजरीवालांच्या दिड तास बोलण्यावर एक दिड मिनिटाच्या चित्रफितीने पाणी पडले म्हणल्यावर गाडी परत मोदी आणि गुजरात दंगलीकडे वळली वाटतं. तसे काही अनपेक्षित नाही. या पुढे अशा धाग्यांच्या संदर्भात, "धाग्याचा मोदी झाला" असे म्हणायला हरकत नाही!

मला खालील दोन लिंक्स मिळाल्या ; एक मोदी आणी एक अरविंद साहेबांची

मोदी

https://www.facebook.com/photo.php?v=10201415435098984
अरविंद केजरीवाल
https://www.facebook.com/photo.php?v=10151998667933531

कुठे पाकिस्तान ला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे म्हणणारे मोदी आणि कुठे दिल्ली ऎलेक्शन झाल्यावर बाकीचे बोलू म्हणणारे अरविंद केजरीवाल साहेब.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2014 - 10:38 am | डॉ सुहास म्हात्रे

इतरांना "नेमका प्रश्न विचारला तर एक मिनीट अस्वस्थ झाले" असे म्हणणार्‍यांनी "देशाच्या सुरक्षेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या संबद्धी (ज्या बाबतीत प्रत्येक राजकारण्याला स्पष्ट मत असणे आवश्यक आहे)" केजरीवालांचे वर्तन आणि पलायन नक्की बघावे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2014 - 10:24 am | डॉ सुहास म्हात्रे

पोस्ट संबंधात तीन मुख्य आक्षेप घेतले गेले: एक, माझ्या निष्कर्षाला पुरावा नाही, दोन, मोदींविरुद्ध अपराध सिद्ध झालेला नाही, आणि तीन, मदत वास्तविकात रोखली गेली का?

मोदींच्या भाषणातला उधृत केलेला भाग हाच पुरावा आहे.

"हवेत कशाला रिलीफ कँप्स ? मी काय तिथे मुलं जन्माला घालायची केंद्र उघडू? आम्हाला कुटुंबनियोजनाच्या धोरणानं विकास साधायचा आहे. आम्ही पाच आणि आमचे पंचवीस! गुजराथ कुटुंबनियोजन राबवू शकत नाही का? कुणाच्या धारणा आमच्या मार्गातला अडथळा आहेत? कोणता धर्मपंथ मार्गातला अडथळा आहे?"

("What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ...")

या मानसिकतेचा अर्थ जर पुरेसा बोलका नसेल आणि आरोपच सिद्ध होण्याची वाट पाहायची असेल तर पुढच्या निवडणूकांशिवाय ती वेळ येणार नाही. मदत वास्तविकात रोखली गेली का ती नाईलाजानं करावी लागली हे ठरवणं अवघड आहे.

(कारण कालच मी त्यावेळचा विडिओ पाहिला. बाजपेयी स्वतः तिथे गेले होते आणि व्यासपिठावरनं म्हणाले `राजाने राजधर्म का पालन करना चाहीए. बस राजधर्म शब्द काफी है' पण इतक्या सौम्य शब्दात संदेश जाईल की नाही याविषयी साशंक झाल्यावर ते म्हणाले `किसीभी व्यक्ती की जात या जन्म बिना देखे मदद होनी चाहिए'. मग मागनं मोदी त्यांना हलक्या आवजात म्हणतायंत `वही तो हो रहा है साहाब'. मजा म्हणजे हा मोदींचा ऑफिशियल विडिओ आहे. बाजपेयींना व्यासपीठावरनं मोदींना सांगायची वेळ यावी यातच सगळं आलं)

मंदार दिलीप जोशी's picture

24 Mar 2014 - 2:13 pm | मंदार दिलीप जोशी

अगदी बरोबर बोल्ले. ते बरोबर तुम्ही चूक.

अर्धवटराव's picture

24 Mar 2014 - 6:04 pm | अर्धवटराव

मूळ चर्चेच्या अनुषंगाने, सग्ळे व्हिडीओ वगैरे बघितल्यावर, काहि सदस्यांना केजरीवालांची नियत आणि क्षमता सकारण संदिग्ध वाटते... असो.

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2014 - 9:09 pm | श्रीगुरुजी

>>> पोस्ट संबंधात तीन मुख्य आक्षेप घेतले गेले: एक, माझ्या निष्कर्षाला पुरावा नाही,

अजूनपर्यंत तुम्ही पुरावा दिलेला नाही. मोदींच्या कोणत्यातरी भाषणातील १-२ वाक्ये याला तुम्ही "आप"वाले पुरावा म्हणत असतील. परंतु तुमच्या दुर्दैवाने कोणतेही न्यायालय किंवा जग याला पुरावा मानत नाही.

अजून एकदा संधी देतो. तुम्ही मोदींविरूद्ध जे आरोप करत आहात ते सिद्ध करणारे पुरावे द्या. नाहीतर स्वतःची चूक कबूल करून आरोप मागे घ्या.

>>> दोन, मोदींविरुद्ध अपराध सिद्ध झालेला नाही,

बरोबर आहे. युपीए सरकारने सीबीआय, एसआयटी, एनआयए, आयबी, असंख्य एनजीओ, अनेक स्टिंग ऑपरेशन्स इ. च्या माध्यमातून जंग जंग पछाडून मोदींविरूद्ध साधा एफआयआर सुद्धा दाखल करता आलेला नाही. आरोप सिद्ध होणं तर लांबच राहिलं. खटला सुद्धा दाखल करता आलेला नाही.

>>> आणि तीन, मदत वास्तविकात रोखली गेली का?

मदत रोखली गेलेलीच नव्हती. रिलीफ कॅम्प्ससुद्धा बंद केलेले नव्हते. याचे पुरावे मी वर दिलेले आहेत. युपीए सरकारमधल्या एका वरिष्ठ मंत्र्याने संसदेत याची लेखी कबुली दिलेली आहे.

>>> मोदींच्या भाषणातला उधृत केलेला भाग हाच पुरावा आहे.

पुन्हा तेच. भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो. प्रत्यक्षात झालेल्या घटना हाच पुरावा असतो. दंगलग्रस्तांची मदत रोखली गेलेलीच नव्हती. रिलीफ कॅम्प्ससुद्धा बंद केलेले नव्हते. याचे पुरावे मी वर दिलेले आहेत. युपीए सरकारमधल्या एका वरिष्ठ मंत्र्याने संसदेत याची लेखी कबुली दिलेली आहे. जर भाषणातील १-२ वाक्ये हा पुरावा असेल तर युपीए सरकारमधील मंत्र्याने संसदेत लेखी खोटी कबुली दिली असा अर्थ होतो. जर १ रिलीफ कॅम्प देखील बंद झाला असता, तर टिस्टा सेटलवाड्/कुलदीप नायर्/महेश भट्ट/अरूंधती रॉय इ. निधर्मांधांच्या बरोबरीने सर्व विरोधी पक्षांनी थयथयाट केला असता. दुर्दैवाने हे तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्ही मुद्दाम वेड पांघरले आहे हे उघड आहे.

पुन्हा एकदा विचारतो. मोदींनी रिलीफ कॅम्प्स बंद केले होते किंवा कॅम्प्सची मदत थांबविली होती हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? किंवा दुसर्‍या शब्दात, युपीए सरकारच्या वरिष्ठ मंत्र्याने संसदेत खोटी माहिती दिली हे तुम्ही सिद्ध करु शकता का?

>>> या मानसिकतेचा अर्थ जर पुरेसा बोलका नसेल आणि आरोपच सिद्ध होण्याची वाट पाहायची असेल तर पुढच्या निवडणूकांशिवाय ती वेळ येणार नाही.

१२ वर्षे जंग जंग पछाडले तरी आरोप सिद्ध करता आलेले नाहीत. पुढच्या निवडणुकीपर्यंत अजून काय वेगळे होणार आहे?

>>> मदत वास्तविकात रोखली गेली का ती नाईलाजानं करावी लागली हे ठरवणं अवघड आहे.

जर हे ठरविणे अवघड असेल तर मदत रोखली गेली होती आणि कॅम्प्स बंद केले होते हे कशाला छातीठोकपणे आणि ठामपणे सांगत आहेत आणि ते देखील कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय? अजून किती दिवस खोटे बोलणार आहात?

>>> (कारण कालच मी त्यावेळचा विडिओ पाहिला. बाजपेयी स्वतः तिथे गेले होते आणि व्यासपिठावरनं म्हणाले `राजाने राजधर्म का पालन करना चाहीए. बस राजधर्म शब्द काफी है' पण इतक्या सौम्य शब्दात संदेश जाईल की नाही याविषयी साशंक झाल्यावर ते म्हणाले `किसीभी व्यक्ती की जात या जन्म बिना देखे मदद होनी चाहिए'. मग मागनं मोदी त्यांना हलक्या आवजात म्हणतायंत `वही तो हो रहा है साहाब'. मजा म्हणजे हा मोदींचा ऑफिशियल विडिओ आहे. बाजपेयींना व्यासपीठावरनं मोदींना सांगायची वेळ यावी यातच सगळं आलं)

तुम्ही पुन्हा खोटं बोललात. अर्धवट माहिती दिलीत. वाजपेयींची शेवटची वाक्ये सांगितलीच नाहीत.

हा पहा तो व्हिडिओ. http://www.ibtl.in/video/6293/atal-ji-actually-said-narendrabhai-is-foll...
_______________________________________________________________________________

यात वाजपेयींना वार्ताहर पश्न विचारते की, "मुख्यमंत्र्यांसाठी तुमचा काही संदेश आहे का?"

यावर वाजपेयी असे उत्तर देतात, "मुख्यमंत्र्यांसाठी माझा एकच संदेश आहे की त्यांनी राजधर्माचे पालन करावे. राजधर्म ... हा शब्द खूपच सार्थ आहे. मी त्याचेच पालन करत आहे. तेच करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. शासकासाठी प्रजेमध्ये भेदाभेद होऊ शकत नाही. ना धर्माच्या आधारावर ना जातीच्या आधारावर ना पंथाच्या आधारावर. "

यावर मोदी,"मी तेच करत आहे" असे उत्तर देतात.

यावर वाजपेयी पुढे सांगतात की "माझी खात्री आहे की नरेंद्रभाई हेच (राजधर्माचे पालन) करत आहेत. धन्यवाद!"

For years on end, sections that dominate the media and intellectual discourse have harped on the misinformation that former Prime Minister Atal Bihari Vajpayee asked Narendra Modi to “follow his Rajdharma”. See this video and hear yourself what Vajpayee ji said- apart from stating that every leader should follow his Rajdharma, he said that he is confident that Narendrabhai is following his Rajdharma!

_______________________________________________________________________________

संक्षी, कधीतरी खोटे बोलणे थांबवा. आणि जर आरोप करायचे असतील तर त्यासाठी सबळ पुरावे द्या.

एकंदरीत केजरीवाल व इतर आप समर्थकांना बिनबुडाचे आरोप करण्याचे व्यसन लागले आहे.

लंबूटांग's picture

24 Mar 2014 - 9:30 pm | लंबूटांग

स्वतःची चूक कबूल करून

गुड लक.

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2014 - 10:37 pm | संजय क्षीरसागर

भाषणातून मानसिकता कळते. ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पुरेशी बोलकी आहे.

वाजपेयींची शेवटची वाक्ये सांगितलीच नाहीत....यावर वाजपेयी पुढे सांगतात की "माझी खात्री आहे की नरेंद्रभाई हेच (राजधर्माचे पालन) करत आहेत. धन्यवाद!

तुम्ही फार सारवासारवी चालवली आहे. वाजपेयींना भर व्यासपीठावर `राजधर्माचे पालन करा, जातीभेद करु नका असे सांगावे लागते याचा अर्थच तो होत होता. आणि त्याच व्यासपीठावर मोदींना त्याचं (हलक्या आवाजात) स्पष्टीकरण द्यावं लागतं `वही तो कर रहे है ना साहाब'. हे परिस्थितीची कल्पना देण्यास पुरेसं आहे. जर भेदभाव होत नसता तर वाजपेयींना तसं (आणि खरं तर इतकं स्पष्ट) बोलायची गरजच काय? आता मोदींच्या स्पष्टीकरणावर वाजपेयींना त्यांची बाजू सावरावीच लागणार. कारण दोघंही राजकीय नेते आहेत आणि जनसमुदायासमोर बोलतायंत. पण तुम्हाला वाटतंय वाजपेयींनी मोदींची पाठ थोपटली!

तुम्ही दरवेळी पुरावे द्या आणि आरोप मागे घ्या हा घोषा लावला आहे. जर उघड पुरावे असते तर मोदींची कारकिर्द केंव्हाच संपली असती आणि त्यांच्या मानसिकतेचा उहापोह झालाच नसता. मी माझा आरोप मागे घेणार नाही कारण मोदींच्या प्रत्येक भाषणात निव्वळ भावनांना हात घालणे हा एकच अजेंडा दिसतो. वाराणसीच्या सभेत तर ते सरळ म्हणाले `भाई, रामराज्य तो लाना ही होगा'. आता त्यांना साळसूद समजणारे म्हणणार `बांधलंय का मंदिर अजून?' दाखवा पुरावा! आणि माझं म्हणणंय की हेतू उघड दिसतोयं, कशाला (पुन्हा) विषाची परिक्षा घ्यायची?

या उलट केजरीवाल इश्यू बेस्ड आहेत : भ्रष्टाचार मुक्त राजकारण आणि विनम्र प्रशासन! दॅट इज ऑल.

मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही. पण एक नक्की जेंव्हा पुरावे समोर येतील तेंव्हा अपरिमीत नुकसान झालेलं असेल आणि वेळ निघून गेलेली असेल.

गब्रिएल's picture

25 Mar 2014 - 10:53 am | गब्रिएल

मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही.

कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ...

पुरावे मागत्यात ल्येकाचे. आतापत्तूर आम्चा म्हादेव अरविंदानं पन दिलेका कदी पुरावे? आम्च काम नुस्ते आरोप करायचे. बास.

आमी म्हनलं कि कोंब्डा अंडि घाल्तो, तर घाल्तोच. आमी म्हनलं की रेडा धा मन दूद देतो, तर देतोच ! आमी म्हनलं की मन ह्ये मन नसत तर नसतच... पुरावे माग्तात लेकाचे ! आमि परत्यक्ष हे... काय... ते हेच... हाओत न्हाय का? मंग? पुरावे माग्तात लेकाचे !

आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमि ते हे हाओत बर्का? कळ्त न्हायका? सांगून ठिव्तो. पुरावे माग्तात लेकाचे !

आनि हो >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ... (कोन हाय्रे तिक्डे? झाला ना हज्जारचा रतीब ? आता तरी पटंल या अदानी जन्तेला)

वामन देशमुख's picture

25 Mar 2014 - 10:55 am | वामन देशमुख

...आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही.

काय बोललात संजयराव! लंबर येक! आआपची हीच तर मानसिकता/ कार्यशैली आहे, "आम्ही आरोप करणार पण तुम्ही पुरावे मागायचे नाही, नाहीतर आम्ही आरोप करणे थांबवू!"

श्रीगुरुजी, अर्धवटराव, इस्पीकचा एक्का, विकास आणि इतरांचे माहितीपूर्ण प्रतिसाद दिल्याबद्धल आभार.

नानासाहेब नेफळे,
तुम्हाला दिग्विजयसिंघ म्हणावं कि सलमान खुर्शीद कि जितेंद्र आव्हाड कि...

संजय क्षीरसागर's picture

25 Mar 2014 - 12:05 pm | संजय क्षीरसागर

माझा एकच स्टँड आहे की मोदी जातीवादी आहेत आणि जातीवाद खुनशी असतो.

जातीवाचकता उघडपणे आणता येत नाही. तो छुपा अजेंडा असावा लागतो. त्यामुळे मला पुरावा देता येत नाही याचा अर्थ `राममंदिराचं बांधकाम झालं नाही म्हणजे पुरावा नाही' असा काढणं आहे.

आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कलमाडी तुरुंगातून आलेत, भ्रष्टाचार झालेला उघड दिसतोयं पण त्यांचे निर्बुद्ध समर्थक विचारतायंत ` अजून झालायं का आरोप सिद्ध? मग द्यानं त्यांना तिकीट!' एकूण काँग्रेस आणि बिजेपीत काही फरक दिसत नाही. त्यांना पैश्याचा लोभ आणि यांना रामाचा! त्यामुळे भ्रष्टाचार आणि जातीवादाच्या विळख्यातून देशाची सुटका दुष्पूर आहे.

`इश्यू बेस्ड' आणि निर्वैयक्तिक राजकारण लोकांना कळेल तो सुदीन.

आता फक्त हर हर महादेवचा अर्थ `या आमच्या घरी जेवायला' असा काढला की झालं!

वेताळ's picture

25 Mar 2014 - 12:07 pm | वेताळ

pavitra kejariwal

पिशी अबोली's picture

25 Mar 2014 - 12:13 pm | पिशी अबोली

माझा एकच स्टँड आहे

संतुलित विचार करा... एकच एक स्टँड घेऊन काय बसता?

संजय क्षीरसागर's picture

25 Mar 2014 - 12:22 pm | संजय क्षीरसागर

आहो, तो एक स्टँड समजला की सगळं संतुलन आहे! देश निधर्मी होईल, सगळे एक होतील. राज्यकर्ते जातीवादावर जनतेत दुफळी माजवू शकणार नाहीत.

पिशी अबोली's picture

25 Mar 2014 - 12:26 pm | पिशी अबोली

म्हणजे तराजूत एका बाजूला ऑलरेडी एक किलो वजन टाकायचं.. आणि म्हणायचं हा एक स्टँड समजा, पुढे सगळं संतुलन आहे... अजब आहे बुवा...

आहो ऑलरेडी दोन्ही बाजूला भरपूर वजनं झालीयेत आणि जनता प्रलोभनांना खुळावलीये. एका बाजूला काँग्रेसचा अल्पसंख्यांकवाद आणि दुसर्‍या बाजूला बिजेपीचा हिंदूवाद. मी तराजू रिकामा करा सांगतोयं म्हणजे संतुलन येईल.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2014 - 1:31 pm | श्रीगुरुजी

>>> मी तराजू रिकामा करा सांगतोयं म्हणजे संतुलन येईल.

तराजू रिकामा करून एका तागड्यात केजरीवालांची खोटी आश्वासने व दुसर्‍या तागड्यात केजरीवालांचे खोटे आरोप टाका. आपोआप संतुलन येईल.

गब्रिएल's picture

25 Mar 2014 - 12:51 pm | गब्रिएल

आहो, तो एक स्टँड समजला की सगळं संतुलन आहे!

हां हां, संजय स्सार, यु आर रैट्ट. तुसी ग्रेट हो.
हामासबी आशिच म्हन्तिया बगा की, पय्लं ह्ये मान्य करा कि इज्राइल नकाशा वरून ग्येला पायजे, बास. आनि चला आता चर्चेला सुर्वात करूया.
पन काय्बि आसो. तुम्चा धागा लईच घोड्दौड करु लाग्लाय बर्का. टाका आजून दोनचार अडेलतट्टू काड्या कि तिन शतकं न्क्की. ह्ये ज्यास्त बरं हाय बर्का. काय्की त्ये मन बीन चे तुम्चे घाग्यास्नि कोन्बी फार चारा टाकत न्हवत ना.

मंदार दिलीप जोशी's picture

25 Mar 2014 - 1:17 pm | मंदार दिलीप जोशी

माझा एकच स्टँड आहे की मोदी जातीवादी आहेत आणि जातीवाद खुनशी असतो.>>

जातीयवादी की धर्मवादी?
आणि धर्मवादी असण्यात काहीच गैर नाही. तुम्ही बहुतेक वाळवंटी पुस्तक वाचलेले दिसत नाही :P

संजय क्षीरसागर's picture

25 Mar 2014 - 12:18 pm | संजय क्षीरसागर

`हर हर मोदी' असा नारा होता नाही का!

नानासाहेब नेफळे's picture

25 Mar 2014 - 12:23 pm | नानासाहेब नेफळे

हर हर च्या जागी 'हार हार 'असे करुन टाका ,कारण केजरीवाल आता वाराणसीत दाखल झालेत...

मंदार दिलीप जोशी's picture

25 Mar 2014 - 1:17 pm | मंदार दिलीप जोशी

हरायलाच दाखल झालेत :P

विनोद१८'s picture

25 Mar 2014 - 11:46 pm | विनोद१८

माझा एकच स्टँड आहे की मोदी जातीवादी आहेत आणि जातीवाद खुनशी असतो.

हे तुमचे त्रैराशिक जरा सविस्तर विशद करा, तुम्ही किवा तुमच्यासारखे लोक म्हणतात म्हणुन आम्ही त्यावर विश्वास ठेवावा काय ?? मोदी काय फक्त तुम्हालाच समजला, त्याला समजुन घेण्याचा जन्मसिद्ध मक्ता फक्त तुमच्याकडेच आहे का ??? तुमच्याशिवाय इतर सगळे मूढ आहेत असा तुमचा दावा आहे का ??? तुमचा वरील स्टँड सप्रमाण सिद्ध करण्याची कुवत तुम्ही बाळ्गता काय ??? बाळ्गत असाल तर करा सिद्ध आणि टाका त्याला आत. अख्खा भारत तुम्हाला 'सवाई केजरिवाल' अशी पदवी हे मी खात्रीने सान्गू शकतो.


`इश्यू बेस्ड' आणि निर्वैयक्तिक राजकारण लोकांना कळेल तो सुदीन.

याचा अर्थच असा की अशी परिस्थीती आज आपल्या देशातील राजकारणात नाही, याला जबाबदार या देशाचा गाडा गेली ६० वर्षे हाकणारे नाहीत का, की ती जबाब्दारी एकट्या मोदीचीच ??


आता फक्त हर हर महादेवचा अर्थ `या आमच्या घरी जेवायला' असा काढला की झालं!


याच अपेक्षेने गोरगरीब जनता त्याच्याकडे (मोदी) पहात आहे, असेच तुम्हाला सुचवायचे आहे ना ??

विनोद१८