माझा लोकलनामा :- भाग २

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
5 Feb 2014 - 10:06 am

माझा लोकलनामा:- भाग १

आपण सारे अर्जुन

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणे हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. याच लोकल ने मी ही प्रवास करतो, डब्यात चढलं नी पाठीवरची बॅग रॅकवर ठेवली कि माझी नजर पोहचते तिथ पर्यंत मी पाहतो, तेव्हा मला विविध रंगी, विविध ढंगी, विविध जाती, धर्म, पंथाचे लोक एका छोट्या जागेत सामावलेले पाहायला मिळतात.
या मध्ये कोणी काळा तर कोणी गोरा, कोणी ऊंच तर कोणी ठेंगू , कोणी केसांची झुलपे वाढवलेला तरुण कॉलेज कुमार, तर कोणी निवृत्तीला आलेले सदगृहस्त, कोणी नीटनेटका कडक इस्त्री केलेल्या कपड्यात, तर कोणी गबाळा, कोणी घार्‍या डोळ्यांचा, कोणी निळा, कोणी काळा, तर कोणी तपकिरी डोळ्यांचा. प्रत्येकाची चण वेगळी, शरीराची ठेवण वेगळी.

हे सगळे जण कसे आपआपल्या उद्योगात मग्न. कोणाचे पेपर वाचन, तर कोणाचे पुस्तक वाचन, कोणाचे जपमाळ ओढीत आपल्या देवाचे नामस्मरण , तर कोणी mobile वरती गाणी ऐकण्यात मग्न, तर कोणी डोळे मिटून आपल्याच नादात / विचारात तल्लीन, या प्रवासात जे रोज भेटतात त्यांचा एक समूह (Group ) तयार झालेला असतो. आणि मग त्यांच्यात एक प्रकारचे वेगळे नाते तयार झालेले असते. काही वारकरी भजन मंडळ असते जे रोजच भजन म्हणत कामाला जात येत असतात.
या भावनिक बंधातून एकत्र येवून स्वखर्चाने दसरा आणि आषाढी एकादशी सारखे सण साजरा करतात. या दोन दिवशी संपूर्ण गाडी आणि गाडीच्या डब्यामध्ये पताका,फुले यांनी गाडी सजवून देवी / देवतांचे फोटो लावून पूजा केली जाते सर्व गाडीतल्या प्रवाशांना प्रसाद वाटला जातो. इतर दिवशीही रोजाचा ढोकळा, इडली, सामोसा असा काहीना काही नाश्ता ते लोक (वर्गणी काढून) करतात.

पण हि लोकल पकडायची म्हणजे एक कसरतच असते. हि ठराविक लोकल सहसा कोणी चुकू देत नाही. जणू काही हि ट्रेन पकडली नाही तर अपमान अगदी घोर अपमान असे वाटावे.

आणि याच बाबतीत आपण सारे अर्जुन असतो असे मी म्हणतो.

तुम्ही स्टेशन वर पोहोचता तेव्हा platphorm खचाखच गर्दीने ओसंडून वाहत असतो. त्यात ट्रेन जर पाच, दहा मिनटे उशिरा आली तर गर्दीचा महापूर नुसता. आणि मग जसा ट्रेनचा पहिला डब्बा platphorm मध्ये शिरतो तसे सगळेच सज्ज होतात , आपला डबा कधी येतोय यावर मन एकाग्र .

आपापले पाकीट,बॅग, इतर वस्तु आणि महिला आपल्या पर्स, दागिने सांभाळून आपल्या समोर आलेल्या डब्याच्या handel वर लक्ष केंद्रित करतात. अशा वेळी म्हणजे या क्षणी आपण सगळेच आजूबाजूचे सर्व जग विसरून जातो किंबहुना इतर सर्व गोष्टी अपोपाच धुसर होतात आणि आपल्याला दिसत असते ते फक्त दरवाजाचे handel किंवा मधला खांब अगदी तसाच जसा अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसत होता. आणि एकदा ते handal हाती लागले कि मग तुम्ही जणू काही लढाई जिंकल्याचा आनंद होत असतो. मग आपल्या इच्छित स्थळी जायला मोकळे.

खरच हा प्रवास म्हणजे एक वेगळे विश्व आहे माझ्यासाठी.

पुढिल लेखात प्लॅटफॉर्म वरिल वेगवेगळॅ नमुने, जुन्या बांधकाम शैलीतील रेल्वे स्टेशनचे, रेल्वेच्या डब्याच्या आतमधले वेगवेगळे फोटे काढलेत ते दाखविन.


माझे मिसळपाववरील लेखन

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

5 Feb 2014 - 10:44 am | खटपट्या

चांगलंय

जेपी's picture

5 Feb 2014 - 11:06 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO:

पुढिल लेखात प्लॅटफॉर्म वरिल वेगवेगळॅ नमुने, जुन्या बांधकाम शैलीतील रेल्वे स्टेशनचे, रेल्वेच्या डब्याच्या आतमधले वेगवेगळे फोटे काढलेत ते दाखविन.
ओक्के... टाका लवकर.

आंबट चिंच's picture

6 Feb 2014 - 4:09 pm | आंबट चिंच

अगदि बाणा म्हणतो आहे त्याला अनुमोदन. फोटो लवकर येउद्या.

फक्त तुमच्यासाठीच नव्हे...तर... आपल्या सगळ्यांसाठी....

प्रमोद देर्देकर's picture

6 Feb 2014 - 5:18 pm | प्रमोद देर्देकर

अरे हो मु.वि.साहेब खरंय तुमचे, अंमळ चुकलेच माझे. पण मग तुमचेही अनुभव तुम्ही शेयर करा की.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2014 - 10:47 pm | मुक्त विहारि

१९८१ ते १९९१ ही १०/११ वर्षे मनसोक्त लोकलचा प्रवास केला.

ह्यातून घेतलेले धडे.

१. मराठी माणसाला कुणीच वाली नाही.कारण मुंबईत लोकल आहे पण रेल्वतील बरेचसे कर्मचारी अमराठी आहेत.

२. माणसाची कातडी जास्त जाड होत चालली आहे.पुर्वी म्हातार्‍या माणसांना सांभाळून घेतले जात असे.हल्ली प्रमाण बरेच कमी झाले आहे.निदान माझा तरी अनुभव असाच आहे.

३. मुंबईत नोकरीच्या ठिकाणी जायला पण लोकल लागते आणि नौकरी गेली तर लोकलच पोसते.मागच्याच महिन्यात १ जण भेटला होता.त्याची नौकरी गेल्या नंतर, तो रोज मस्जिद बंदराहून आले पाकाच्या वड्या आणि इतर वस्तू आणतो आणि लोकल मध्ये विकतो.

काम करू इच्छिणार्‍या (आणि शारिरीक व मानसीक द्रुष्ट्या सक्षम) माणसाला अद्याप तरी मुंबईत मरण नाही.

४. पुर्वी ठाणे ते बोरीबंदर पर्यंत प्रत्येक स्टेशनवर तिकीट चेकर असायचा अगदी कांजूरमार्ग्,चिंचपोकळी सारख्या कमी गर्दीच्या ठिकाणी सुद्धा.शिवाय अध्ये-मध्ये कधी पण चेकिंग व्हायचे.१९८१ ते १९९१ पर्यंत गाडीत चेकिंग होत होते.पण आजकाल टी.सी. शोधावा लागतो.

माझा मोठा मुलगा गेली ३ वर्षे लोकलने प्रवास करत आहे.त्याचा पास अद्याप कुणीच तपासला नाही आहे.मी पण गेली ५/६ वर्ष अधुन मधुन लोकलने प्रवास करतो.अद्याप पर्यंत माझा पास फक्त एकदाच चेक झाला आहे.

५. कॅन्सरच्या आणि अपंग लोकांसाठी असलेल्या राखीव डब्यातून नक्की किती गरजू (म्हणजे खरोखर ज्यांच्यासाठी ही सुविधा आहे असे) प्रवासी प्रवास करतात हा पण एक संशोधनाचा विषय आहे.बरे हे सगळे प्रवासी फास्ट लोकलनेच का जातात हे गौड्बंगाल अद्याप उलगडलेले नाही.

किसन शिंदे's picture

6 Feb 2014 - 5:57 pm | किसन शिंदे

आधी वाटलं लोकलमधल्या विविध अनुभवांवर लेख असेल.

आतिवास's picture

6 Feb 2014 - 6:37 pm | आतिवास

त्याच अपेक्षेने धागा उघडला होता.

खुप पोन्टेशियली लिहु शकतोस मित्रा ...पहिला, दुसरा, आणि तिसरा पॅरा ..मस्त ग्रिप घेतलीस ...पण मध्येच विषय सोडलास ...तरी ही दुसर्‍या भागात अजुन उत्तम लिहीशिल या आशेने ....

मदतगार अर्जुन :)

@ मु. वि. :-
१.मराठी माणसाला कुणीच वाली नाही.कारण मुंबई....>>> साफ चुक, मुंबईत मराठी माणसे आहेत पण त्यांना अभियंता वगैरे झाले की अमेरिका वगैरे सारखे पाश्चात्य देश आठवतात, रेल्वेत मराठी लोक तृतीय श्रेणी , चतुर्थ श्रेणीच्या तर कामाला हात पण लावत नाहित आणि तिथेच अमराठी व बहुतेक करुन भयै लोकांची सरशी होते. आपल्याला सुटाबुटातली नोकरी पाहिजे असते. शिवाय घरापासुन दुरहि नको असे सगळे लाड असतात. (आणि इकडे रा़ज ठाकरे उगिचच ओरडंत असतो. भयै का जिंकतात या विषयावर एक वेगळा धागा होईल.)

२. माणसाची कातडी जास्त जाड होत चालली आहे.पुर्वी म्हातार्‍या माणसांना सांभाळून घेतले ...
हो या बाबतीत थोडंसं सहमत हळुहळू ही संस्कृती लोप पावत चालंलीयं. पण अगदिच प.रे. सारखे म.रे. मध्ये होत नाही, इथे डब्यात एखादी बाई, बाई+लहान मुल, कुटंब यांना म.रे. मध्ये तरी विचारपुस केली जाते.

३. मुंबईत नोकरीच्या ठिकाणी जायला पण लोकल लागते आणि नौकरी गेली तर लोकलच पोसते ..... हे मात्र खरे ज्यांना काम नाही मिळत त्यांना ही रेल्वे थोडेफार का होईना पोटापाण्यापुरते पैसे मिळवण्यास मदत करते. अगदि दिवा - सांवतवाडी या रुटवर सुद्धा गावठी फळ, भाजीपाला विकणारे सगळे आपपली रोजी रोटी कमवत असतात.
(मला आठवण झाली ती १२/१५ वर्षांपुर्वी ची त्या वेळी डब्यात एक तुणतूणे घेवुन काय अप्रतिम गाणी छेडायाचा. खास करुन विरह गीत. त्यावेळी अमिर खानचा दिल पिक्चर हीट झाला होता त्यातली सगळी गाणी वाजवावीत म्हणुन त्याला फर्माईश असायची. आता कुठे दिसत नाहिये तो.)

४. पुर्वी ठाणे ते बोरीबंदर पर्यंत प्रत्येक स्टेशनवर तिकीट चेकर असायचा अगदी कांजूरमार्ग्,चिंचपोकळी सारख्या कमी गर्दीच्या ठिकाणी सुद्धा.शिवाय .... असतो तिकीट चेकर असतो पण तो ठराविक वेळी सहसा महिन्याच्या १० ते १५ तारिख हे त्यांचे दिवस पण गाडीत येणे कमी झाले आहे. कारण मुंब्र्याला मध्यंतरी वादावादी झाली होती. आणि तिकिट चेकरला डब्यातुन खाली फेकला होता.
५. कॅन्सरच्या आणि अपंग लोकांसाठी असलेल्या राखीव डब्यातून नक्की किती गरजू ....
हे मात्र १००% खरं . जास्त करुन सकाळी जेव्हा तिकिट तपासणीस नसतात तेव्हा या डब्यातुन अगदि कोणीही प्रवास करतात.

@ किसन / अतिवास :- माझा या पुढील लेख हे लोकलमधल्या विविध अनुभवांवर, तसेच टिपलेल्य विविध गोष्टींवर असतील. पण तो पर्यंत तुम्हीही तुमचेही अनुभव लिहा ना.
या रेल्वे बद्द्ल एक मात्र खरं की अगदि श्रीमंत व्यक्तींपासुन, मध्यमवर्गीयांपासुन, गरिबांपसुन ते भिकार्‍यां पर्यन्त कोणत्याही स्टेशन पासुन कुठेही, कधीही पार या टोकापसुन ते दुसर्या टोकापर्यंत सर्वजण प्रवास करु शकतात. इथे सगळे एका समान पातळी वर येतात. रेल्वे त्यांना सगळ्यांना सामावुन घेते.

पैसा's picture

9 Feb 2014 - 10:35 pm | पैसा

हा भाग जरा लहान वाटला. अजून येऊ द्या.