उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १)

मोदक's picture
मोदक in भटकंती
20 Jan 2014 - 8:33 pm

...तर गुजरातमध्ये उत्तरायण (संक्रांत) हा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जातो.

( याबाबत आता अधिक माहिती देण्याची आवश्यकता नसल्याने सरळ मुद्द्यावर येतो. ;) )

२००८ साली संक्रांत हा सण बडोद्यात कसा साजरा करतात हे प्रत्यक्ष पाहिले होते आणि पुन्हा येथे येवून हे सर्व अनुभवायचे आहे हेही त्याच वेळी ठरवले होते. नंतर दरवर्षी काही ना काही कारणाने गुजरात भेट शक्य होत नव्हती. मात्र ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा मित्रमंडळीत हा विषय निघाला व इतके दिवस सुट्टी मिळेल का हे सर्वजण चेकवू लागले.

डिसेंबर मध्ये घेतलेल्या सुट्ट्या.. नवीन वर्षाची सुरूवात.. त्याचा हाफिसातला लोड.. कौटुंबीक कारणे.. अशा अनेक कारणांमुळे एक एक जण कॅन्सल होवू लागला व शेवटी बहुदा एकट्यालाच जावे लागणार याचा अंदाज आला. प्लॅन डळमळीत होतो आहे असे दिसत असतानाच माझे बडोद्यामधील मित्र; मितेशजींना कॉलवून परिस्थितीचा अंदाज घेतला तर त्यांनी अत्यंत उत्साहाने "इसबार पक्का आना, अरे फेस्टीवल बहोत बदल गया है, नक्की आवो" असे सांगून माझा डळमळीत प्लॅन पक्का करवला.

या वर्षीची बाईक ट्रीपही व्हायची होती. मग बडोद्यालाच बाईकवरून का जावू नये असा विचार आला.

एकटाच..?? बाईकवरून..?? बडोद्याला..????
अरे तो खूप वर्दळीचा हायवे आहे रे..
वेडा आहेस का..? खूप लांब आहे ते.
अरे तुझी सिटी बाईक आहे, इतके अंतर झेपेल का..? (माझ्याकडे पॅशन प्लस आहे - साडेसत्त्याण्णव सीसी!)
एखादी बुलेट तरी अरेंज कर..
मुंबईत माझ्याकडे गाडी लाव आणि पुढे बसने / ट्रेनने जा!
जा.. पण बाईकने कशाला..???

अशा अनेक सूचना / कमेंट / बोलणी यांचा भडीमार झाल्यावर जाण्याचा विचार आणखी पक्का केला गेला. :D

सर्वप्रथम पुणे ते बडोदा रूट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात आली, मुंबई नंतर वापी-वलसाड-नवसारी-सुरत-कामरेज-अंकलेश्वर-भरूच अशी ठरावीक अंतरावर मोठ्या गावांची / शहरांची सोबत आहे आणि दरम्यानचे अंतरही फारसे नाहीये. त्यामुळे "गाडी घेवून गेल्यास फार काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आला तर बघू.." आणि जाण्याची तयारी सुरू केली.

पुणे ते बडोदा - मुंबईमार्गे. हा स्टँडर्ड रूट फायनल केला व टीमबीएचपी ची साईट मुंबई-अहमदाबाद रूटसाठी चेकवायला सुरू केली. टीमबीएचपीवरील मिळेल तो धागा आणि मिळेल त्या ठिकाणाहून माहिती मिळवल्यावर लक्षात आले की हा रूट एकदम शांत आणि निवांत आहे. घाट / बोगदे / डोंगर नसलेला सरळसोट मोठाला ३ लेनचा रस्ता आहे.

प्रवासाचे टेन्शन थोडेफार उतरले. त्यात मुंबईमध्ये मुक्कामाचा प्लॅन ठरला. आता आणखी निवांत जाता येईल याची खात्री झाली.

आता प्रवासाची खर्‍या अर्थाने तयारी सुरू केली.

सर्वप्रथम एक स्मार्ट फोन घेतला. मुंबई आणि बडोद्यातील रस्ते शोधण्यासाठी जीपीएसची नितांत गरज होती.

गूगल मॅप्सवरती पुणे ते वाशी, वाशी ते डोंबीवली (इस्ट) आणि डोंबीवली ते घोडबंदर या रूटची अनेकदा उजळणी केली (किमान ३० ते ३५ वेळा हा रूट चेक केला असेल!!)

गुजरात टुरीझमला कॉल करून बडोद्यातील पर्यटनस्थळे आणि बाकी काय काय बघता येईल याची चौकशी केली. गुजरात टुरीझमच्या बुवाने धो धो माहिती दिली. मेल आयडी विचारून घेतला आणि सगळी माहिती मेल केली.

मिपावरच मिळालेल्या सल्ल्याप्रमाणे बाईकचे ४०,००० च्या दरम्यान रनींग झाले असल्याने क्लच प्लेट, चेन सॉकेट, ब्रेकपार्ट्स आणि सगळ्या केबल्स बदलून घेतल्या.

'बफर' म्हणून पुणे बडोदा प्रवासानंतर एक व पुण्यात परतल्यावर दोन दिवस राखीव ठेवले.

सोबत नेण्यासाठी क्लच केबल, एक ट्यूब आणि एका बाटलीत पेट्रोल घेतले.

आणि शनिवार ११ जानेवारीची वाट बघणे सुरू झाले. या दिवशी सकाळी निघायचे होते. शुक्रवारी नाईट शिफ्ट करणे गरजेचे असल्याने दुसर्‍या दिवशीचा प्रवास कसा होणार याचे थोडेफार टेन्शन होतेच.

अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी झोप झाली नाहीच. मात्र दोनेक तासांच्या झोपेनंतर सहा साडेसहाच्या दरम्यान एकदम फ्रेश होवून जाग आली.

बाहेर पाहिले तर पुणे धुक्याची दुलई पांघरून शांत झोपले होते..

.

(पर्वती सापडते आहे का वरील फोटोत..?)

ट्रेकींग सॅक आणि त्याला अडकवलेली तेथे फिरण्यासाठी लागणारी छोटी सॅक असा सुटसुटीत जामनिमा ठेवला होता.

.

थंड हवेत गाडी चालवायला सुरूवात केली. आता पुढे हजार दीड हजार किमी प्रवास होणार होता.

सोमाटणे फाट्यावर पहिला थांबा घेतला.

.

लोणावळ्यात मगनलालकडे चिक्कीची खरेदी करून लोणावळ्यानंतरचा हायवेचा माझा आवडीचा सेक्शन लागला.
डोक्यावर दोन अजस्त्र पूल.. त्यांच्या बीम मुळे तयार होणारी एक गती आणि खाली गुळगुळीत रस्ता.. (खंड्याळयातून येताना हा रस्ता डोक्यावरच्या पुलांसकट वेगवान टर्न घेतो. खल्लास मजा येते त्या सेक्शनला!!!)

.

मुंबई-पुणे प्रवास गाडीवरून केला असल्याने एक्प्रेस हायवे आणि त्याच्या टूव्हीलरच्या एक्झिट्स माहिती होत्या. मात्र जाताना नक्की कसे हा मुद्दा होताच त्यातही कळंबोली सर्कलवरून वाशीला जावे की उरण मार्गे हा आणखी एक मुद्दा होता. यामुळे नक्की कुठून वाशीला पोहोचायचे ते शेवटपर्यंत ठरले नव्हते. लोणावळ्यानंतर अचानक टूव्हीलरला परवानगी नसलेला एक्प्रेस हायवे सुरू झाला. एकही पाटी नाही दिशादर्शक नाही.. मग पर्याय नाही म्हणून गाडी एक्प्रेसवेवर घेतली. अचानक खोपोली एक्झिटजवळ एक खाकी युनीफॉर्म दिसला. "च्याXX मामा घेतोय साईडला असे म्हणेपर्यंत तो युनीफॉर्म एक बस ड्रायव्हर आहे असे लक्षात आले."
बस्स्स!!!! डायवर मामा को ऑपरेटीव्ह होते. सगळ्या शंका आणि रस्त्यांची माहिती व्यवस्थीतपणे मिळाली.

त्यांना धन्यवाद देवून पुढे निघालो.

त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे उरण रस्त्यावर गाडी वळवली. अचानक एका पुलावर रस्ता चुकलेला हा दिसला.

.

वाशीला अमोल आणि माऊसोबत छोटेसा कट्टा झाला. भगत ताराचंद साहेबांकडे खादाडी केली.

गप्पा, हशा आणि दंगा करून झाल्यावर डोंबीवलीकडे कूच केले.

डोंबीवलीला मित्राकडे तासाभरात पोहोचून फ्रेश झालो व गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळालेच नाही. रात्री नऊ वाजता जाग आली. मित्राने एका अब्दुलमियाँकडून झकास बिर्याणी व लहसूनी चिकन अरेंज केले होती.

.

रात्री १२ पर्यंत गप्पा मारत बसलो व नंतर उद्याच्या प्रवासाची उजळणी करत दिवस संपला..

(क्रमशः)

प्रतिक्रिया

लवकरात लवकर पुढचा भाग टाकणे

हा चुकून पब्लीश झाला आहे. :(

अजून फोटो आहेत...

सुहास..'s picture

20 Jan 2014 - 8:52 pm | सुहास..

ते आम्हाला काय सांगता ? त्यांना सांगा , ते संपादक आहेत ;)

झाला झाला.. नीट पब्लीश झाला आहे.

धन्यवाद मोदक. ;)

संपादक मंडळाला कॉलवल्यानंतर लक्षात आले.. धागा भटकंतीत आहे, आपण बदल करू शकतो. ;)

हुप्प्या's picture

21 Jan 2014 - 3:29 am | हुप्प्या

पुलंच्या म्हैसमधले डायलॉक कुठे कुठे उपयोगी पडतील ह्याचा नेम नाही. ;-)

सुहास..'s picture

20 Jan 2014 - 8:50 pm | सुहास..

वेळ कमी पडला काय रे ? हात आखडता घेतला आहेस असे वाटले ..बाकी दोन फोटो आणि लेखनप्रारंभ, उत्सुकता जागृत करून गेली आहे याची नोंद घ्यावी..

सूड's picture

20 Jan 2014 - 9:04 pm | सूड

गणेशा झालाय !!

मोदक's picture

20 Jan 2014 - 10:21 pm | मोदक

आता दिसले का फटू..?

आणखी कोणाला फोटो दिसत नाहीयेत असे आहे का..?

सूड's picture

21 Jan 2014 - 2:33 pm | सूड

अजून दिसत नाहीयेत. फ्लिकर वरुन टाकलेस का? तसं असेल तर हापिसात दिसणार नाहीत मला, घरनं पाहीन.

मोदक's picture

21 Jan 2014 - 3:21 pm | मोदक

चेपू. :(

सूड's picture

21 Jan 2014 - 3:48 pm | सूड

हापिसात फक्त पिकासावरुन अपलोड केलेलं दिसतं, घरी निवांत बघेन फोटु.

कपिलमुनी's picture

21 Jan 2014 - 10:45 am | कपिलमुनी

फोटू दिसत नाही :(

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2014 - 9:09 pm | टवाळ कार्टा

आयला...बैकवर... मजा आहे

प्रचेतस's picture

20 Jan 2014 - 10:10 pm | प्रचेतस

मस्त रे.
पुभाप्र

सानिकास्वप्निल's picture

20 Jan 2014 - 11:29 pm | सानिकास्वप्निल

वाचतेय :)

रेवती's picture

21 Jan 2014 - 2:38 am | रेवती

वाचतीये.

प्यारे१'s picture

21 Jan 2014 - 2:47 am | प्यारे१

वाचतो आहे.

स्पा's picture

21 Jan 2014 - 7:36 am | स्पा

मस्त, वाचतोय

मन१'s picture

21 Jan 2014 - 7:37 am | मन१

छाछाअन

अजया's picture

21 Jan 2014 - 8:33 am | अजया

पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत!

असे काही अचाट करायचे असल्यास, कमीत कमी खफ वर टाकत जा. ज्याना इच्छा असेल ते येवू शकतात बरोबर. मी असतो तर ठाण्यापासून पुढे आलो असतो सोबत.

इरसाल's picture

21 Jan 2014 - 9:44 am | इरसाल

मोदका, मोदु फसवलेस ना ! मला काय म्हणाला होतास हे तरी आठव्तेय का? म्हणे बडोद्याला येणार तेव्हा तुला नक्की भेटेन, येवुन गेलास आणी माझ्या **** वारा सुध्हा नाही ?

झकासराव's picture

21 Jan 2014 - 10:01 am | झकासराव

आँ!!!!
बाइक वर.. :)
त्यासाठी स्पेअर पार्ट्स विचारत होतास होय.
एकटं जाण्यात मजाही आहे. :)
फक्त काहि अचानक अडचण झाल्यास लफडा होतो.
वाचतोय.
भाग पटापट येवु देत.

बाईक च्या पर्फोर्मंस बद्दल पण लिहा
म्हणजे किती मायलेज दिला , काही कुरकुर केली का ? तयार प्रेशर वेग्रे

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2014 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

वा वा ! मोदकाची खूप दिवसांनंतर हजेरी !

सुरुवात छान झाली. वर्णन आणि फोटो मस्त. पुभाप्र.

किसन शिंदे's picture

21 Jan 2014 - 11:36 am | किसन शिंदे

वाचतोय. पुभाप्र

दिपक.कुवेत's picture

21 Jan 2014 - 11:57 am | दिपक.कुवेत

वाचतोय...पुढिल भाग लवकर टाक

पिलीयन रायडर's picture

21 Jan 2014 - 12:43 pm | पिलीयन रायडर

म्स्त झालय रे भाग!!!
अजुन येऊ देत...

नाखु's picture

21 Jan 2014 - 12:44 pm | नाखु

तरी वर्णन देखील भन्नाट आहे..
पु.भा.प्र.

अनिरुद्ध प's picture

21 Jan 2014 - 12:44 pm | अनिरुद्ध प

दिसत नाहीत.बाकी प्रवासवर्णन त्रोटक वाटले पण आवडले.

वेल्लाभट's picture

21 Jan 2014 - 1:39 pm | वेल्लाभट

जबरदस्त आहे.... पुढचे भाग लवकर येऊद्यात बर का....एक्सायटेड आम्ही.
किती म्हणून असं काहीतरी करायची उर्मी आहे म्हणून सांगू आम्हालाही. पण साला...तुमच्या धाग्याचा पहिला परिच्छेद होतो आणि तिथेच धागा तुटतो. असो.

येऊद्यात पुढचं वर्णन... बेस्ट..!

मी_आहे_ना's picture

21 Jan 2014 - 2:29 pm | मी_आहे_ना

सही रे...वाचतोय (फोटो दिसत नाहीयेत, कदाचित हापिसातून बघतोय म्हणून असेल, असो. घरून निवांत बघेन.) पु.भा.प्र.

फोटो चेपूवरून अपडेट केले आहेत. काहीजणांना दिसत आहेत आणि काहीजणांना नाही हे मात्र कळत नाहीये.

प्रचेतस's picture

21 Jan 2014 - 4:11 pm | प्रचेतस

अरे दाद्या, बर्‍याच हापिसांमध्ये फेसबुक ब्लॉक असतंय. मग फोटू कसे दिसतील?
घरची बॅण्डविड्थ उगा कोणी फारशी जाळत नै.

ओक्के.. मला वाटले फोनवरही फोटो दिसत नाहीयेत.

पण, मी आत्ता चेपू ब्लॉक असलेल्या प्रॉक्सीवरून मुद्दाम चेक करून पाहिले. चेपू नाही पण येथे फोटो दिसत आहेत.

मंद्याच्या हाफिसात चेपू ब्लॉक आहे पण फोटो दिसत आहेत.

वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्या वेगवेगळ्या अग्नीभिंतीमध्ये असतात त्यानुसार चाळण होते ;)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2014 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा

सुरवात छान झालीये! :HAPPY:

श्री गणेशा'य नमः। ;)

अस्य श्री प्रवासवर्णनः स्तोत्रमंत्रस्य।
वायुवाहन ऋषि: । भटकंती देवता।
आनंच्छंदः। वेगेवेगे..धागे विनियोगः

चैत्रबन's picture

21 Jan 2014 - 9:25 pm | चैत्रबन

पुभाप्र :)

जोशी 'ले''s picture

21 Jan 2014 - 10:44 pm | जोशी 'ले'

मस्त.. वाचतोय

अक्षया's picture

23 Jan 2014 - 5:37 pm | अक्षया

मस्त फोटो आणि धागा..:)

अनन्न्या's picture

23 Jan 2014 - 6:01 pm | अनन्न्या

............

बॅटमॅन's picture

23 Jan 2014 - 6:09 pm | बॅटमॅन

मस्त धागा! पुढील भागांची उत्सुकता वाढवणारा.

पैसा's picture

28 Jan 2014 - 7:33 pm | पैसा

हा भाग मस्त. आता पुढचे सगळे भाग पटापट वाचते!

nitin Pandharkar's picture

14 Sep 2015 - 12:59 pm | nitin Pandharkar

mage ek lekh vachala hot Cycale konati ghyavi yar detail mahiti hoti ........koni madat karu shakel ka mala ti link milat nahiye

मोदक's picture

14 Sep 2015 - 7:55 pm | मोदक

http://www.misalpav.com/node/28858

हा तो धागा.. सायकल अ‍ॅक्सेसरीजचे फोटो दिसत नाहीयेत. ती ती नावे गुगलावीत. आणखी काही माहिती लागल्यास अवश्य विचारावे..

nitin Pandharkar's picture

15 Sep 2015 - 9:56 am | nitin Pandharkar

Mahiti kharach khup chan ahe.......me Cycle gheyach tharaw ahe pan nakki kalat anhi konti ghyavi. Me tumachya mhitichya adhare GIANT chi model pahile...parantu tyat performance ani sport do prakarat gallat hot ahe...cycle frame material aluminium ahe ...he jara khatakatay....maje 15 te 20 hajarant paryant rakkam guntau shakato.....tumhi jankar ahat ..ekhade model suchau skhakal ka...

nitin Pandharkar's picture

15 Sep 2015 - 9:59 am | nitin Pandharkar

On Road Ani off Road chale...ashi cycle pahato...atta survat karun nantar motta palla gathawa asa vichar ahe ....fakta swasukhasathi...