देवाचा हात दिसला !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
10 Jan 2014 - 11:35 pm

२३ जुलै १९९९ साली नासाने अवकाशात पाठवलेली भारतिय वंशाच्या सुब्रम्हण्यम चंद्रशेखर या शात्रज्ञाचे नाव दिलेली "चंद्र एक्स रे वेधशाळा" तिच्यापूर्वीच्या वेधशाळांपेक्षा १०० पट जास्त अंधूक असणार्‍या तारकापूंजांची छायाचित्रे घेऊ शकते. या वेधशाळेने सर्वप्रथम शोध लावलेल्या "देवाच्या हाता"ची (hand of God) अधिकाधिक स्पष्ट छायाचित्रे आता मिळू लागली आहेत.

देवाच्या हाताचे हे नविन छायाचित्र न्युस्टार (Nuclear Spectroscopic Telescope Array (NuSTAR)) या नासाच्याच अजून एका दुर्बीणीने पकडले आहे...

पृथ्वीपासून १७,००० प्रकाशवर्षे दूर असलेल्या PSR B1509-58 नावाच्या पल्सार प्रकारच्या एका मृत तार्‍याचे हे छायाचित्र आहे. हा तारा फक्त १९ किलोमीटर व्यासाचा आहे आणि तो स्वतःभोवती दर सेकंदाला सात वेळा फिरत आहे. त्याच्या फिरण्यामुळे त्याचे वस्तूमान बाहेर फेकले जाते आणि त्याचा भोवतिच्या चुंबकिय क्षेत्राबरोबर होणार्‍या क्रिया-प्रतिक्रियेने दृश्य आणि एक्स रे च्या प्रतिमा निर्माण होतात.

त्यामधून तयार झालेला हा हाताचा आकार कसा बनला, म्हणजे हे खरंच वस्तुमान आहे की केवळ प्रकाश आणि एक्स रे लहरींचा आभासी देखावा, याचे गुढ शोधून काढण्यामागे अनेक शात्रज्ञ लागले आहेत.

विज्ञानबातमी

प्रतिक्रिया

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 11:39 pm | बर्फाळलांडगा

.

सस्नेह's picture

12 Jan 2014 - 7:05 am | सस्नेह

+१ !

पहाटवारा's picture

11 Jan 2014 - 12:30 am | पहाटवारा

देवबाप्पा डावरे दिसतायत म्हणजे !
-पहाटवारा

देव डावा ;) कम्युनिस्ट असेल काय?

बाकी छायाचित्र का चित्र जे काही असेल ते चान चान आहे. :)

विकास's picture

11 Jan 2014 - 12:49 am | विकास

"हात" म्हणल्यावर कम्युनिस्ट कसा काय? ;)

वडापाव's picture

11 Jan 2014 - 1:00 am | वडापाव

की डावीकडे आहे?? हायला!! थाम्बा!! कन्फ्युस्ड!!

छे!! उजवाच हात दिसतोय तो. नीट बघा. समोरून पाहिल्यावर अंगठ्याचा तळहाताच्या बाजुचा भाग आपल्या उजवीकडे आहे.

अत्रन्गि पाउस's picture

11 Jan 2014 - 10:03 am | अत्रन्गि पाउस

जो पर्यंत नखे दिसत नही तो पर्यंत पंजा उपडा आहे कि समोरून हे कसे ठरवणार ??

विकास's picture

11 Jan 2014 - 12:48 am | विकास

फोटो आणि (मराठीतील) माहिती एकदम मस्त.

अजून फोटो आहेत का बघायला गेलो तर नासाच्या संस्थळावर (हबल टेलीस्कोपमधून घेतलेला) खालील एक मजेशीर फोटो मिळाला.

Photo

नासाने केलेले वर्णन खालील प्रमाणे:
Explanation: This dense cloud of gas and dust is being deleted. Likely, within a few million years, the intense light from bright stars will have boiled it away completely. Stars not yet formed in the molecular cloud's interior will then stop growing. The cloud has broken off of part of the greater Carina Nebula, a star forming region about 8000 light years away. Newly formed stars are visible nearby, their images reddened by blue light being preferentially scattered by the pervasive dust. This unusually-colored image spans about two light years and was taken by the orbiting Hubble Space Telescope in 1999. This Carina sub-cloud is particularly striking partly because its clear definition stimulates the human imagination (e.g. it could be perceived as a superhero flying through a cloud, arm up, with a saved person in tow below).

पहाटवारा's picture

11 Jan 2014 - 1:14 am | पहाटवारा

आम्हाला तर ब्वा हे 'मध्यमादर्शक' फाट्यावर कि काय म्हणतात असले वाटतेय ( अन हातास सहा बोटे असावीत असा अवांतर संशय! )
-पहाटवारा

बॅटमॅन's picture

11 Jan 2014 - 1:09 am | बॅटमॅन

फोटो जबराट आवडला!!!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2014 - 1:22 am | अत्रुप्त आत्मा

लै भारी!

कवितानागेश's picture

11 Jan 2014 - 9:31 am | कवितानागेश

छान आहे फोटो. डेस्कटॉप बॅकग्राउंड म्हणून वापरायला हरकत नाही ना? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jan 2014 - 11:19 am | डॉ सुहास म्हात्रे

जरूर वापरा. मीही तो जालावरूनच घेतला आहे, अधिकारमुक्त आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jan 2014 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांचे आभार !

अनिल तापकीर's picture

11 Jan 2014 - 12:09 pm | अनिल तापकीर

मस्त आहेत दोन्हीही

मेघवेडा's picture

12 Jan 2014 - 4:06 am | मेघवेडा

फोटो आवडला! मला वाटलं हा देवाचा हात!

आतिवास's picture

12 Jan 2014 - 8:53 am | आतिवास

'देवकण', 'देवाचा हात' .... या 'विज्ञानयुगात' शास्त्रज्ञांना झालंय तरी काय? ;-)

शास्त्रज्ञसुद्धा माणसेच असतात. ते जेव्हा गॉड्स पार्टीकल्स वगैरे शब्द वापरतात तेव्हा ती त्यांची देव या संकल्पनेवरील व्यक्तीगत श्रद्धा असते.

यशोधरा's picture

12 Jan 2014 - 9:40 am | यशोधरा

तशी परवानगी आहे का पण? ;) व्यक्तिगत श्रद्धा वगैरे असण्याची? मागे - म्हणजे हल्लीच - अशी श्र्द्धा बाळगणार्‍या भारतीय शास्त्रज्ञांना मिपावर ती परवानगी नाकारण्यत आली होती ना? ;)

जोपर्यंत एखादया व्यक्तीच्या श्रद्धा त्या व्यक्तीला आणि एकंदरीत समाजाला घातक ठरत नाहीत तोपर्यंत त्या व्यक्तीला कशावर श्रद्धा ठेवावी आणि कशावर ठेवू नये याचं स्वातंत्र्य असायलाच हवं.

यशोधरा's picture

12 Jan 2014 - 12:13 pm | यशोधरा

अगदी सहमत.

अगदी!!!! मिपाकरांनाच विचारून त्यांनी श्रद्धा वैग्रे ठेवायला पाहिजे होती =)) तरी नशीब त्यांनी लग्न कुणाशी करावे हे सांगितलं नाही.

धन्या's picture

12 Jan 2014 - 9:00 am | धन्या

रोचक आणि रंजक माहिती !!

अनिरुद्ध प's picture

13 Jan 2014 - 2:39 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

अनन्न्या's picture

14 Jan 2014 - 6:43 pm | अनन्न्या

आणि फोटोही मस्त!

पैसा's picture

21 Jan 2014 - 3:01 pm | पैसा

एक शंका (मूर्खपणाची असू शकेल.) या फोटोत रंग कसे दिसतात? आपल्याला आकाशात रात्री तार्‍यांचा फक्त प्रकाश दिसतो. असे स्पष्ट रंग जाणवत नाहीत. ग्रहांचे रंगही लालसर, पिवळसर असे दिसतात ते त्यांचे पृष्ठभाग, वायू यामुळे. पण तार्‍यांचीर सतत ज्वलनप्रक्रिया सुरू असते. मग तिथे रंग कसे आणि का दिसतात?

चांगली शंका आहे. रंगांचे म्हणाल तर त्याचे विश्लेषण पुढीलप्रमाणे -

प्रकाश म्हणजे लहरी असतात. आणि (विविध रंगांचा प्रकाश) म्हणजेच प्रकाशाचे विविध रंग हे प्रकाशलहरींच्या तरंगलांबीचे फल असतात (Color of light is the function of its wavelenght). आपल्याला जो पांढरा प्रकाश दिसतो तो म्हणजे प्रकाशाच्या संपूर्ण वर्णपटातील दृश्य भाग जो असतो त्याची सरमिसळ असते. जसे चित्र काढताना आपण लाल-पिवळा-निळा हे मूळ रंग एकत्र करून वेगवेगळ्या रंगछटा बनवतो तसे प्रकाशातही मूळ रंगाच्या तरंगलांबी असतात. त्या म्हणजे लाल-पिवळा-हिरवा. ह्या तीन रंगछटांचे विविध प्रमाणातील मिश्रण आपल्याला दूरदर्शनसंचाच्या पडद्यावर इतके सर्व रंग दाखवतो.

तारे आपल्या डोळ्यांना पांढरेच दिसतात कारण त्यांचा प्रकाश प्रचंड दूर अंतरावरून आलेला असतो आणि त्यातील विविध तरंगलांबी आपल्याला दिसू शकत नाहीत. याचे दुसरे उदाहरण म्हणजे अंतराळातून वेगवेगळे ग्रह वेगवेगळ्या रंगांचे दिसतात. उदा. पृथ्वी निळी दिसते. आता पृथ्वीवर खुद्द इतकी रंगसंगती आहे. तरीपण पृथ्वीवरून ज्या तरंगलांबीच्या किरणांचे सर्वात जास्त विकीरण होते आणि ज्या तरंगलांबी वगळता इतर सर्व तरंगलांबींचे किरण शोषले जातात, ती तरंगलांबी म्हणजेच निळा रंग अंतराळातून दिसतो. मंगळ तांबूस दिसतो कारण त्याच्या पृष्ठभागावरून लाल रंग वगळता इतर तरंगलांबीचे किरण शोषले जातात. हेच तत्त्व कुठल्याही पदार्थाला लागू आहे.

ज्वलनाचे म्हणाल तर त्यातूनही बाहेर पडणार्‍या तरंगलांबी ह्या ज्वलनप्रक्रियेच्या तापमानानुसार वेगवेगळ्या असतात. घरगुती उदाहरण म्हणजे मेणबत्तीचा प्रकाश आणि गॅसचा प्रकाश यातील फरक. (पिवळसर आणि निळसर. निळसर झाक ही उच्च तापमानाची निदर्शक आहे.)

ह्या फोटोत रंग दिसतात कारण प्रतिमेचे तेवढे विशालन केले आहे. सूर्याचेही आपल्याला तो इथून पांढरा दिसतो, जवळ जाऊन पाहिल्यास पिवळसर सोनेरी दिसतो आणि अगदी त्यातील वेगवेगळ्या सौरज्वालांचे नीट निरीक्षण केल्यास त्या चक्क काळसर ते तांबूस ते पिवळ्या अशाही दिसतात.

तार्‍यातून बाहेर फेकल्या जाणार्‍या प्रकाशाचे रंग हे खगोलभौतिकशास्त्रज्ञांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात कारण त्यातून तार्‍याचे तापमान मोजता येते. तसेच तार्‍यातील वेगवेगळ्या घटकांबद्दलही सांगता येते.

अर्थात क्ष-किरण छायाचित्रण आणि त्याचे प्रयोगशाळेत नंतर केले जाणारे विश्लेषण व इंटरप्रिटेशन ही सर्वस्वी वेगळी बाब आहे. मला वाटते अदिती याचे योग्य उत्तर देऊ शकली असती. (मी खगोलशास्त्रज्ञ नसल्याने वरील माहितीत कदाचित तफावत असू शकेल.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2014 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या डोळ्यातल्या नेत्रपटलात (रेटिना) दोन प्रकारच्या प्रकाश टिपणार्‍या पेशी असतात.

त्यातल्या एका प्रकारच्या पेशींचा आकार दंडगोल (रॉड) असतो आणि त्या प्रकाशाचे आस्तित्व आणि तीव्रता जाणवून देण्याचे काम करतात. या पेशी अत्यंत संवेदनाशील असतात आणि अतिशय कमी तीव्रतेचा प्रकाशही टिपू शकतात. परंतू त्यांचे संवेदन मेंदू फक्त पांढर्‍या (प्रकाश आहे) आणि काळ्या (प्रकाश नाही) रंगाच्या किंवा करड्या छटांच्या स्वरूपात जाणतो. या पेशी रंगारंगामध्ये फरक करू शकत नाही.

दुसर्‍या प्रकारच्या पेशीचा आकार शंखाकृती (कोन) असतो. या रंग ओळखणार्‍या पेशी असतात. मात्र या प्रकाशाची काही किमान तीव्रता असल्याशिवाय काम करू शकत नाहीत. त्यामुळे कमी उजेडात मानवाच्या डोळ्याला रंग बरोबर ओळखणे किंवा रंग अजिबात दिसणे शक्य होत नाही.

त्यामुळे अगदी कमी तीव्रतेचा कोणत्याही रंगाचा प्रकाश मानवी डोळ्यांना धुरकट पांढरा-करडा असाच दिसतो. यामुळेच आकाशातले बहुतेक तारे आणि आपली आकाशगंगा आपल्याला कमीअधिक तीव्रतेच्या पांढर्‍या-करड्या रंगात दिसतात.

आपण जी अवकाशातील, धृवीय ऑरोराची आणि खोल पाण्यातील जी चित्रे पाहतो ती अतिशय संवेदनाशील कॅमेरे वापरून, त्यांचे एक्सपोजर अनेक दशसेकंद किंवा काही मिनीटे ठेवून शिवाय नंतर संगणकीय प्रोसेसिंग करून मगच सुस्पष्ट आणि रंगतदार झालेली असतात ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2014 - 12:53 am | डॉ सुहास म्हात्रे

मानवी डोळा सर्वसाधारणपणे फक्त ४०० ते ७०० नॅनोमीटर तरंगलांबी असलेल्या विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटीक) लहरी पाहू शकतो. डोळे पाहू न शकणार्‍या यापेक्षा कमी आणि जास्त तरंगलांबीच्या अनेक लहरी विश्वात आणि खुद्द पृथ्वीवरही आहेत.

क्ष-किरण आणि इतर प्रकारच्या मानवी डोळ्यांना न दिसणार्‍या लहरी वापरून छायाचित्र काढताना संगणकाचा उपयोग करून त्यांचे मानवी डोळ्यांना दिसू शकणार्‍या रंगांच्या छटांत (४०० ते ७०० नॅनोमीटर तरंगलांबीत) रुपांतर केले जाते. त्यामुळे अश्या प्रकारच्या प्रकाशचित्राला "फॉल्स-कलर इमेज" म्हणतात. या लेखातले चित्रही अश्याच प्रकारचे "क्ष-किरण दुर्बिणीने" काढलेले छायाचित्र आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2014 - 4:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या फोटोत रंग कसे दिसतात?

हा फोटो ज्या दुर्बिणीने काढला आहे ती, न्यूस्टार दुर्बिण, क्ष-किरणांमधे काम करणारी आहे. थोडक्यात साध्या डोळ्यांनी ही किंवा अशी प्रतिमा दिसणार नाही, दृष्य दुर्बिणींना जी प्रतिमा दिसेल ती यापेक्षा फार निराळी असू शकेल. (बहुतेकदा असंच असतं.) कदाचित हा मेघ दृष्य प्रकाशात दिसणारही नाही.

क्ष-किरण दुर्बिण काम कशी करते हे सांगणं फार किचकट असल्यामुळे सोडून देते. या दुर्बिणीत शोषला जाणारे क्ष-किरण प्रकाश लहरींच्या स्वरूपातला असतो. वेगवेगळ्या तरंगलांबीचे (किंवा वेगवेगळी ऊर्जा असणारे) क्ष किरण या दुर्बिणीत वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या वेळी साठवले जातात. तुलनाच करायची तर वेगवेगळ्या रंगांचे फिल्टर वापरून एकाच दृष्याच्या प्रतिमा तयार करायच्या. आणि नंतर या प्रतिमा एकत्र केल्या जातात (ते फक्त छान दिसतं म्हणून. अभ्यासासाठी हे वेगवेगळं असणंच फायद्याचं असतं). 'पाहण्यासाठी' या प्रतिमांना त्यांच्या ऊर्जेनुसार (किंवा तरंगलांबीनुसार) रंग दिले जातात. जास्त ऊर्जेचे क्ष-किरण निळ्या रंगात, कमी ऊर्जेचे लाल असं. त्यातून हे रंग दिसतात. हे रंग पाहून, ठराविक वेळेस colour temperature चा अंदाज घेता येतो, पण या ठिकाणी असं करता येणार नाही. (का ते इथे सांगत नाही, वेगळा धागा करावा लागेल.)

या वायूचा आकार असा का बनला याचं उत्तर यथावकाश शोधलं जाईलच. (ही बरीच किचकट प्रक्रिया असते. त्यात बरंच computation वगैरे चालतं. पण साधारण काय होतं याचं मॉडेल आता सर्वमान्य आहे.) हा वायू तिथे येण्याचं कारण म्हणजे मूळ तारा मरतेसमयी त्यातून वायू बाहेर फेकला गेला असावा. किंवा एखाद्या राक्षसी आकाराच्या ताऱ्याने त्यातलं वस्तुमान बाहेर ओढलं असेल किंवा स्वतःचं काही वस्तुमान/वायू या ताऱ्याला देऊ केला असेल. आता या वायूमेघाच्या मधे जो न्यूट्रॉन तारा आहे, त्यातून त्याच्या प्रचंड वेग, चुंबकीय क्षेत्रामुळे इलेक्ट्रॉन बाहेर पडत आहेत. भारीत कण विद्युतप्रवाहातून प्रवास करतात तेव्हा विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडतात (कॉंप्टन इफेक्ट). त्या लहरी म्हणजे आपल्याला 'दिसणारे' हे क्ष-किरण.

खगोलशास्त्र आणि देवाच्या नावांबद्दल:
देवकण, देवाचा हात अशी नावं संशोधक नसणाऱ्या, पण विज्ञानात रस असणाऱ्या आणि (शास्त्रज्ञांचा चरितार्थ चालवण्यासाठी पैसे भरणाऱ्या) करदात्यांना आकर्षित करण्यासाठी दिली जातात. (बाबू) लोकांना खूष न केल्यास पुढे पोटापाण्याचा प्रश्न येऊ शकतो. पण मुळात अशी नावं टिंगल करण्यासाठीही दिलेली असू शकतात. विश्वोत्पत्तीबद्दल महास्फोटाचा सिद्धांत आता सर्वमान्य आहे. एकेकाळी तो नवा होता तेव्हा त्याची (पक्षी - मांडणाऱ्यांची) खिल्ली उडवली जात असे. त्यातूनच, टर उडवण्यासाठी दिलेलं नाव, big bang आता सवयीमुळे आणि सिद्धांत मान्य झाल्यामुळे सामान्य वाटतं. ('मिसळपाव'वर स्त्रियांचं पाशवीकरण झालेलं आहे तसं काहीसं!)

'देवकणां'चा संबंध भौतिकशास्त्रात वस्तुमान असण्याशी आहे. वस्तुमान म्हणजे mass. पण या mass चा अर्थ चर्चातली रविवारची मोठी प्रार्थना असाही होतो. त्यामुळे देव आणि देवाच्या वस्तुमानावर बरेच विनोदही करता येतात.

या 'देवाच्या हाता'वर काम करताना काही बिघडलं, निरीक्षणं करताना मधेच दुर्बिण बंद पडली तर देवाने ढवळाढवळ केली म्हणून बिघडलं असे विनोदही होत असणार आणि होत राहतील. ही नावं संशोधकांच्या धारणा दाखवण्यापेक्षा 'पॉप कल्चर', थोडक्यात काय विकलं जातं ते, दाखवणारी असतात (असा माझा मर्यादित अनुभव). ती तितपतच गांभीर्याने घेतलेली बरी. (त्यातही देवभोळी अमेरिका आणि सुधारणावादी पश्चिम युरोप असा फरक दिसतो का, हे पाहिलं पाहिजे.)

(संशोधक स्वतः आणि इतर संशोधकांसाठी खगोलीय गोष्टी किंवा सॉफ्टवेअर्सना नावं देतात, ती बऱ्यापैकी विनोदी आणि प्रसंगी दणकून अश्लील असतात. अशा शब्दांनी (jargon) भरलेला, एखादी तरुण विद्यार्थिनी आणि म्हातारा शिक्षक यांच्यातला संवाद, त्रयस्थाने ऐकला तर हे दोघेही चारित्र्यहीन आहेत अशीही शंका येऊ शकते.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2014 - 4:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"भारीत कण विद्युतप्रवाहातून प्रवास करतात तेव्हा विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडतात (कॉंप्टन इफेक्ट). त्या लहरी म्हणजे आपल्याला 'दिसणारे' हे क्ष-किरण."

हे वाक्य असे वाचावे:

भारीत कण विद्युतक्षेत्रातून (electric field) प्रवास करतात तेव्हा विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडतात (कॉंप्टन इफेक्ट). त्या लहरी म्हणजे आपल्याला 'दिसणारे' हे क्ष-किरण.

चित्रगुप्त's picture

22 Jan 2014 - 9:16 am | चित्रगुप्त

छान माहिती मिळाली.

आमचा एक शेजारी आहे, ख्रिस्ती, वय पन्नास, ग्रॅजुएट, चांगली नोकरी करणारा वगैरे.
त्याची अगदी ठाम समजूत आहे, की 'गॉड' म्हणजे आकाशात प्रत्यक्ष निवास करणारा, पांढरी दाढीवाला भव्य देव आहे.
हे चित्र म्हणजे अगदी पुरावाच मिळेल त्याला.

देव, गॉड वगैरेंबद्दल आमचा एक जुना धागा:
http://misalpav.com/node/23698

पैसा's picture

22 Jan 2014 - 11:46 am | पैसा

स्वॅप्स, इस्पीकचा एक्का आणि अदिती, माझ्या शंकेला एवढी सविस्तर आणि छान उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद! बर्‍यापैकी कळलं आहे.

इस्पिकचा एक्का यांच्या प्रतिसादातील एक अगदी छोटीशी दुरूस्ती -

दुसर्‍या प्रकारच्या पेशीचा आकार शंखाकृती (कोन) असतो.

ह्यात 'शंखाकृती' हा शब्द बरोबर नसून 'शंक्वाकृती' असा शब्द पाठ्यपुस्तकांमध्ये वाचल्याचे आठवतंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2014 - 11:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर !

सुधारणेसाठी धन्यवाद !

इंग्लिश "कोन" म्हणजे मराठीत "शंकु". म्हणून... शंकु+आकृती = शंक्वाकृती.

दंडगोलाकृती पेशी (रॉड)...

.

शंक्वाकृती पेशी (कोन)...

(दोन्ही चित्रे जालावरून साभार)

राजेश घासकडवी's picture

22 Jan 2014 - 9:38 pm | राजेश घासकडवी

मला तर लाल मंदिल, निळा अंगरखा घातलेला, चित्राच्या डाव्या दिशेला बघणारा, दाढीवाला माणूस दिसतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2014 - 10:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही सगळी देवाचीच करणी म्हणावी काय?... कोणाला काय दिसतंय, कोणाला काय... +D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jan 2014 - 2:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला फावडं आठवलं, इस्पिकवालं नाही. भारतीय प्रकारचं. हात म्हणण्यासाठी फारच फताडा वाटला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो मॅडम, देवाचाच हात तो. देव लै म्होट्टा असतोया, म्हंजे हातबी तसाच म्होट्टा आसनार की नाय? :) द्येवाच्या हाताला फताडा म्हणू नाय, पाप लागतं ;)

कवितानागेश's picture

23 Jan 2014 - 11:14 pm | कवितानागेश

तुम्ही फारच पुण्यवान आहात. अख्खा देव दिसला की दाढीसकट! :)

प्यारे१'s picture

24 Jan 2014 - 3:46 pm | प्यारे१

तुना दिसला काय गो माऊ?
जल्ला, मना नाय दिसत!
गुर्जी जरा टार्च मारा वो.

मदनबाण's picture

23 Jan 2014 - 9:13 pm | मदनबाण

बरीच माहिती मिळाली. :)
एक्का काका... जरा वेळ मिळाला तर Vedic Cosmology: Integrating God and Physics हे देखील वाचा. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही क्वांटम फिजिक्सवाले देव आहे हे सिद्ध करता येईल असे म्हणायला लागले आहेत... तेव्हा जरा सांभाळून ;)

अहो देवाचे अस्तित्व मुळात कर्ट गोडेलनेच सिद्ध केलेय!!!
वैदिक कॉस्मॉलॉजीची गरजच नाही, यवनांमधीलच एका मोठ्या आचार्याने सिद्ध केलेय.

यावर अथीइस्टांचे म्हण्णे काय आहे ते ऐकावयास आवडेल-जर नेहमीचा क्लिशे झालेला बाष्कळपणा त्यांना बाजूला ठेवता आला तर.

http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del's_ontological_proof

वरची लिंक अंमळ गंडली. राईट क्लिक न करता चोप्य पस्ते करावी. धन्यवाद.