आंध्रप्रदेशातील मंदिर

सचीन's picture
सचीन in जनातलं, मनातलं
1 Jan 2014 - 2:22 pm

आंध्र प्रदेशात सोनिया गांधी ह्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे त्यात सोनियाजींचा फोटो लावून दररोज नियमित पूजा केली जाते. सोनियाजींमुळेच तेलंगाना राज्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे तेलंगणातील जनतेला त्यांच्या बद्दल खूपच आदर वाटतो व ते सोनिया गांधीना यांना देवी मानतात.

तर अखंड आंध्रच्या समर्थकांनी स्व इंदिराजींचे स्मारक उभारले आहे. या मंदिराचे करीम नगर येथील तेलंगाना चौकात उद्घाटन झाले .या मंदिराच्या शेजारीच इंदिराजींचा पूर्णाकृती पुतळा आहे..

एखाद्या व्यक्तीचे मंदिर बांधणे हि तसे पाहिले विचित्रच गोष्ट आहे. ह्या पूर्वी मद्रास मध्ये खुशबू, हरियाणामध्ये धर्मेंद्र,जोधपूरमध्ये हेमामालिनी तसेच अनेक चित्रपट अभिनेत्यांचे मंदिरे आहेत. पण माझ्या मते एखाद्या राजकारणी व्यक्तीचे ती हयात असताना बांधलेले कदाचित हे पहिले मंदिर असावे.

भारतात अनेक महान नेते होवून गेले सद्य स्तिथीत भारताचे महान नेतृत्व सोनियाजी आहेत ह्या बद्दल कोणाच्याच मनात शंका असण्याचे कारण नाही.त्यांच्या वर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे देश प्रगतीपथावर जात आहे .त्या एखाद्या राज्यात प्रभाव असलेल्या नेत्या नव्हेत त्या संपूर्ण भारतातील धर्मनिरपेक्ष, गोरगरीब, दलित दुबळ्या जनतेच्या त्या आशास्थान आहेत.

विरोधी पक्षात नेतृत्वाचा दुष्काळ आहे हीही बाब तितकीच खरी.सोनियाजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वापुढे विरोधी पक्षातील नेते हे खुजे वाटतात त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव आहे.

हे सर्व जरी खरे असले तरी मंदिर बांधण्याची कृती हा व्यक्तीस्तोम माजवण्याचा प्रकार आहे असे मला तरी वाटते. एखाद्या व्यक्ती बद्दल आदर असणे वेगळे नि त्याचे अंधभक्त असणे वेगळे.

मागे एकदा पु ल देशपांडे ह्यांचे एक वाक्य वाचले होते 'ज्यांच्या पायावर आदराने डोके ठेवावे असे पायच राहिलेले दिसत नाहीत. ह्यालाच अनुसरून सध्या भारतात ज्यांच्या बद्दल आदर वाटावा अशा नेत्यांचा दुष्काळ पडलेला आहे. त्यातूनच सध्या राजकारणात असलेले एकमेव आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून सोनियाजींचे मंदिर आंध्रातील जनतेने उभारलेले असावे.

समाजलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Jan 2014 - 2:25 pm | मुक्त विहारि

?

अनिरुद्ध प's picture

1 Jan 2014 - 2:32 pm | अनिरुद्ध प

+१११११११११११११११

सौंदाळा's picture

1 Jan 2014 - 2:33 pm | सौंदाळा

अहो फ्री लान्सिंग पत्रकार असतात कोणत्याही बातम्या कोणत्याही व्रुत्तपत्राला विकणारे तसे काँग्रेसने आंतरजालावर फ्री लान्सिंग लोक पाठवलेले दिसतायत.
रोजचा हिशोब असेल त्यांचा आज मिपावर १० प्रतिसाद दिले, २ लेख टाकले, माबोवर ७ प्रतिसाद, १ लेख वगैरे वगैरे.
तुम्ही नका लक्ष देऊ, बुलफ्रॉग पिलेत का काल?

मुक्त विहारि's picture

1 Jan 2014 - 2:38 pm | मुक्त विहारि

काल एक नविनच कॉकटेल प्यायलो.

फोटो काढले आहेत. (म्हणजे कॉकटेल तयार करतांनाचे, कॉकटेलची नशा भिनल्या नंतर कुठले फोटो अन कुठले लिखाण?)

रात का नशा अभीतक गया नही.... :) :)

सन्दीप's picture

1 Jan 2014 - 3:00 pm | सन्दीप

मुद्दाम गहन विचार करणार्‍यांची आम्हाला गरज नाही."====

जेपी's picture

1 Jan 2014 - 4:00 pm | जेपी

स्वंय संपादित .

विनायक प्रभू's picture

1 Jan 2014 - 5:02 pm | विनायक प्रभू

शब्द दिला होता मुवि ने
अशा २५.२६ ला प्रतिसाद देणार नाही म्ह्णून.

मुक्त विहारि's picture

1 Jan 2014 - 5:10 pm | मुक्त विहारि

जास्त काही न लिहीता फक्त आणि फक्त चिन्हच वापरले...

सचीन's picture

1 Jan 2014 - 8:45 pm | सचीन

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5673066182866878265&Se...

लालूंनी मागितली सोनियांची माफी..देर आये दुरुस्त आये

विकास's picture

1 Jan 2014 - 9:46 pm | विकास

आंध्र प्रदेशात ...ते सोनिया गांधीना यांना देवी मानतात. checkbox
...या मंदिराच्या शेजारीच इंदिराजींचा पूर्णाकृती पुतळा आहे.. checkbox

... पण माझ्या मते एखाद्या राजकारणी व्यक्तीचे ती हयात असताना बांधलेले कदाचित हे पहिले मंदिर असावे.... checkbox

भारतात अनेक महान नेते होवून गेले सद्य स्तिथीत भारताचे महान नेतृत्व सोनियाजी आहेत ह्या बद्दल कोणाच्याच मनात शंका असण्याचे कारण नाही...दलित दुबळ्या जनतेच्या त्या आशास्थान आहेत. checkbox

..सोनियाजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वापुढे विरोधी पक्षातील नेते हे खुजे वाटतात त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव आहे. checkbox

हे सर्व जरी खरे असले तरी मंदिर बांधण्याची कृती हा व्यक्तीस्तोम माजवण्याचा प्रकार आहे असे मला तरी वाटते. checkbox

...त्यातूनच सध्या राजकारणात असलेले एकमेव आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून सोनियाजींचे मंदिर आंध्रातील जनतेने उभारलेले असावे. checkbox

Marks

मोदी असताना विपक्षात आपण म्हणता तितका अभाव नाहीय.

विकास's picture

1 Jan 2014 - 9:48 pm | विकास

मागे एकदा पु ल देशपांडे ह्यांचे एक वाक्य वाचले होते 'ज्यांच्या पायावर आदराने डोके ठेवावे असे पायच राहिलेले दिसत नाहीत.

पायावर डोके ठेवण्यासारखे नसतीलही कदाचीत, पण डोक्यावर पाय ठेवता यावेत असे बरेच जण आहेत.

हॅहॅहॅ... उगाच राहुल बाबांचे जोडे उचलणारे रमेश बागवे आठवले !

मैत्र's picture

4 Jan 2014 - 12:12 am | मैत्र

आयला.. बॉल थेट मैदानाच्या बाहेर!
फार दिवसांनी धम्याचे कॉफीचे नळ आणि कीबोर्डवर कॉफी आठवली..

पायावर डोके ठेवण्यासारखे नसतीलही कदाचीत, पण डोक्यावर पाय ठेवता यावेत असे बरेच जण आहेत. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>अगदी योग्य प्रतिक्रिया.डोक्यावर पाय ठेवावे असे बरेच जण आहेत. पण पायावर डोके ठेवावे असे व्यक्तिमत्व विरळाच.

मंदार दिलीप जोशी's picture

5 Jan 2014 - 4:19 pm | मंदार दिलीप जोशी

मु.विंची जागा चुकलीच. डोक्यावर पाय नव्हे हो XXवर :P

नक्शत्त्रा's picture

2 Jan 2014 - 12:07 pm | नक्शत्त्रा

""त्यातूनच सध्या राजकारणात असलेले एकमेव आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून सोनियाजींचे मंदिर आंध्रातील जनतेने उभारलेले असावे.""

आई ग !!!! कस काय होणार ह्यांचे!!!!

पायावर डोके ठेवण्यासारखे नसतीलही कदाचीत, पण डोक्यावर पाय ठेवता यावेत असे बरेच जण आहेत.

:-) लय भारी.

गब्रिएल's picture

2 Jan 2014 - 3:52 pm | गब्रिएल

आत्ताचा हाती आलेल्या बातमीपर्मानं ईतका बेधडक चाप्लूसबाजी कर्नारा दुस्रा कोनी मिळायला (इतालीसकट) आख्या दुनियेत लै म्हंजे लैच कटिन असल्यामुले उत्तुंग एक्मेव म्हान आस बरच काही व्यक्तिमत्व; धर्मनिरपेक्ष, गोरगरीब, दलित दुबळ्या जनतेच आशास्थान; वगेरेवगेरेवगेरे आसलेल्या खुद्द देविंनि खास चाराप्रसाद लालूजीच्या वशिल्यावरून सचीनभौची त्या देवळाच्या पुजार्‍याची नोकरी द्याच्या वशिल्याचे पत्र लिहून तयार ठेवलय...

सचीभौनी ताबडतोड पत्र घेउन कामी रुजु व्हावे आनि तितून रोज आंग चिकट व्हवून आंगोळ करायला लागल इतका मस्का मार्नारे लेख लिहून सोताचा उद्दार करावा... हि तो राऊलस्वामीन्ची विच्चा हाय बर्का.

सचीन's picture

3 Jan 2014 - 6:39 pm | सचीन

पुजारी बनण्यासाठी जे क्वालीफ़िकेशन लागते ते माझ्याकडे नाहीये गब्रिएल.

गब्रिएल's picture

4 Jan 2014 - 1:09 am | गब्रिएल

आत्त्त्त्त्त्त्त्ता काय म्हनावं ? तुमची आयडि सचीन पन खर नाव विनय नायतर विनोद आसनार बगा. खर्का नाय?

आवं माज्या पर्तिसादात ज्येव्डे म्हनून गून लिवलेत त्यापेक्षा जास्त गून तूमी तूमच्या जिल्ब्यातून पाजळ्वून दावलेत की? का हितबी शब्दाचं ख्येळ करताव राव. आमच्या गावाकडं लोकं म्हंत्याय की 'मी नाय त्यातली आनि...' जावद्या झालं. आता स्द्याच्या येळंला नुस्त आर्ती ववाळायचं काम तुमच्या इक्त कोनालाबी झ्याक जमनार नाय ह्यो हायकंमाडचा निर्नय हाय. तुमचा डोला कुट्ल्या दुसर्‍या पदावर आसल तर जरा दमानं घ्या. पुडच्या बारिला इचार व्हईल. तुमी आर्ती नीट ववाळली तर काय व्हनार नाय? आवो लोकं तर बाईचं घर आफिस काय मिळल ते साप करायला हातात झाडू घेउन तयार हाईत लायनीत. आनी तुमी तुमची आर्ती ववावळन्या पिएच्डी अस्ताना काय ते क्वालीफ़िकेशन (लय कटीन शबूद कापीपेष्ट क्येला तेवा जमला) नाय म्हनता? कैच्या कै विनयभौ,,, आपले ते विनोदभौ,,, नाय नाय ते आपलं सचीन्भौ (हैला लै कन्फूस केलं राव तुमी).

रमेश भिडे's picture

2 Jan 2014 - 6:43 pm | रमेश भिडे

भारतात अनेक महान नेते होवून गेले सद्य स्तिथीत भारताचे महान नेतृत्व सोनियाजी आहेत ह्या बद्दल कोणाच्याच मनात शंका असण्याचे कारण नाही.त्यांच्या वर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे देश प्रगतीपथावर जात आहे .त्या एखाद्या राज्यात प्रभाव असलेल्या नेत्या नव्हेत त्या संपूर्ण भारतातील धर्मनिरपेक्ष, गोरगरीब, दलित दुबळ्या जनतेच्या त्या आशास्थान आहेत. यापेक्षा अधिक विनोदी वाक्य वाचले नव्हते बर्याच दिवसात!

भारतातील सर्वधर्मीय लोक ज्यांना मानतात असा एखादा दुसरा नेता सांगा रमेश भिडे साहेब.

अब्दुल कलाम , अटल बिहारी वाजपेयी ही २ नावे तर सध्या लगेच सांगता येतील....

श्रीगुरुजी's picture

4 Jan 2014 - 8:19 pm | श्रीगुरुजी

>>> यापेक्षा अधिक विनोदी वाक्य वाचले नव्हते बर्याच दिवसात!

बर्‍याच दिवसात? अहो, या विनोदमूर्तींनी गेल्या महिन्याभरात अनेक तुफान विनोदी लेख बुंदी पाडावी तसे पाडलेले आहेत. ते वाचले नाहीत वाटतं? २०१४ ची सुरूवातच त्यांनी षटकाराने केली आहे. प्रत्येक वाक्याला हसू आवरत नव्हते. हे विनोदी लेखन वाचून नेह्मी कोरा चेहरा ठेवणारे स्थितप्रज्ञ मौनमोहन सिंग सुद्धा खो खो हसले असते.

सचीन, असेच विनोदी लेखन लिहीत चला. नवीन वर्षात छान करमणूक होत आहे.

आनन्दा's picture

3 Jan 2014 - 8:22 pm | आनन्दा

चला... मिपाकर शहाणे झाले म्हणायचे.