( कंदील )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
19 Jul 2008 - 2:01 pm

आमची प्रेरणा श्री. अंबोळी यांचा कंदील
चाल :मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रुपी तुझा देव आहे
----------------------------------------------------------------------

अंगणात कंदीलात तोच काळ आहे.
नाना वाती नाना ज्योती उभा तोच आहे.

तीच कंदीलाची मुर्ती, तीच काळजात भीती
तीच कडी, तीच खुंटी, मुकतधाम आहे.

मयताच्या किर्तनात तिरडीच्या चिंतनात
तोच शाप, तोच बाण, लास्ट श्वास आहे.

तोच यम, मरणही, आयुष्याचा विश्रामही
तोच ऐल, तोच पैल, आत्मा शांत आहे.
-------------------------------------------------------------------------
मुळ गाणे-

मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रुपी तुझा देव आहे

तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे

संताचिया कीर्तनात, साधकाच्या चिंतनात
तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे

तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे

गीत - सुधीर मोघे
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - धाकटी सून (१९८६)

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

19 Jul 2008 - 2:29 pm | आंबोळी

विडंबने पाडून कंदीली प्रतिमा पुसून टाकायचा अयशस्वी प्रयत्न करतोय....
पण बिरुटेशेठना हार्टली घंटा वाजेना आणि केळकरांनी तर आता आमचा कंदीलावरच कविता केलीय....
छ्या बोवा ! आम्हाला कोणी कंदीलाच्या भुमिकेतून बाहेरच पडू देत नाहिये. ;)

--कंदीलसुमार

केशवसुमार's picture

19 Jul 2008 - 2:36 pm | केशवसुमार

केळकरशेठ,
उत्तम विडंबन.. लिहीत रहा ..
(मास्तर)केशवसुमार

स्वगत: कंदिलाला शाप आहे का माहित नाही पण अंबोळिला कंदिल हा शाप जरूर आहे..

कंदीलात अंबोळिच्या तोच काळ आहे.
नाना वाती नाना ज्योती उभा तोच आहे.

तीच कंदीलाची मुर्ती, तीच काळजात भीती
तीच कडी, तीच खुंटी, सुटत घाम आहे.

अंबोळिच्या लेखनात कवितेत चिंतनात
तोच शाप, तोच भास, तोच ध्यास आहे.

तोच काळ, यमदुतही, आयुष्याचा विरामही
माळ्यावर घरामध्ये आता शांत आहे.

अमोल केळकर's picture

19 Jul 2008 - 2:42 pm | अमोल केळकर

गुरुजी,

अश्याच चुका दाखवुन सुधारण्याची संधी द्यावी

( आपला अजाण शिष्य ) कंदिल कुमार सॉरी अमोलकुमार
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बाजीरावाची मस्तानी's picture

19 Jul 2008 - 3:33 pm | बाजीरावाची मस्तानी

का हो..तुम्हाला...नारायण पेशव्यानि पछडले आहे का?

अमोल केळकर's picture

19 Jul 2008 - 3:42 pm | अमोल केळकर

नाही हो आम्हाला कोणी पछाडले नाही . अंबोळी साहेबांना मात्र कंदिलाने पछाडले आहे बहुतेक !

अवांतर : हे नारायण पेशवे कोण बरं? :? आणी इथं कंदिलात काय करत आहेत?

--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विसोबा खेचर's picture

19 Jul 2008 - 5:33 pm | विसोबा खेचर

मयताच्या किर्तनात तिरडीच्या चिंतनात
तोच शाप, तोच बाण, लास्ट श्वास आहे.

सह्ही! :)

सखाराम_गटणे™'s picture

19 Jul 2008 - 6:19 pm | सखाराम_गटणे™

आवड्ली कवीता.

अंगणात कंदीलात तोच काळ आहे.
नाना वाती नाना ज्योती उभा तोच आहे.

मस्त आहे.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

आंबोळी's picture

19 Jul 2008 - 11:24 pm | आंबोळी

मयताच्या किर्तनात तिरडीच्या चिंतनात
तोच शाप, तोच बाण, लास्ट श्वास आहे.
मस्तच!

तोच काळ, यमदुतही, आयुष्याचा विरामही
माळ्यावर घरामध्ये आता शांत आहे.

खल्लास!!

केळकरसाहेब, केसुनाना दोघेही पायाचा फोटू स्क्यान करुन पाठवा... ऊशीच्या आभ्र्याला चिकटवीन म्हणतो.

(धारी)आंबोळी

धोंडोपंत's picture

20 Jul 2008 - 7:21 am | धोंडोपंत

मस्त कविता,

तिसर्‍या कडव्यातील "लास्ट" हा शब्द खटकला.

आपला,
(छिद्रान्वेषी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com