(सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा)

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
19 Jul 2008 - 10:08 am

सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा,
दाऊद होता सभापती मधोमध उभा.
दाऊद म्हणाला, दाउद म्हणाला, "मित्रांनो,
खंडणीत सूट, खंडणीत सूट !
तुमचे -आमचे सर्वांचे जुळेल सूत !

या हिरोगीरिचे कराल काय?

संजय म्हणाला " ढिशांव ढिशांव करुन मी मारीन लोंका "

सल्लू म्हणाला,"ध्यानात ठेवीन, ध्यानात ठेवीन
मी ही माझ्या गाडीने असेच करीन असेच करीन"

शाहरुख म्हणाला," खुषीत येईन तेव्हा, क_क करीत राहीन."

प्रिती म्हणाली, "नाही ग बाई, राणीसारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेंव्हा क्रिकेट खेळीन, क्रिकेट खेळीन".

तुषार म्हणाला, "होईल गोची तेव्हा माझ्या बहिणीची मलाच बंडी."

अक्षय म्हणाला, "कधी वर, कधी खाली, जहिरातींवर मारीन उडी."

जॉनी म्हणाला, "विनोद म्हणजे कठिण काम, कठिण काम
करत राहीन सिनेमात, करत राहीन सिनेमात."

सैफ म्हणाला, "माझे काय?"
"तुझे काय? हा हा हा !
करिना पण समजुन जाय."

रेखा म्हणाली, "रोल रोल समजुन करीन, सिनेमात मी,
अभिषेकची आई होईन."

दाऊद म्हणाला, "छान छान छान!
'भाईच्या' देणगीचा ठेवा मान.
आपुल्या भुमिकेचा उपयोग करा."

"नाही तर काय होईल?"

"न ऐकणार्‍यांगत, तुमचा गेम होऊन जाईल."

-------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा.
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट, देवाघरची लूट !
तुम्हा-आम्हा सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय ?"

गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी मारीन माश्या."

घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"

कुत्रा म्हणाला, "खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."

मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."

खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."

माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."

मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात."

कांगारू म्हणाले, "माझे काय?"
"तुझे काय? हा हा हा !
शेपूट म्हणजे पाचवा पाय."

मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन."

पोपट म्हणाला, "छान छान छान!

देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या शेपटाचा उपयोग करा."

"नाही तर काय होईल?"

"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पाहू किती रे वाट (१९६३ )

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jul 2008 - 10:49 am | बिपिन कार्यकर्ते

भयानक आवडली कविता... क्या बात है...

असलं रूपक सुचणं ग्रेटच... आणि ते मूळ कवितेच्या मीटर मधे चपखल बसले आहे.

बिपिन.

मराठमोळा's picture

15 Oct 2010 - 8:46 am | मराठमोळा

>>असलं रूपक सुचणं ग्रेटच... आणि ते मूळ कवितेच्या मीटर मधे चपखल बसले आहे.

+१ सहमत आहे.

श्रीमंत दामोदर पंत's picture

19 Jul 2008 - 12:21 pm | श्रीमंत दामोदर पंत

खूप सुन्दर आहे हो तुमची कविता.........
फारच आवडली...........
कसे काय सुचले हो तुम्हाला असे लि़खण???????
पण मज्जा आली वचताना...............

आसेच सुन्दर सुन्दर लिहित रहा...................

आमचे मनोरन्जन करत रहा.............. :H

अन्या दातार's picture

19 Jul 2008 - 12:28 pm | अन्या दातार

मस्तच

सुचेल तसं's picture

19 Jul 2008 - 4:07 pm | सुचेल तसं

अन्याशी सहमत........
एकदम भारी........

http://sucheltas.blogspot.com

नंदन's picture

19 Jul 2008 - 3:49 pm | नंदन
बेसनलाडू's picture

19 Jul 2008 - 4:00 pm | बेसनलाडू

(भाई)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

19 Jul 2008 - 5:33 pm | विसोबा खेचर

रेखा म्हणाली, "रोल रोल समजुन करीन, सिनेमात मी,
अभिषेकची आई होईन."

हाहाहा! रेखा आणि अभिषेकची आई? :)

मस्त..!

प्रियाली's picture

19 Jul 2008 - 6:10 pm | प्रियाली

लई भारी ;) चालू दे!

स्वाती दिनेश's picture

19 Jul 2008 - 6:12 pm | स्वाती दिनेश

आवडले.
स्वाती

सखाराम_गटणे™'s picture

19 Jul 2008 - 6:22 pm | सखाराम_गटणे™

हे पण भारी,

आजकाल मिपावर रीमिक्स चा जमाना आला आहे काय?
मालकः 'विडंबन' म्हणुन नवीन सदर चालु करता येयील काय?

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

चतुरंग's picture

19 Jul 2008 - 6:44 pm | चतुरंग

उच्च रुपक आणि चपखल विडंबन! हॅट्स ऑफ!!

(स्वगत - ह्या कृष्णेच्या पाण्यात विडंबनाचे गुण बाय डिफॉल्ट असतातच का? :? )

चतुरंग

केशवसुमार's picture

19 Jul 2008 - 9:32 pm | केशवसुमार

चपखल विडंबन!
कृष्णेच्या पाण्यात विडंबनाचे गुण बाय डिफॉल्ट असतातच
(सहमत)केशवसुमार

शितल's picture

19 Jul 2008 - 8:31 pm | शितल

अगदी सुदर विडबन.
मस्त शब्द निवड्लेत आणी हडके विडबन.
खुप खुप आवडले.

शेखस्पिअर's picture

19 Jul 2008 - 9:47 pm | शेखस्पिअर

बहोत अछ्छे उस्ताद.

ऋषिकेश's picture

20 Jul 2008 - 6:27 pm | ऋषिकेश

आवडले.. मस्त :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चावटमेला's picture

21 Jul 2008 - 1:02 pm | चावटमेला

छान आहे विडंबन..
आवडले :)
http://chilmibaba.blogspot.com

इंटरनेटस्नेही's picture

15 Oct 2010 - 3:23 am | इंटरनेटस्नेही

सर्वोत्तम!

राजेश घासकडवी's picture

15 Oct 2010 - 4:00 am | राजेश घासकडवी

छान जमलेलं आहे. स्नेहींनी धागा वर काढला म्हणून वाचायला तरी मिळालं...

सहज's picture

15 Oct 2010 - 8:27 am | सहज

मस्त जमलय!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2010 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विडंबन आवडलं! कंटेंपररी संदर्भ असल्यामुळे जास्तच "भावलं"!

Pain's picture

15 Oct 2010 - 8:37 am | Pain

आवडली.

अमोल केळकर's picture

15 Oct 2010 - 2:06 pm | अमोल केळकर

धन्यवाद ' सर्व स्नेहींचे ' :)

( मी पण विसरलो होतो )

अमोल केळकर