हे इकडचे भैये ते तिकडचे भैये.

सचीन's picture
सचीन in जनातलं, मनातलं
27 Nov 2013 - 4:35 pm

प्रसंग १
"काय,जोशी साहेब कसे आहात थकलेले वाटताय "ऑफिस वरून येणाऱ्या जोशींना सानेनी विचारले.'अहो ,काय करणार साने साहेब ,मध्यावरच छोटस स्टेशन आपले.सकाळी गाडीत चढायचे वांधे तर संध्याकाळी उतरायचे. 'अहो चालायचच शहरे म्हटली कि अस व्हायचच'साने उतरले. 'अहो साने साहेब, गर्दी किती वाढलीय. फक्त मुंबईच नव्हे तर पुणे नाशिक ह्या ठिकाणाची गर्दीही बरीच वाढली आहे. ह्याला कारणीभूत ' भैये' युपी बिहारचे' जोशी म्हणाले. अहो हे भैये आपल्या इथे मोठ्या संख्येने येतात साऱ्या शहराची वाट लावून टाकलीय यांनी.ह्यांच्यामुळे आपले तरुण बेकार राहतात. अहो मिळेल त्या पैशावर काम करतात सोळा सोळा तास राबतात. आपल्या मनाचे सम्राट बरोबर बोलतायत हाकलून लावले पाहिजे साऱ्यांना इथून. अहो कालचीच गोष्ट ६ वाजता ऑफिसातून घरी निघालो. तर साहेब बोलतात 'काय जोशी, चाललात घरी. तो गुप्ता बघा. ८ वाजेपर्यंत थांबतो तुम्ही सहा वाजले कि उचललीत ब्याग'. असा राग आला साने साहेब.आणि साहेबांचा राग आल्यावर इतर मराठी माणसे जे करतात तेच मी केले. राग गिळला. आता ह्या साहेबाला काय सांगायचे, हा गुप्ता इथे एकटाच राहतोय .ह्याचे सारे कुटुंब तिकडे बिहारात. ह्याला घरी जावून काय दिवे लावायचेत. घरी बसायचे ते ऑफिसात बसतो. वरून आम्हाला साहेबांच्या शिव्या असा त्रास होतो ना.
चला जावू द्या आता घरी निघतो'.

प्रसंग २
'क्यो रामशरण कैसे हो'? कृष्णा यादव ने आवाज दिला. 'हा, भाई ठीक है'. रामशरण बोलला. चलो चाय लेते है असे बोलून दोघे चहा घ्यायला जवळच्या टपरीवर गेले. ह्या रामशरणला कृष्णानेच मुंबईत आणले होते व एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून चिटकवून दिले होते. दोघांच्या गप्पा चालू झाल्या त्यातून कृष्णाला कळले कि रामशरण मुंबईत जास्त खुश नव्हता. रामशरण कृष्णाला म्हणाला कि 'अच्छा लगणे जैसा इस शहर मे है हि क्या? सात जन मिलके एक झोपडी मी रहते हे. उससे भाडा सबजन मिलके देते है खाना उधरही बनाते है. उससे काफी पैसे बच जाते है. और मेरी डूटी ८ घंटे है लेकिन घर जाके क्या करनेका इसलिये रोज ओवरटाइम करता हु. और जो पैसे आते है वह थोडे खुद को रखकर गाव भेज देता हु'. थोडक्यात त्याला हे शहर आवडले नव्हते. त्याने स्पष्टपणे कृष्णाला सांगितले कि तो फक्त इथे पैसे कमवायला आलाय. त्याला ह्या शहराशी काही घेणे देणे नाही. इथले लोक भैया म्हणून हेटाळणी करतात अपमान करतात पण आपण तो सहन करायचा. पण गावी गेल्यावर मात्र आपले कौतुक होते. मुंबईला नोकरी करतो म्हणून लोक आदर करतात. मात्र आपण इथे शहरात काय त्रास भोगतोय तो आपल्यालाच ठावूक.

प्रसंग ३

स्थळ-जोशींचा दिवाणखाना-

जोशी व साने गप्पा मारत बसलेले असतात. 'काय जोशी साहेब,अमोल काय म्हणतोय तुमचा अमेरिकेत असतो ना तो'. अमोलचा विषय निघतच जोशी खुश झाले हसत म्हणाले 'पोराने पांग फेडले माझे अमेरिकाला गेला. मी त्याला तो कॉलेजात असतानाच सांगितला होत. तुला बाहेरगावी जायचेय पैसा कमवायचाय. पोराने माझी इच्छा पूर्ण केली. अहो, नाहीतरी आहे काय ह्या देशात नसती गर्दी, भ्रष्टाचार, अडाणी लोक, घाण, बेशिस्त पण फोरेनला असल काही नसत'.
'अहो जोशीसाहेब, पण मागे वृत्तपत्रात एक बातमी आली होती कि फोरेनचे लोक आपल्या इथल्या तरुणांवर चिडलेत. त्यांच्या नोकऱ्या आपला युवा वर्ग बळकावतोय.त्यामुळे ते नाराज आहेत'. यावर जोशी म्हणाले, 'अहो, चालायचच. बाहेरच्या देशात गेले तर हे व्हायचेच .पण आपण एक लक्षात ठेवायचे. आपण तिथे पैसा कमवायला गेलोय मान नाही. आपण गप्प पने तिथे मान मोडून काम करायचे नि तो पैसा इकडे मुंबईत पाठवायचा. अहो बाहेरगावी दहा वर्षे काम केल नि परत इकडे आल तर आयुष्यभर काम करायची गरज नाही. अहो डॉलर तो डॉलर. आपला रुपया त्याच्या पुढे कीस झाड कि पत्ती काय.

वरील हे तीन प्रसंग पाहिल्यावर हेच वाटते कि आपण आपल्याच देशात येणाऱ्या परप्रांतीयांना हिणवतो पण त्यांना त्यांच्या राज्यात, गावात मात्र मान मिळतो. तसेच आपण मोठ्या कौतुकाने लोकांना सांगतो कि माझा अमका ह्या देशात आहे तमका त्या देशात आहे. पण तिथल्या देशात त्या लोकांची किंमत आपल्या इथल्या भैयासारखीच असते.

थोडक्यात काय तर हे इकडचे भैये ते तिकडचे भैये.

कथालेख

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

27 Nov 2013 - 4:40 pm | कपिलमुनी

पॉपकॉर्न दे रे !

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2013 - 4:46 pm | टवाळ कार्टा

मला पॉपकॉर्न विथ कोला :)

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2013 - 4:46 pm | टवाळ कार्टा

भारतिय लोक बाहेरच्या देशात "मिळेल ते" काम करण्यासाठी जातात??? बरे गेले तर तिथे झोपड्यांमधे रहातात?? तिकडच्या राजकारणातला चिखल वाढवतात???

कैच्याकै

मला पण पॉपकार्न हवेत गुर्जी

=))

इरसाल's picture

27 Nov 2013 - 4:48 pm | इरसाल

नाथा पुरे आता.

हे कुठेतरी वाचल्यासारखे वाटत आहे.

नक्की काय वाचल्यासारखे वाटत आहे? लेख की "पुरे आता" की दोन्ही ;)

इरसाल's picture

27 Nov 2013 - 5:09 pm | इरसाल

आपले मत "दोन्ही" ला !

पैसा's picture

27 Nov 2013 - 5:13 pm | पैसा

नक्की कुठे आठवत नाही. मिसळपाववर की मिमराठी?

ऋषिकेश's picture

27 Nov 2013 - 5:15 pm | ऋषिकेश

खाली मी दिलेला दुवा तर नै?
पण तेव्हा बॅट्या / पैसातै मिपावर असल्याचे आठवत नैये

पैसा's picture

27 Nov 2013 - 5:18 pm | पैसा

तुझी कविता आताच वाचली. हा लेख असाच्या असा हल्लीच वाचला आहे.

जेपी's picture

27 Nov 2013 - 5:31 pm | जेपी

मी पण वाचलेय . फक्त नाव बदललीत बहुतेक .
चेपु वर कींवा ब्लॉगवर

...

मला एक प्लेट मुळगापुडी इडली विथ टोमॅटो चटनी आणि नंतर कै करी स्ट्यू बरोबर आप्पमची चवड!!!!

यशोधरा's picture

27 Nov 2013 - 5:08 pm | यशोधरा

मुळगापुडी इडली म्हण्जे?

बॅटमॅन's picture

27 Nov 2013 - 5:34 pm | बॅटमॅन

मुळगापुडी/पोडी म्हणजे एक प्रकारची चटणी असते. सानिकातैंनी याची रेसिपी मिपावर मागे एकदा टाकलेली आहे. ही चटणी जरा लहान आकाराच्या इडलीला फासायची, थोडे तूप वैग्रे लावून (भौतेक) जरा श्यालो फ्राय केले की त्या इडल्या होतात. जीवघेणी चव असते. हा प्रकार जं.म. रस्त्यावर दक्षिणायन नामक हाटेलात मिळतो. माझा अतिशय आवडता प्रकार आहे.

माझाही अत्यंत आवडीचा प्रकार..
घरी हि पुडी असतेच!

स्पा's picture

27 Nov 2013 - 4:55 pm | स्पा

मस्त

मिपाचे म्हाग्रु

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2013 - 4:58 pm | टवाळ कार्टा

"म्हाग्रु" =))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 7:37 pm | अत्रुप्त आत्मा

@"म्हाग्रु">>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif
==========================
अ वांतर- अता स्पांडू रंगात आला...! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

ऋषिकेश's picture

27 Nov 2013 - 5:04 pm | ऋषिकेश

माझेच हे जुने लेखन(कविता) आठवले
तीच कविता मटाने 'तुमचं पान' मध्ये टाकली होती तेव्हा आलेल्या प्रतिक्रिया रोचक आहेत ;)

इकडच्या भय्यांना इकडे यायला विसा वगैरे लागत नाही.
तिकडे जायला मात्र सरकारी परवाना लागतो.
इकडच्या भय्याना त्याम्च्याबद्दल काही बोलले की त्यांचे नेते गर्जना फोड्डतात.
तिकडचे भय्ये मात्र गुपचूप मार खात बसतात

चिरोटा's picture

28 Nov 2013 - 3:59 pm | चिरोटा

ईकडे 'इकडच्या भैय्यांना हाकलून लावा' असे लिहिताही येते आणि टी.व्ही.वर बोलून टाळ्याही मिळवता येतात.तिकडच्या भैय्यांबाबत असे तिकडे करता येत नाही.

अमोल मेंढे's picture

28 Nov 2013 - 4:06 pm | अमोल मेंढे

मी जरा झोप घेतो..

गाणं आठवलं

नाखु's picture

28 Nov 2013 - 4:28 pm | नाखु

मागच्या वेळे ला किती स्कोअर झाला होता?