तर हे अस आहे कॉरपोरेट जग तुमच...!!!!

स्नेहश्री's picture
स्नेहश्री in जे न देखे रवी...
18 Jul 2008 - 2:47 pm

कधी कुणाचा कोणाला पत्ता नाही
कोण कुठे हे माहित नाही
आज इथे तर उद्या तिथे
लाईन लागते पैसा मिळेल तिथे
बोनस देत नाही टाकतो मी पेपर
इंक्रिमेंट नाही घ्या माझे लेटर
कोणाची कोणाला पडलेली नसते
कॉरपोरेट जगात हे असेच आसते
खोट रडणं नी खोट हसणं
आणि त्यातच आपल आयुष्य शोधणं
खोटी सहानभुती , मदत खोटी
यावर चालते आपली रोजीरोटी
कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची
अजिबात नाही पर्वा माणुसकीची.

कविता

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

18 Jul 2008 - 3:27 pm | आनंदयात्री

>>कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची
>>अजिबात नाही पर्वा माणुसकीची.

सगळीकडेच असे होते असे नाही. बाकी कविता छान, कॉर्पोरेट वाटली.

स्नेहश्री's picture

18 Jul 2008 - 4:02 pm | स्नेहश्री

धन्यवाद!!!
खर आहे तुमचा म्हणण.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

अमोल केळकर's picture

18 Jul 2008 - 4:20 pm | अमोल केळकर

वर्णन केलेल्या बहुतांशी गोष्टी घडत आहेत.
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बाजीरावाची मस्तानी's picture

18 Jul 2008 - 5:35 pm | बाजीरावाची मस्तानी

ओह्..स्नेह्..स्स्....आय कन अन्देर्स्तन्द यु......दोन्त मैन्द...........

स्नेहश्री's picture

19 Jul 2008 - 11:39 am | स्नेहश्री

काहीच समजलं नाही मला 8|

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी