पुणे तिथे काय उणे- (२nd होम) जागा सुचवा.

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
1 Nov 2013 - 4:02 pm

" दि पा व ली च्या हा र्दि क शु भे च्छा "

मला पुणे खूप आवडते. मुंबई च्या मानाने थोडे शांत जीवन कसली घाई नाही, सावकाश, आणि ट्रेनचे वेळा पत्रक सांभाळायला नको.
पुणे तिथे काय उणे असे म्हणतात.पुण्याचे स्वत:हचे असे वेगळे भौगोलिक स्थान आहे.
मनपा,लक्ष्मी रोड आणि तुळशी बाग, दगडू शेठ गणपती,मंडई हा आवडता परिसर. म्हणजे अजून बाकीचा परिसर बघण्याचे राहून गेले आहे म्हणून असे म्हणतो आहे. पुणे येथून चारी दिशांना जाण्याला भरपूर सोई उपलब्ध.

आणि म्हणूनच या शांत वातावरणांत मला माझे दुसरे घर (२nd होम) पुण्याला पाहिजे आहे.
तरी सर्व पुणेकर मिपा वाले यांना विनंती कि ते एखादी १५ ते १८ लाख पर्यंत १ BHK जागा सुचवतील काय जर शक्य झाले तर पुण्याच्या बाहेरही चालेल. आणि त्यातून जर कोणी मिपावले बिल्डर क्षेत्रात असले तर उत्तम.
धन्यवाद
प्रमोद देर्देकर

धोरणविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

1 Nov 2013 - 4:42 pm | तुषार काळभोर

कमीत कमी १० किमी गेल्यावर प्रति चौफु ३५०० च्या खाली उतरतो. बाकी हिशेब तुम्ही करा..

संजय क्षीरसागर's picture

1 Nov 2013 - 4:56 pm | संजय क्षीरसागर

साधारण दिड-पावणे दोन लाख वार्षिक व्याज येईल. त्यातून दरवर्षी बेस्ट लोकेशन्सला (म्हणजे हॉलिडे इन, मॅरिएट, मल्हार माची वगैरे) तीन-चार वेळा तरी सहज राहाता येईल. नाही तरी त्यापेक्षा जास्त फुरसत कुणी काढू शकत नाही. पुन्हा तुमचे पैसे सलामत.

सहज's picture

1 Nov 2013 - 6:19 pm | सहज

सहमत.

समजा दर महिन्याला फुरसत काढायला जमत असेल तर बेस्ट डिल्स [ऑफ सिझन, ऑफ पीक टाईम डिस्काउंट, त्यातल्या त्यात नविन/अप्रसिद्ध त्यामुळे कमी गर्दी असलेली] + डेस्टीनेशन्स काँबो अशी ठिकाणे सुचवा ना प्लीज. .

संजय क्षीरसागर's picture

2 Nov 2013 - 12:22 am | संजय क्षीरसागर

एकसोएक ठिकाणं आहेत

+ १५०००००

अत्यंत सहमत.

तसाही १५ ते १८ लाखात १ बीएचके असा दर रत्नागिरी, सावंतवाडी, कदाचित सातारा वगैरेमधे चालू आहे. पुण्यात कुठे असलंच तर ठाऊक नाही.

प्रसाद गोडबोले's picture

3 Nov 2013 - 2:31 pm | प्रसाद गोडबोले

सातार्‍यात गावा मधे ( म्हणजे जुन्या गावात ) साधारण २४०० ते २८०० रेट चालु आहे , नवीन गावात ( म्हण्जे नाक्या पुढे ) २८०० ते ३००० चालु आहे .

गावा मधे ६०० - ७०० स्केफु चा प्लॅट मिळेल !!

पुण्यात माझ्या मित्राने अंबेगाव अरीयात १/१.५ वर्षा पुर्वी १ बीएच के बुक केला होता तेव्हाच त्याची किंमत जवळपास २५ लाख होती !

यसवायजी's picture

3 Nov 2013 - 10:51 pm | यसवायजी

सध्याची किंमत-> आंबेगांव खुर्द - १ bhk - ३९ लाख. (अर्थात प्रोजेक्ट वर अवलंबुन आहे. ही किंमत लेक व्हिस्टा मधली आहे)

कवितानागेश's picture

1 Nov 2013 - 5:11 pm | कवितानागेश

चाकण मध्ये बघा.

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 5:15 pm | प्यारे१

उरळी कांचन, शिरवळ, सासवड, रांजणगाव, मंचर असं पुण्यापासून ३० ते ५० किमीच्या परिघात तुम्हाला १८ च्या आसपास १ बीएचके मिळेल.
वेळेत नि बजेटमध्ये घर मिळण्यासाठी शुभेच्छा!

पुणे येथून चारी दिशांना जाण्याला भरपूर सोई उपलब्ध.
नव्या शतकी धाग्याची बीजे येथे आहेत.
बाकी, घरांविषयी फारसे काय बोलायचे? दोनेक वर्षांपूर्वी पुण्यात जर्रा चौकशी केली तर एक कोटी ते दीड कोटी अशी किंमत बघून गप्प बसलीये ती अज्जून! काही बिल्डर्स म्हणे भाजी विकावी तशी किंमत साम्गतात. जसे की कांदा १०० रू. किलो! एकच भाव, कमी होणार नै! आम्ही मारे स्वे. फू. त्याचा दर वगैरे विचारत बसलो तर तो बुवा म्हणाला तसं काही नाही. तुम्ही ते नंतर गणित करा. आमच्या हितं ३ बेडरूमच्या सगळ्या घरांच्या किमती तीन कोटी आहेत आणी सगळे मागल्या बाजूचे (म्हणजे गटारगंगेच्या बाजूचे फ्लॅट) शिल्लक आहेत. मी नक्की कोणत्या देशात आहे हे समजले नाही. माझ्या आईच्या घराशेजारी नवी बिल्डींग उभी रहात होती म्हणून चौकशी केल्यास आत्ता बुकींग केल्यास २ बेडरूमस्चे घर १ कोटी असे सांगितले. पुन्हा गप्प बसले. आणि ते पुण्यापासून लांब वगैरे कितपत खरे आहे ते एक देवालाच माहित! माझ्या भावाने बालेवाडी की असाच कुठेतरी घेतलाय ४ वर्षांपूर्वी, २ बेरू. त्याचे ४० लाख की काहीतरी पडले. त्यावर एक नातेवाईक "तसा स्वस्तात मिळाला" असे म्हणाले. बालेवाडीच्या पलिकडे होण्यार्‍या ठिकाणी स्वस्त म्हणून माझ्या मामेबहिणीने घेतला आणी सगळी ग्रोसरी दुप्पट किमतीने मिळते असे अनुभवास आले. शाळाही लांब. मग मुले शाळेच्या वयाची झाल्यावर त्यांनी तो विकून चक्क मध्यवर्ती ठिकाणी घेतलाय.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 7:08 pm | चित्रगुप्त

पूर्वी अमेरिकेत वगैरे काही वर्षे नोकरी करून आले, तर पुण्यात मोठे घर बांधता/घेता येत असे. आता उलटे झाले आहे, असे ऐकून आहे. जाणकार मंडळींनी यावर प्रकाश टाकावा.

कधीतरी अधून मधून जाऊन रहायचे असेल, तर संक्षींनी सुचवलेला मार्ग उत्तम.

तुमच्या बोलण्यावरून तुम्ही मुंबई चे दिसता . तळेगाव मध्ये तुम्हाला १५ ते १८ लाखामध्ये घर. पुण्यापासून साधारण ४५ किमी असेल .

शैलेन्द्र's picture

1 Nov 2013 - 8:37 pm | शैलेन्द्र

"मुंबई च्या मानाने थोडे शांत जीवन कसली घाई नाही, सावकाश,"
डोळे पाणावले..

"मनपा,लक्ष्मी रोड आणि तुळशी बाग, दगडू शेठ गणपती,मंडई हा आवडता परिसर."
पाणावलेल्या डोळ्यांना काही दिसेना झालयं

पुण्याला, पुण्यातील जागांना कमी, हीन दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. १५-१८ लाखात हल्ली टिटवाळ्याला, महागणपतीचे सानिध्यात, "चालींचे भव्य संकुलात" घर मिळेल, पुण्यात नाही.

(काडी टाकल्या गेलीय.. )

चौकटराजा's picture

1 Nov 2013 - 9:50 pm | चौकटराजा

ठेवा नावं सासुर वाडीला !

शैलेन्द्र's picture

1 Nov 2013 - 10:47 pm | शैलेन्द्र

:) घ्या..

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Nov 2013 - 8:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

१५ ते १८ लाख तुमचे आणि बाकी होम लोन घेउन मिळु शकेल
बाकी >> वार्षिक व्याज आणि त्यातून दरवर्षी बेस्ट लोकेशन्सला ट्रिप>> सहमत!!

तळेगाव ला मिळेल. तळेगाव अगदी पुण्याजवळच आहे. स्वत:ची गाडी असेल तर उत्तम. किमती कमी आहेत.

रमेश आठवले's picture

2 Nov 2013 - 4:48 am | रमेश आठवले

परांजपे बिल्डर्स यांच्या अथश्री आणि तत्सम नाव असलेल्या कॉलनी पुण्यात दोन चार ठिकाणी आहेत. ते जालावर उपलब्ध आहेत. तुम्ही दिलेल्या किमतीत त्यांच्याकडे flats मिळू शकतात का याची चौकशी करा.
http://www.pscl.in/

lakhu risbud's picture

3 Nov 2013 - 3:23 pm | lakhu risbud

आजच गावात जाताना नल स्टाप अलीकडे SNDT च्या शेजारी बोर्डावर जाहिरात बघितली,९.५ लाखात १ BHK तिथल्या नंबर वर फोने करून माहिती घ्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Nov 2013 - 2:58 pm | llपुण्याचे पेशवेll

हा ती स्किम शिरवळ मधे चालू आहे वाटतं.

माशा's picture

4 Nov 2013 - 3:20 pm | माशा

तुमच्या १५ ते १८ लाख पर्यंत च्या बजेटात वाघोली , तळेगाव ,चाकण, शिरवळ अशा ठिकाणीच फ्लॅट मिळेल.

ह भ प's picture

5 Nov 2013 - 9:31 pm | ह भ प

जरा बजेट वाढवा अन डीएसके विश्वला रहायला या..

झकासराव's picture

15 Nov 2013 - 9:34 am | झकासराव

एखादी १५ ते १८ लाख पर्यंत १ BHK जागा सुचवतील काय जर शक्य झाले तर पुण्याच्या बाहेरही चालेल>>> आँ???

पुण्यातच काय पिंची च्या एक्सटेन्डेड येरीयात पण नाही मिळणार.
बाहेर म्हणजे मिळालाच तर शिरवळ, चाकण अशा तत्सम गावांमध्येच मिळेल..

सुहासदवन's picture

15 Nov 2013 - 11:46 am | सुहासदवन

एक घर, जिथे आपण स्वतःला आणि आपल्या सामानाला ठेवतो त्या चौकोनाला कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये मोजायचे हे खूळ नव्हे तर काय.

चौकटराजा's picture

15 Nov 2013 - 5:16 pm | चौकटराजा

माझा फ्लॅट विकायचा आहे. वेल फर्निशड रेनोव्हेटेड. कॉर्नर,जमीनीपासून दहा पायर्‍या .उजेड मस्त, रोड फेसिंग पण शांत रस्ता...... आयला अडचण येकच हाय आता सर्व पयशे पझेशन मे २०१५.
स्थळ - चिंचवड . जुन्या हायवे पासून सुमारे आठशे मीटर्स.

प्यारे१'s picture

16 Nov 2013 - 3:01 am | प्यारे१

काका
>>आयला अडचण येकच हाय आता सर्व पयशे पझेशन मे २०१५.
हे जरा सोप्या मराठीत सांगा ना!

चौकटराजा's picture

16 Nov 2013 - 7:32 am | चौकटराजा

सगळॅ पयशे आता द्यायचे . जागेला टच मातुर मे २०१५ ला .

चित्रगुप्त's picture

18 Nov 2013 - 10:51 am | चित्रगुप्त

म्हणजे शुभमंगल आत्ता, गौना दोन वर्षांनी म्हणा की.

सुहास..'s picture

18 Nov 2013 - 11:15 am | सुहास..

" दि पा व ली च्या हा र्दि क शु भे च्छा " >>>

तुम्हाला नववर्षाच्या

मला पुणे खूप आवडते. मुंबई च्या मानाने थोडे शांत जीवन कसली घाई नाही, सावकाश, आणि ट्रेनचे वेळा पत्रक सांभाळायला नको. >>
चला म्हणजे पुढे चालुन आम्ही पुणेकर , पुण्याच्या बाहेरच्यांनी पुणे बिघडवले म्हणायला मोकळे ;)

पुणे तिथे काय उणे असे म्हणतात.पुण्याचे स्वत:हचे असे वेगळे भौगोलिक स्थान आहे.
मनपा,लक्ष्मी रोड आणि तुळशी बाग, दगडू शेठ गणपती,मंडई हा आवडता परिसर. म्हणजे अजून बाकीचा परिसर बघण्याचे राहून गेले आहे म्हणून असे म्हणतो आहे. पुणे येथून चारी दिशांना जाण्याला भरपूर सोई उपलब्ध.
>>>

एक रस्ते सोडले तर सगळ्याच सोई आहेत ....अर्थात जो परिसर आपण आवडता परिसर म्हणत आहात , तिथे अजुन जास्त सोई आहेत ....हॅ हॅ हॅ

आणि म्हणूनच या शांत वातावरणांत मला माझे दुसरे घर (२nd होम) पुण्याला पाहिजे आहे>>

मनपा आणि मंडई शांत ????.
तरी सर्व पुणेकर मिपा वाले यांना विनंती कि ते एखादी १५ ते १८ लाख पर्यंत १ BHK जागा सुचवतील काय जर शक्य झाले तर पुण्याच्या बाहेरही चालेल. >>>
ओक्के ओक्के ....या आमच्या गरीबांच्या लोहगावात ....

१५ ते १८ मध्ये मिळेल
नेमके कुठे ?? लिंक घ्या ...( हे जाहिरात प्रसारण सेवा केंद्र आहे )
http://misalpav.com/node/23264
आणि त्यातून जर कोणी मिपावले बिल्डर क्षेत्रात असले तर उत्तम. >>

कोण उत्तम ;)

धन्यवाद
प्रमोद देर्देकर >>

वेलकम
वाश्या

आंबेगाव बु. येथे सर्वे नंबर - १५ मध्ये (ग्रामपंचायत एन. ए.) २२ लाखामध्ये (७०० स्क़्वे. फुट ) तिसऱ्या मजल्यावर एक २ बी. एच. के. फ्लेट उपलब्द आहे.