लागले वेड मज |

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 1:20 pm

चौकार आणि षटकार
चेंडू तो तडीपार।
धावांचा डोंगर ।
शतक रचण्याचे ।
लागले वेड मज।
सचिन म्हणे || १ ||

फायलींचा डोंगर ।
कामाचा बट्याबोळ ।
लाच खोरी, भ्रष्टाचार ।
कितीतरी पैसे खायचे
लागले वेड मज |
मंत्री म्हणे ||२||

दिंडी पताका भजन।
रंगले कीर्तन ।
भान हरपून ।
वाट चाले पंढरी |
भेट द्या हो माउली |
लागले वेड मज |
वारकरी म्हणे ||३||

उभे पीक गेले जळून ।
सगळे माळ वैराण ।
चढे कर्ज डोक्यावर ।
झाकू कसे नागडेपण |
करितो आत्माहत्या |
लागले वेड मज |
शेतकरी म्हणे ||४||

कविता

प्रतिक्रिया

आंबट चिंच's picture

21 Nov 2013 - 9:45 am | आंबट चिंच

वा खुप छान! शेवटची ओळ चटका लावुन गेली. बाकी वेल्लाशेटच्या म्हाणतो त्या प्रमाणे "काही
गोष्टींचे वेडच अस्सावे लागते".

जेनी...'s picture

23 Nov 2013 - 6:56 am | जेनी...

दर्दु काका ... कवितेमे एक दर्द छुपा है
लय भारी