निर्भया

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
13 Sep 2013 - 9:01 pm

TV वर बातमी पाहिली . निर्भया ला न्याय मिळाला
PIFF मध्ये पाहिलेला 38 WITNESSESसिनेमाची आठवण झाली
एका CRIME चा उपयोग करून घेऊन , एका महान सत्याची प्रचीती शेवटच्या एका दृश्याने घडवणे,एका थ्रिलर सिनेमाचे रुपांतर एका वैचारिक सिनेमात करणे स्तिमित करून जाते .

38 WITNESSES ची गोष्ट [मला जशी समजली तशी ] पुढील प्रमाणे
सोसायटीच्या समोरील रस्त्यावर रात्री एका तरुणीचा खून होतो . त्या तरुणीचे ओरडणे हिरो ऐकतो . हिरोची बायको बाहेर गावी गेलेली असते ती येते तेंव्हा तिला खुनाबद्दल कळते .
नवरा तिला सांगतो कि तो खून झाला त्या वेळेस घरी नव्हता . कामावर गेलेला होता . पोलिसांना तो हेच सांगतो . खून झालेल्या तरुणीचे ओरडणे ऐकले असे कुणीच पोलिसांना सांगत नाहीत .
एका पत्रकार स्त्रीला याचे नवल वाटते आणि ती स्वतः चौकशीस सुरवात करते . बातमी वर्तमानपत्रात छापते आणी लोक या सोसायिटीमधील लोकांची छी थू करू लागतात
पोलीस पुन्हा चौकशी करू लागतात . हिरो त्या तरुणीचे ओरडणे ऐकल्याचे मान्य करतो
ते ओरडणे कसे होते हे ऐकण्यासाठी प्रयोग केला जातो
हिरो आणि पोलीस हिरोच्या शयनगृहात उभे राहतात . पोलिसाने हिरोच्या बायकोला त्यांच्याबरोबर येण्यास मनाई केल्याने ती खोलीबाहेर बसलेली आहे
पोलिसाने सांगितल्यानंतर खून झालेल्या जागेवरून आवाज ऐकवण्यात येतात
हे आवाज निरनिराळ्या प्रकारे काढले जात असताना हिरोच्या बायकोच्या चेह य्रावरील भाव दाखवले जातात . आणि जे ओरडणे हिरोला खून झालेल्या तरुणीच्या ओरडण्या सारखे वाटते
त्या वेळी हिरोची बायको BAG घेऊन जाताना हिरोला घर सोडून जात असल्याचे सांगते .
सिनेमा संपतो
असले ओरडणे ऐकूनही मदतीला न जाणारे खरे गुन्हेगार हे सत्य हिरोच्या बायकोच्या कृतीने
उमजते आणि खून कोणी केला हे दाखवले नाही हे नंतर कधीतरी लक्षात येते .

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

13 Sep 2013 - 9:19 pm | आनन्दा

हा निकाल वरच्या न्यायलयात टिकेल असे वाटत नाही... पब्लिसिटी आणि दबावाखाली दिलेला निर्णय वाटतो.

ता. क. (फुंकून ठेवतो :) ): यामध्ये आरोपींची भलावण करण्याचा काही हेतु नाही.

>>हा निकाल वरच्या न्यायलयात टिकेल असे वाटत नाही... पब्लिसिटी आणि दबावाखाली दिलेला निर्णय वाटतो.

तुम्ही या केसवर खूपच अभ्यास केला आहे व शक्यतो तुम्ही व्यवसायाने कायद्याचे जाणकार दिसता असे तुमच्या प्रतिसादातून जाणवले, कृपया सविस्तर लिहा यावर.

काय आहे आम्ही सामान्य लोक आधी पासूनच शंकेखोर इत्यादी आहोत, आम्हाला चांगल्यात देखील काळे दिसते, तुमच्या सारख्यांनी जरा मदत केली तर सगळे कसे चांगले चांगले होईल.

नगरीनिरंजन's picture

14 Sep 2013 - 7:31 am | नगरीनिरंजन

चित्रपटाची कथा फारच मार्मिक आहे.

पैसा's picture

14 Sep 2013 - 10:41 am | पैसा

चित्रपटाची कथा मार्मिक आहे यावए +१ दिल्ली गँग रेपमधील एका गुन्हेगाराला कमी वयाचा फायदा देऊन सोडून देणे याचा खरं तर प्रचंड राग आहे.

बाकीच्यांना दिलेल्या शिक्षा कमी होतील अशीच शक्यता वाटते. कारण पुन्हा गुन्हेगारांचे तरूण वय. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात केस उभी राहील त्याला किती वर्षे जातील कोणजाणे. तोपर्यंत आणखी काही मुलींचे बळी गेलेले असतील आणि ही केस सगळेच विसरून जातील यथावकाश निवडणुकांचा रेटा नसेल तर राष्ट्रपती गुन्हेगारांचा दयेचा अर्जही स्वीकारतील आणि सगळेच आलबेल होईल. जय लोकशाही!

आनंदी गोपाळ's picture

14 Sep 2013 - 12:48 pm | आनंदी गोपाळ

.

दादा कोंडके's picture

14 Sep 2013 - 12:56 pm | दादा कोंडके

सहमत. राष्ट्रपत्नी प्रतिभाबाई पाटील नसल्यामुळे थोडी आशा आहे.

प्रमोद देर्देकर's picture

19 Sep 2013 - 11:47 am | प्रमोद देर्देकर

हे सर्व ठिकाणी असेच ऐकू येते. अरे ती माणसे जर मदत करायला गेली तर मग त्यान्ना
कोण संरक्षण देणार? कारण जे साक्ष देतात त्यांचे नंतर हे गुन्हागर लोक सुटून आल्यावर सूड बुद्धीने खूप त्रास देतात. असा हा आपला देश आहे. म्हणून कोणी या भानगडीत पडत नहित.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2013 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

माझ्या एका मित्राचा मित्र भारतात सुट्टीवर गेला असताना कुठेतरी कारने जात होता. त्याच्या समोरच दुसर्‍या एका कारने पायी चालणार्‍याला जोरदार उडविलं पण ती कार न थांबताच पळून गेली. ह्याचे लक्ष त्या रस्त्यावर तडफडणार्‍या दुर्दैवी माणसावर होते त्यामुळे तो कारचा नंबर पाहू शकला नाही. ह्याने कार थांबवून त्या रक्तबंबाळ माणसाला इतरांच्या मदतीने स्वतःच्या कार मध्ये घेतले आणि जवळच्या हॉस्पिटलला पोहोचवले. परंतू, तिथे कांही जबानी द्यायचा आत त्या अपघातग्रस्त माणसाचा मृत्यू झाला. त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी ह्याच्यावरच केस टाकली. त्या केस मधून बाहेर पडायला त्याला ७ वर्षे लागली. नोकरीस मस्कत मध्ये असल्यामुळे ह्या ७ वर्षात दर महिन्यास १ किंवा २ भारतवार्‍या कराव्या लागल्या. तो प्रवास खर्च, वकिलाचा खर्च, मन:स्ताप आणि मानसिक तणाव हे सर्व भोगावं लागलं. किती महागात पडलं पाहा त्याला दयाधर्म निभावणं?

देशपांडे विनायक's picture

20 Sep 2013 - 11:33 am | देशपांडे विनायक

न्यायालयात गुन्हेगारास शिक्षा सुनावली जाते आणि न्याय झाला असे आपणास वाटते . बरेही वाटते .
गुन्हा शाबित होण्यासाठी दिलेल्या साक्षीचे महत्व आपल्या लक्षातही नसते
साक्षीदाराचे कौतुकही करत नाही पण न्याय मिळाला नाही तर आरडा ओरडा मात्र पाहण्याजोगा असतो
आणी VICTIM बद्दलचा कळवळाहि
न्याय मिळवण्यासाठी फार त्रास पडतो आणि तो भलत्यालासुद्धा पडतो !!

रघुनाथ.केरकर's picture

21 Sep 2013 - 12:47 am | रघुनाथ.केरकर

अरुणा शानभाग च पुढे काय झाल...

------------------