इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र : नक्की किती खात्रीशीर व सुरक्षित ?

चेतनकुलकर्णी_85's picture
चेतनकुलकर्णी_85 in काथ्याकूट
31 Aug 2013 - 11:26 pm
गाभा: 

सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. अनेक जण दहशतवाद(हिरवा,भगवा ,निळा इत्यादि ) वैगैरे चे मुद्दे उपस्थित करत आहे. पण नक्की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्या किती सुरक्षित व खात्रीशीर आहेत हाच मोठा विषय आहे.
निवडणूक आयोगाने आजकाल काही वर्षान पासून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र द्वारे मतदान घ्याचे ठरवले आहे. पूर्वी ह्या यंत्रावर अनेकदा शंका घेतली गेली आहे. सध्या ह्याच विषयावर जरा माहिती गोळा करावी असे ठरवले व ती मांडत आहे.
तर हि मतदान यंत्रे भारतातील भारत इलेक्ट्रोनिक्स व इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ह्यांनी बनवली आहेत. आता जर ह्याच्या कार्य पद्धती वर व हार्ड वेअर मध्ये डोकावूया .

प्रथम दर्शनी असे वाटले होते कि हे यंत्र म्हणजे एकदम हाय फुन्डू इलेक्ट्रोनिक चीज असेल पण असो.

ह्या इलेक्ट्रोनिक यंत्राचे दोन भाग असतात (खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे ) डावीकडच्या भागाला (कळ फलक )"ballot unit " तर उजवीकडच्या भागाला "control unit " असे म्हणतात . ह्या यंत्रान मध्ये कालांतराने सुधारणा होऊन सध्या तिसर्या गेनरेशन ची यंत्रे वापरत आहेत.
EVM

ह्या दोन युनिट्स पैकी "ballot unit " हे मत दात्याने वापरावयाचे असते नुसती आपल्या पसंदीच्या उमेदवार समोरची कळ दाबून तर "control युनिट " हे मतदान केंद्राच्या कर्मचारी वर्ग कडे असते ज्यात मते साठवली जातात . दोन्ही युनिट्स हि एकमेकांना ५ मी लांब केबल ने जोडली गेली असतात .
प्रत्येक "ballot unit " मध्ये १ ६ उमेदवारांची तरतूद असते (१ ६ उमेदवार प्रती युनिट )ज़र उमेदवार १ ६ पेक्ष्या कमी असतील तर उर्वरीत जागा ह्या बंद केल्या जातात . जर १ 6 पेक्ष्या जास्त उमेदवार असतील तर अनेक ballot units ची साखळी केली जाते. पण जास्तीज जास्त ६ ४ उमेदवारांचीच(४ ballot units ) सोय होऊ शकते. प्रत्येक उमेद्वारच्या पुढे त्याचे नाव, पक्ष्याचे चिन्ह व कळ असते जी दाबल्याने त्याच्या पुढचा दिवा लागतो.
control unit हे खालील चित्रात दाखवले आहे. हे मतदान केंद्राच्या कर्मचार्या कडे असते. जेव्हा कर्मचारी "ballot " हि काळ दाबतो तेवा "बल्लोत unit " वरील हिरवा दिवा लगतो. ह्याचा अर्थ मतदार मत नोंदवू शकतो. जेव्हा मतदार कळ दाबब्तो तेव्हा हिरवा दिवा बंद होतो व बीप असा आवज येउन लाल दिवा लगतो. ह्याचा अर्थ तुमचे मतदान झाले आहे. हीच किर्या पुढच्या मत दर साठी घडते .

2

मतदान केंद्र वरचा कर्मचारी केव्हाही "टोटल " ही काळ दाबून एकूण झालेल्या मतदानाची नोंद घेऊ शकतो. तसेच मतदान सुरु ह्यायाच्या उगोदर तो "क्लियर " दाबून टोटल शुन्य करतो. जेव्हा मतदान संपते तेवा तो "कंट्रोल युनिट " वरील प्लास्टिक चे टोपण काढून "क्लोज " ही कळ दाबतो त्यानंतर मतदान करता येत नाहि .
ह्यानंतर "कंट्रोल युनिट " हे वेगळे करून सुरक्षित ठेवले जाते. मतदान मोजणीच्या वेळी "result " हि काळ दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली आहेत ते पहिले जाते व निकाल जाहीर करता येतो.

ह्या इलेक्ट्रोनिक यंत्राचा आतील सर्किट हे खालील चित्रात दाखवले आहे. ह्यात Renesas H8/3644- किंवा Hitachi 630x ह्या सिरीज मधील मायक्रो कंट्रोलर (८ बीट ८ ० ५ १ लायकीचा !!!) वापरला जातो . सर्वात मोठी गम्मत अशी आहे कि ह्याचे जे फर्म वेअर आहे ते ह्या मायक्रो कंट्रोलर च्या "रॉम " मध्ये टाकले जाते आणि कोण टाकतो तर जी कंपनी ही चीप सप्लाय करते ती !!!
3

4

आणखी एकदा का हे फर्म वेयर ह्या चीप मध्ये टाकले कि हे पुन्हा तपासून किंवा बदलत येत नाही !!!.
दोन "EEPROM " चीप मध्ये मतदानाचा डेटा हा साठवला जातो. हा डेटा नंतर "seven segemen led display " वर दृष्टी सातत्याच्या नियमाने दाखवला जातो .

आता आपण ह्या डेटा मध्ये किंवा मुलभूत फर्म वयर मध्ये कसा बदल करून निवडणुकीचा निकाल कसा बदलू शकतो ते बघू . (ज्यांना इलेक्ट्रोनिक्स ची मुलभूत माहिती आहे त्यांना ह्याचे सर्किट पाहून लगेच अश्या कल्पना सुचतील )

१. ह्या मायक्रो कंट्रोलर च्या निर्माणाच्या वेळेला फार्म वेअर मध्ये फेरफार करून कारण हे त्रयस्थ पार्टी करून लोड केले जाते आणि एकदा का लोड केले कि हे पुन्हा तपासून किंवा बदलत येत नाही .

२. ह्या चिप्स फर्म वेयर लोड केलेल्या भारतात पाठवल्या जातात व त्या यंत्रात वापरल्या जातात . आता भारतात आलेल्या ह्या चिप्स ज्या हव्यात त्याच आहेत का हे तपासायची यंत्रणा आपल्या कडे नाही आहे.

३. जर का लोड केलेला प्रोग्राम हा चुकीचा असेल तर तो एका विशिष्ठ उमेदवाराच्या फेवर मध्ये करता येऊ शकतो कारण ह्याचे सर्किट व कार्य पद्धती खूपच सरळ धोपट आहे.

४. जेव्हा पूर्ण यंत्र जोडले जाते तेव्हा आतील इलेक्ट्रोनिक्स भागांशी छेडछाड करणे सहज शक्य आहे.

ह्या सर्व वरून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र हे फेर्फारी साठी अत्यंत प्रवण आहे असे दिसत आहे. बाकी काही अति विशिष्ट्य प्रोजेक्ट साठी सरकारचा "electronic automation " साठी बिलकुल आग्रह नसतो मग ह्या साठीच अट्टाहास का व तो योग्य आहे का(फक्त वेळेची बचत हे कारण सोडले तर )?

अवांतर : बाकी भूज च्या भूकंप च्या वेळी एका पाश्चात्य देशाने मदत म्हणून दिलेल्या ब्लांकेंत्स मध्ये इलेक्ट्रोनिक मायक्रो चिप्स दडवलेल्या सापडल्या जेणे करून कछ्छ भागातील सैनिकी हालचाली जमिनीतील कंपना द्वारे टिपता येतील असे कानावर आलेले होते. मग अश्या मतदान यंत्रात फेरफार करून केवढा मोठा अनर्थ करता येऊ शकतो ह्याची कल्पना न केलेलीच बरॆ.

प्रतिक्रिया

जॅक डनियल्स's picture

1 Sep 2013 - 7:10 am | जॅक डनियल्स

मी याचा कधी विचारच केला नव्हता. खूप चांगल्या विषयाबद्दल माहिती दिली आहे.
खरच या छोट्या गोष्टी वर खूप लक्ष दिले पाहिजे. हल्ली खूप वेबसाईट वर (पहा आणि बनवा !) वाचून माझ्यासारख्याला पण इलेक्ट्रॉनिक सर्किट सोडवता येईल.

उद्दाम's picture

1 Sep 2013 - 10:48 am | उद्दाम

आँ ????

भारतातील सगळी मतदान यंत्रे ही नरेंद्र मोदींच्या गावात म्हणजे अहम्दाबादेत तयार होतात.

आता मोदींच्या निगराणीखाली तयार होऊनही ही यंत्रे मॅनिपुलेट होतात किंवा वर्षानुवर्षे फक्त काँग्रेसला निवडून आणत असतील, तर ते मोदींसाठी लज्जास्पद नाही का?

त्यामुळे इथे काथ्याकूट करण्यापेक्षा डायरेक्ट मोदीनाच संपर्क करावा.

arunjoshi123's picture

1 Sep 2013 - 2:21 pm | arunjoshi123

सांगलीच्या विलिंग्डनच्या एका विद्यार्थ्याचे आमच्या गल्लीत चणे विकण्याचे दुकान आहे. त्याने त्यात भयंकर गलथानपणा केला असल्याची गल्लीवाल्यांना शंका आहे. आम्ही विलिंग्डनच्या प्राचार्यांना थेट तक्रार केली आहे. तिचा काही फायदा झाला नाही. तेव्हा सबब विषयी मी इथे मीपाकरांशी काही काथ्याकूट करू इच्छितो.

चेतनकुलकर्णी_85's picture

1 Sep 2013 - 11:10 am | चेतनकुलकर्णी_85

आता मोदींच्या निगराणीखाली तयार होऊनही ही यंत्रे मॅनिपुलेट होतात किंवा वर्षानुवर्षे फक्त काँग्रेसला निवडून आणत असतील
उद्दाम साहेब, मी वरील लेखात कुठेही असा उल्लेख केलेला नाहीये कि कॉंग्रेस ह्या यंत्रान मध्ये फेरफार करत आहे.
भारतातील सगळी मतदान यंत्रे ही नरेंद्र मोदींच्या गावात म्हणजे अहम्दाबादेत तयार होतात.
होत असतील ! पण वर म्हटल्या प्रमाणे ज्या दोन नवरत्न कंपन्या भारत इलेक्ट्रोनिक्स व इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ह्या अनुक्रमे रक्षा मंत्रालय व अणुउर्जा मंडळ ह्यांच्या कडे आहेत ज्या रक्षा मंत्री व खुद्द पंतप्रधान यांच्या देखरेखी खाली येतात अनुक्रमे. आणि सध्या तूर्तास तरी मोदी ह्या दोन्ही पैकी कोणत्याही पदावर नहित . त्यामुळे तुमच्या विधानानला काडीचीही किंमत नाहीये!
बाकी काही विशिष्ट्य धागे मिपा वर आले कि कुत्राच्या छत्री सारखे आगा -पिच्छा नसलेले आयडी कसे दिसू लागतात ह्याचा उलगडा आता होउ लागलेला आहे!

आमचा आगा पीछा तुमच्या जवळच आहे साहेब ! म्हणजे तुम्ही सांगलीच्या वालचंद कॉलेजात शिकलात आणि मी तुमच्या समोरच असलेल्या विलिंग्डन कॉलेजात. :)

मशीन कोणत्याही मिनिस्ट्रीत तयार होत असले तरी ते तयार होते मोदींच्याच राज्यात. म्हणून मी तुम्हाला सुचवलं त्यानाच गाठा. यात तुम्ही का दुखावले गेलात हे समजले नाही.

अनिरुद्ध प's picture

5 Sep 2013 - 6:58 pm | अनिरुद्ध प

म्हणजे,मशीन कोणत्याही मिनिस्ट्रीत तयार होत असले तरी ते तयार होते मोदींच्याच राज्यात
केन्द्र सरकार्,फक्त वरवर मोदी विरोध करते पण हे काम मात्र गुजरात सरकारला मात्र मोठ्या विश्वासाने,देते असा अर्थ निघतो.

उद्दाम's picture

6 Sep 2013 - 2:13 pm | उद्दाम

सर्कार मशीनचे काम मोदींच्या गावात देते. विश्वासाने.

आणि मोदींच्या फेवरमधले लोक मशीनवर अविश्वास दाखवतात.

चेतनकुलकर्णी_85's picture

1 Sep 2013 - 11:37 am | चेतनकुलकर्णी_85

मशीन कोणत्याही मिनिस्ट्रीत तयार होत असले तरी ते तयार होते मोदींच्याच राज्यात.
परत तेच… तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाहीये असे दिसत्येय ….
यात तुम्ही का दुखावले गेलात
काय संबंध ?

नितिन थत्ते's picture

1 Sep 2013 - 12:34 pm | नितिन थत्ते

खूप पूर्वी इथे चर्चा झाली आहे.

अवांतरः भारतात इलेक्ट्रॉनिक पॉलीसी वैगेरे काही नाही. आपल्याकडे इतके रिसोर्स असतांनाही आपल्याकडे बेसीक ५५५, ७४सिरीज च्या आयसी व्यतिरीक्त काहीच बनत नाही. जी काही इलेक्टॉनीक वस्तू बनतात त्या असेंबल होतात. स्र्कू ड्रायव्हर किंवा कॉपी पेस्ट टेक्नॉलॉजी.

दादा कोंडके's picture

1 Sep 2013 - 12:51 pm | दादा कोंडके

आपल्याकडे इतके रिसोर्स असतांनाही

रिसोर्सेस म्हणाजे काय? प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे नावालाच डिग्र्या घेतलेली लोकं का?

रिसोर्सेस म्हणाजे काय? प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे नावालाच डिग्र्या घेतलेली लोकं का?

रिसोर्सेस म्हणाजे असणारे संसाधने, जसे पीसीबी बनवायला लागणारा कच्चा माल, सिलीकॉन वेफर बनवायला लागणारा कच्चा माल आदी आदी.
अन लोकसंख्या अन नावालाच डिग्या घेतलेली माणसे ही देखील रिसोर्स होवू शकतात. ही लोकसंख्या अन नावालाच डिग्या घेतलेली माणसे उत्तम मजूर बनू शकतात. चीनमध्ये सगळीच माणसे उत्तम डिग्य्रा घेतलेली असू शकत नाही. तरीही पुर्ण जगाला ते इलेक्र्टॉनीक वस्तू पुरवत आहेत.

आताच्या घडीला आपण साध्या साध्या इलेक्र्टॉनीक वस्तू बनवू शकत नाही. इलेक्र्टॉनीक वस्तूंच्या मेटल कॅबीनेट, केबल्स आदी सुद्धा आपण बनवत नाही.

सरकारने इलेक्र्टॉनीक वस्तू बनविण्यासाठी परदेशी कंपन्यांना निमंत्रण देवून बोलावले पाहीजे. पाहिजे त्या सुविधा, टॅक्स सवलत, १००% गुंतवणूक करण्याची सवलत दिली तर अशक्य काहीच नाही. पण आपले पुढारी फक्त उद्घाटने करतात अन लॅपटॉप वाटतात.

अनिरुद्ध प's picture

6 Sep 2013 - 12:32 pm | अनिरुद्ध प

सहमत्,पण तसेच आपल्या लोकान्ची मनसिकता सुद्धा याला जवाबदार आहे,आपल्या ईथे काही गोष्टी जरुर खूप चान्गल्या तयार होतात्,पण Finishing मध्ये मार खातात्,तसेच लेबर सुद्धा महाग पडते आणि ट्याक्स ने कम्बर्डे मोडते,त्या तुलनेत चीन चा माल खूपच स्वस्त पडतो,पण तो टिकावु नसतो,वरती कोणाच्या प्रतिसादात गुजरातचा उल्लेख वाचला,माझ्या माहीती प्रमाणे,गुजरात येथे सर्वात कमी कर आकारणी आहे,म्हणुनच वरिल प्रकल्प गुजरात मधे चालवला जात असावा.

भारतात इलेक्ट्रॉनिक पॉलीसी वैगेरे काही नाही.
हॅहॅहॅ... आहे त्या पॉलिसीज तरी काम करतात का ? ;)

प्रकाश घाटपांडे's picture

1 Sep 2013 - 1:05 pm | प्रकाश घाटपांडे

माहितीपुर्ण लेख. मतमोजणी ऐवजी मतदान केंद्रातच जर यंत्रणेतील लोकांनी रिझल्ट बटन दाबले तर? लोक मॅनेज होउ शकतात.

यसवायजी's picture

1 Sep 2013 - 1:44 pm | यसवायजी

चांगली माहीती आहे. यातील फेरफार हि केवळ शक्यता आहे का अश्या काही घटना घडल्या आहेत?
मी गुगलुन पाहीले, पण काही विशेष मिळाले नाही.

बाकी भूज च्या भूकंप च्या वेळी एका पाश्चात्य देशाने मदत म्हणून दिलेल्या ब्लांकेंत्स मध्ये इलेक्ट्रोनिक मायक्रो चिप्स दडवलेल्या सापडल्या जेणे करून कछ्छ भागातील सैनिकी हालचाली जमिनीतील कंपना द्वारे टिपता येतील असे कानावर आलेले होते.

गोबेल्स लोकांचे हेच तर वैशिष्ट्य. ढीगभर लिहायचे आणि मग कानावर आले असा शेवटी साप जोडायचा. ( नै, असेलही खरे ते. पण काही इतर माहितीही द्या. )

दादा कोंडके's picture

2 Sep 2013 - 9:23 am | दादा कोंडके

सहमत. ब्ल्यांकेट मध्ये चिपा टाकून जमिनीतील कंपनाद्वारे सैनिकी हलचाली टिपणं म्हणजे कै च्या कै आहे राव.

बॅटमॅन's picture

4 Sep 2013 - 2:55 pm | बॅटमॅन

अहो कंच्या तरी सौथ पिच्चरमध्ये असेल दाखवलेलं =)) =))

चेतनकुलकर्णी_85's picture

4 Sep 2013 - 9:41 pm | चेतनकुलकर्णी_85

अहो कंच्या तरी सौथ पिच्चरमध्ये असेल दाखवलेलं

अश्या तर्काने तर प्रत्येक होली वूड चा सिनेमा हा सौथ वरून घेतलेला असावा नै!!

होली वूड शिणेमांचा सर्वात मोठा पंखा

चेतनकुलकर्णी_85's picture

4 Sep 2013 - 9:45 pm | चेतनकुलकर्णी_85

जरा "Tactical unattended ground sensor" किंवा "Unattended ground sensor" हे अंतर जालावर तपासून पहा … काहीशी संबधित माहिती मिळेल ….
हा संदर्भ द्यायचा उद्देश्य हाच होता कि अश्या देशाचे दशा व दिशा ठरवणाऱ्या गोष्टी बाबत एवढी जोखीम घेणे योग्य आहे का ?

उद्दाम's picture

5 Sep 2013 - 9:19 am | उद्दाम

ज्याला सेन्सर पेरायचाच असेल तो कागदी मतपत्रिकेच्या बॉक्समधूनही पाठवू शकेलच नै का?

हा संदर्भ द्यायचा उद्देश्य हाच होता कि अश्या देशाचे दशा व दिशा ठरवणाऱ्या गोष्टी बाबत एवढी जोखीम घेणे योग्य आहे का ?

अगदी अगदी . सत्यनारायण घालणारा भटजीही अशीच भीती घालत असतो, माझं नै ऐकलेस तर तुझी नाव बुडेल बघ! तुमच्या वाक्याला तसा वास येतोय.

कुणीतरी सेन्सर पेरेल म्हणून निवडणूक प्रक्रियेतून मशीनच बाद करणे म्हणजे आनंदच.

थंडीच्या दिवसात ब्लँकेट तरी वापरता का? का त्यात सेन्सर असेल म्हणून तेही दिलेत फेकून??

--- वाकळ पांघरुन सत्यनारायणाचा शिरा खाऊन निवांत झोपणारा.

उद्दामराव वाकळे

चेतनकुलकर्णी_85's picture

5 Sep 2013 - 7:19 pm | चेतनकुलकर्णी_85

समोरचा काय म्हणतोय ह्याच्या कडे सोयीस्कर कानाडोळा करून आपलेच गाढव दामटणे फारच छान जमते तुम्हाला . ह्या हिशोबाने तुमची महाविद्यालयातील एक्सटरनल ची "ओरल " फारच दीर्घ काल चालत असेल नै?

बाकी वायफळ प्रश्न विचारून मिसळपाव चे खास बाग मैदान कशाला बनवताय राव ?

उद्दाम's picture

5 Sep 2013 - 9:21 am | उद्दाम

..

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Sep 2013 - 12:46 pm | पुण्याचे वटवाघूळ

एकूणच प्रतिसाद देतानाचा उद्दामपणा आणि लिहायची पध्दत यावरून मिपावर पूर्वी गझनीचा महंमद उर्फ धम्मकलाडू या नावाने लिहिणार्‍या पूर्वीच्या एका आय्.डी ची आठवण आली. त्या आय्.डी ची साईन होती-- 'तुझे वाचन किती तू बोलतोयस किती. तुझा पगार किती तू बोलतोयस किती'. म्हणजे तो आय्.डी किती उद्दाम होता हे कळेलच. आता स्वतःला उद्दाम म्हणणवारी आय्.डी ही त्याच गझनीच्या महंमदाची डुप्लिकेट आय्.डी आहे असे वाटायला लागले आहे :)

अनिरुद्ध प's picture

4 Sep 2013 - 11:27 am | अनिरुद्ध प

त्रोटक पण चान्गली माहिती.

ऋषिकेश's picture

4 Sep 2013 - 1:34 pm | ऋषिकेश

चांगली परंतु काहिशी जुनी माहिती :)

आता नवी मशीन्स येत आहेत ज्यात तुम्ही दिलेल्या मताचे प्रिंट बाहेर पडेल ते तुम्ही बॅलट बॉक्समध्ये टाकायचे. जर उमेदवारांनी मागणी केली तर पडताळणीसाठी प्रत्यक्ष प्रिंटसची मोजणी होईल ज्यामुळे यातील बहुतांश तृटिंवर पायबंद बसेल

पटकन शोधल्यावर ही जुनी बातमी सापडली. कर्नाटकाच्या व इतरही बाय इलेक्शन्ससाट्।ई काही केंद्रांवर ही यंत्रे वापरातही आली आहेत

अशोक पतिल's picture

5 Sep 2013 - 10:16 am | अशोक पतिल

आता नवी मशीन्स येत आहेत ज्यात तुम्ही दिलेल्या मताचे प्रिंट बाहेर पडेल ते तुम्ही बॅलट बॉक्समध्ये टाकायचे. जर उमेदवारांनी मागणी केली तर पडताळणीसाठी प्रत्यक्ष प्रिंटसची मोजणी होईल ज्यामुळे यातील बहुतांश तृटिंवर पायबंद बसेल

म्हणजे..परत येरे माझ्या मागल्या!

मला परत क्लाऊड कंप्युटींगवरचा व्हिडीओ आठवला :D

अग्निकोल्हा's picture

6 Sep 2013 - 1:26 pm | अग्निकोल्हा

अग्गागा :D:D:D:D:D:D:D मेलो मेलो. धन्य ति आठवण अघाद ते ज्ञान त्या अधिकार्‍याचे. विश्वबंधु गुप्ता रॉक्स!

http://www.youtube.com/watch?v=AnxrJiS5uKU

उद्दाम's picture

8 Sep 2013 - 2:08 pm | उद्दाम

धागा बंद का पडला?

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 2:54 pm | अनिरुद्ध प

समजत नाही कि धागा बन्द पडला की पाडला?

उद्दाम's picture

11 Sep 2013 - 3:02 pm | उद्दाम

नै काय आहे, पूर्वी निवडणुका झाल्या, मद मोजणी झाली की ताशा, गुलाल, मिरवणूक, मारामार्‍या वगैरे व्हायचं.

मग गावात दोन बोर्ड लागायचे. जिंकणारे म्हणायचे -- आभार.
हरणारे म्हणायचे --- भौतिक विजय त्यांचाच असला तरी नैतिक विजय आमचाच आहे. :)

आजकाल , निवडणूक हरुन मग असे नैतिक विजयाचे बोर्ड लावाय इतका वेळ नाही कुणाकडे.

मग आता गेली दहा वर्षे झाली, बघतोय, निवडणुका आल्या की ज्याना हरण्याची भीती असते ते लोक आधीच बोर्ड लावतात ... 'मशीनमध्ये गोंधळ नसेल कशावरुन?'

खटासि खट's picture

8 Sep 2013 - 9:07 pm | खटासि खट

माझा आक्षेप शेवटी मतमोजणीच्या वेळी जोडतात त्याला आहे .एकेक जोडून मतविभागणी दाखवल्याने कोणत्या भागाने (उदा: अमुक नगर)कोणत्या पक्षाला मते दिली ते कळते .तसे न करता सर्व यंत्रे (उदा:मुंबई दक्षिण मतदार संघाची) जोडून फक्त एकत्रित निकाल दाखवा .