शिमगा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
10 Aug 2013 - 9:12 am

माझे कसे म्हणू मी माझाच मी न आहे
स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे
आवेग भावनांचा माया उतून वाहे
अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे

मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा
वारा थके जरासा अंगी उलाल लाही
श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला
आतंक सोसलेला शिमगा सुभान देही

………………अज्ञात

करुणकविता

प्रतिक्रिया

बेहतरीन...

आणखी काय म्हणावे?

अज्ञातकुल's picture

12 Aug 2013 - 11:57 am | अज्ञातकुल

मनःपूर्वक आभार वेणू...................... :)