साबुदाणा वडा(इन अप्पेपात्र)

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in पाककृती
19 Jul 2013 - 9:39 pm

साहित्य-
भिजवलेला साबुदाणा- २ वाटी
उकडलेले बटाटे- २ छोटे
दाण्याचे कुट - २ टे. चमचे,
लिंबु- अर्धा,
लाल तिखट- २ चमचे,
मीठ- चवीनुसार,
साखर- १ चमचा,
(जिर व कोथंबीर- मी उपवासाला खाते, ज्यांच्या उपवासाला चालते त्यांनी जरुर वापरावी.),
तेल.

क्रुती-
भिजवलेला साबुदाण्यात बटाटे किसुन मिक्स करावे.
वरील सर्व साहित्य-दाण्याचे कुट+लिंबु+लाल तिखट+मीठ+साखर+ जिर व कोथंबीर साबुदाणा व बटाट्यात घालुन चांगले मिक्स करावे.
1

आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवुन घ्यावे.
2

अप्पे पात्रात थोडे तेल टाकुन त्यात साबुदाण्याचे छोटे वडे टाकावे.
3

दोन्ही बाजुंनी चांगले फ्राय करावे.
4

खरच सांगते खुप कमी तेल लागते. मी एकुण ३५ वडे केले त्याला ४ चमचे (पोह्याचा चमचा)तेल लागले.
5

6

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

19 Jul 2013 - 9:44 pm | त्रिवेणी

माफ करा फोटो अपलोड करतांना परत काहितरी गड्बड झाली माझ्याकडुन

त्रिवेणी's picture

19 Jul 2013 - 10:08 pm | त्रिवेणी

खुप खुप धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2013 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

साबुदाणम् रबर-सदृषं...श्वेतवर्णम् च्यूईंगम्!!! =))

बॅटमॅन's picture

25 Jul 2013 - 12:13 pm | बॅटमॅन

पाकृ रोचक आणि आत्मूसचा प्रतिसादही :)

राघवेंद्र's picture

19 Jul 2013 - 10:35 pm | राघवेंद्र

आज सकाळी हा पदार्थ खुप तेलगट असल्याने नको ( असे बायको म्हणाली :) ) . पण तुम्हि छान पाकक्रुती दिल्याबद्दल धन्यवाद. संध्याकाळी वडे मिळाले तर फोटो टाकेलच.

त्रिवेणी's picture

19 Jul 2013 - 10:48 pm | त्रिवेणी

नकी करुन बघा. खरच कमी तेल वापरुन हे वडे करता येतात सो खातांना अपराधी वाट्त नाही.

कवितानागेश's picture

20 Jul 2013 - 12:36 am | कवितानागेश

मस्त आयडीया. आता बिन्धास्त करेन.
एक्स्टेन्डेड एकादशीला! ;)

मज्जा वाटली ही पाकृ बघून. आता करून बघेन.

शिल्पा ब's picture

20 Jul 2013 - 2:52 am | शिल्पा ब

छान आहे.
सकाळी फेबुवर साबुदाण्याच्या खिचड्यांचे फोटो बघुन साबुदाण्याची खिचडी करुन खाल्ली. १ कप साबुदाण्यात ५४४ कॅलरीज असतात. कदाचित म्हणुनच "उपासाला" खात असावेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2013 - 6:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण वडे जरा लहान वाटतात.

-दिलीप बिरुटे

त्रिवेणी's picture

20 Jul 2013 - 8:24 am | त्रिवेणी

हो
वड्यांची साईज छोटी होती. माझे अप्पेपात्र थोडे छोटे आहे आणि हे वडे छोटे असल्याने कमी तेल असुनही आत पर्यंत चांगले शिजतात.

'मायबोलीवर' ही टिप मागेच कोणीतरी दिली होती, बटाटेवडे आप्पे पात्रात केल्याचं लिहिलं होतं. मी तेव्हाचं ह्यात साबुदाणे वडे करून पाहिले. खरंच तेल कमी लागतं. पण आकार खूपच छोटा ठेवावा लागतो वड्यांचा.

तुम्ही बटाटे वडे करुन पाहिलेत का? म्ह्णजे चांगले होत असतील तर मी सुध्दा करुन बघेन.

पैसा's picture

20 Jul 2013 - 9:50 am | पैसा

सध्या बरेच प्रयोग सुरू दिसतायत! पण हा कमी तेलाचा वडा आवडला. बाकीचे तळकट पदार्थ असे करायला हरकत नाही!

हो ताई आता दिवाळी पर्यंत घरीच असणार आहे,सो सध्या प्रयोग करुन तुम्हा लोकांना अस काहीबाही लिहून त्रास देणार आहे.

इरसाल's picture

20 Jul 2013 - 10:19 am | इरसाल

मस्त आवडलं.
पण त्या उपवासाच्या साबुदाणावड्यांच्या मधे ते अंड का ठेवले आहे अर्ध कापुन ?

त्रिवेणी's picture

20 Jul 2013 - 1:35 pm | त्रिवेणी

नाय हो ते अंड नाय. ते दही आहे.

नाही, मी बटाटेवडे try नाही केले. साबुदाणे वडे मला थोडे कच्चे वाटले आतून. जास्त वेळ ठेवले तर बाहेरून कडक झाले.
पण बटाटे वड्याला हा प्रॉब्लेम बहुतेक येणार नाही. कारण आपण बटाटा आधीच शिजवून घेतो. फक्त वरचं cover कच्चं राहत नाही ना हे बघायला हवं.

वा. आयडीया आवडली. आता करुन पाहणार.

प्रतिसादासाठी सगळ्यांना खुप खुप धन्यवाद.

मोदक's picture

20 Jul 2013 - 2:10 pm | मोदक

भारी आयड्या!

अनन्न्या's picture

20 Jul 2013 - 4:14 pm | अनन्न्या

जास्त प्रमाणात मात्र हे शक्य होणार नाही असं वाटतय.

मृणालकेदार's picture

20 Jul 2013 - 4:20 pm | मृणालकेदार

खरच अप्रतिम कल्पना आहे....
ब्राव्हो....

स्पंदना's picture

22 Jul 2013 - 8:12 am | स्पंदना

मस्त! म्हणजे तळणाचे तेल काय करु? हा प्रश्नच निकालात निघाला.
मेदु वडे असे तळले तर चालतील का?

त्रिवेणी's picture

22 Jul 2013 - 9:16 am | त्रिवेणी

मी मुगाची भजी केली होती, ती मस्तच झाली होती.मेदुवडे लहान साईजमध्ये तळावे लागेल, म्ह्णजे आत पर्यंत शिजतील. आता एक दिवस मेदुवड्यांचा प्रयोग करुन बघते.

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2013 - 11:35 am | दिपक.कुवेत

साबुदाणे वडे. मी मागे कोफ्ते पण असेच आप्पेपात्रात केले होते.

त्रिवेणी's picture

22 Jul 2013 - 1:43 pm | त्रिवेणी

तुमचीही कोफ्त्यांची रेसिपी येऊ द्या प्लीज.

तुमचा अभिषेक's picture

22 Jul 2013 - 12:28 pm | तुमचा अभिषेक

मस्त आयडिया आहे.. घरी दाखवतो.. वाचनखून :)

प्रभाकर पेठकर's picture

22 Jul 2013 - 12:50 pm | प्रभाकर पेठकर

वाचनखून

वाचनखून??.... बापरे..!

त्रिवेणी's picture

22 Jul 2013 - 1:42 pm | त्रिवेणी

नका हो नका आत्ताच खुन करु.
करुन, खाऊन मग नाहीच आवड्ले तरच करा खुन त्या वड्यांचा.

सस्नेह's picture

22 Jul 2013 - 1:06 pm | सस्नेह

पण पुष्कळ वेळ ठेवूनसुद्धा आतून कच्चे राहिले.

वड्यांचा आकार लिंबाएवढाच ठेवा. बटाटा आणि दाणे कुट टाकला होता ना?
आणि नाहीच जमले कुरकुरीत तर माझ्याकडे या माहेरपणाला मी करुन खाऊ घालीन.

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2013 - 1:22 pm | दिपक.कुवेत

मग वडे किंवा आप्पेपात्र बदल...बघ आतुन नक्कि शीजतील

सानिकास्वप्निल's picture

22 Jul 2013 - 2:29 pm | सानिकास्वप्निल

मी कोफ्ते असेच आप्पेपात्रात बनवते आता साबुदाणे वडे ही बनवून बघेन :)

स्नेधा's picture

24 Jul 2013 - 10:11 pm | स्नेधा

उद्या संकष्टी आहे! बनवून पाहते. :-)

सुहास झेले's picture

25 Jul 2013 - 4:01 am | सुहास झेले

मस्त आहे कल्पना... पाककृती आवडली :) :)

गौरीबाई गोवेकर's picture

4 Sep 2013 - 12:36 pm | गौरीबाई गोवेकर

आजकाल साबुदाणा चांगला मिळत नाही. खीचडी पण चिकट्ट कशीतरी होते. चांगला साबुदाणा घेताना कसा ओळखायचा हे कोणाला माहिती आहे का?