आज बरोबर १४ दिवसांनी कॅफे मध्ये आलो होतो. द्विधा मनस्थिति होति. परत चाट करावे कि बाबांच्या साईट पहाव्यात. पण एक भीती होती कि विज्याला जर कळले कि परत चाट करतो आहे तर तो सगळ्यांना सांगू शकत होता कि मी गे लोकांशी चाट करतो, किंवा माझ्यात काही तरी प्रोब्लेम झाला आहे. मित्रांना एक आयताच विषय मिळाला असता.त्यामुळे बाबांची साईट पाहायचे पक्के केले आणि पुन्हा एकदा कोपर्यातला कॉम्पुटरवर ताबा घेतला. XXXX बाबा.कॉम लावून बसलो. पण मन लागत नव्हते. सारखे वाटत होते कि परत चाट करावे. परत एकदा नशीब आजमावावे. शेवटी न राहाववून १५ मिनटात बाबा बंद करून MIRC लावले. ह्या वेळेस पुणे चाट च्यनेल जोइन केला. कसली कसली निक नेम होती मुला मुलींची prince of heaven, dream gal,barbie gal for u, night king. माझी कल्पनाशक्ती इतकी अचाट नसल्या कारणाने मी आनंद नावानेच चाट करू लागलो. पण घंटा कोण reply देत नव्हते. मला राग येवू लागला. कानात विज्याचीवाक्ये घुमू लागली "साल्या तू काय शाहरुख आहेस का". वैताग आला, MIRC परत कधी हि न वापरायचे ठरवले आणि बंद करणार तितक्यात एक पॉप अप आला .…. "हाय आनंद मी मंदिरा". आई झ#% मला रेप्लाई… मनात आले बेटा भगवान तो है आणि हीच तुझी आनंदी. कसले जबराट नाव होते "मंदिरा". कसे काय ह्यांचे आई वडील इतकी छान छान नवे ठेवतात, नाही तर आमचे नाव काय? "आनंद" आणि मित्रांनी केले "अंड्या" … माझे मन माझ्या नावाचा तिरस्कार करू करू लागले …. आज वाटते कि तेव्हा जर तिने "गोदाक्का" निक् नेम घेवून जरी चाट केले असते तरी मला हेच वाटले असते …. … पण त्या वेळी "मंदिरा" नाव वाचूनच कलेजा खल्लास झाला.
मी रेप्लाय केला "कशी आहेस मंदिरा"…. परत रेप्लाई "मी मजेत….तु बोल "… मग काय केले चान्गले २ तास चाटिंग. ती मंदिरा घाटगे …DEBRA … नारायण पेठेत रहायची… S P कॉलेज मध्ये होति. नेट कॅफे मध्ये पार्ट टाईम जॉब करत होती. रोज चाटिंग चालू झाले. ती तशी फ्रान्क होती, छान बोलयचि. मधेच मनात विचार यायचा साला हा पण गे नसेल ना? पण मी विचार झटकून टाकायचो. तरी हि मनात हा किडा होताच. एकदा तिला म्हणालो कि तुझा नंबर दे ना, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. आणि काय आश्चर्य तिने नंबर दिला. मला स्वर्ग दोन बोटे नवता राहिला तर मी स्वर्गाच्या दोन बोटे वर होतो.
नंबर एका कागदावर टिपून घेतला आणि आनंदात घरी आलो. नंबर तर मिळाला पुढे काय करायचे? आयुष्यात कधी हि मुलींशी न बोलल्या मुले मला काहीच अनुभव नवता. माझा एक मित्र होता निलेश … त्याला खूप GF होत्या असे तो तरी सांगायचा. त्याचे मार्गदर्शन घ्यायचे ठरवले. संध्याकाळी निल्या कडे गेलो आणि त्याला नंबर विषयी सांगितले. त्याला जरा आश्चर्य वाटले कि मी मुलींशी कधी पासून बोलू लागलो. पण तो काही बोलला नाही. मला म्हणाला "अंड्या आपल्याल लई अनुभव आहे ह्या बाबतीत, तू फक्त नंबर दे आणि मी कसा बोलतो ते बघ. तुला ट्रेनच करून टाकतो". खरे सांगतो त्याचा आत्मविश्वास पाहून मला भरून आले होते. असे वाटले कि का नाही मी याच्या कडे आधी आलो. हाच आहे जो माझे आणि माझ्या आनंदीचे मिलन घडवणार. डोळेच भरून यायचे बाकी होते.
त्यांच्या घरी कॉर्ड लेस फोने होता हो घेवून आम्ही बाल्कनीत गेलो. मी दिलेला नंबर त्याने फिरवला, आणि फोन स्पीकर वर टाकला. बर्याच वेळ रिंग वाजत होती,शेवटी तिकडून एक कडवट आवाज आला "हेल्लो कोण पाहिजे?" निल्या लगेच " काका मंदिरा आहे का?"
समोरची व्यक्ती आणखीन कडू आवाजात "कोण मंदिरा?"
निल्या " मंदिरा घाटगे"
समोरची व्यक्ती "नंबर नित बघून फिरवत जा ...होपेलेस लोकं"
निल्या पण पेटला,पण निल्याला बोलायचा चान्स न देता त्याने फोन कट केला. निल्याची तडफड झाली. तो राग माझ्यावर काढला "अंड्या भें*# नंबर नीट सांग,आपल्याला कोणाचे ऐकून घ्यायची सवय नाही"
मला पण निल्याचा राग आला होता …पन काम माझे होते… परत नंबर dial केला, फोन एका काकुनी उचलला, तसा निल्या परत फोर्मात आला. मला मी काय आणि कसे बोलतो ते ऐक असे खुणावून बोलू लागला " मंदिरा आहे का ?"
काकू "मंदिरा तुझा फोन आहे गं "
निल्याने मला डोळा मारला, ह्या वेळेस फोने बरोबर लागला होता.
तिकडून एक मंजुळ आवाज आला "हेल्लो मंदिरा स्पिकिंग..... हु इस थिस?"
इंग्लिश ऐकून निल्याच्या कपाळात, निल्याने फोन कट केला, आणि मला दाखवायचा प्रयत्न केला कि फोने आपोआप कट झाला आहे. आणि म्हणाला “काही तरी प्रोब्लेम आहे लाएन मध्ये, मगाशी रॉंग नंबर लागला … आत्ता कट झाला …सरखे फोन नको करायला आपण उद्या परत प्रयत्न करू" त्याने मला कटवले. आता मलाच माझे काही तरी करावे लागणार होते. फोन नंबर तर होता पण करायची हिम्मत नव्हती. दोन दिवस गेले चाट सुरु होते पण मला माझ्या आनंदीशी बोलायचे होते.
त्या दिवशी संध्याकाळी हिम्मत करून फोन केला आणि नेमका तिनेच उचलला "हेल्लो "
माजे heart beats वाढले, घश्याला पार कोरड पडली ,काय बोलावे सुचेना, आणि नेहमीच्या सवयीने बोलून गेलो "अंड्या बोलतो आहे"
"अंड्या ? अहो पण आम्ही शाकाहारी आहोत आम्हाला नकोत अंडी " मागून कोणीतरी हसल्याचा आवाज
मी "Sorry मी आनंद, तुम्ही मंदिरा ना ? "
थोडा वेळ शांतता …
मी बधिर झालेलो …मुलिशि आयुष्यात पहिल्यांदा बोलत होतो … ती जर समोर असती तर चक्कर येवून पडलो असतो.
"अय्या तुम्ही ताईचे चाट फ्रेंड ना ? तिने सांगितले मला तुमच्या बद्दल"
आई शपथ म्हणजे तिने मझ्या बद्दल तिच्या बहिणीला पण सांगितले होते…… मी जर माझ्या बहिणीला असे काही सांगितले असते तर तिने लगेच आमच्या जेम्स बॉंडला (तीर्थरुपांना) पिन मारली असति. आणि त्यांनी माझे चार चौघात वाभाडे काढायला कमी नसते केले. असो.
मला काय प्रतिक्रिया द्यावी समजेना, मी काहीच बोललो नाही. बहुधा तिची बहिण वैतागली असावी.
ती "ताई तुझा फोन आहे गं "
कोणी तरी पळत येण्याचा आवाज आणि तिची बहिण तिला म्हणाली "बहुतेक मंद आहे हा … तूच बोल"
मंदिरा "आनंद तु…? अरे तुला मी नंबर देवून किती दिवस झाले आणि तू आज फोन करतो आहेस"
ती एकदम नॉर्मल होति… पण मी जाम excite झालो होतो … काय बोलावे सुचत नव्हते. तितक्यात माझी आई हॉल मध्ये आली. मी फोन काही न बोलता ठेवून दिला. आईला बहुधा माझ्या चेहऱ्याकडे पाहून संशय आला असावा, तिने विचारलेच "कोणाचा फोने होता?"
मी "तुला काय करायचे आहे?"
आई "काय होणार ह्या पोराचे? लोकांची मुले कुठल्या कुठे गेलि…. आणि हा … मी म्हणते जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी"
परत तिचे लेक्चर चालू होण्याआधी तिथून निसटलो
माझे heartbeats जाम वाढल्या होत्या… ते नॉर्मल करण्या करता मावशीच्या टपरीवर जावून बिडी मारण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या मनातून तिचे विचार काहीकेल्या जात नव्हते. आईच्या अवेळी येण्याचा पण राग येत होता. काय करावे ? ती आता उद्या नक्कीच विचारेल काळ फोने का कट केलास? तिला काय सांगावे. मी बधिर झालो होतो. तीन चार कश मारल्यावर जर शांत झालो.
दुसर्या दिवशी तिने विचारलेच कि काल फोन का कट केलास ? मी ठरवल्याप्रमाणे उत्तर दिले, फोन जुना झाला आहे कधी कधी आपोआप कट होतो. बहुतेक तिचा विश्वास बसला असावा तिने नंतर काहीच प्रश्न नाही विचारले. परत नेहमी प्रमाणे चाट चालू झाले. ठरवले कि पुढच्या आठवड्यात नक्की फोन करायचा.
हळू हळू हिम्मत येत गेली आणि मी नंतर फोन केला आणि चक्क ७ मिनिट तिच्याशी बोललो. For me it was big achievement. जाम खुश झालो स्वतःवर. दसरा जवळ येत होता.तिला तिच्या घराचा पत्ता विचारला तिने काही हि आढे वेढे न घेता तो दिला. मग मी न विसरता त्या दसर्या पासून प्रत्येक सणाला ग्रीटींग्स पाठवणे चालू केले. फोन तर चालू होतेच. हळू हळू तिच्या आईशी (म्हणजे माझ्या होणार्या सासूशी) तिच्या प्रेमळ बहिणीशी बोलन होऊ लगले. तिची आई एक दोनदा मला म्हणाली सुद्धा अरे पुण्यात राहून ग्रीटींग्स पाठवतोस तर एकदा घरी तरी ये. मंदिरा सांगत असते तुझ्या बद्दल.
मित्रानो काय सांगू तुम्हाला हे ऐकून मला काय वाटले असेल. …. देवाचे आभार मानले कि मला इतकी चांगली लोक दिलेस.
मंगळवारचा दिवस होता, दुकानात माश्या मारत बसलो होतो. तितक्यात माझे मोठे काका आले.
काका "काय आनंदराव कसे चालू आहे?"
मी "मजेत"
काका "नोकरी बिकरी करायचा विचार आहे कि आपले दुकानातच पुड्या बांधणार आहेस"
मी "प्रयत्न चालू आहेत"
खरे तर चाट चालू झाल्या पासून मी बिलकुल प्रयत्न नव्हतो करत.
काका "उद्या या आमच्या ऑफिसमध्ये बघू काही जमते का ते"
माझे विचार चक्र चालू झाले जर खरेच नोकरी मिळाली तर माझे आणि माझ्या मंदिराचे काय होणार. आयुष्य मस्त मजेत चालले होते. ह्यांना कोणी नोकरी पाहायला सांगितली. मला काकाचं राग येवू लागला होता. पण झक मारून जाने भाग होते.
सकाळी सकाळी आवरून आणि त्यातल्या त्यात बरे कपडे घालून काकांच्या ऑफिसमध्ये पोहचलो. काका मला H R मध्ये घेवून गेले. आणि तिथल्या साहेबाना सांगितले कि हा माझा पुतण्या आहे ह्याला कुठे तरी चिटकवा. माझे काका बरेच सेनिओर असल्यामुळे तिथे त्यांच्या शब्दाला किंमत होती. (खरे तर हे माझे दुर्दैव). HR Manager ने कुठे तरी फोन केला, काकांना म्हणाले मार्केटिंग तें मध्ये ट्रेनी साठी requirement आहे. तिथे काम करू शकेल का हा? काकांनी मला विचारले " करशील का रे" हो म्हणण्याशिवाय माझ्या कडे काही पर्याय नव्हता त्यांनी लगेच मला जोइन करून घेतले. काय नशीब असते पहा जेव्हा नोकरी पाहिजे होती तेव्हा नाही मिळाली …. आणि आता …:(
मला लगेच HR वाले मार्केटिंग department मध्ये घेवून गेले, तिथल्या साहेबांशी ओळख करून दिली आणि म्हणाले तुम्हाला आज पासून इथे ट्रेनी म्हणून काम करावे लागेल. मी मान डोलावली.
त्या दुपारीच मंदिराला सांगितले कि मला नोकरी मिळाली, आपण आता फोने वर contact मध्ये राहुयात. दुसर्या दिवशी सकाळी ऑफिस मध्ये पोहचलो. HR Formalities पूर्ण झाल्यावर मला बसायला जागा दिली. मी सोडलो तर सगळे जन बिझी होते. मला जो कॉम्पुटर दिला होता त्या वर TP करत होतो. आणि मला समजले कि इथे इंटरनेटच्या सगळ्या साईट ओपेन होतात. मी प्रचंड खुश झालो …पहिले काम MIRC डाऊनलोड करण्याचे केले. आता तर काय मी ऑफिस मधून पण चाट करू शकत होतो. तसे मला जास्त काम नव्हते . मग काय दिवस भर चाट… आणि वर ३०००/- काय पाहिजे अजून. दिवस मागून दिवस जात होते. मला जरी दिवस भर काम नसले तरी मी कॉम्पुटरवर चाट करयचो आणि बर्याचदा रात्री ८.३० पर्यंत थांबायचो . साहेबाना वाटायचे कि मी फार काम करतो. एकदा असेच रात्री चाट करण्यात रमून गेलो होतो. काही वेळाने लक्षात आले कि साहेब मागेच उभे राहून बघत आहेत कि मी काय करतो आहे. माझी जाम टरकली…
साहेब "आनंद काम सोडून हे काय करतो आहेस?"
आता झाली का पंचायत काय सांगू? पण मला एक गोष्ट जाणवली कि त्यांना मी काय करतो आहे हे बिलकुल समजले नव्हते. MIRC मध्ये microsoft, ORACLE असे बरेच चाट चान्णेल होते जे त्यांच्या product विषयी users ना मदत करत. मी दिले ठोकून कि MS ऑफिस मध्ये प्रोब्लेम होता तो सोल्व करण्यासाठी मी चाट करत होतो. त्यांचा जास्त विश्वास बसला नाही. पण काहीच न समजल्या मुले त्यांनी जर थंड घेतले. माझी तर पार हवा टाईट झाली होति. जे जसे जागेवर जावून बसले, मी घरी जायला निघालो. दुसर्या दिवसापासून जर जपून चाट करावे लागणार होते.
अश्यातच february महिना उजाडला. माझा आणि माझ्या मित्रांचा १४ feb चा कार्यक्रम म्हणजे कॉलेजच्या कट्टयावर जावून बिड्या फुकट बसायचे. समोर लेडीज होस्टेल असल्याने बर्याच मुली दिसायच्या. पण सगळ्या नॉर्थ इंडिअन पोरांबरोबर engage. आमचा आवडता विषय म्हनजे… नॉर्थ इंडिअन पोरे कशी मुलीना गटावतात …कुठे कुठे नेतात … कुठली पोरगी कोणाला पटेल … ह्या पलीकडे ३ वर्ष्यात काही केले नव्हते. पण बहुदा हे वर्ष वेगळे असणार होते. ह्या वर्षी मला मंदिरा भेटली होती. अश्यातच १४ feb उजाडला आणि अनायासे त्या दिवशी गुरुवार होता म्हणजे आमचा पोळा. सकाळी ९.३० लाच तुषारचा फोन आला " अंड्या कॉलेजवर ये" मी तयार होवून कॉलेजला पोहचलो तिथे तुषार आणि विवेक कट्ट्यावर पोरींना बघत बसले होते.
क्रमश:
प्रतिक्रिया
12 Jul 2013 - 3:43 pm | Mrunalini
चांगले चालु आहे चाट प्रकरण. :P पुभाप्र
12 Jul 2013 - 3:48 pm | संजय क्षीरसागर
मस्त हसवलंस.
12 Jul 2013 - 3:58 pm | जेपी
****
12 Jul 2013 - 4:01 pm | प्रभाकर पेठकर
कथानक वेग घेते आहे. कांही अनावश्यक शब्द वगळता हसत-खेळत अनुभवकथन आवडते आहे.
12 Jul 2013 - 4:33 pm | देवांग
Thanks …पन हि काही प्रमाणात सत्य कथा आहे… जे खरेच घडले आहे तसेच्या तसे लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे मी …. अपशब्दाबद्दल जास्त मनावर घेवू नये.
12 Jul 2013 - 4:07 pm | पिलीयन रायडर
मजा येतेय हां...
आणि पटापटा लिहीताय त्यामुळे तर अजुनच मस्त...!!
12 Jul 2013 - 4:07 pm | अग्निकोल्हा
.
12 Jul 2013 - 4:08 pm | किसन शिंदे
येऊ द्या पुढचा भाग पटकन.
12 Jul 2013 - 4:42 pm | सौंदाळा
मस्त चालु आहे तुमचे चाट जीवन.
येवु द्या पुढचा भाग पटकन.
वाचुन चाट पडलेला.. (सौंदाळा)
12 Jul 2013 - 5:59 pm | पैसा
हा पण भाग आवडला. पण काय हो, ते आनंद ऊर्फ अंड्या साळसकर आणि तुमचे अनुभव एकसारखे का वाटतायत!
12 Jul 2013 - 8:18 pm | देवांग
कारण तो माझा सावत्र जुळा भावू आहे
12 Jul 2013 - 8:54 pm | भाते
कसा मी, कसा मी, कसा मी, कसा मी;
जसा मी, तसा मी, असा मी, असा मी.
साभार पु. ल. देशपांडे (असा मी असा मी)
12 Jul 2013 - 7:41 pm | जेपी
वेगवान