✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गजलेचा अनुवाद

अ — अज्ञातकुल, Wed, 07/10/2013 - 11:03
मूळ गझलेच्या स्वैर अनुवादाचा एक प्रयत्न. गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी. क़तील शिफ़ाई यांची मूळ गजल अपने होंठों पर सजाना चाहता हूँ आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ | कोई आँसू तेरे दामन पर गिराकर बूँद को मोती बनाना चाहता हूँ | थक गया मैं करते-करते याद तुझको अब तुझे मैं याद आना चाहता हूँ | छा रहा है सारी बस्ती में अँधेरा रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ | आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये मौत भी मैं शायराना चाहता हूँ|| हे सखी हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज ज्ञात मी आठवावे या मला आधीन मग होईन मी लोपले तिमिरात सारे जाळतो उश्वास मी ना दिसे कांही तरीही एकटा फिरतोय मी एक वांछा तू असावी ज्योत मंगळ ह्या तमी ओळखीची ओळ व्हावी तू, मला विझवीन मी ............................अज्ञात (१०/०७/२०१३)

प्रतिक्रिया द्या
1351 वाचन

💬 प्रतिसाद (6)

गझल आवडली

दिपक.कुवेत
Wed, 07/10/2013 - 11:18 नवीन
लोपले तिमिरात सारे जाळतो उश्वास मी ना दिसे कांही तरीही एकटा फिरतोय मी......हे कडव जास्त आवडलं
  • Log in or register to post comments

chhan. khoop aavaDle. shivay

निनाव
गुरुवार, 07/11/2013 - 03:21 नवीन
chhan. khoop aavaDle. shivay "गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी." agadee sahamat!!
  • Log in or register to post comments

आधी दिलेल्या अनुवादात थोडा

अज्ञातकुल
Sun, 07/14/2013 - 12:43 नवीन
आधी दिलेल्या अनुवादात थोडा बदल करून................... हे सखी हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज जाणतो मी आठवावे या मला अर्पीन समिधा प्राण मी लोपले तिमिरात सारे जाळतो उश्वास मी ना दिसे कांही तरीही एकटा फिरतोय मी एक वांछा तू असावी ज्योत मंगळ ह्या तमी ओळखीची ओळ होशिल तू जशी, जगा विसरीन मी ............................अज्ञात (१०/०७/२०१३)
  • Log in or register to post comments

आधी दिलेल्या अनुवादात अजून

अज्ञातकुल
Sun, 07/14/2013 - 18:45 नवीन
आधी दिलेल्या अनुवादात अजून थोडा बदल करून................... हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज जाणले मी आठवावे तू मला आता तरी सुखवेन मग मी लोपले तिमिरात अवघे यातना उश्वास सारे जाळतो मी ना दिसे कांही तरीही एकटा आधांतरी फिरतोय मी एक वांछा तू असावी तेवणारी ज्योत मंगळ ह्या तमी ओळखीची ओळ व्हावी तू, मरण जगवीन मी ............................अज्ञात (१०/०७/२०१३)
  • Log in or register to post comments

छान!

पैसा
Sun, 07/14/2013 - 20:57 नवीन
शब्दशः अनुवाद न करता भावानुवाद छान जमला आहे!
  • Log in or register to post comments

तरल भावानुवाद

रसिया बालम
गुरुवार, 07/18/2013 - 01:35 नवीन
माझी आवडती गझल मराठमोळ्या रूपात..... धन्यवाद साहेब!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा