एका सागरात....

अनंतसागर's picture
अनंतसागर in जे न देखे रवी...
11 Jul 2008 - 8:00 pm

एका सागरात एक जन्मा आली लाट,
जीवनाच्या प्रवासाची केली तिने सुरुवात.
तिच्या सवे होत्या तिच्या सख्या अन्य लाटा,
या सागरातून त्या सागरात ती राहिली फिरत.
एका सागरात एक जन्मा आली लाट.

कधी चंद्र सुर्याची लाभे तिला साथ,
कधी अवसेचा काळोख पदरी येत.
तरीही नाही भ्याली राहिली चालत.
एका सागरात एक जन्मा आली लाट.

चालता चालता तिला दिसला किनारा,
मॄत्यु पुढे पाहून तिचा जीव घाबरा झाला.
डोळ्यात उभे राहिले अश्रु तिच्या नकळत.
एका सागरात एक जन्मा आली लाट.

तिला रडताना पाहून सोबतीन म्हणाली,
"रडू नको गडे ही सुवर्णसंधी आली,
ज्याने जन्म दिला होने त्यात सामाविष्ट,
याहुन मोठे सुख नाही या जगतात."
एका सागरात एक जन्मा आली लाट.

कविताविचार